Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » माहेरची साडी » Archive through May 23, 2007 « Previous Next »

Sashal
Monday, May 21, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RH , मला तुमचं म्हणणं अंशतः पटतंय .. पण इकडे ज्यांनी त्या चित्रपटावर टिका केलीय ती सुध्दा त्यांची स्वतःची मतं आहेत ना, नाही त्यांना आवडला आणि त्यांनी लिहिलं तसं तर त्यात त्यांचंही काय चुकलं ..

ज्याची चलती असते तीच गोष्ट श्रेष्ठ ठरते .. तिकडे आम्ही सगळे त्या हिमेश ची अशीच शेष्टा करतोय, पण कुठल्या तरी audience मध्ये तो अतिशय लोकप्रिय आहे आणि म्हणूनच successful पण आहे .. लता, आशा, मोहम्मद रफ़ी वगैरेंच्या पठडीत कदाचित तो नाहिच बसू शकणार पण तो successful आहेच हे नाकारता येत नाहि .. तसंच माहेरच्या साडीबद्दल .. मी सुध्दा थट्टा करते असल्या चित्रपटांची कायम ज्यात उगीच melo drama आहे, स्त्री त्यागाची मुर्ती वगैरे दाखवण्याचा मुर्खपणा आहे असले चित्रपट मलाही माझ्या taste चे वाटत नाहित, पण ह्यातले काहि चित्रपट प्रचंड चालले, superhit ठरले आणि म्हणूनच successful पण, भले माझ्या दृष्टीने ते टाकाऊ होते ..

आणि इकदच्या कोणीही असं म्हंटलंय का, की मला sensible वाटत नाहि तो चित्रपट म्हनून तुम्ही सगळ्यांनी सुध्दा त्याला non sense म्हणा?

तुम्ही जो बस स्टॉप वरचा किस्सा लिहीलाय त्यात ज्या इतर मुली त्या बाईची थट्टा करत होत्या त्यांना त्या बाई ने समज दिली ना .. मग त्या बाईचं कौतुकच आहे, पण त्या मुलींना तसलं नटणं inferior वाटलं ह्यात काय चूक .. प्रत्येक बाबतीत हे असंच असतं .. काहि गोष्टी काहि जणांना inferior वाटू शकतात आणि तसे वाटणारे भरपूर लोक एकत्र असले की त्यांच्याकडून थट्टा होणारच ..


Marhatmoli
Monday, May 21, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<R H>

RH ,

मी स्वत: माहेरचि साडि बघितल नाहिये पण इथल्या एकन्दर चर्चेवरुन अस वाटत कि इथे जि मस्करि चाललि आहे ति या picture मध्ये दाखवलेल्या कालबाह्य परंपरा आणि अंधश्रध्धेला खतपाणि घालण्यार्या समजुति यावर आहे.

पण त्या college girls बद्दल चे तुमचे विचार १००% पटले.

Sashal ,
त्या बाईंचि test त्या मुलिना inferior वाटलि हि त्यांचि चुक नसुन त्यानि त्यावरुन तिचि ज्या पध्धतिने सगळ्यांसमोर टर उडवलि हि आहे. मला खात्रि आहे कि त्या बाईंऐवजि जर एहादि उच्चमध्यमवर्गिय स्त्री असति तर तिला अस हसण्याचि हिम्मंत त्यानि केलि नसति. भर्पुर लोक एकत्र असले कि थट्टा होणारच हे जर मान्य केल तर रस्तोरस्ति वाह्यात मुल मुलिंना बघुन मोठ्याने गाणि वगैरे गातात तेहि मान्य कराव लागेल कारण मुलगि एकटिच असते मुले भरपुर!


Disha013
Monday, May 21, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


RH ,तुम्ही लिहिलेल्या किस्स्स्यातच बघा ना, अती झाले की त्या बाईने चिडुन त्या मुलिंना समज दिलीच ना. मग मा.सा. ची नायिका का सहन करत राहाते? की तिच्यामते अती झालेलेच नसते? का ती चवताळुन उठत नाही?
आणि ही नायिका काही गरीब,अडाणी अशी न्हवती. चांगली लखपती,मिल मालक असलेल्या माणसाची मुलगी असते. घरात पाठीरखा भाउ असतो. सासरही खाउन्पिवुन सुखी मिळते.शिकलेला नवरा मिळतो. त्याच्या आधाराने ती जगु शकत नाही का?
या चित्रपटाचा शेवट थोडा वेगळा हवा होता.म्हणजे नायिकेला मुलगा न होता मुलगी झाली असे दाखवुन सासुची अजुन भयानक reaction तिला म्हणजे पर्यायाने आपल्याला दाखवायला हवी होती. कदाचित दिग्दर्श्कालाच दया आली असावी तिची. त्यामुळे ते टाळले.
यापेक्षा तो 'पुढचं पाऊल' चित्रपट मला आवडतो,
पण त्याचा २ nd half part .


Arch
Tuesday, May 22, 2007 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉप्युलिटिक>>

असा शब्द आहे? populace माहिती आहे.

Sanghamitra
Tuesday, May 22, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RH छान भाषेत मांडलेत विचार
(स्वैपाकाबद्दल लिहीलेत ते अगदी बरोबर.)
पण इथे चेष्टा त्या चित्रपटाच्या अतर्क्यपणामुळे होतेय.
या सगळ्या चीप टेस्टची चर्चा आणि हेटाळणी अभिजनांनी केली नाही तर या लोकांची टेस्ट बदलणार नाही कधीच.
आणि गरीब श्रीमंतचा काही प्रश्न नाही बर्का. अभिरुचीचा आहे.
माझी एक श्रीमन्त मैत्रीण आम्ही कॉलेजात असताना दीड दोन हजाराचे ड्रेस घालून यायची पण इतके भडक रंग आणि अंगावर येणारे पॅटर्न्स असायचे त्याचे.
समाजातला कुठलाही ट्रेन्ड हा अभिजन, सुशिक्षित किंवा द्रष्ट्या लोकांकडूनच सुरू होत असतो आणि मग तो तळागाळापर्यंत (नुसते पैशाने नाही अभिरुचीनेही )पोचतो. मग ती फॅशन कपड्यांची असो(साडी ते पंजाबी सूट्स) , शिक्षणाची असो(स्वभाषा ते कॉन्वेंट व्हाया इन्ग्लिश मिडीयम) वा अभिरुचीची. (यात मला चांगले वाईट म्हणायचे नाहीये पण ट्रेंड्स समाजात कसे पसरतात हे सांगायचे आहे.)
ज्यांना स्वतःला चांगले वाईट कळत नाही त्यांना ते बाहेरून समजून घ्यावे लागते.
बाई गं हे असले चीप कपडे, लिप्स्टिक वापरू नको असे म्हटले तर ती ऐकेल का? पण तेच कुणी चेष्टा करण्यासारखे आपण वागतोय या भावनेतूनच यातूनच माणूस नक्की सुधारण्याचा प्रयत्न करतो.
आणि तुम्ही वर्णन केलेली बाई आहे तशा कित्येक श्रीमंत बायकाही भडक रहाणीमानामुळे चेष्टेचा विषय झालेल्या मी पाहिल्यात. रस्त्यावरचे प्रॉडक्ट्स काय आणि लॉरियालचे काय? चीप टेस्ट कुठल्याही रेण्जमधे खरीदता येते.
माहेरची साडी हा अत्यंत रडूबाई आणि अतर्क्य चित्रपट आहे म्हणून त्याची चेष्टा चाललेय. कुणाच्या आयुष्यात खरेच असे घडले तर चेष्टा करण्या इतके अभिजन क्रूर नसतात.


Monakshi
Tuesday, May 22, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RH ,

अहो त्या पिक्चरवर अशा कारणासाठी राग आहे की जे जुन्या पिक्चर मधून इतकी वर्षे आजपर्यंत दाख़वत आले आहेत तेच त्यांनी नवीन फॉर्म मध्ये दाख़वले. त्यांना असेही दाख़वता आले असते की ती मोठी झाल्यावर तीच्या सावत्र आईला अद्दल घडवते किंवा लग्नानंतर जेव्हा सासू तीला त्रास देते तेव्हा ती तीला तिच्यापद्धतीने सरळ करते. something like that . आज़ आपल्या समाजातल्या बायकांना अशाच पिक्चरची गरज आहे. कारण अजूनही आपल्या इथे बरीच जण पिक्चरचं अनुकरण करतात. त्यामुळे अशा पिक्चरचं जर अनुकरण केलं गेलं तर बर्याच सुनांचे प्राण वाचतील.


