|
Ksmita
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:32 pm: |
| 
|
श्रेय या शब्दाला मराठी प्रतीशब्द काय? हक्कदार हा पर्याय होऊ शकेल सामान्य भाषेत वाक्यरचनेनुसार
|
Zakasrao
| |
| Friday, April 06, 2007 - 8:19 am: |
| 
|
आताचे अर्थ उद्या रहात नाहीत>>>> बरोबर आहे दिनेशदा. पुर्वी एखाद्याची फ़जिती केली की कसा वडा केला म्हणत असतील आता कसा पोपट झाला. नवीन पिढी आणि नवीन भाषा हे चालायचच. (पण पुढच्या पिढीतील मुल मराठी बोलतील का? आणि बोलले तर कस बोलतील? त्याना मी जी काही गावं आणि माणसं पाहिलीत ती पाहायला मिळ्तील का? किती प्रश्न आहेत ना.) बर मी कालच एक S T पाहिली. तिच्यावर काय काय लिहिल होत ते लिहितो. बाजुच्या पत्र्यावर ‘ खानदेशची मैना ’ मागच्या काचेवर ‘ यावल आगार ’ (बहुतेक यावलच होत. जाणकार सांगतीलच) मागच्या बाजुला खाली जो बंपर असतो तिथे ‘ वाट पाहिन रे, पण एस टी नेच जाइन बे’ हे नेहमीच वाक्य पण बे लावुन आलेल.
|
Adi787
| |
| Monday, April 09, 2007 - 3:03 pm: |
| 
|
बे हे विदर्भामधील बोलीभाषेमध्ये येतं.. कदाचीत मराठीच्या (slangs) globalization ची ही सुरुवात असेल 
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:56 am: |
| 
|
बे हा शब्द हिन्दीवरून आला. जसे 'अबे यार ये वैसा नही है...'
|
Zakasrao
| |
| Friday, April 13, 2007 - 4:53 am: |
| 
|
झ्यांगप्यांग. हा शब्द अलीकडे आम्ही वापरायचो. खुप फ़्याशनेबल किंवा खुप चट्टेरी पट्टेरी, भडक रंग ,किंवा न कळेल अस चित्र असलेल शर्ट, कपडॆ असेल तर हा शब्द वापरत होतो.
|
Prj4945
| |
| Monday, April 16, 2007 - 5:30 pm: |
| 
|
mi aaj prathamach post karat aahe. tumha sarvanche shabdkosh pahun mazya dnyanat bhar padli. punha bhetu.
|
Rajya
| |
| Tuesday, April 24, 2007 - 9:36 am: |
| 
|
जोरात सु सु ला येणे: कंठ दाटुन येणे सु सु करणे: गाणे म्हणणे एखादा जास्त बोलत असेल तर त्याला गप्प करण्यासाठी: मंडळ आपलं आभारी आहे दारु पिणे: किट्टा करणे दारु पिऊन फुल्ल्: किट्टा फुल्ल दारु पिऊन पडणे: किट्टा फुल्ल टांगा पलटी सिगारेट्: पकाली
|
Zakasrao
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:14 am: |
| 
|
ह्या BB वर मी सोडुन कोणी फ़ारस येत नाहि वाटत. असो. काल SG road वर TP करता करता एक शब्द आठवला तो लिहिला तर मला लिम्बुने विचारले की हा काय जिन्नस असतो, त्याची रेसिपी दे मी करुन बघेन त्यावेळी मला हसु आल खुप. असो हा शब्द किती जणाना माहित आहे बघु तरी. पण कोल्हापुर मधे ज्यानी खेडेगावात रहायचा अनुभव घेतला त्याना कदाचित माहित असेल. शब्द आहे पावणेर किंवा पाहुणेर हा शब्द मी मावशीकडे गावी गेल्यावर ऐकला पहिल्यांदा. त्यावेळी मी ६वी ला असेन. गावी उन्हाळ्यात शेतामधे खुप काम असत. ते करण्यासाठी माणसं मिळत नाहित. घरचे सर्वजण जरी गेले तरीही अशी काम उरकत नाहीत. समजा अशा वेळी तुमच अजुन काही वेगळ काम निघाल जस की घराची जमीन बनवणे,एखाद खोपट बांधणे किंवा घरातल काही काम जस की घर शाकारणे किंवा शेतातल एखाद काम जस की दुरवरच्या शेतात खत नेवुन पसरवणे अशी काही काम आलि तर खुप धावपळ होउ शकते. अशा वेळी ज्या लोकांशी आपले चांगले संबध आहेत अशा लोकाना आपण मदतीसाठी बोलवु शकतो. ते देखिल आपल काम संभाळुन मदतीसाठी येतात. आणि त्यामोबदल्यात जे जे मदतीला येतात त्याना पावणेर केला जातो. म्हणजे त्या रात्री मटण किंवा कोंबडी किंवा अंडी असा स्पेशल बेत असतो.