|
Dhumketu
| |
| Monday, May 14, 2007 - 5:15 am: |
| 
|
आता ठश्यांना बार लावलेले दिसतात.. आधी तुम्ही सहज हाताच्या ठश्यावर आपला हात ठेऊ शकत होतात. त्यामुळे हाताचा ठसा बर्यापैकि मोठा झालेला दिसतो.. खालील ठिकाणी महाराजांच्या देवळातला फ़ोटो आहे. http://members.tripod.com/~danand/home/fly/trek/shivaji/shivaji.html
|
Itsme
| |
| Monday, May 14, 2007 - 5:21 am: |
| 
|
बाकी सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर जिल्हा आहे असे माझे मत झाले आहे. अजुनही बर्याच गोष्टी बघायच्या राहील्या आहेत, तेंव्हा अजुन एक वारी निश्चीत इतक्या कमी वेळेत, इतकी ठिकाणे, इतक्या सहज बघुन, एक परिपुर्ण आणि आनंददायी सफर पार पाडण्याचे सगळे श्रेय, अर्थातच GS चे. त्याच्या आयोजन / नियोजनाला १०० / १०० गुण बहाल ( मंडळातर्फे ) 'एक' मताचे फायदेही असतात की रे cool !!
|
Saee
| |
| Monday, May 14, 2007 - 6:55 am: |
| 
|
GS आणि सुभाष, मस्त. दौर्यादरम्यान घडलेल्या रंजक किश्श्यांचीही फोडणी द्या थोडी, कारण इतके सगळेजण होतात म्हणजे नकीच मज्जेचा आणि हास्यफवार्यांचा महापूर लोटला असेल. कुणीतरी कुणाच्या तरी खोड्या काढणे आणि खोडकराला तसेच प्रत्युत्तर हे झालंच असेल शिवाय त्यात मोकाशांचा प्रसादही सोबत म्हणजे मैफिलीही, त्यामुळे फक्त प्रवासाचा वृत्तांत देऊन आमच्या तोंडाला पाने पुसू नका. सगळं वाचून आणि फोटो बघून माझा अवर्णनीय आनंद मी पुन्हा अनुभवला. सुभाष आणि फदी, फोटोंना लवकर नावे द्या. केवळ अविस्मरणीय! कितीही खाल्लं तरी पोटच भरत नाही कारण मुद्दलात मनच भरत नाही असा काहीसा प्रकार आहे हा सगळा. हाच सगळा टापू पालथा घालायला ८ दिवसांच्या २ खेपा घालाव्या लागल्या आणि तरीही अजुन पुष्कळ बाकी आहे. पण सगळं वाचताना एकुणच तुम्हाला वेळेला महत्व देऊन धावाधाव करावी लागली असं दिसतं आहे. पुढच्या वेळेला कोणत्याही कार्यक्रमाशिवायचे एखाददोन जास्तीचे दिवस हाताशी ठेऊन गेलात तर खुप उपयोग होईल. नाहीतर परतताना मनाची घालमेल होते खुप. आरती, रत्नागिरी जिल्हादेखिल इतकाच स्वच्छ आहे. त्यामुळे पुढच्या बेताच्या तयारीला लागलीस तरी चालेल. मी कोकणातल्या निसर्गाइतकेच हे दौरे यशस्वी होण्यासाठी महामार्ग आणि सा. बां विभागाचेही न चुकता आभार मानते. जे तुम्हीही मान्य कराल. मोठे रस्ते असोत की आडगावातल्या वाटा, अप्रतिम रस्त्यांनी (पुणेकर तर जरा जास्तच सुखावतात) या आनंदात मोलाची भर पडते. अन्यथा गाडीच्या काळजीतही बरच लक्ष लागून राहतं. धुमकेतूप्रमाणेच फोटो बघून मलाही वर्षभरात देवळे आणि परिसरात बराच फरक दिसला. कुणकेश्वराचं रंगरंगोटीपुर्वीचं रुप जास्त देखणं होतं. असो. वेळेअभावी मार्गावरचे बरेच काही तुम्ही सायडींगला टाकून पुढे गेलात ते लवकरच पुर्ण कराल आणि त्या पुढचा बेतही असाच धमाल आनंदाचा होवो ही मनापासून शुभेच्छा.. (पुढच्या वेळी पुन्हा उलट्या दिशेने जाऊन किरणपाणीतून चारचाकीसकट तेरेखोल ओलांडून गोव्यात शिरुन वायव्य गोव्यातल्या खेड्यांमधुन दिनेशकडे पोचा मजा येईल..)
