| 
   | 
| | Disha013 
 |  |  |  | Thursday, May 24, 2007 - 8:30 pm: |       |  
 | 
 
   ९० अंशाचा कोन करुन भिंत चढतो?  imagine  करुन बघितले,कल्पनेतही शक्य वाटत नाहीये!
 
 
 |  | | Supermom 
 |  |  |  | Thursday, May 24, 2007 - 9:43 pm: |       |  
 | 
 बहुधा त्याला त्या काळी  spider  चावला असावा.
   
 
 |  | शेषनाग नामक चित्रपट आठवतोय का?
 त्यात ड्यानी डेन्गझोप्पा अघोरी नामक छानसे नाव बाळगणारा मांत्रिक कम खलनायक दाखवला आहे. तो म्हणे ग्लासच्या ग्लास सर्पवीष पिऊन जालिम विषारी बनलेला असतो. त्याला भेटायला येणारे
 लोक एका चषकात झगमगते निळ्या रंगाचे द्रव्य वीष म्हणून त्याला सादर भेट देतात.
 त्यावर तो "इतनासा? इससे तो मेरे दात भी गीले नही होंगे" असा चतुर डायलॉग मारतो. असो.
 
 सगळ्या चित्रपटभर ह्या अघोरीच्या चेहेर्यावर एक त्रासिक चिडका भाव असतो. तो भीतीदायक वाटायला हवा पण तसे काही न वाटता
 असे वाटत रहाते की हे जे काही निळे हिरवे रसायन गडी पितोय त्यामुळे बहुधा ह्याचा कोठा साफ होत नसावा.
 
 ह्यात तो म्हणे इच्छाधारी नागांशी फायटिंग करतो. तेव्हा लोक रॉकेटसारखे एकमेकांच्या दिशेने उडतात. आणि बर्याच चमत्कारिक लीला करतात.
 
 रिशी कपूर एक भोळा गावरान गडी दाखवला आहे. तो म्हणे बासरी वाजवून प्राण्यांना लुब्ध करतो.
 तो हिमालयात कुठे तरी बसून तो त्याची बासरी वाजवतो आणि मग हत्ती, मोर, वाघ, सिंह, उंट असे वाट्टेल
 ते प्राणी त्याच्या दिशेने धावताना दाखवले आहेत. गडी एवढी जोरात बासरी वाजवत असावा की समस्त भारतातील
 वन्यप्राणी जीव खाऊन धावत सुटत असले पाहिजेत.
 
 नागाशी संबंधित आचरट व अतर्क्य सिनेमातील हा एक नागमणी.
 
 
 |  | | Zelam 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 3:34 am: |       |  
 | 
 शेंडेनक्षत्र, मस्त आहे  review. HHPV  झाली.
 आता पहावासा वाटू लागलाय.
 
 
 |  | >> तर अमजदखान बेशुद्धच पडतो...
 फाईट खाऊन नाही देवानंदची हिम्मत आणि स्टॅमिना बघून बेशुद्ध पडला असेल.
 स्लर्टी मिथूनदा सही
   शेंडेनक्षत्र, अजून एखादा नागमुव्ही असेल तर लिहा की.
   कुछ कुछ होता है नामक मुव्ही मधे
 जेंव्हा शाहरुख आपल्या मुलीला समर कॅंपमधे भेटायला जातो आणि तिथे त्याला काजोल भेटते तेंव्हा त्याच्या ब्रीफकेस मधून काजोलचा लाल दुपट्टा निघतो.
 अरे काय हे? बर आणि इतकी वर्षे दुपट्टा जपून ठेवणारी माणसे एकमेकांचे ऍड्रेस घेऊन पत्रे बित्रे लिहून कॉंटॅक्टमधे राहू शकत नाहीत?
 या मूव्हीमधे शेवटपर्यंत शा. खा. काजोलच्या प्रेमात पडलाय असे वाटतच नाही. एकूणच अतर्क्यच होता तो मूव्ही.
 
 
 |  | | Monakshi 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 5:25 am: |       |  
 | 
 तो मिथुनचा भिंतीवरनं चालत जाण्याचा सीन 'वतन के रख़वाले' या पिक्चरमध्ये आहे.
 
 
 |  | | Cool 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 5:28 am: |       |  
 | 
 
