|
Disha013
| |
| Friday, May 18, 2007 - 8:39 pm: |
| 
|
मंजु,नंदिनी,च्या, शाळेच्या चर्चेवरुन माझा एक वेंधळेपणा आठवला. माझ्या शाळेत तेव्हा roll no. न्हवते. हजेरी (म्हणजे presenty ) घेताना शिक्षक विद्यार्थ्याच्या आडनावाचा पुकारा कराय्चे. अशिच एकदा सर हजेरी घेत असताना येस सर म्हणायच्या ऐवजी मी उठुन परत माझेच नाव पुकारले! सगळा वर्ग खो-खो हसत सुटलेला.
|
Runi
| |
| Friday, May 18, 2007 - 10:49 pm: |
| 
|
च्या. तुझ्या घरचे सगळेच धमाल आहेत वाटते. शाळेवरुन आठवले, मी ९ वी ला असतांना सत्र परिक्षेच्या वेळी इंग्रजीच्या पेपरला संस्कृतचा अभ्यास करुन गेले होते. बाईनी प्रश्नपत्रिका वाटल्यावर मी अगदी आत्मविश्वासाने उभी राहुन म्हणाले की बाई (तेव्हा त्यांच्या मॅडम नव्हत्या झाल्या) तुमची काही तरी चुक झालीए, आत्ता संस्कृतचा पेपर आहे, उद्या आहे इंग्रजीचा पेपर. खरच, मी लिहुन घेतलेल्या वेळापत्रकात तसेच होते..., अर्थात हा भाग वेगळा की मी वेंधळेपणा करुन चुकीचे वेळापत्रक लिहुन घेतले होते
|
Rajankul
| |
| Saturday, May 19, 2007 - 9:15 am: |
| 
|
नव्यांशी तितकेच चांगले खेळीमेळीने वागता येणे कठिण दिसते. .नविन लोकांशी बोलुही नका आणि त्यांना भडकवु नका, ते धरमनिरपेक्ष आहेत त्यांना तसेच राहु द्या. तुम्ही आणि संतु जा तिकडे गळ्यात गळे घालुन मुसलमानांविरुध्द गळे काढा.
|
माझे आजोबा एक वाक्य कायम म्हणतात, अरे कशाचा नाही तर वयाचा तरी मान ठेवा.
|
Rajankul
| |
| Saturday, May 19, 2007 - 9:50 am: |
| 
|
ज्याने त्याने आपल्या वयाचा मान स्वता मिळवायचा असतो, तरी तुम्हि म्हणता तर मी माझे वाक्य delet करतो. नंदिनि तुझ्या शिव्यांचा उल्लेख ते का करत होते साधे कारण तुझा मित्र मुसल्मान आहे मग तुला सतवाय्चे.
|
Thats good वाक्य उडवल्याबद्दल आपले आभार. समोरच्याने लायकी सोडली म्हणून आपण आपली सोडू नये, असंही माझे आजोबा म्हणतात. मी ते अमलात आणत आहे. तर माझा धमाल वेंधळेपणा. पूर्ण कथा लिहिली आणि सेव्ह करायचे लक्षातच नाही. पॉवर गेली. आणि कथा पण. आता लिहा परत.
|
Gobu
| |
| Saturday, May 19, 2007 - 10:03 am: |
| 
|
राजन, धन्यवाद! रुनी, दिशा, नन्दिनी,... कुठे गेले सगळे? चला एखादा भन्नाट किस्सा येऊ द्या...
|
Zakasrao
| |
| Saturday, May 19, 2007 - 11:12 am: |
| 
|
मी शनिवारी घड्याळाकडे लक्ष देवुन असतो. कधी सुटतो आणि कधी पळतो घरी. आज अजुन कं. सुटायला तासभर अवकाश आहे पण मी तिरक्या नजरेन घड्याळ पाहिल तर मला ते ४:३५ च्या ऐवजी ५:३५ दिसल. (काय करणार शनिवार इफ़ेक्ट) मग मी एक एक खिडकी बंद करायला सुरु केली. PC बंद करुन जाण्यासाठी. सगळ्या खिडक्या बंद केल्या आणि माझ्या PC ला शटर ओढ अस सांगितल. त्याने बिचार्याने काय जस सांगितल तस केल. मग मी उठुन इकडे तिकडे पाहिल तर जे लोक नेहमी राईट टाइम पळतात ते जागेवरच दिसले. हे अस कस म्हणुन मित्राच्या PC वर जावुन वेळ पाहिली तर मी एका तासाने पुढे............ मग काय परत केला सुरु त्याला. आणि लगेच हा किस्सा लिहिला.
|
च्यायला सहि यार, बर्याच दिवसानंतर पोट धरुन हासलो...... 
