|
Gs1
| |
| Friday, July 28, 2006 - 7:46 am: |
| 
|
महिला मंडळात अतिक्रमणाबद्दल क्षमस्व. हा किस्सा आमच्या मातोश्रींनी सांगितलेला, पण तरीही इतका अविश्वसनीय की मी अजूनही 'तू काहीतरीच सांगतेस' असे तिला म्हणतो. आमच्या आजोळच्या एका लग्नामध्ये 'झाल' या प्रकारात गुरूजी म्हणाले की आता सासूबाईंच्या मांडीवर बसा तर त्यांच्या सांगण्या बघण्यात काय चूक झाली माहीत नाही पण मुलीचे वडील पटकन उठले आणि काही कळायच्या आत विहिणबाईंच्या मांडीवर जाऊन बसले. लोक हसून गडाबडा लोळले. ते अगदी किरकोळ शरीरयष्टीचे, खूपच उत्साही व सज्जन गृहस्थ आहेत. पण नंतर त्यांना कुठे तोंड लपवू असे झाले होते. तरी 'झाल' हा शेवटचाच विधी होता म्हणून बर. आता आजोळी कोणत्याही लग्नाला गेलो तरी हा विषय एकदा निघतोच आणि 'रेखाच्या लग्नात काय गंमत झाली होती हो ? ' असे थेट त्यांना निष्पापपणे विचारायच्या पैजाही लागतात.
|
Gs1 ! विहिणीच्या मांडीवर सही आहे किस्सा! अज्जुका, तुझे पोस्ट वाचून खरंच वाचावेसे वाटले ते पुस्तक! छ्या! आणि आता ते कार्ल्याचे इथे न लिहिता येण्यासारखे काय बरं असावे या विचाराने पार भुंगा लागला डोक्याला
|
Arch
| |
| Friday, July 28, 2006 - 1:02 pm: |
| 
|
Maudee, GS1 मजा आली वाचून. 
|
Yogibear
| |
| Friday, July 28, 2006 - 1:32 pm: |
| 
|
Gs1: सही किस्सा आहे... 
|
Milindaa
| |
| Friday, July 28, 2006 - 1:56 pm: |
| 
|
अज्जुका, कोणत्या वर्षाचा दिवाळी अंक शोधते आहेस? LOL GS
|
Moodi
| |
| Friday, July 28, 2006 - 2:07 pm: |
| 
|
जी एस खूपच धमाल. नंतर काय अवस्था झाली असेल त्यांची. तुम्ही लिहीलेत तरी कल्पनाच करवत नाही. 
|
GS1 अज्जुका, सहीच वाचले पाहिजे ते पुस्तक.
|
Ajjuka
| |
| Friday, July 28, 2006 - 6:56 pm: |
| 
|
२००२ च्या दिवाळी अंकात सालंकृत म्हणून दागिन्यांसमंधी लेख लिहिला होता मी. तो अंक सध्या शोधतेय.. प्रतिक्रिया मधे २००४ अनि २००५ चेच अंक आहेत. आधीचे नहीयेत
|
Ajjuka
| |
| Friday, July 28, 2006 - 7:13 pm: |
| 
|
MT .. ही ही ही... keep guessing थोडं आमच्यासारखं तिरकं डोकं चालव, लग्गेच कळेल इथे सांगण्यासारखा का नाही ते. :P
|
Storvi
| |
| Friday, July 28, 2006 - 8:08 pm: |
| 
|
ही घ्या लिन्क
|
Zelam
| |
| Friday, July 28, 2006 - 8:08 pm: |
| 
|
अज्जुका ही घे दिवाळी अंकाची link /user/hda_2002/home.htm
|
Bee
| |
| Saturday, July 29, 2006 - 1:33 am: |
| 
|
अज्जुकाचा तो सालंकृत लेख मला चांगलाच आठवतो. आता वरच्या लिंक वर गेलो आणि तिथे बेटीचा जुना लेखही वाचला. अगदी भरून आले मला.. कुठे हरवली ही बया..
|
Zakki
| |
| Tuesday, August 01, 2006 - 7:13 pm: |
| 
|
Fusion! गेल्या शनिवारी माझ्या महाराष्ट्रीय मित्राच्या मुलीचे लग्न एका अमेरिकन ख्रिस्चन मुलाशी झाले. दोन वेगळे समारंभ करण्या ऐवजी एक ब्राम्हण व एक प्रीस्ट मिळून त्यांनी Fusion केले. म्हणजे एक विधी वैदिक पद्धतीने, तर एक ख्रिस्चन पद्धतीने. थोडक्यात मधून मधून प्रीस्ट काही काही बायबलमधील उतारे म्हणून दाखवत होता. वगैरे, वगैरे. पण आपला होम, सप्तप्दी झाली. मंगलाष्टके झाली नाहीत, अंतर्पाट नाही. अक्षतारोपणाच्या जागी vows by bride & groom वगैरे. असे करून एकदाचे दोन्ही पद्धतीचे लग्न दीडएक तासात आटोपाले. मग अस्सल अमेरिकन पद्धतीने कॉकटेल्स, डाँस, जेवण, चमच्यांची किणकिण, टोस्ट, विनोदी भाषणे इ.