(मी एकही शाकाहारी पावणेर नाहि पाहिलेला) शिवाय पब्लिक डिमांड नुसार दारु ते ही उसाच्या मळीपासुन स्वत्: बनवलेली. काल हा शब्द आठवला आणि सोबत सगळ्या सुट्टीतिल आठवणी जाग्या झाल्या. नॉस्टेल्जिया कि काय म्हणतात तस झाल. मग रात्री जेवणानंतर टेरेसवर गेल्यावर सहज म्हणुन आई,बायको आणि १० वीची परिक्षा देवुन त्याच गावी महिनाभर राहुन इकडे आलेला माझा मावसभावु यांना विचारल तुम्हाला पावणेर माहित आहे का? यावर बायकोचा कोरा चेहरा आणि आई व मावस भावाचा उजळलेला चेहरा पाहिला. त्या दोघानाही हे सर्व माहित होत. मग काय तिघे बसलो जुण्या आठवणी काढत आणि माझ्या बायकोला सांगत.मग जाणवल की त्यावेळी कधी १०००० रु. एकत्र एकगठ्ठा नसतील पाहिले पण हे जे सुख आणी समाधान होत ते आज वर्षाला लाखो रु. कमावुनदेखिल नाहिये. आज सगळ तिथे आहे पण ते अनुभवण्यासाठी वेळ नाहिये. लिम्ब्या तुझे विशेष आभार रे तुझ्यामुळे मी काल काही चांगल्या आठवणी काढल्या.
|
अरे पावणेर हा शब्द मला गेला नव्हता कधी पण इकडे मावळात याला "हत्त्यारी" असा शब्द वापरतात कोणाकडेही एकट्या दुकट्याने न होणारे काम निघाले तर गावकीला सान्गुन "हत्त्यारी" ठरवतात, त्या दिवशी घरटी किमान एकजण तरी या कामावर येतो! ज्याच्या घरच काम असेल त्याच्या मकदुराप्रमाणे तो जेवण देतो! इकडे मावळात मान्साहारी गाव जेवण फारशी होत नाहीत, हत्त्यारी देखिल शाकाहारीच बघितली हे! कदाचित अस असेल की बामणाच्या काजासाठिची हत्त्यारीला मान्साहार कसा काय मिळेल?? दुसर अस की शिरवळ सोडल की पुढे गावजेवण ही त्या त्या घरातल्या लोकान्नी करुन वाढायची असतात पण मावळात एक चान्गली प्रथा हे की गावकीला बोलल्यास गावकी केवळ शिधा घेवुन आपले आपण जेवण बनवितात व वाढतात देखिल! मला ही पद्धत माहीत असल्यानेच छप्पर घालायला तुला नि किस्नाला बोलवणार होतो! एक बोल्ला ते खर, पैशा पेक्षा देखिल जास्त किमतीची किम्बहुना पैशानी विकत न घेता येणार्या कित्येक प्रथा, बाबी गावाकडे अजुनही टिकुन हेत, अन त्या किमान बघायला मिळण्याच नशिब आपल होत!
|
Saee
| |
| Tuesday, May 22, 2007 - 9:34 am: |
| 
|
झकासराव, इथेही एक चक्कर मारा, म्हणजे आणखी खुश व्हाल... /hitguj/messages/103385/37566.html?1012452044
|
Nkashi
| |
| Tuesday, May 22, 2007 - 10:36 am: |
| 
|
हे हे, "दिवानसाब" मला एकदम माझी आत्या आठवली... माझी आई तिला दिवानसाब म्हणायची... आणि माझी वहिनी मला "गुलाबसाब" म्हणायची...
|
Nkashi
| |
| Tuesday, May 22, 2007 - 10:38 am: |
| 
|
तुम्हा कुणाला "येशाल त्याल" म्हणजे काय माहित आहे? (जरा डोका चलाओ.. )
|
Zakasrao
| |
| Tuesday, May 22, 2007 - 11:04 am: |
| 
|
लिम्बु तु म्हणतोयस ते हत्त्यारी मला माहित नव्हत. आणि हो सगळी गावकी बोलवायची गरज पडलिये अस काम फ़ार कमी असतं. हे कस कामाच्या स्वरुपावर अवलंबुन आहे. काम कमी असेल तर कमी लोक आणि काम जास्त असेल तर जास्त लोक. जर लोक फ़ार असतील तर अंड्यांचा प्रोग्राम असायचा. सई, मी तु दिलेल्या लिंक वर जावुन आलो. तुम्ही बरीच चर्चा केलि आहे आधी. अलिकडे बरेच दिवस तिकडे कोणि फ़िरकलेले नाही अस दिसतय. अजुन कोणत्या गावकडे अशी प्रथा आहे आणि त्याला काय म्हणतात याची वाट बघतोय. रॉबिन तुम्ही लिहाल अशी अपेक्षा आहे. दिनेशदा तुम्हाला पण काहि माहिती असेल तर येवु दे.