|
Giriraj
| |
| Monday, May 14, 2007 - 7:31 am: |
| 
|
तेरेखोलवरून किरणपाणीच्या फ़ेरीने गोव्यातल्या केरीला पोचता येते. ह समुद्रकिनारा खूप सुंदर आणि दुर्लक्षीत असल्याने खूपच स्वच्छ आहे! हीच किरणपाणीची फ़ेरी ओलांडतांना तांत्रिक गडबड झाल्याने आम्ही फ़ेरीसकट समुद्रात खूप वेगाने वाहून गेलो होतो. पण एक दोघांच्या प्रसंगावधानाने फ़ेरी पुन्हा किनार्याला लागलो. तेव्हही पोहाणे शिकायचे ठरवले होते.पण अजूनही नाही शिकलो. आरति,तुझा जाहीर निषेध! GS चे कौतुक न करण्याची शपथ घेतली होती ना आपण!!
|
Itsme
| |
| Monday, May 14, 2007 - 9:27 am: |
| 
|
काल तो cool ला १५० रुपये देतो म्हणाला, मला वाटले मला पण मिळेल काहीतरी, फुल ना फुलाची पाकळी ... अर्थात तुझा निम्मा वाटा त्यात असणारच (लगेच जाहीर निषेध करण्याची काही गरज नाहिये) ......
|
१५० रुपये तुम्ही ट्रेक ला गेले होतात कि मतदानाला 
|
Dineshvs
| |
| Monday, May 14, 2007 - 5:51 pm: |
| 
|
सई, आमंत्रण का द्यायला हवय या मंडळीना ? अगदी लहानपणापासुन हा सगळा भाग बघत आल्याने, कोकणी माणसाची अनास्था माझ्याही डोक्यात शिरलीय. लहानपणी, किल्ल्यात ? काय्येक बगण्यासारके ना s S S य, अशीच प्रतिक्रिया येत असे. सिंधुदुर्ग हे नावही गेल्या १० ते १५ वर्षातच, खास करुन जिल्हा झाल्यानंतर प्रचारात आलेय. आधी तो नुसताच किल्ला होता. पुर्वी किल्ल्यात जायला नियमित होडी सेवाही नव्हती. होडीवाला आधी ठरवावा लागे. मुंबईकर आले कि त्याना घेऊन, रोज बाजारात जाणे, सिनेमाला जाणे, हाच उद्योग असायचा. मी मात्र समुद्रात, वाळुन खेळत रहायचो.
|
Cool सचित्र वृतांताची मजा काही औरच... आंबे संपले का?
|
Psg
| |
| Tuesday, May 15, 2007 - 6:17 am: |
| 
|
GS1 आणि कूल, मस्त लिहिलं आहे. त्याहून मस्त तो अनुभव असणार यात शंका नाही! फोटो अप्रतिम आहेत. thanks for sharing
|
Cool
| |
| Tuesday, May 15, 2007 - 6:41 am: |
| 
|
आंबे संपले का? >>> नाही अजुन, रोज आठवणीने खातोय, कधी येतोस खायला..
|
Zakasrao
| |
| Tuesday, May 15, 2007 - 10:46 am: |
| 
|
नाही अजुन, रोज आठवणीने खातोय,>>>> आता गिरी धाड टाकेल बघ किंवा टाकली असेल देखिल.
|
जीस परत जेव्हा भरत गड कराल तेव्हा मुक्काम माज़्या घरी, मसुरे येथेच दोन किलोमीटर वर आहे आमचे घर.