|
Gondhali
| |
| Wednesday, August 02, 2006 - 8:42 pm: |
| 
|
झक्की काका, अमेरीकेत हे ABCD (American Born/brought-up, Confused Desi) लोक काय करतील याचा नेम नाही... HOT DOG बासुन्दी मध्ये बुडवुन नाही ना खाल्लात उद्या ह्या मेनु ला पण Fusion म्हणतील
|
Zakki
| |
| Wednesday, August 02, 2006 - 10:30 pm: |
| 
|
पोळीला भाजीसारखा, मसालेभात लावून खाताना मी बघीतले आहे. नि आपल्या सारखा हाताने भाताचा घास त्यांना खाता येत नाही! साबूदाणा वडे ऐवजी साबूदाण्याची खिचडी भरलेले मोठ्ठे समोसे, जेवणात शाकाहारी लोकांसाठी ठेवले होते. आपले रसमलाई, बासुंदी, जिलबी असे पदार्थ त्यांना आवडत नाहीत. विशेषत: दुधाचे गोड पदार्थ तर नक्कीच नाही. जाऊ दे. आपल्याला तरी त्यांच्या स्टेक्स नि इतर गोष्टींचे कुठे कौतुक वाटते. फारतर पिझ्झा. बाकी आपले उगीच खायचे म्हणून!
|
Arch
| |
| Thursday, August 03, 2006 - 1:56 pm: |
| 
|
झक्कि, अस कोण fusion लग्न लावत हो NJ मध्ये. आमच्या इथले एकजण शोधत होते त्यांच्या मुलिच्या लग्नासाठी. कारण देवळातले लोक अस लग्न लावायला तयार नसतात. हे कोण तुमचे भटजी दुसरीकडे जात असले तर त्यांच नाव ओळखिच्यांना सांगते.
|
Zakki
| |
| Thursday, August 03, 2006 - 4:30 pm: |
| 
|
हे गुरुजी ऑस्टिन, टेक्सास येथून आले होते. ते पूर्वी न्यू जर्सीत रहात असत. माझा मित्रहि इथेच तीस वर्षे राहिला होता, नि मुलगी नि जावई इथेच रहातात. म्हणून त्या गुरुजींना मुद्दाम ऑस्टिनहून इथे आणले होते. 'Resident' NJ चे गुरुजी फार बिझी होते. त्यांचे नाव, नंबर माझ्या मित्राला विचारून सांगतो.
|
आता लग्नाचा विषय चालला आहे तर आमच्या खान्देशी लग्नाची चित्तरकथा पण एका. आमच्याकडे लग्नाचे मुहुर्त फ़क्त एप्रिल, मे महिन्यातच आसतात, आनि टेम्परेचर ४४ पर्यन्त आसते, लग्नात सध्याच्या सिज़न मधे २०००-२७०० लोक आसतात. नवरदेव सकाळी ९.०० वज्त पारावर जातो. आनि मग नवरिचा भाऊ (त्याला "सुख्या" म्हनतात ) घोड्यावर बसुन नवरदेवाला घ्यायला जातो, एकदा का वरात सुरु ज़ालि कि मग ""नाचा रे" कोनिच आडव्नारे नाहि, ढोल आनि ताशे वाजतात आनि बस " नाचो रे" काहि मोठे लोक घाई करय्च प्रयत्न करतात, पण सगळेच मुड मधे..! आनि मग १.०० ते २.०० ला वरात पोचते, मंगलआष्तके, फ़ेरे ज़ले कि मग भेटनारे लोक येतात आनि मुलगा मुलगि पाय पडुन पडुन परेशान होतात. जेवणे आटोपलित कि मग ४.०० ते ५.०० वाजता हळद फ़ेडण्याचा कार्यक्रम होतो. ह्यात नवरदेव आनि नवरी दोघे तोडात पाणि घेवुण एकमेकावर पिचकारि मारतात. पाण्यात दूध टाकुन एक पिचकारि तर मध टाकुन एक पिचकारि कधि साखर टाकुन एक पिचकारि...... नन्तर नॉर्मल बीदाई....... खेल खतम..... कसा वाटला आमचा ख़ान्देशि लग्नाचा सोहला???
|
Alpana
| |
| Thursday, May 31, 2007 - 6:39 am: |
| 
|
गेल्या महिन्यात एका गढवाली लग्नाला गेले होते... लग्न तर नाॅर्थ ईन्डीयन लग्नाप्रमाणेच झले... म्हणजे सकाळी हलदी हाथ, त्यानंतर मुलानी भीक्शा मागायची... सन्ध्याकाळी बारात... मग बारात चे स्वागत.. त्यानंतर जयमाला... रात्रभर फेरे वैगरे... पहाटे पासुन बिदाइ.. यात वेगळे जर काही होते तर ते म्हणजे नवरीची नथ.. ती गोल नथ असते ना कभी कभी मधल्या राखी सारखी तशी ती पण चक्क १ तोळा सोन्याची.. पुर्वी ह्यापेक्शा मोठ्या नथी असायच्या म्हणे आता किमान येवढी असते.... बिचारी नवरी पाणी पण स्ट्राॅ ने पीत होती
|
Alpana
| |
| Friday, June 01, 2007 - 6:59 am: |
| 
|
दिपान्जली ने पन्जाबी लग्नाच्या आधीच्या काही समारन्भाबद्दल लिहिलय मागे... लग्नानन्तर पण बरेच छोटे विधी असतात.. त्यातही मज्जा येते..आणी हे सगळे लाडी शी म्हणजे नवरीशी सम्बन्धीत असतात. एका विधीत नव्या नवरीच्या मान्डीवर धाकट्या दिराला बसवतात, ज्याचे लग्न नेक्स्ट ड्यु आहे. माझ्या मान्डीवर माझा २६ वर्षाचा दिर बसला होता..जोपर्यन्त त्याला नवरी शगुन देत नाही तोपर्यन्त तो मान्डीवरुन उठत नसतो... मी तर पुर्ण पर्स त्याच्या हातात ठेवली लवकर उठावा म्हणुन
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|