|
Zakasrao
| |
| Tuesday, May 22, 2007 - 11:10 am: |
| 
|
दिवानसाब" मला एकदम माझी आत्या आठवली>>>>>>> माझ्या आईला माझी एक मामी दिवाणसाब म्हणायची तर माझ्या धाकट्या मावशीला लाडसाब आणि मोथ्या मावशीला काय म्हणाय्ची ते आठवत नाही. उद्या सांगतो. (आई सध्या पुण्यात आहे ८ दिवसांकरता तिला विचारतो) मी लहान असताना एकदा आईला विचारल होत कि मामी तुला दिवाणसाब का म्हणते त्यावर ती म्हणाली होती कि तशी प्रथा आहे. NKASHI गोडेतेल किंवा शेंगतेल. मला तर आधी येशेल तेल हा शब्द फ़क्त कोल्हापुरमधे वापरतात बाहेर नाहि हेच माहित नव्हतं.
|
Saee
| |
| Tuesday, May 22, 2007 - 11:25 am: |
| 
|
झकासराव, त्या bb वर आधी आलेले शब्द सोडून तुम्हाला आणखी काही आठवत असतील तर भर घाला... तेच शब्द इथे पुन्हा यायला लागले म्हणुन आठवण करुन दिली.. मागे पडलेला bb पुन्हा धावू शकतो की!
|
Rajya
| |
| Tuesday, May 22, 2007 - 12:21 pm: |
| 
|
मीही कोल्हापुरचाच आहे, आमच्या कडे एक म्हण आहे, "वाई वरुन सातारा", याचा अर्थ सातारा, पुणे ईकडच्या लोकांना माहीत नाही. एखाद्या जवळच्या गोष्टीचा लांबचा संदर्भ देणे. याला समांतर म्हण म्हणजे, "काखेत कळसा आणि गावाला वळसा"
|
म्हण : सहज पडे आणि दंडवत घडे ! अर्थ : प्रयत्न न करता मोठे काम होणे.
|
हे पावणेर अथवा हत्यारी ला आमच्या नगर कडे इर्जीक म्हणतात.(म्हनजे म्हणायचे भूतकाळच ्झाला तो!)तेच जवळच्या शेतकरी मित्रानी कामे करायची त्याबदल्यात कामवाल्याने जेवण द्यायचे. इर्जीक शब्द साहित्यातही आढळतो. आमच्याकडे मांसाहारी इर्जीक कधी दिसली नाही कारण परवडत नसते म्हणूनच तर इर्जीक करायची मग नॊन व्हेजचा खर्च कसा परवडेल? आमच्याकडे पु-या व गुळवणी हा एकमेव मेनु असे. पु-याला आमच्या कडे ’तेलच्या’ असा शब्द आहे...तेलच्या गुळवणी अन वांग्याची भाजी म्हणजे स्वर्ग महाराजा स्वर्ग!!! विशेषत: नांगरणीला अशा इर्जीकी होत अन नांगरट रात्री चाले. दिवसा उन असे रात्री सुखद थन्डावा असे व काम होई.. विशेष म्हणजे या नांगरटी चांन्दण्या रात्री होत.कारण नांगरायला दिसले तर पाहिजे ना. काय सुरेख वातावरण असे . चान्दणी रात्र.नांगर चालू, शेतक-यांन्ची गाणी हास्यविनोद, चांदण्यातले गोडधोडाचे जेवण वा वा!(माझ्या गळ्यात आता दु:खाने आवंढा आला आहे...)
|
आमच्या कडे एक म्हण आहे, "वाई वरुन सातारा", >>>> आमच्याकडे ”पुण्याहून पुणताम्ब्यास ” असे म्हणतात. पुणताम्बा गाव शिर्डीजवळ आहे . चांगदेव महाराजांची समाधी आहे तिथे. पण त्याचा अर्थ असा होतो सोपा मार्ग असताना अवघडात जाणे. काखेत कळसा त्याच्याशी सुसंगत नाही कारण त्याचा अर्थ वस्तू जवळ असून लक्षात ना आल्याने सर्वत्र शोधणे...
|
Slarti
| |
| Wednesday, May 23, 2007 - 12:42 am: |
| 
|
killer instinct ला मराठी प्रतिशब्द काय होऊ शकतो?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|