|
गिरी... मी जेव्हा नव्याने कामाला लागले होते आणि entertainment reporter म्हणून काम करत होते, तेव्हा ऑफ़िसमधल्या एका इम्रान नावाच्या सीनीअरला मी कतरीना ही कैफ़ची सावत्र बहीण आहे हे सांगितलं होतं... तो बिचारा "हा सच मे क्या? दोनो के चेहरे भी एक जैसे है ना.." असं म्हणाला होता. अख्खं ऑफ़िस हसत होतं. इम्रान आमचं आवडतं इब्लिसपणा करण्याचे टारगेट. तो बंगाली होता आणि कम्युनिस्ट होता. सगळ्यात आधी शिव्या त्यालाच बसायच्या... समलान कतरीनाचे अद्याप लग्न झालेले नाही. आणि एवढ्यात होईल असे वाटत नाही. सलमानला सध्या कतरीनाच्या करीअरची काळजी आहे. आणि तीपण चांगलं काम करत आहे. सलमान आणि तिच्या वयामधे वीस वर्षाचा फ़रक आहे. पण ती सलमानला मस्त control करू शकते. एकदम opposite स्वभाव असणारे दोघं आहेत.
|
Sayonara
| |
| Friday, May 25, 2007 - 3:58 pm: |
| 
|
अज्जुका, बरं झालं metro बद्दल लिहिलस. DVD आणण्याआधी समोर काय वाढलंय ह्याची कल्पना असलेली चांगली असते. 
|
Ajjuka
| |
| Friday, May 25, 2007 - 6:22 pm: |
| 
|
वरण भात नाहीये आणि पंचपक्वान्नांची मेजवानीही नाहीये. पावभाजी आहे पार्ल्यातली चटईवरची, मारूतीची...
|
Yog
| |
| Friday, May 25, 2007 - 8:50 pm: |
| 
|
1971: must see... esp. for stunts! किती सहज आणि भिडणारे अभिनय आहेत सर्वान्चे. काही काही दृष्ये पाहताना अन्गावर शहारे येतात ( hotel मधे एक जवान स्वताच्या डोक्यात गोळी मारून घेतो, तो scene तर केवळ आरपार उतरतो... रामानन्द सागर च्या मुलाच(?) या पहिल्या प्रयत्नाच कौतुक कराव तितक कमी आहे.. शेवट थोडा अपेक्षितच वाटला तरिही परिणामकारक आहे. this movie is much much better than previous ones such as LOC , वीर झारा वगैरे.. Looking fwd to more from this movie maker..
|
Farend
| |
| Saturday, May 26, 2007 - 12:07 am: |
| 
|
अज्जुका तो चित्रपट बहुधा " Wall Street ". Charlie Sheen & Daryl Hannah यांच्यात बहुधा तसा शॉट होता. जबरदस्त चित्रपट आहे. मलासुद्धा अंधुक आटवतय.
|
Hems
| |
| Saturday, May 26, 2007 - 1:31 am: |
| 
|
अज्जुका , तुझा report वाचल्यामुळे metro बघायलाच हवा आता! मस्त लिहिलायस.
|
Slarti
| |
| Saturday, May 26, 2007 - 4:21 pm: |
| 
|
Bug काल Bug बघितला. हा खरंतर २००६ मध्ये मर्यादित चित्रपटगृहांमध्ये प्रकाशित झाला होता, आता आणखी विस्तृतपणे पुनर्प्रकाशित झाला आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आहे विल्यम फ्रीडकीन. त्याने Exorcist दिग्दर्शित केला होता, त्यामुळे जरा उत्साहाने बघायला गेलो होतो. पण जबरदस्त अपेक्षाभंग झाला. कामे चांगली झाली आहेत. कथाबीजही खरेतर चांगले आहे. ओक्लाहोमामधील एका middle of nowhere अशा मोटेलमध्ये राहणार्या एका बाईच्या आयुष्यात एक मानसिक तोल ढळलेला आत्यंतिक paranoid & dillusional माणूस जेव्हा येतो तेव्हा काय होते ते दाखवले आहे. या माणसाला सर्वत्र किडे दिसतात, अमेरिकन मिलिटरीने त्याच्यावर काही अघोरी प्रयोग केले आहेत व आता त्याच्या शरीरातसुद्धा किडे भरलेले आहेत असे तीव्र भास होतात. काही काही गोष्टींमध्ये दिग्दर्शकाची उत्तम झलक दिसून येते. उदा. कूलर सुरू झाल्यावर त्याला चिकटलेल्या काही कापडी पट्ट्या हवेच्या झोताबरोबर हलू लागतात आणि 'दोन praying mantis हलत आहेत किंवा त्यांचे मिलन चालले आहे' असा भास निर्माण होतो. या आभासाचा संदर्भ नंतर लागतो. ***Spoiler Warning*** दुसरी मला आवडलेली गोष्ट