|
Chyayla
| |
| Saturday, May 19, 2007 - 1:24 pm: |
| 
|
मधुरा, सन्घा, दीशा, गणेश तुम्हाला धन्स. काय म्हणता गणेश खुप दीवसानी दीसलात झकासा ईतकही बायकोच्या धाकात राहु नये शनिवारी लवकर या म्हटल्याबरोबर... दीवे घेशील रे बावा. रुनी.. बापरे याला म्हणतात आत्मविश्वास, पण खरच अशी वेळ माझ्यावर आली असती तर च्या. तुझ्या घरचे सगळेच धमाल आहेत वाटते. अरे माझ्या मावशीचे अजुन किस्से आहेत. अजुन एक भारी किस्सा सान्गुनच देतो. एक दीवस काका (माझ्या मावशीचे यजमान) आमच्याकडे नागपुरला आले तेन्व्हा घरात घालण्यासाठी पैजामा काढावा म्हणुन मावशीनी प्याक केलेली सुटकेस उघडली तर कुठे त्यान्चा पैजामाच दीसत नव्हता आणी त्याऐवजी काकान्च्या सुटकेस मधुन निघाला परकर काका म्हणाले पहा म्हणे तुझ्या मावशीचा वेन्धळेपणा आता मी काय घरात पैजामा ऐवजी परकर घालुन बसु का?
|
च्यायलाअ, हसून हसून पुरेवाट झाली. बाप रे!! तू अगदी मावशीवर गेलायस म्हणजे
|
Monakshi
| |
| Saturday, May 19, 2007 - 5:08 pm: |
| 
|
च्यायला मावशी ग्रेटच, पण मा.भा. ने संभाषण अजून ताणायला हवं होतं. आम्हाला आणख़ी काही धमाल वाचायला मिळाली असती.
|
Runi
| |
| Sunday, May 20, 2007 - 1:38 am: |
| 
|
झकास, PC ला शटर ओढ म्हणजे काय? गोबु अरे मी इथेच आहे ROM मध्ये.
|
Runi
| |
| Sunday, May 20, 2007 - 1:57 am: |
| 
|
अजुन एक किस्सा कॉलेज मधला. मी १२ वीला असतांनाचा. Physics ची टेस्ट होती. घरात मी एकटीच होते आणि परीक्षेच्या एक तास आधीच तयार होवुन मैत्रीणीची वाट बघत बसले होते. वाट बघता बघता कधी डोळा लागला कळलेच नाही. जाग आल्यावर बघितले तर परिक्षेची वेळ टळुन अर्धा तास होवुन गेला होता. मग तशीच गेले परिक्षेला. सरांनी विचारले उशीर का झाला, काय करत होतीस हे विचारल्यावर मी सांगीतले, सर मी झोप काढत होते. हे ऐकुन सरच काय अख्खा वर्ग हसत सुटला
|
Runi
| |
| Sunday, May 20, 2007 - 2:00 am: |
| 
|
अजुन एक किस्सा कॉलेज मधला. मी १२ वीला असतांनाचा. Physics ची टेस्ट होती. घरात मी एकटीच होते आणि परीक्षेच्या एक तास आधीच तयार होवुन मैत्रीणीची वाट बघत बसले होते. वाट बघता बघता कधी डोळा लागला कळलेच नाही. जाग आल्यावर बघितले तर परिक्षेची वेळ टळुन अर्धा तास होवुन गेला होता. मग तशीच गेले परिक्षेला. सरांनी विचारले उशीर का झाला, काय करत होतीस हे विचारल्यावर मी सांगीतले, सर मी झोप काढत होते. हे ऐकुन सरच काय अख्खा वर्ग हसत सुटला
|
Runi
| |
| Sunday, May 20, 2007 - 2:02 am: |
| 
|
हा अजुन एक वेंधळेपणा झाला एकच मेसेज दोनदा पोस्ट करुन . डिलीट कसे करायचे स्वतःचे पोस्ट?
|
Arch
| |
| Sunday, May 20, 2007 - 2:11 am: |
| 
|
रुनी, त्या फ़ुलीवाल्या icon वर click कर delete करायला.
|
Runi
| |
| Monday, May 21, 2007 - 12:11 am: |
| 
|
धन्यवाद आर्च. पुढच्यावेळी लक्षात ठेवेन.
|
Zakasrao
| |
| Monday, May 21, 2007 - 4:16 am: |
| 
|
रुनि PC ला शटर ओढ असे सांगितले याचा अर्थ दुकान बंद कर. अजुन नाही कळाले. अरे म्हणजे shut down . च्या. तु आणि तुझी मावशी ग्रेट. रुनि दोनदा लिहुन तु सिद्ध झाली आहेस कि तु वेंधळी आहेस तेही दोनदा.
|
Alpana
| |
| Monday, May 21, 2007 - 4:29 am: |
| 
|
कुणी हापुस आम्ब्याच्या रसात ताक घातलय कधी? ते पण लग्नानन्तर पहिल्यान्दा....... रस बनवताना..... मी कालच करुन बघितले....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|