Bee
Tuesday, May 22, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडून सहसा अशी चूक होत नाही. मला वाटल हा चित्रपटावरील प्रतिक्रियांचा बीबी आहे. मी माझे पोष्ट कुठल्या बीबीवर टाकले आहे हे बघितले नाही.. असो.. क्षमस्व मे!

Ajjuka
Tuesday, May 22, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१००% योग्य बोललीस बघ सन्मे!

Robeenhood
Tuesday, May 22, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज़ आपल्या समाजातल्या बायकांना अशाच पिक्चरची गरज आहे. कारण अजूनही आपल्या इथे बरीच जण पिक्चरचं अनुकरण करतात. त्यामुळे अशा पिक्चरचं जर अनुकरण केलं गेलं तर बर्याच सुनांचे प्राण वाचतील.
>>>>

हा दावा जरा तपासून पहावा लागेल. कलाकृती जनमानसावर परिणाम करतात हा त्या क्षेत्रातल्या लोकानी पसरवलेला गैरसमज आहे.कलाकृतीना त्यांन्च्या स्वत:च्या मर्यादा आहेत... सन्त तुकाराम , शामची आई, गाडगेबाबा या चित्रपटांमुळे समाजाची नैतिक अध्यात्मिक पातळी उंचावल्याचे दिसत नाही... असे असते फारच सोपे झाले असते गणित...
अर्थात अशी चित्रे काढणे आवश्यक आहे ते सांस्कृतिक वारसा संक्रमित होण्याच्या दृष्टीने..
हेटाळणी अभिजनांनी केली नाही तर या लोकांची टेस्ट बदलणार नाही कधीच>>>>
अभिरुची नसलेल्या लोकांची अभिरुची बदलण्यासाठी हेटाळणी हे अभिनवच शस्त्र ्दिसते.. हाच गोंधळ लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यात घातला, बहुप्रसवा साहित्य आणि ’दर्जेदार" अभिजात वाड.मय यात घातला., हेटाळणी करणा-याना अभिजनाचा दर्जा कोणी दिला ? तो स्वयंघोषितच आहे.

प्रश्न असा आहे की माहेरच्या साडीच्या दर्जाचा चित्रांचीही मानसिक गरज असणारा मोठा प्रेक्षक्वर्ग इथे आहे आणि त्याची आवड जपणेही वेडेपणा आहे का?
त्यांची जीवन्शैली मुळी ’अभिजात’ चित्रपटाच्या आकलनाची संवेदनशीलता प्राप्त करण्याचीनसते. त्याना हेटाळणी करून पथेर पांचाली १०० वेळा दाखविला तरी त्याना नाही समजू शकत त्यातील सौंन्दर्य !!!(ते फक्त ’बी लाच समजू शकते:-)

मला व्यक्तिश: मोठ्या चित्रकारांची चित्रे अजिबात कळत नाहीत.पिकासो, वगैरे सोडाच पण हुसेन, सडवेळकर, अमृता शेरगिल,सुभाष अवचट यांचीही कळत नाहीत मला आपली वास्तव शैलीतील बालबोध, शाळकरी झाडे नद्या पाणी बैल असलेली चित्रे समजतात आणि आवडतात... आता या दगडाला (म्हणजे मला!)कितीही तूप चोळले तरी मला अभिजात चित्रकला कळणार आहे का?( त्याचे कारण मानसशास्त्रात आम्हाला इंन्क ब्लॊट टेस्ट होती त्याचा अभ्यास करताना कळले) घाबरू नका त्याची चर्चा इथे नाही,
मग आता माझ्यासाठी बालबोध चित्रे निर्माणच करायची नाहीत का?आणि माझी अभिरुची थर्ड रेट असल्याने मी ती पहायचीही नाहीत आणि त्याचे कौतुकही करायचे नाही असा याचा अर्थ!!
मायबोलीवरील ९० टक्के लोकाना ’शास्त्रीय’चित्रकला कळत नाही असे माझे म्हणणे आहे त्याना आपली ’सुगम’च कळते . त्यानी काय करावे?
त्याना सुगम चित्रांचीच गरज आहे आणि सुगम चित्राना त्या तिथे पलिकडच्या बी बी वर रिस्पॊन्सही मिळतो आहे... त्याना अभिजनानी क्षमा केली पाहिजे परमेस्वरा त्याना क्षमा कर आपण काय लायकीची चित्रे पाहतोय त्याना समजत नाहीये:-(

आणि जी स्थिती चित्रकलेच्या प्रान्तात यांची आहे तीच त्या ढसढसा रडणा-या प्रेक्षकांची चित्रपटक्षेत्रात आहे!!