म्हणजे ऍग्नेसला कोणाच्या तरी साथीची खूप गरज आहे आणि त्याचवेळी (किंवा कदाचित त्यामुळेच) ती कमजोर मनाची आहे आणि बाह्य घटकांनी लगेच प्रभावित होऊ शकते हे छान सुचवले आहे. म्हणजे तिला मुलगा होता, पण सध्या तिचे ती ज्या lesbian bar मध्ये काम करते तिथे काम करणार्या एका lesbian बाईशी संबंध आहेत, (हे केवळ 'ती bisexual आहे' असे म्हणून बाजूला सारता येण्यासारखे नाही असे मलातरी वाटते, शिवाय तिची मैत्रीण कणखर आहे, परिस्थितीचा charge घेणारी आहे हेही सुचक वाटते.) तिचा boyfriend जेव्हा तुरुंगातून परत येऊन तिच्यावर हक्क गाजवायला बघतो तेव्हादेखिल ती प्रतिकार करत नाही, पोलिसांना बोलवण्याच्या धमक्या देते पण प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही, अनोळखी पीटरला ती तिच्या घरी लगेच झोपू देते वगैरे गोष्टींमधून ऍग्नेसची व्यक्तिरेखा उत्तम चितारली गेली आहे. पीटरचे बोलणे, त्याच्या चेहेर्यावरील शून्यभाव, सतत कोणीतरी त्याच्या मागावर असल्यासारखा त्याचा वावर ('आता टेकू की मग टेकू') हेही त्याच्या वेडेपणाची व्यवस्थित साक्ष देतात. ***Spoiler End*** पण हे सर्व असूनसुद्धा हाताळणीमध्ये दिग्दर्शक over the top गेला आहे असे वाटले. म्हणजे चित्रपटाचे अपेक्षित genre आहे psy-thriller , पण चित्रपट पकडच घेत नाही. एक तर सुरुवातीचा अर्धा ते पाऊण तास बर्यापैकी संथ आहे. अशा चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा काळजीपूर्वक आणि सविस्तर रेखाव्या लागतात हेही समजू शकते. पण ते करताना जर वेग घेतला नाही तर प्रेक्षक गुंगून राहत नाही आणि तेच इथे झाले आहे. परिणामी सुरुवातीला प्रेक्षक hook व्हायला तयार असतात, धीर धरतात पण त्या susceptible mode मध्ये काही मर्यादित काळच राहू शकतात हे दिग्दर्शक विसरला आहे असे वाटते. त्यामुळे चित्रपटाने थोडा वेग घेतल्यावरसुद्धा सर्वांनाच अतिशय अनपेक्षित (पक्षी दिग्दर्शकास) ठिकाणी हसू येत होते. उदा. Ashley Judd तिच्या मैत्रिणीच्या तोंडात मारते ते दृष्य विनोदी वाटते आणि पकड बसायला लागली आहे की काय असे वाटत असतानाच आपण परत शून्य होतो. ऍग्नेस व पीटरमधील चुंबनदृष्य poignant तर राहूच द्या पण गेला बाजार erotic देखील न होता किळसवाणे होते, प्रणयदृष्याला लांबण लागली आहे, पीटरचे गुप्तांग कॅमेर्यात दिसू नये म्हणून जो आटापीटा केला आहे तो तर फारच विनोदी आहे. परत तिथे प्रसंगाचे गांभीर्य निघून जाते. शिवाय जो काही रक्तपात दाखवला आहे तो फक्त किळसवाणा ठरतो. आता Se7en मध्ये तर याहूनही जास्त किळसवाणी दृष्ये आहेत, पण narrative असा जबरदस्त आहे की तिथे ती अंगावर येतात, इथे ती फक्त डोक्यात जातात. माझ्यासाठी तर चित्रपट हा अनुभव न होता चित्रपट बघणे हाच एक महान अनुभव झाला. लोक मोठमोठ्याने सही comments मारत होते Peter : Do I look like an asshole ? More than half the audience : YES !! वगैरे थोडक्यात, अमेरिकन चित्रपटगृहात एकदम देशी थेट्राचा छान अनुभव मिळाला हीच जमा.
|
चीनी कम पाहीला. ग्रेट!!! . बासू चतर्जी,हृषिदा, गुलजार यांचे चित्रपट ज्याना आवडतात त्याना फारच आवडेल. अमिताभचा करीअरमधल्या उत्कृष्ट भूमिकातील एक. तसेच तबूच्याही. पात्रयोजना इतकी पर्फेक्ट की विचारू नये. इलिया राजाचे आऊट्स्टन्डिन्ग संगीत.संवाद हा या चित्रपटाचा मोठाच asset आहे. परेश रावळच जरा फिका आहे. ८० टक्के वेळ अमिताभ पडद्यावर असूनही सलत नाही. अप्रतिम अभिनय आणि voice culture मायबोलीकराकरता a must see!!!