 मला हे वाचुन पौराणिक कथांच्या सिरियल्स आठवल्या. दोन मुख्य पात्र समोर लढत असतात, त्यावेळी मागे लढणारे लोक बिचारे लुटुपुटीची लढाई खेळतांना दिसतात. ही मुख्य पात्रे एकमेकांना बाण मारतात आणि एकाचा बाण गायब होतो त्याच्या चेहर्यावरील भाव बघण्यासारखे असतात. त्याचवेळी दुसरा गडगडाटी हास्य करतो (याचे प्रात्यक्षीक गिरी ऐकवु शकतो
  ) आणि लगेच  break  होउन लक्स साबणाची जाहीरात   
 
 |  | | Psg 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 5:35 am: |       |  
 | 
 असे वाटत रहाते की हे जे काही निळे हिरवे रसायन गडी पितोय त्यामुळे बहुधा ह्याचा कोठा साफ होत नसावा.
 
 
  
 
 |  | | Zakasrao 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 5:39 am: |       |  
 | 
 अरे तो नवीन जानी दुश्मन पाहिलाय का. तोच बरेच लोकांची जंत्री असलेला. तो पिक्चर  A/C  मधे पाहण्यापेक्षा कडाक उन्हात उभे राहुन वाजंत्री ऐकायला पहायला, परवडली असे वाटाते.
 त्यात म्हणे मनिषा कोइराला आणि तो कोण एक आहे ते इच्छा धारी नाग त्या,न्च पुर्व जन्मात प्रेम असतं. तो तिची वाट बघत झाड का काय होतो. बरच काहि आहे त्यात निट आठवत नाहीये. पण सगळे सिन अचाट आहेत त्यात. त्यात आधीच सनी देओल आहे सोबत तो नाग कम माणुस कम  everything .  भिक नको पण कुत्र आवर च्या चालिवर "सनी असुदे पण तो नाग आवर" अस वाटत. कैच्या कै. बरेच सीन ढापलेले आहेत हॉलिवुड मधुन. मला जे आठवतात ते संगतो.
 १) तो अंगात सळी घुसल्यानंतर बाजुने काढतो तो  TERMINATOR 1/2  मधुन जसाच्या तसा.
 २) अक्षय कुमार आणि त्या नाग कम माणसाची फ़ाइट त्यात ते गाडीवरुन एकमेकाच्या अंगावर उड्या मारतात तो सीन  Mission Impossible 1/2  मधून जसाच्या तसा.
 बाकी कथानक बरचस जुन्या नागिन सारख. (तोच जितेन्द्र नाग आणि रिना रॉय नागिन)
 बर ह्या फ़िल्म मधे अक्षय कुमार.सोनु निगम,सनी देओल,मनिषा कोइराला,राज बब्बर असे बरच लोक्स आहेत. अजुन काहि नाव लक्षात नाहित.
 वेळ मिळाला तर नक्कि बघा. फ़ुल मापं काढायला चान्स देणारा शिनेमा. (मापं काढणे=नाव ठेवणे)
 धन्य्वाद झकासराव.......
 अज्जुका ह्या अशा गोष्टीमधल माझा एक रुमी होता त्याला बरच कळायच त्याने श्वास पाहिल्यावर मला सांगितल होत कि तु बघच ते हॉस्पिटल. म्हणुन मी बारकाइने पाहिल.
 
 
 |  | | Zakasrao 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 6:19 am: |       |  
 | 
 अरे हो ती  DD1  वरची आंखे नावाची सिरियल कोणी पाहिलिय का कधी? रामांनद सागर च प्रॉडक्शन होत ते. त्यामुळे अचाट, अतर्क्य घ्यटना आणि त्याच फ़ालतु चित्रिकरण हे त्याच मुख्य वैशिष्ट्य होत.
 त्यात पुठ्ठा सद्रुश वस्तुंच हेलिकॉप्टर दिसणे,जंगल म्हणुन कुठल्यातरी जेमतेम एक पुरुष उंचीची झडुपे किंवा झाडे असायची आणि त्यातुन पळणारे लोक्स ते ही गोळ्या चुकवत, रॉकेट लॉन्चर घेवुन रस्त्यातुन फ़िरणारा माथेफ़िरु आणि त्याला न पकडु शकणारे पोलिस,भारत आणि पाकिस्तान मधे लागणारा डायरेक्ट फ़ोन (कर्नल आणि कार्लोस मधल संभाषण),नवीन नवीन शोध लावणरे अचाट सन्शोधक, आंखेच्या ५-६ जणाच्या टीम कडुन फ़क्त पिस्तुलाद्वारे गारद होणारे कार्लोसची ढिगभर माणसे अस बरच काही होतं. जर हे तुम्ही पाहिल नसाल तर तुम्ही बरच काहि मिस केल कारण आता ती सिरियल बंद झाली आहे.
 आम्ही प्रत्येक गुरुवारी पाहत होतो कारण इत्का मस्त  TP  काय असु शकतो?
 अरे हो शेवटी एक सांगायच राहिलच ना!
 हेलिकॉप्टरमधे बसल्यानंतर त्याच्या पंख्याची सावली आत बसलेल्या माणसांवर पडते असा शोध मला फ़क्त आंखे पाहुनच लागला.
 
 
 |  | | Ajjuka 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 6:22 am: |       |  
 | 
 नागावरून आठवलं.. 'हिरवं कुंकू' नावाचा चित्रपट पाह्यलाय का कुणी? मी त्यातली काही दृश्ये पाह्यली होती..
 एक लहान मुलगी नागाशी बोलते तिला घरातल्यांनी त्रास दिल्यावर. मग ती मोठी होती आणि सासरी जाते तोवर नागाला विसरलेली असते आणि नाग तिच्या प्रेमात पडलेला असतो मग तो तिच्या सासरच्या माणसांना त्रास देऊ लागतो. मग ति हळूच कोपर्यात जाऊन नागाशी भांडून येते वगैरे...
 बर हा चित्रपट २००५ सालचा आहे हा!
 
 झकास..  कौतुक म्हणून नाही सांगत पण ते तसंच्या तसं येण्यासाठी संदीपने भरपूर वेळ त्या वातावरणात घालवलाय आणि आम्हाला सगळ्यांना घालवायला लावलाय. त्या वातावरणाचा आत्मा  exact  पकडण्यासाठी ते सगळ्यांच्या आत उतरलं पाहिजे तरच अर्थ आहे.. या तत्वाने त्याने स्वतः आणि आम्ही सगळ्या टीम ने काम केले आहे. असो.. श्वास च्या  making  आणि पुढच्या प्रवासाबद्दल लिहिणे मी टाळत होते इतके दिवस काही कारणांसाठी पण असं दिसतंय की लिहावं लागणार आता.
 
 
 |  | | Giriraj 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 6:34 am: |       |  
 | 
 शिनमावाल्यांचं जेलबद्दलचं ज्ञान अतिशय अफ़ाट असते... जितका फ़ालतूपणा जेलबद्दल पिक्चरांत दाखवतात तितका एक नाग सोडले तर अजून दुसर्या कशाबद्दलच झाला नसेल काहिही दाखवतात!
 
 कोणत्या तरी शिणमात गोळी तलवार किंवा चाकूवर चालवून त्याचे दोन समान भाग करून एकाच वेळी दोन डाकूंना मारण्याचा प्रयोग यश्स्वीरित्या करण्यात अल्याचेही मी पाहिले आहे...
 
 तसेच दोन चाकू क्रॉस करून चार जणांचा मुडदा पाडता येऊ शकतो.. आणि  so on...
 
 
 |  | | Swa_26 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 7:06 am: |       |  
 | 
 अजुन एक सीन म्हणजे... हिरो किंवा हिरोईन किंवा आणखी कोणीतरी एक फाईल शोधत असतात, आणि ती फाईल हातात येताच त्यावर एक मोट्ठे स्टिकर दिसते..  SECRET FILE  किंवा मग  CONFIDENTIAL
   
 
 
 |  | | Nalini 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 12:29 pm: |       |  
 | 
 श्वास पाहिल्यावर मला सांगितल होत कि तु बघच ते हॉस्पिटल. म्हणुन मी बारकाइने पाहिल. >>
 
 झकास, ज्या डॉक्टरवर आधारीत हा चित्रपट आहे ना त्या डॉक्टरचा खराखुरा दवाखाना(ईस्पितळ) पण पाहुन ये एकदा.
 ' श्वास' मध्ये दाखवलेलं ईस्पितळ खुपच छान आहे. अज्जुका,  ' श्वास'ची शुटिंग तुम्ही  KEM  मध्ये केली होती का?
 
 
 
 |  | | Dineshvs 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 1:02 pm: |       |  
 | 
 नाग आणि त्याचे लोकसाहित्यातले स्थान, याचा छान उपयोग नागमंडल या नाटकात केला होता. हे नाटक मराठी आणि हिंदी अश्या दोन्ही भाषात होते. हिंदीत भक्ती बर्वे आणि मराठीत चित्रा पालेकर भुमिका करत असत. अज्जुका आठवतय ते नाटक  ?
 मला वाटते गिरिश कर्नाडची कथा होती. विजया मेहतांचे दिग्दर्शन होते. बहुतेक सुकन्या कुलकर्णी पण होती.
 त्यामानाने मराठी नाटकात तसा आचरटपणा कमी असतो.
 
 
 |  | | Gobu 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 5:20 pm: |       |  
 | 
 मोनाक्शी,
 अरे वा! चित्रपटाचे नावही लक्षात आहे तुझ्या!
   मित्रहो,
 "जिद" नावाचा पिक्चर कुणी पाहीलाय का?
 कुणाल गोस्वामी हिरो आहे त्यात!
 इतका पडेल आणि भिक्कार सिनेमा हिन्दीत नसेल!
 अहो, हा सिनेमा पुण्यात "अलन्कार" थेटरात लागल्यानन्तर २ दिवसात उडवला गेला!
 थेटर मालकालाही लाज वाटली असेल बहुतेक!
   (पाहीला नसेल तर कृपया कधीच पाहु नका!
  ) शेन्डेनक्षत्र,
 बहुधा ह्याचा कोठा साफ होत नसावा...
 
  मानल बुवा तुम्हाला!   
 
 |  | | Ajjuka 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 6:24 pm: |       |  
 | 
 nalinee, ho
 dinesh, ho
 
 
 |  | | Sas 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 6:54 pm: |       |  
 | 
 लिहा ना अजुन मजा येतेय वाचतांना; मला ही एक आठवल,
 
 हिरो होरोईन एकटे मग Aug असो वा Dec विजांचा कडकडाट... बारिश... मग होरोईनच्या typical lines आणी मग मिठ्या.
 
 'मुझे डर लग रहा है' म्हणुन वा घाबरल्या सारख 'acटुन' हिरोईनच हिरोला बिलगण अगदी typical in bollywood
 
 नेमके ह्यांच्याच वेळा विजा कश्या कडाडतात, अचानक 'बिजली चली जाते" कस काय हे director लाच ठाऊक, एखाद्या शिणेमात ठिक पण अनेक शिनेमात काही हे पचत नाही.
 
 
 |  | | Sas 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 7:01 pm: |       |  
 | 
 हिरोईन प्यार के खातीर बापाच्या घरुन पळुन वै. जाते मग हा परक्रम करतांना तिच्या पायाला काचा , काटे वै. वै. बोचुन रक्त येत असत पण ही रक्त बंबाळ हिरोईन full confidence ने चालत रहाते व होरो कडे आगेकुच करत रहाते background ला music वा प्रेमगीत.
 
 end ला हिरो तिला उचलुन 'धर्नुवादाच' injection द्यायला उचलुन नेतो हे दाखवत नाहीत तेवढे उपकार director चे !
 
 
 |  | | Sas 
 |  |  |  | Friday, May 25, 2007 - 7:10 pm: |       |  
 | 
 अरे Airport चे सीन राहिलेच की "फ्लाईट छुटने में अभी सिर्फ १०/१५/२०.. मीनीट है" मग हिरो/हिरोईन ची पळापळ
 
 प्रेमभंग  झाल्यावर दु:ख हलक करण्यास वा "नई शुरुवात" करण्यास भारतात काही जागा नाहीत का? की दुसरी तरुण मंडळी नाही.
 
 एवढी महगडी तिकिट बुक करुन शेवटी हिरो पोहोचला की हिरोईन जातही नाही, निदान पैसे भरलेत म्हणुन तरी जायच ना जिथल तिकिट बुक केलय तिथे; आल्यावर मग आहेच ना हिरो तो कुठे Cancel होणार आहे.
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |