|
Bee
| |
| Tuesday, April 24, 2007 - 7:22 am: |
| 
|
ग्रेस.. म्हणजे कवी ग्रेस का?
|
बी, होय कवी ग्रेसच! ग्रेसच्या गद्य लिखाणात इनग्रिड बर्गमनचे बर्याचदा उल्लेख येतात. मी देखील बर्गमन कॅसाब्लान्का म्ध्येच पाहिली. जबरदस्त. काय इन्टेन्सिटी आहे! अन तिचा तो विश्वप्रसिद्ध डायलॉग... play it again Sam!!! हा डयलॉगच इतका गाजला की काही दिवसानी याच नावाचा एक चित्रपट निघाला!!
|
Malavika
| |
| Tuesday, April 24, 2007 - 3:48 pm: |
| 
|
here is to looking at you kid! हे विसरु नका
|
Bee
| |
| Wednesday, April 25, 2007 - 2:56 am: |
| 
|
मालविका, नक्की काय म्हणते आहेस काहीच कळले नाही.. कुणाची मुले.. काय विसरू नका.. रॉबीन, धन्यवाद.. मग हा चित्रपट बघायलाच हवा.. आता स्पेलींग शोधतो आहे गूगलवर...
|
बी त्यासाठी casablanca बघ एकदा... माझ्या कॉलेजमधे जेव्हा हा पिक्चर दाखवला होता तेव्हा आम्ही सगळ्यानी तो हट्टाने परत पाहिला. रात्री उशीरा पर्यन्त थांबून..
|
Bee
| |
| Wednesday, April 25, 2007 - 8:46 am: |
| 
|
स्पेलींग बद्दल धन्यवाद नंदीनी..
|
बी तुझ्यासाठी आणखी एक डायलॉग Of all the gin joints in all the towns in all the world, she walks into mine.
|
अरे हो... हा तर एकदम वेगळा. आणि तो अजून एक होता ना मला नीट आठवत नाही Louis, I think this is the beginning of beautiful friendship आणि somehow, just because you despise me, you are the only one I trust हा माझा आवडता...
|
कॅसाब्लॅन्का!६६ वर्षापूर्वीचा पिक्चर. माझ्या १६ वर्षाच्या मुलालाही आवडतो म्हणजे काय! वैश्विक वैश्विक म्हणतात ते हेच. काळ, पिढ्या, भूप्रदेश ओलान्डूनही ह्याही पिढीवर मोहिनी घालू शकतो म्हणजे बघा! चित्रपटांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट मानल्या गेलेल्या पहिल्या तीन क्लायमॅक्स मध्ये कॅसाब्लॅन्काच्या समावेश होतो. त्याचे समर्थक तर त्याच्या क्लायमॅक्सला एक नम्बरचाच क्लायमॅक्स मानतात..... ग्रेट ग्रेट अन ग्रेटच!!!
|
Psg
| |
| Monday, April 30, 2007 - 8:07 am: |
| 
|
तारारमपम पाहिला.. पूर्णपणे family movie .. चित्रपट अगदी focussed आहे. सैफ़ racing car driver आहे, राणी त्याची बायको आणि २ मुलं.. तो successful असताना आणि नसतानाही सगळे एकत्र राहतात, मिळून कष्ट करतात, आनंदी राहतात आणि पुन्हा खडतर जीवनातून जिद्दीनी बाहेर पडतात अशी कथा. भरपूर racing tournaments दाखवल्या आहेत. १-२ कमी असत्या तरी चालल्या असत्या चित्रपट कुठेच इकडे-तिकडे जात नाही आणि म्हणूनच लांबी थोडी कमी चालली असती. सैफ़ आणि राणीचा अगदी सहज वावर. राणीबद्दल तशीही शंका नाही, पण सैफ़नेही अगदी सहज अभिनय केलाय. राणी मस्त बारीक झाली आहे. छान दिसते. ते 'गरीब' झाल्यानंतर उपाशी वगैरे रहातात त्यासाठी तिला 'स्लिम हो' अश्या instruction सिद्धार्थ आनंदनी दिल्या असाव्यात! गरीबीच्या काळात तिला मेकपही नाहिये, पण कपडे मात्र श्रिमंतीच आहेत.. ते खटकत रहातं. त्यांच्या मुलीचं काम जिने केलय.. गोड आहे ती मुलगी आणि अभिनयही छान तिचा. जावेद जाफ़रीला बर्यापैकी मोठी आणि serious भूमिका आहे. गुज्जू हिंदी बोलतो तो, त्या प्रकारचे टीपीकल जोक आहेत सुरुवातीला. thankfully पूर्ण सिनेमाभर तसला अचरटपणा नाहिये. चित्रपटातून संदेश वगैरे घ्यायचा असेल तर 'पैसे वाचवा.. save for your future .. ' असा आहे एकूण, बघायला गेलात तर चांगला टीपी होईल. पण if you have better things to do , नाही गेलात तरी you wont miss anything! घरी CD आणून पाहिला तरी चालेल.
|
माझ्या एका मैत्रिणीने "तारा रम पम" म्हणजे Cinderella Man ची भ्रष्ट नक्कल आहे असे सांगितले...मी अजुन "तारा रम पम" पाहिला नाही त्यामुळे काही कल्पना नाही.....
|
Farend
| |
| Monday, April 30, 2007 - 5:15 pm: |
| 
|
Psg ते गरीब झाल्यावर नवीन गरीब वाटणारे कपडे घ्यायला पैसे नाहीत म्हणून मूळचे श्रीमंतीतील कपडे वापरत असतील
|
आणि कदाचित कपडे लोन वर घेतले नसतिल म्हणुन , तुम्हि जर "Cinderella Man" पाहिला असेल तर उगाच अमुल्य वेळ वाया घालु नका, बरेच हिंदी Movies इंग्लिश ची नक्कल असतात,पण कधि कधि बॉलिहुड स्टाईल मध्ये बघायला मजा येते. 
|
Mbhure
| |
| Tuesday, May 01, 2007 - 8:03 pm: |
| 
|
हनिमून एक्सप्रेसः फार प्रश्न न काढता, डोक बाजुला ठेऊन बघितला तर मस्त TP आहे. मला तरी आवडला. गाणीही बरी आहेत. मला बॅले डान्सचे गाणे आवडले. निःशब्दः एका BOLD विषयाचा सर्व बाजुनी विचार न करता काढलेला चित्रपट कसा असतो हे बघायचे असेल तर अवश्य बघा. (तसे बरेच हिंदी सिनेमा ह्या वळणाचे असतात) पण रामुसारखा डायरेक्टर अश्या गंभीर विषयावरचा चित्रपट बनवताना कसलाच का अभ्यास / विचार करत नाही? कोणीतरी आपली आयडिया चोरेल आणि अमिताभला घेऊन हा सिनेमा काढेल म्हणुन घाई करून एकदा गंगेत घोड नहायला घातल्यासारखे वाटते. ती जिया अमिताभला Innocent वाटते.... हाच एक विनोद आहे. तोकड्या चड्ड्या आणि अघळपघळ कपडे घातल्यामुळे कोणी Innocent कसे काय वाटू शकते?.... फक्त सेक्सी वाटू शकते. अमिताभबद्दल न बोललेलेच बरे. हल्ली त्याला " दिलीप कुमार " रोग झाला आहे. तो किती पुतपुटतो. मला तर बर्याचदा सब - टायतस वाचूनच डायलॉग कळतात. त्यामानाने Joggers Park बरा होता. रामू, यश चोप्रा ह्यांसारख्याने(यादी लांब आहे) आता जरा रेश्ट घ्यावी. सलाम - ए - इश्कः झोप येण्यास उत्तम औषध आहे. तुकड्यात बघण्याचा परयत्न केला; पण......
|
Honeymoon Travels Pvt. Ltd. आणि Honeymoon Express हे वेगवेगळे आहेत कि एकच आहे ?
|
Nanya
| |
| Tuesday, May 01, 2007 - 10:16 pm: |
| 
|
Honeymoon Express असा काही movie आहे का? मी तरी कधी ऐकले नाही. इन्ग्रजी आहे का हिन्दी? कदाचित Honeymoon Tarvels PVt. Ltd म्हणायचे असेल MBhure ना
|
Bee
| |
| Wednesday, May 02, 2007 - 3:18 am: |
| 
|
दिप्ती नवल खरच किती सुंदर अभिनेत्री आहे.. म्हणजे तिचा अभिनय, तिची चित्रपट निवड सगळेच काही मला आवडते. काल तिचा 'एक बार फ़िर.. ' हा अगदी वेगळा चित्रपट बघितला.
|
Sayuri
| |
| Wednesday, May 02, 2007 - 4:29 am: |
| 
|
Yes Bee, right! मला तिचा 'चष्मेबद्दूर' सगळ्यात जास्त आवडतो. आणि 'कथा' पण. 
|
सलाम - ए - इश्कः झोप येण्यास उत्तम औषध आहे. तुकड्यात बघण्याचा परयत्न केला; पण...... >>>>>>>>>>>>> धुरे साहेब, आम्हि तो पिक्चर बघत असतांना झोपायचा प्रयत्न केला होता, पण काय ती प्रियंका चोप्रा आणि तो सल्लु मिया ची कट कट.... फ़ार बोर केल आहे आहे हो त्यांनी..............
|
Sayuri
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:46 pm: |
| 
|
'1971' Worth watching! Based on true story.पाकच्या कैदेत असलेल्या भारतीय युद्धकैद्यांनी पळून जाण्याचा केलेला प्रयत्न हीच चित्रपटाची प्रमुख स्टोरी आहे.(शेवट तर हेलावून सोडतो) मनोज वाजपेयी, रविकिशन आणि इतर चेहेर्यांचाही उत्तम अभिनय.(उगाच भाराभार 'स्टार मंडळी' भरलेली नाहीत. नाहीतर युद्धपटात सनी देओल, सुनिल शेट्टी, पुनीत इस्सर, सुदेश बेरी या त्याच त्याच मंडळींना बघून कंटाळा आला होता.) ओढूनताणून अनावश्यक गाणी/डान्स नाहीत. मला तरी हल्लीच्या इतर सिनेमांच्या भाऊगर्दीत हा वेगळा वाटला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|