|
GS , कूल, सफ़रीचा वृत्तांत मस्त लिहिलाय. कोंकणच्या प्रेमात पडलो अगदी. पुन्हा कधी जायला मिळतय असे झालय. तार्कर्लीच्या समुद्रात स्नान केल्यानंतर कोकणाकडे बघण्याची एक " वेगळीच दृष्टी " मला लाभली. कूलचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कुणकेश्वरच्या भक्तनिवासात झोपायला जागा कमी पडत होती तर बिचारा लोककल्याणासाठी पलंगाखाली जाऊन झोपला. काय GS?
|
Phdixit
| |
| Sunday, May 20, 2007 - 6:39 am: |
| 
|
GS कुल वृत्तंत मस्तच. आरती आणी कुल तुम्हा दोघांचे अभिनंदन. फोटोंना नावे देण्याचा प्रयत्न केला आहे आणी आजुन काही फोटो अपलोड केले आहेत. फोटो येथे आहेत प्रसाद तुला आजून काय काय मिळाले तारकर्लीच्या किनार्यावर विजयदुर्ग आणी वेंगुर्ले चे पुर्वी काढलेले काही फोटो
|
Cool
| |
| Monday, May 21, 2007 - 5:37 am: |
| 
|
तार्कर्लीच्या समुद्रात स्नान केल्यानंतर कोकणाकडे बघण्याची एक " वेगळीच दृष्टी " मला लाभली. >>> प्रसाद कूलचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कुणकेश्वरच्या भक्तनिवासात झोपायला जागा कमी पडत होती तर बिचारा लोककल्याणासाठी पलंगाखाली जाऊन झोपला. >>> जगाच्या कल्याणा संताच्या विभुती
|
Itsme
| |
| Monday, May 21, 2007 - 12:26 pm: |
| 
|
cool तु पण .... !!
|
तार्कर्लीच्या समुद्रात स्नान केल्यानंतर कोकणाकडे बघण्याची एक " वेगळीच दृष्टी " मला लाभली. >>> आँ? मी तारकर्लीच्या समुद्रात स्नान केले तेव्हा अंग खार्या पाण्याने चिक चिक झाले अन कातडी ओढून धरल्यासारखी ताणली जाऊन अस्वस्थ वाटले... म्हणजे एक तर ती तारकर्ली दुसरी असेल किंवा तुमची कातडी मानवी नसावी.. त्वचा जणू गेंडियाचे चर्म....
|
हूड, मी माझ्या " दृष्टी " बद्दल बोलत होतो. तुम्ही तुमच्या चिक चिक झालेल्या कातडीने कोकण बघत होता की काय ? आणि गेंड्याची कातडी तर सरकारी कर्मचार्यांची असते असे म्हणतात
|
Svsameer
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:02 am: |
| 
|
gs आणि कुल सही लिहिलयत रे. खुप धमाल केलीत. मी तिथलाच असुन आजपर्यन्त ह्यातल्या काही गोष्टी अजुन पाहिल्या नाहि आहेत
|
फदी, तू पुर्वी कोकणातल्या घराचे एक चित्र टाकले होतस. त्यावर त्या वेळी मला सुचलेली कविता पुन्हा आठवली या सहलीनंतर. घर माडांच्या छायेतूनी जाई एक वाट गुंजारव सोबतीला सागराची लाट. वाटेवर वाट पाही उभे माझे घर पावलांच्या चाहुलीने दारी थरथर. लालकाळ्या कौलांवर थेंब पावसाचे आसुसल्या डोळी जसे थेंब आसवांचे. वाळूतुनी खेळू लागे पुन्हा बालपण आठवांनी मंतरला तिचा कण कण. सागराचे पाणी घाली अंगणात सडा रेतीतल्या रांगोळीस शिंपल्यांच्या कडा. धपापल्या आयुष्यात अशा आठवणी उन्हाळल्या जीवा जसे शहाळ्याचे पाणी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|