|
अरेच्चा चीनी कम अजून कोणीच पाहीला नाही का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 29, 2007 - 6:32 am: |
| 
|
रॉबीन, सगळ्या पेपर्समधे चांगले रिपोर्ट आले आहेत. बघायला हवा.
|
Sashal
| |
| Tuesday, May 29, 2007 - 4:29 pm: |
| 
|
Persuit of happiness .. तसा चांगलाच आहे, पण मध्ये रखडल्यासारखा वाटला .. Will Smith ने छान काम केलंय आणि त्या लहान मुलाने सुध्दा ..
|
Sas
| |
| Tuesday, May 29, 2007 - 6:56 pm: |
| 
|
अतिशय बिंडोकपणा, पाचकळपणा यांची शाब्दिक रटाळवाणी कथा (कथा म्हणण्या पेक्शा फालतुगिरी) म्हणजे "नि:श्ब्द" , "Take light" एकत एकत अवजड प्रकाराच ओझ शेवट पर्यंत उचलयची मानसीक तयारि असेल तरच आपला वेळ "नि:श्ब्द" ह्या प्रकारास द्यावा
|
Karadkar
| |
| Tuesday, May 29, 2007 - 7:22 pm: |
| 
|
सशल, अग तो मुलगा विल चा स्वत्:चा मुलगा आहे.
|
Himscool
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:42 am: |
| 
|
हूडा तुझ्या चीनी कम वरील पोस्ट ला अनुमोदक... खरच छान चित्रपट आहे... अत्यंत अटोपशीर मांडणी... अमिताभ बच्चन, तब्बू, जोहरा सेहगल आणि ती छोटी मुलगी सगळ्यांचे काम फारच सुरेख...
|
Alpana
| |
| Wednesday, May 30, 2007 - 10:29 am: |
| 
|
खरच मस्त आहे चीनी कम....
|
Mansmi18
| |
| Thursday, May 31, 2007 - 5:22 pm: |
| 
|
नुकताच "बोराट" नावाचा चित्रपट पाहिला. यात काय विनोदी होते मला कळले नाही. अतिशय किळसवाणा वाटला. शक्यतो टाळा.
|
Monakshi
| |
| Friday, June 01, 2007 - 5:18 am: |
| 
|
बोराट???? कुठल्या भाषेतला आहे?
|
येऊ शकते की हा परीसर कसा दिसेल याची. हे सगळं त्याने आपल्या dream girl ला दाखवणं आणि तीचे त्याच्या बॉसबरोबरच लफडं असणं... etc.. आठवतोय का कुणाला तो चित्रपट? मी बहुतेक HBO किंवा star movies वर पाह्यला होता. <<<<<<अज्जुका , Farend त्या movie चं नाव ,'The Apartment'. मला पण मेट्रो आवडला , music सकट .
|
Bee
| |
| Friday, June 01, 2007 - 7:09 am: |
| 
|
काल इथे बुद्धपौर्णिमेची सुटी होती. बाहेर पाऊन निनादत होता. मी घरी बसून रेंचा 'चारूलता' पाहिला. त्यानंतर six moral tales मधील काही tales बघितल्यात. Frech संग्रह आहे हो ६ कथांचा. माझा वेळ खूप चांगला गेला. रेंचे चित्रपट साधे जरी असले तरी कितीतरी अभ्यासपुर्वक आणि अत्यंत रसरशीत असतात. मला आता त्यांच्या चित्रपटांचे वेड लागले आहे. सौमित्र चटर्जीचा अभिनय तर बघतच बसावा इतका सुरेख आहे. माधबी मुखर्जी तर अफ़लातून काम करते. जशी मीना कुमारी संथ अभिनेत्री आहे तशीच माधबी मुखर्जी आहे. पण त्यातूनही तिचा अभिनय प्रगट होतो. कृष्णधवल चित्रपटांची आपलीच एक मजा असते. हल्लीच्या अति शृंगारीत चित्रपटांना कंटाळून कंटाळून मी कृष्णधवल चित्रपटांकडे ओढला गेलो. मला हल्लीच्या चित्रपटांचा loudness अजिबात सहन होत नाही. इतका आवाज की घर फ़ुटुन मी बाहेर पडेन की काय असे होते..
|
Farend
| |
| Friday, June 01, 2007 - 7:33 am: |
| 
|
Deepanjali Wall Street मधेही तसंच आहे ना? चार्ली शीन तिला असाच काहीतरी प्लॅन दाखवतो, पण तिचे (आधी) मायकेल डग्लस बरोबर अफेअर असते?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|