किंवा असे केले तर ? जो जे वांछील तो ते पाहो अशी परवानगी सगळ्याना दिली तर? सर्वच आपापल्या डोमेन्मध्ये आनन्दी!!
आहे का परवानगी....?

Dineshvs
Tuesday, May 22, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, बसस्टॉपवरच्या बाईचे वागणे अगदी योग्य.
पण मराठी सिनेमातच माहेरची साडी पेक्षा आशावादी कथा येऊन गेल्या होत्या.
तो सिनेमा म्हणजे त्यांच्याच भावनाना श्रद्धाना, एनकॅश करण्याचा प्रकार होता तो. कथेला वेगळे वळण देणे सहज शक्य होते.
पण मग तो कदाचित चालला नसता.
सावत्रपणा, अपशकुनी या जुनाट गोष्टी नाही का वाटत तुला ?


Dinesh77
Tuesday, May 22, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राॅबिनहूड,
एक उदाहरण, पहा पटते का?
मराठीत "पाणी" हा शुध्द शब्द आहे.
बरेच लोक पानी, असा अशुध्द उच्चार करतात. म्हणून त्यांना शुध्द शब्द काय आहे ते सांगायचेच नाही का?
का त्यांची अभिरुची तशीच आहे, त्यांची पद्धत तशीच आहे म्हणून सोडुन द्यायचे??


Apurv
Tuesday, May 22, 2007 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शास्त्रीय चित्रकला म्हणजे काय रे भाऊ? ए.भा.प्र.

अरे, शास्त्रीय चित्रकला म्हणजे ज्यात भौतिक, जीव, रसायन ह्यातले कुठलेही नियम न पाळता काढलेले चित्र.

अच्छा! म्हणजे जी लोक विज्ञानात ढ असतात त्यानी काढलेली चित्र ना!

अरे नव्हे, ती शास्त्रीय चित्र खूप प्रसिद्ध आणि मौल्यवान असतात. ती फक्त १० टक्के लोकांनाच समजतात.

म्हणजे मायबोलिवर १० टक्के ढ लोक आहेत.

तुला कसे रे माहीत?

Robin च्या पोस्टमध्ये मी वाचले होते की मायबोलिवर ९० टक्के लोकांना शास्त्रीय चित्रकला समजत नाही.

...दीवा...



Giriraj
Wednesday, May 23, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाच एक चित्रपट मी अगदी थोडासा पाहिला होता.. 'माझं घर माझं संसार'.. त्यातल्या सासूच्या स्वभावामुळे तर त्या सुंदर अभिनेत्रिसाठी चित्रपट पाहणही जीवावर आलं होतं.. माझं ठाम मत होतं त्यावर की असे प्रकार अतर्क्य आणि उगीच मेलोड्रामा म्हणून घेऊन लोकांना उल्लू बनविले जाते... पण थांबा... या चित्रपटात दाखविले आहे ते अतर्क्य असले तरी अशक्य आणि असत्य नसते.. जरा परिस्थितिचे भान येण्याच्या वयापासून अश्याच गोष्टी मी खूपदा बघितल्या आहेत... आणि अपशकुनि वगैरे प्रकार अजूनही मानले जातात.. सूनांना मोलकरीण मानणारे अजूनही आहेत.. आजही सूनांना जाळल्या जाण्याच्या घटना घडतात.. अजूनही स्त्री संरक्षण कायद्याची गरज आहेच.. अजूनही बायकोला दासीप्रमाणे वागवणारे आणि गुराप्रमाणे बडवणारे लोक आहेत...

