पहिल्या रात्रीचा प्रसन्ग! हिरॉईन हिरो च्या हातात दुधाचा प्याला देते. हिरो ते दूध बाजुला टेवून हिरॉईन ला जवळ घेतो. अरे मुर्खानो, ते दुध तापवून तरी ठेवा मग उद्या चहाला होईल. नहितर विरजण लावा म्हणजे उद्या दही होईल
|
जज हिरो ला शिक्शा ठोठावणार एवढ्यात कोणीतरी कोर्टात धावत येतो, सरकारी वकील ये अदालत को गुमराह करने की कोशीश, वक्त जाया करना... पोलिस: मौका ए वारदात प ये चप्पल मिलि है वो विजय के नही बल्की शेठ गोवर्धनदास की है. प्रेक्शकात बसलेला शेठ पळून जाण्याचा प्रयत्न करणार. ईतके पोलिस असताना सुद्धा हिरो च त्याला पकडणार.
|
Giriraj
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:02 am: |
| 
|
कुणाला मिथून ची साहसदृश्ये माहीत असल्यास लिहा की!
|
Dakshina
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:11 am: |
| 
|
अरे आणि हा famousest dialogue कसा काय विसरलात? अब दुनिया की कोई ताकद हमें जुदा नही कर सकती.... मैं तुम्हरे बिना मर जाऊंगा.... मुझे छोडकर मत जाओ.... मै तुमसे अपने बेटेके जिंगदी की भीक माँगती हूँ.
|
Rajya
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:46 am: |
| 
|
अजून एक प्रकार असतो चित्रपटात. आधीच्या सीन मधे एक वस्तु वापरलेली असते आणि त्या नंतरच्या सीन मध्ये वेगळीच, सातच्या आत घरात या मराठी चित्रपटात वेंकी (आंध्रचा) आपल्या नव्या प्रेयसीला घेऊन कुठेतरी फिरायला जातो, जाताना त्याच्याकडे हीरो होंडा स्प्लेंडर असते व येताना हीरो होंडा सी. डी. डीलक्स. याच्या बापाचा काय जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा धंदा असतो की काय कळत नाही?
|
सुहाग नावचा एक चित्रपट होता. त्यात अमिताभ आणि शशी कपूर हे दोघे हिरो होते. तर या चित्रपटात शशी काही कारणाने आंधळा होतो. एकदा हे दोघे हिरोलोक मोटरसायकल वरून व्हिलनचा पाठलाग करत असतात. त्या सीन वर शिरीष कणेकरांनी अशी टिप्पणी केली होती... "आधी अमिताभ मोटरसायकल चालवतो आणि शशी मागे बसतो. मग अमिताभ मागे बसतो आणि आंधळा शशी मोटरसायकल चालवतो. नंतर ती मोटरसायकल या दोघांवर बसते आणि त्याना जोरात पिटाळते हे दाखवायचं बहुदा राहून गेलं असावं...."
|
Zakasrao
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:56 am: |
| 
|
आधीच्या सीन मधे एक वस्तु वापरलेली असते आणि त्या नंतरच्या सीन मध्ये वेगळीच>>>>>>>> सेम पछाडलेला मधे झालय. भरत जाधवला वेड्यांच्या इस्पितळात घेवुन जातात त्यवेळे त्या श्रेयसची जाताना एक बॉक्सर दाखवली आहे नवीन मॉडेल. आणि परत जाताना जुण्या मॉडेलची बॉक्सर. मी तर जुण्याकडुन नवीन पाहिलय पण इथे उलटा फ़्लो. गिरी तु लिहि ना.
|
फिदा मध्ये शेवटी मरता मरता शाहिद कपूर करीना कपूरला गोळी घालतो, ती अगदी कपाळावर मोठ्ठी टिकली लावल्यासारखी दिसते. आणि का कोण जाणे, मला ते पाहून एकदम ' झपाटलेला ' आठवला. त्यात त्या बाहुल्याच्या दोन भुवयांच्या बरोबर मध्ये गोळी घालायची होती. करीनाच्या बाबतीत फिदामध्ये तसेच का व्हावे, काही कळायला मार्ग नाही. मला आवडलेले काही डायलॉग्ज : इस बेचारीका इस दुनियामे कोई नही. ( हिरो अनाथ हिरोईनला घरी घेऊन येतो त्याच्या कुटुंबाला दाखवायला तेव्हाचा हमखास डायलॉग. तेव्हा मला हटकून अरे पण तू आहेस ना की तुझंही नक्की नाहीये असं म्हणावंसं वाटतं.) देखो तो, क्या चांद जैसी बहू ले आया है मेरा बेटा. तुम्हारे पिताजीकी आखरी इच्छा यही थी की...... ( तू बडा होके पुलिस अफसर बने, इ इ) आपल्याकडच्या सिनेमांमध्ये नायिकांना कायम परदेशी लोकांचे आकर्षण वाटत आलेले आहे. गावातल्या लोकल, होतकरू तरुणांना डावलून त्या कायम परदेसी बाबूच्याच प्रेमात का पडत असाव्यात हे अनाकलनीय कोडे आहे. उदा. मि नटवरलाल मध्ये अमिताभच्या प्रेमात रेखा, बोल राधा बोल मधली जुही चावला... अगदी बंजारनमधली श्रीदेवी देखील टोळीतल्या तरुणाला नकार देऊन ऋषी कपूरला हो म्हणते.
|
अतुल ते पोल खोल दूंगा अगदी अगदी. किती तो बावळटपणा. शिवाय व्हिलन कुणच्या तरी कानशिलावर पिस्तुल ठेवून कुणाला तरी चुपचाप इन कागजातोपर दस्तखत कर दो म्हणतो तेंव्हा हळूच वेगळीच सही करायची किनई किंवा थोडी चुकीची. (माझी तर खरं करताना पण खात्री नसते ही बरोबर येईल म्हणून.) हो आणि कुणीही सहज कुणालाही आपल्या घरी आठवडेच्या आठवडे रहायला बोलावतं. आलेत आपले रहायला महिनोन्महिने. आजकाल तर ये मेरी दोस्त है म्हणून बिनदिक्कत हिरो आपल्या मैत्रिणीला रहायला घेऊन येतो घरी. वर लग्न तिच्याशीच करेल याची ग्यारंटी नाही.
|
काय जबरदस्त वाहतोय हा बीबी माझे आवडते सीन दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे... शेवटच्या सीनमधे मारामारीनंतर अमरिश पुरीला म्हणतो, "ये आपकी अमानत है" काजोल रडत बसते. तोंडातून एक शब्द काढत नाही आणि ट्रेन सुटल्यावर "मुझे जाने दो" बापाने धरलेला हात सोडवता येत नाही. आणि तो बाबुजी पण ट्रेन सुरू झाल्यावर "जा बेटी.." मुलीला काय पळायला लावतो. मी असते तर म्हटलं असतं "जाऊ दे आता कोण पळेल. पुढची ट्रेन पकडून निवांतपणे जाऊ. सगळं सामानसुमान पण घ्यायला हवं ना.. "
|
Farend
| |
| Thursday, May 24, 2007 - 6:52 am: |
| 
|
हो ना. आणि दुनिया भरचे नियम मोडतील पण अशा वेळेस एक चेन खेचणार नाहीत. तिला धडपडत प्लॅट्फॉर्म संपायच्या आधी डबा पकडायला लावणार. चॉंद तारे वगैरे तोडके लाऊ शकणारा हिरो २५० रू. चा दंड भरू शकत नाही?
|
Farend
| |
| Thursday, May 24, 2007 - 6:57 am: |
| 
|
चित्रपट यल्गार. फ़िरोज खान आणि संजय दत्त मशिन गन घेऊन एकमेकांना शोधत असतात, बराच वेळ इकडेतिकडे बघत असतात फक्त ज्या दिशेला दुसरा आहे तिकडे नाही. आणि ही शोधाशोध कोठे तर जवळजवळ वाळवंटात, लोळत शोधले तरी एकमेकांना दिसतील अशा ठिकाणी अजून एक म्हणजे 'जा ने जा ढूंढता फिर रहा' मधे रणधीर आणि जया यांना एकमेकांचे गाणे ऐकू कसे येते? एक डोंगरावर असतो आणि एक खाली
|
Lalitas
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:00 am: |
| 
|
१९७०रीत जखमी हिरो हिरॉईन म्हणजे हॉस्पिटलमध्ये डोक्याला पांढरं बॅन्डेज आणि त्यावर प्रत्येक सीनबरोबर लहान मोठा होणारा, बॅन्डजवरची जागा बदलणारा लाल डाग... मारामारी, अपघात, पाण्यांत पडणें काही प्रसंग असो, जखम फक्त डोक्यालाच!
|
हॉस्पिटलचा सीन सगळ्यात वैतागवणा असतो. पण आचरटपणाचा कहर म्हणजे, सलाम नमस्ते मधला अभिषेक बच्चन वाला सीन. आम्ही सगळे फ़्रेंड्स हा पिक्चर बघायला गेलो होतो. सोबत एक डॉक्टर मित्र या आचरट पणाला जो वैतागला. त्याने सरळ उभे राहून शिव्या घालायला सुरुवात केली. (अभिषेक आणि डीरेक्टरला) इतके चांगले पिक्चर क्लायमॅअक्ष्मधे इतके का वाया घालवतात???
|
Saee
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:49 am: |
| 
|
धम्माल चाललीय की इकडे
|
Farend
| |
| Thursday, May 24, 2007 - 8:01 am: |
| 
|
नंदिनी तो सीन Friends मधल्या एका सीन वरून ढापलाय. तो ओरिजिनल सीन खूप छान आहे. You have to see the looks on Rachel's and the doctor's faces when Ross says "You have no idea how much it hurts"
|
Lalitas
| |
| Thursday, May 24, 2007 - 8:13 am: |
| 
|
एक प्रश्न मला नेहमीच पडतो.... गोळी पोटाला-छातीला लागलीय्, भळाभळा रक्त वाहतंय्... तरीही सिनेमातील पात्रं सर्व शक्ती एकवटून "आज तक छुपाया राज़" हिरोला नाहीतर हिरॉईनला उलगडून सांगतात.. शक्य आहे का गोळीची जखम झाल्यावर शुध्दीत बोलणं?
|
Ajjuka
| |
| Thursday, May 24, 2007 - 11:16 am: |
| 
|
'हम दिल दे...' मधे ती आजी ऐश्वर्याला स्वत च्या वेळची प्रेमाची गोष्ट सांगत असते आणि जेव्हा ती सांगते की लग्नाआधी तुझ्या आजोबाने आपले चुंबन घेतले तेव्हा 'बिच्चारी भोळी भाबडी' ऐश्वर्या "और तू मा बन गयी!" असं म्हणते. आम्ही सगळ्या इतक्या थक्क झालो होतो... बराच वेळ आमची निर्विकल्प की सविकल्प समाधी लागली आश्चर्याने आणि हे लैंगिक शिक्षण काढून टाकतायत अभ्यासक्रमातून.. कुली मधे बच्चनच्या पोटात का छातीत ३ गोळ्या घुसलेल्या असतात. बाहेर त्याचे आईबाप नमाज पढतात आणि गोळ्या एकदम निकामी... राजाबाबू मधे वेगवेगळ्या वेशात आपल्या निरक्षर (हे का? इतका रग्गड पैसा असून यांना शाळेत नाही घालता आले मुलाला?) बाळाचे फोटो काढून मुलींना स्थळ म्हणून पाठवले जातात. त्याला फसून करीष्मा येते आणि खरं कळल्यावर चिडते तर ती जगन्माता तिला अडाणी असला तरी चांगला आहे, तू लग्न कर असं सांगते आणि ती नाही म्हणते तेव्हा शापते की तूने माकी ममता का अपमान किया है!! अरे काय!
|
Ajjuka
| |
| Thursday, May 24, 2007 - 11:23 am: |
| 
|
आधीच्या सीन मधे एक वस्तु वापरलेली असते आणि त्या नंतरच्या सीन मध्ये वेगळीच,|आधीच्या सीन मधे एक वस्तु वापरलेली असते आणि त्या नंतरच्या सीन मध्ये वेगळीच,| राज्या, या प्रकाराला continuity jerks म्हणतात. अर्थात वस्तू बदलणे, वस्तूची जागा बदलणे एवढेच यात येत नाही, अजूनही बरेच आहे. चित्रपटाच्या बनण्यातली ही वरवर छोटीशी दिसणारी पण खूप महत्वाची गोष्ट आहे. बर्याचदा ३-४थ्या किंवा अजून खालच्या सहाय्यक दिग्दर्शकाकडे हे काम असते. एकतर त्याला continuity ची व्याप्ती काय हे अजून नवीन असल्याने कळलेले नसते आणि कोणी सांगायच्या भानगडीत पडत नाहीत किंवा त्याला माहित असले तरी त्याची position इतकी खालची असते की तो एखादे बारके detail सांगायला गेला की सगळे.. बडा आया, इतना कौन देखता है, अभी नया है तू सीख जायेगा... असा आहेर देतात.
|
Zakasrao
| |
| Thursday, May 24, 2007 - 11:50 am: |
| 
|
हम दिल दे चु. स. मधे नन्दिनी (ऐश) ला गोळी खांद्याला लागते पण बॅंडेज मात्र हाताल वै. दिसत. हॉस्पिटलचा सीन सगळ्यात वैतागवणा असतो. >>> मी आतापर्यंत पाहिलेल श्वास मधील हॉस्पिटल सगळ्यात वास्तववादी वाटल मला. नाहीतर फ़िल्म मधी हॉस्पिटल म्हणजे ५ स्टार हॉटेल असतं. मोठ्ठी वेगळी खोली वै. मुन्ना भाइ मधल पण बर होत हॉ.
|