आणि महत्वाचं म्हणजे पुणे,मुंबई,अमेरिका यापलिकडेही जग आहे. आणि हे मी कोणाचिही हेटाळणी किंवा कुणाची तळी उचलणे या भावनेतुन लिहीत नाहिये.. हे असे आहे आणि ते तुम्ही नाकारू शकत नाहीत. मला नाही आवडत असे चित्रपट पहायला पण ते तसे असते आणि त्यातून कुणी त्या प्रसंगांशी,पात्रांशी स्वतला relate करून पाहत असते,त्यातून आपले दुःख हलके करत असते... अमिताभचे एका काळात गाजलेले चित्रपट हेही त्या काळच्या भरकटलेल्या आणि काहिश्या खचलेल्या तरुण पिढीने उचलून धरले कारण अमिताभ मध्ये त्यांना आपण असेच व्हावे,करावे असा अशावाद दिसत होता.

तेव्हा रोबिन म्हणतायेत ते खुपसे बरोबरच आहे. संघमित्रा,तुझे म्हणणे खटकले!:-)




Sanghamitra
Wednesday, May 23, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> भरकटलेल्या आणि काहिश्या खचलेल्या तरुण पिढीने उचलून धरले
गिरी हे मान्य आहे. पण मग तसे मा. सा. मधे दाखवलेय का?
(मी चित्रपट पाहिलेला नाही पण त्याचे ड्वायलॉक मोठमोठ्याने स्पीकरवर लावायची फॅशन होती त्यावेळी ते जबरदस्तीने ऐकावे लागलेत.)
काहीतरी डोळ्यात अंजन घालणारी कथा असती तर ठीक आहे. काय शिकतेय ती खचलेली, पुणे-मुंबई-आमेरिकेत नसलेली पिढी या चित्रपटातून?
(आणि हेच मी एकता कपूरच्या सिरियल्स बद्दल पण म्हणेन. पुन्हा सांगते प्रश्न गरिबी श्रीमंतीचा नाही चुकीचे आणि अतर्क्य मेसेज देण्याचा आहे. )
ध्वनीचित्र माध्यमांचा समाजावर फार मोठा परिणाम होत असतो. त्यातले सगळे खरेच समजणारे खूप लोक असतात.
असाच खाष्ट सासू असलेला सौ दिन सासके नावाचा जुना हिंदी सिनेमा मी टिव्हीवर परत लागला होता तेंव्हा परत अहिला. (ललिता पवार, आशा पारेख आणि रीना रॉय)
रॉबीन अभिजन हा शब्द तुम्ही वापरलात आधी. म्हणून तेच कॅटेगरायझेशन मी वापरले. आणि परवानगी कशाला?
कुणाला तो चित्रपट बघायची आडकाठी नाही तशीच एखाद्याला त्याची चेष्टा करायची असू नये इतकेच. :-)
आणि अशा छळात दिवस काढणार्‍या बायका पहिल्या आहेत मी. त्याचा गरीब श्रीमंत, गाव शहर याच्याशी काऽऽऽऽही संबंध नसतो. मनोवृत्तीशी आणि सुसंस्कृतपणाशी असतो.
ज्या बायका अशा छळात दिवस काढतात ना त्यांना तुफान चालणारी माहेरची साडी बघायचे स्वातंत्र्य नसते हो.
असो. एखाद्याला त्यातून कला सापडत असेल तर ठीकच आहे.
कुणाला नकळत मी दुखावले असल्यास क्षमस्व.


Ajjuka
Wednesday, May 23, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|आणि अपशकुनि वगैरे प्रकार अजूनही मानले जातात.. सूनांना मोलकरीण मानणारे अजूनही आहेत.. आजही सूनांना जाळल्या जाण्याच्या घटना घडतात.. अजूनही स्त्री संरक्षण कायद्याची गरज आहेच.. अजूनही बायकोला दासीप्रमाणे वागवणारे आणि गुराप्रमाणे बडवणारे लोक आहेत... |
प्रश्न लोक आहेत किंवा नाहित हा नाहिये. हो लोक आहेत ना. पण ते तसे वागतात अनि ते सगळं सहन करत मरण पत्करणारि completely कणाहिन so called त्यागमूर्ति glorified केली जाते याचि चीड आहे. चित्रपटातून त्याग करत रहा, सहन करत रहा, त्यात मेलात तरि चालेल असाच एक अप्रत्यक्ष सन्देश दिला जातो. आक्षेप तिथे आहे. असा सगळा त्याग करणारि, सहन करणारि व्यक्ति महान हे जे चित्र उभ केल जातय ते अयोग्य आहे.
अस सतत सहन न करता retaliate करणारि व्यक्ति असेल तर ती लगेच कुटुंब फोडणारी, दुष्ट प्रवृत्तीची व्यक्ति दाखवली जाते. ह्यामधे relative etc काहि नाहि.. १००% चुक आहे.
बाकि माहेरची साडी आणि तत्सम चित्रपटांच्या संदर्भात म्हणायच तर एकहि व्यक्तिरेख हि माणूस वाटत नाहि. जगात कोणीहि व्यक्ति इतकी संपूर्ण वाइट किंवा संपूर्ण चांगली असूच शकत नाहि. अतर्क्य ते हे. प्रत्येक दुष्ट व्यक्तीच्या वाइट वागण्याला सुद्धा एक कारणमिमांसा असते. कोणीहि जन्मतच दुष्ट बनून येत नाहि. इथे lack of depth आहे.
अजुन बरच काहि सांगता येईल पण इथे " मला कळत नाहि, मी समजुन घ्यायचा प्रयत्नहि करणार नाहि आणि ज्यांन समजतय ते अतिशहाणे " असा approach आहे तेव्हा याहुन काहि इथे बोलण्यात अर्थच नाहि. तेव्हा गिर्‍या याबद्दल detail नंतर बोलू याहू किंवा gtalk वर.


Giriraj
Wednesday, May 23, 2007 - 7:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा,माफ़ केले माफ़ केले! :-)
अगं माफ़्या कसल्या मागतेस?? कुणी काही नाही दुखावले गेले!

एकता कपूरच्या सिरियल्स सत्याच्या किती जवळ जाणार्या असतात हे ज्यांना आवडतात आणि ज्यांना खटकतात त्यांना सगळ्यांना माहित आहे. तू म्हणते तसा प्रश्न शहर,गाव,गरीब,श्रीमंति याचा नसला तरी गरिबी आणि गाव याने परिस्थिती अधिक वाईट होत नाही का.

मुळात मी माहेरची साडी पाहिला नाहिये पूर्णपणे.. आणि पाहणारही नाही,मला आवडतही नाही असले पिक्चर.. पण ज्यांना आवडतात किंवा जे यातून कोणता संदेश वगैरे घेण्यापेक्षा स्वतला relate करून थोडे हलके वाटून घेतात त्याने मी हसण्याची गरज नाही. आणि या चित्रपटांची किंवा मिथूनच्या (कितिही अतर्क्य करामति त्यात होत असल्या तरी) चित्रपटांची तुलना कोणत्याही डेली सोपशी होऊ शकत नाही की ज्यात सतत कही ना काही कारस्थाने करून कुणाची तरी संपत्ति मिळवायचा किंवा कुणाला तरी मारण्याचेच प्रयत्न होत असतात!


ज्या बायका अशा छळात दिवस काढतात ना त्यांना तुफान चालणारी माहेरची साडी बघायचे स्वातंत्र्य नसते हो. >>>> त्यांच्या सासवाच त्यांना असे पिक्चर दाखवून सांगतात,'बघा किती छळतात सासवा सुनांना.. मी तर किती प्रेमाने वागते तुमच्याशी'.. आणि हे गंमत म्हणून नाही सांगत मी.. अगदी आसपासच्या अनुभवांवरून सांगतोय...

याच धर्तिवरचा एक 'चांगला' चित्रपटही आहे 'पुढचं पाऊल'.. सुधीर फ़डक्यांचे संगित असलेले आणि आशा भोसलेने गायलेले 'एकाच या जन्मी जणू' खूप मोठा आशावाद आणि उभारी देऊन जाते....

अज्जुका,आता कसं.. सहनशिलतेचं किंवा आदर्शवादाचं glorification चुकिचं आहे.. आणि तुझं निरिक्षणही अगदी अचूक आहे. मला तुझे पटले पण दुसरे असेही आहे की जसे RH म्हणतात तसे जनू बांडे च्या चित्रपटांना वाह वाह करायचे आणि दुसरीकडे मिथूनचे चित्रपट फ़ालतू असतात म्हणून नाक मुरडायचे हे काही बरोबर नाही.. बाकी मी वाक्युद्धाला तयार आहेच :-)

बाकी सर्व ठिक आहे,कळावे! :-)
}




Swa_26
Wednesday, May 23, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१००% अनुमोदन अज्जुकाला... यावेळी मला वादळवाट या सिरीयलमधील 'विशाखा' ची व्यक्तीरेखा आठवते.
ती एक व्यक्ती म्हणून चांगली असते, पण फक्त सहनशीलता व त्यागमुर्ती वगैरे नसल्याने आणि resist करणारी असल्याने ती सगळ्यांच्या (प्रेक्षक आणि इतर व्यक्तीरेखा) दृष्टीने ती 'वाईट' ठरते.... असो, बाकी चालु द्या :-)


Psg
Wednesday, May 23, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशचे वाक्य पटले- इथे भावना एनकॅश केल्या आहेत- त्याला आक्षेप आहे! अज्जुकाचे आणि सन्मीचेही पटले. ’बायकांचा मेला जन्मच असला.. सतत सहन करा’ हाच असला तर संदेश हा चित्रपट देतो. या माध्यमातून काही वेगळे नक्कीच दाखवता येईल. ती सून एका मर्यादेपर्यंत सहन करते, मग मात्र नाही असे दाखवले असते तर कुठेतरी खर्‍या सोशीक सुनांना थोडा मानसिक आधार मिळाला असता!

Zakasrao
Wednesday, May 23, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रपटातून त्याग करत रहा, सहन करत रहा, त्यात मेलात तरि चालेल असाच एक अप्रत्यक्ष सन्देश दिला जातो. आक्षेप तिथे आहे. असा सगळा त्याग करणारि, सहन करणारि व्यक्ति महान हे जे चित्र उभ केल जातय ते अयोग्य आहे. >>>>>>>>>..
अरे इथे तर V&C सुरु झाल की.
अज्जुका एकदम पटेश.
आणि त्यात जे शेवटच गाण आहे त्यात असाच काहिसा संदेश आहे आणि ते पाहिल्यावर माझ टक्कुरं फ़िरल.
इथे दोन प्रकारे लोक ह्या चित्रपटाला वाइट म्हणत आहेत. एक त्यातील अतर्क्य घटना आणि दोन म्हणजे त्यात दाखवलेले स्त्रिवरचे अत्याचार आणि ते सहन करणे हाच स्त्रीधर्म अस जाणारा संदेश.
रॉबिन तुम्ही म्हणता तस ज्याना मानसिक गरज आहे पण ह्या मानसिकतेतुन एखादी चांगली गोष्ट घडणार आहे का? त्यापेक्षा त्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले जर चित्रपट माध्यमातुन तर काय वाइट आहे. ह्या फ़िल्म चा शेवट बघा तुम्ही जर याआधी नसेल पाहिला तर.
मी तुमच्या मधे खुप लहान आहे शिक्षणाने, अनुभवाने. मला ह्यापेक्षा जास्त लिहिता येइल असे वाटत नाही.


Dineshvs
Wednesday, May 23, 2007 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर संघमित्राने उल्लेख केलाय तो सिनेमा आशावादी होता. त्याची मराठी आवृत्ती पण आली होती. रंजना, आशा काळे आणि ललिता पवार होते त्यात.
या दोन्ही सिनेमात धाकटी सुन योग्य त्या रितीने सासुला वठणीवर आणते. आणि तरिही आपली माणुसकी सोडत नाही. सासुला साप चावल्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालुन तिला वाचवते.
सचिनचा आत्मविश्वास ही असाच सुंदर सिनेमा होता. जयवंत दळवींचे पर्याय नाटक आणि त्यावर पुढे निघालेला सिनेमा, हेही सुंदर होते.
आणि झुलवा नाटकही. या कलाकृतिमधुन, अन्यायाची परिसीमा गाठल्यावर काय होते, त्याचे किंचीत स्वप्नील तरिही आदर्श चित्रण होते. आदर्श नेहमी उच्चच असावेत. नाही का ?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators