| 
   | 
| | Manjud 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 10:34 am: |       |  
 | 
 नमस्कार, मी मन्जू, पहिल्यान्दाच लिहीत आहे. समजुन घ्या. तुमच्या वेन्धळेपणात माझीही एक भर.
 
 बरेचदा ऑफिस मध्ये फोनवर मी एखाद्या माणसाशी बोलत असते; त्याला माझ्या सहकार्याशी बोलायचे असते. नेमका त्याच वेळी सहकार्याच्या फोन वर माझा फोन येतो. मग काय फोनची अद्लाबदल. आपले बोलणे झाल्यावर मी फोन ठेउन देते. सहकारी ओरडतो, " माझा फोन का कट केला?".
 
 एक मदत्: देवनागरीत अनुस्वार कसा द्यायचा? आणि "सहकार्याशी " शुद्ध कसे लिहायचे?
 
 
 
 
 |  | | Monakshi 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 10:53 am: |       |  
 | 
 इकडे अनेक लेन्सचे किस्से वाचून मलाही माझा वेंधळेपणा सांगावासा वाटतो.
 
 ऑफिसला जायच्या गडबडीत मी लेन्स घातल्या, डाव्या डोळ्याची बरोबर गेली पण उजव्या डोळ्याची लेन्स घातल्यावरही नीट दिसेना मला वाटलं बेसीनमध्ये पडली म्हणून तीथे शोधले पण नाही मिळाली, नवर्याला पण कामाला लावलं त्याने बेसीनच्या आजूबाज़ूला, बाथरुममध्ये सगळीकडे शोधलं पण नाही मिळाली शेवटी वैतागून दुसरी लेन्स पण काढली आणि चष्मा घातला, आधीच ऑफीसला जायला उशीर त्यात ही कटकट. थोड्यावेळाने उजव्या डोळ्यात ख़ुपायला लागले म्हणून पापणी वर करुन पाहिली तर काय पापणीच्या आतल्या भागाला लेन्स चिकटूण बसली होती. नशीब ऑफिसला जायच्या अगोदरच कळलं ते. नवर्याने मला कोपरापासून नमस्कार केला.
 
 
 |  | | Manjud 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 10:58 am: |       |  
 | 
 हे माझ्या बाबतीत बरेचदा घडते. त्यामुळे आता लेन्स हरवली की नवरा म्हणतो, आधी स्वत:च्या डोळ्यात बघ.
 
 
 |  | | Zakki 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 1:38 pm: |       |  
 | 
 आधी स्वत:च्या डोळ्यात बघ.
 त्यात काय गंमत? नवरा बायकोने कसे 'एकमेकांच्या' डोळ्यात पहायचे असते आणि बरेच काहि काहि.
 
  
 
 |  | नवरा बायकोने कसे 'एकमेकांच्या' डोळ्यात पहायचे असते
 
 हो! परक्याच्या डोळ्यात पाहून बघा, म्हणजे कळेल, कसे तुमच्या जोडीदाराच्या डोळ्यात खुपते ते!!
 
 
 |  | | Runi 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 4:03 pm: |       |  
 | 
 manjud  अनुस्वार देण्यासाठी  .n  वापरा. उदा.  ma.nju  लिहिले तर ते मंजु दिसेल. सहकार्याशी
 हा शब्द  sahakaaRyaashii  अस लिहितात.
 देवनागरीत लिहीण्यासाठी मदत हवी असेल तर ही लिंक बघा
 
 
 |  | | Supermom 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 4:20 pm: |       |  
 | 
 लेन्स ची काहीनाकाही गंमत होतेच नेहेमी.
 मी एकदा दोन्ही लेन्सेस घालून झाल्यावर इकडेतिकडे पाहिले आणि जाम हादरले. खूपच धूसर आणि विचित्रच दिसत होतं. काहीच कळेना. बरे लेन्सेस डबीत नव्हत्या.इकडेतिकडे पडलेल्याही नव्हत्या. शोधायला मदत करायला नवरा घरी नव्हता. अचानक हे आपल्या डोळ्यांना काय झाले ते कळेनाच.
 मग शोध लागला की एकाच डोळ्यात एकावर एक दोन्ही लेन्सेस विराजमान झाल्या होत्या.
 
 
 |  | | Monakshi 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 4:35 pm: |       |  
 | 
 सुपरमॉम,
 
 सॉलीडच!
 
 पण ख़रंच कधी कधी जाम वाट लागते. त्यापेक्शा चष्मा बरा वाटतो.
 
 
 |  | | Gobu 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 4:54 pm: |       |  
 | 
 सुपरमम्मी,
 मज्जाच करतेस ह तु!!!
   ह. ह. पु. वा.
 
 
 |  | | Karadkar 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 6:53 pm: |       |  
 | 
 कालचा माझा किस्स  -  सकाळी कधि नव्हे ते ब्रेकफास्टला काहीतरी करुयात म्हणुन पट्कत पातळ पोह्यात मीठ, लिंबु साखर घातली आणि लाल तिखट कशाला म्हणुन परवा केलेला हिरव्या मिरचीचा खरडा घातला. ते मिश्रण काही चमच्याने एकत्र होइना म्हणुन हाताने मिसळले. खाउन काम करत बसले. नंतर लेन्सेस घालायला गेले तोपर्यन्र्त विसरले की मिरच्यांना हात लावलेला
   
 आईग असले घळाघळा पाणी आले ना
  नशीब घरी कुणी नव्हते माझ्यावर हासायला 
  
 
 |  | | Suyog 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 7:13 pm: |       |  
 | 
 माझ्या एका मैत्रिणीने नवीन लेन्स बनवुन वापरायला सुरुवात केली होती. एकदा ती २ व्हीलर वर जात असताना एक जण तीला धडकला. तिच्या डोळ्यातुन खुप पाणी यायला लागले.  धडकणारा म्हणाला रडु नका, मग तीने सान्गीतले कि पाणी नवीन लेन्स मुळे येत आहे
 
 
 |  | | Runi 
 |  |  |  | Friday, April 27, 2007 - 7:17 pm: |       |  
 | 
 मिनोती,
 हो असे माझ्या बाबतीत पण होते बर्याचदा, तिखटाचा हात आहे हे लक्षात येत नाही आणि लेन्स लावली जाते. आई ग मग कसले चुरचुरते.
 
 
 |  | बास आता लेन्सचे किस्से.. असं मी म्हणणार होते.. पण सकाळचा वेंधळेपणा खिशाला चाट देणारा ठरलाय...
 
 लेन्स घालताना पडली. अर्धा तास शोधूनही सापडली नाही.... आता संधाकाळी नवीन घ्यायला जायचं.. त्यातच महिना अखेर..
   
 
 |  | | Giriraj 
 |  |  |  | Saturday, April 28, 2007 - 6:57 am: |       |  
 | 
 मीही आता लेन्सचा किस्सा लिहू म्हटले स्वतःलाच... मग आता लक्षात आले की मला कधीच लेन्सच काय चषमाही लागला नव्हता... आणि मी कधी प्रत्यक्षात लेन्स पाहिल्याही नाहीयेत!
   
 
 |  | | Ajjuka 
 |  |  |  | Saturday, April 28, 2007 - 12:05 pm: |       |  
 | 
 लेन्सबद्दलचा महान किस्सा. ३-४ वर्ष झाली तरी अजून हसायला येतं..
 (वेंधळेपणा माझा एकटीचा नाही आणि लेन्सेस ही माझ्या नाहीत)
 ६ फेब्रु. २००३ मधे पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमधे शूटींग सुरू झाले. अश्विन चे डोळे काळेभोर आहेत पण सिनेमातला परश्या रेटिनोब्लास्टोमा चा पेशंट असल्याने डोळे थोडे  lighter  असायला लागणार होते त्यामुळे त्याला लेन्सेस लावायच्या ठरलेल्या होत्या. लेन्सेस पहिल्या फटक्यात डोळ्यात बसल्या. (६ वर्षाच्या त्या पोराच्या डोळ्यात लेन्सेस बसवायच्या म्हणजे त्याची आई आणि मी आमच्या डोळ्यातून पाणी निघायचं.. तो मात्र मजेत असायचा). लेन्सेस घालून स्वारी हुंदडत होती. एक शॉट ओके झाला आणि दुसर्याची तयारी झाली नी आता एकदा रिहर्सल नी मग टेक सुरू आणि तेवढ्यात कुणीतरी ओरडलं, "अरे याच्या डोळ्यातली लेन्स कुठेय?" लेन्स कुठे तरी पडली. झालं सगळं ५० माणसांचं युनिट शोधतंय लेन्स. ती थोडीच मिळायला. अर्थात जास्तीची एक जोडी होतीच आमच्याकडे त्यामुळे त्यातली लेन्स घालून शूट सुरू केलं. एक दोन शॉटस् झाले संध्याकाळपर्यंत आणि परत अश्विनचा एक डोळा काळा आणि एक लेन्सच्या रंगाचा दिसू लागला. अश्विनची आईच आता वैतागून, "अश्विन, लेन्सचं काय केलंस? तुला सांगितलं होतं ना इकडे तिकडे नाचू नको म्हणून..!" या नोटवर गेली. आता जास्तीचीही एकच लेन्स उरली होती आणि ती अजून लेन्सेस आणून ठेवायला मॅचिंगसाठी पाठवली होती. परत शोधाशोध. अर्धा तास असा गेला आणि अश्विनची आई परत एकदा,
 " ए अश्विन, डोळ्यात काय आहे तुझ्या?"
 "कुठे काय?" इति बाळराजे..
 "अरे डोळा असा का विचित्र दिसतोय तुझा?"
 एव्हाना मी आणि संदीप तिथे पोचलो होतो. अश्विनच्या एका डोळ्यामधे एक काळं आणि एक ग्रे अशी दोन बुबुळं दिसत होती. थोडक्यात थोड्यावेळापूर्वी लेन्स हरवलेली वा पडलेली नसून ती सरकून त्याच्या डोळ्यात लपून (शब्दशः) बसली होती. आणि ती सगळ्यात सॉफ्ट असल्याने त्यालाही लक्षात आले नाही. नंतर काही दिवस शूट ला आल्यावर सकाळी अश्विनला, " आज किती लेन्सेस बाहेर पडल्या डोळ्यातून?" असं विचारलं जात होतं. पण एवढं नाटक पहिल्या दिवशीच झाल्यावर नंतर मात्र त्या गुणी बाळाने लेन्सेस ची फार छान काळजी घेतली.
 
 
 |  | | Ultima 
 |  |  |  | Saturday, April 28, 2007 - 2:13 pm: |       |  
 | 
 च्यायला...
     खरच धन्य आहेस बाबा तु......  तुझे चरण कुठे आहेत? (मी किती नाही कुठे अस विचारतेय)
 
 
 |  | | Monakshi 
 |  |  |  | Saturday, April 28, 2007 - 4:30 pm: |       |  
 | 
 अरेरे,
 
 काय हो हाल करता लहान मुलांचे??
 
 
 |  | एकदा माझे कॉलेजचे सर अचानक बसमध्ये भेटले. बसमध्ये एकदम पीक आवर्सची गर्दी होती. आम्ही दोघे कसबसे उभे राहिलेलो. बोलता बोलता सरांचा स्टॉप आला आणि ते मागे दरवाजाकडे जायला निघाले. तर मी म्हटले की, एवढी गर्दी आहे तर कंडक्टर मागच्या दरवाज्याने तुम्हाला उतरू देणार नाही, त्यापेक्षा पुढच्या दरवाजाकडे जा. ते गर्दीतून पुढे सरकत सरकत पुढच्या टोकाकडे गेले तेव्हा माझ्या आणि त्यांच्याही लक्षात आले की आम्ही डबल-डेकर मध्ये होतो. बोलण्याच्या नादात हे विसरून गेलेलो. अर्थात यात सरांचा स्टॉप निघून गेला. सर म्हणाले, तू माझा चेला आणि मी तुझा गुरू मग असेच होणार.
   
 
 |  | | Manjud 
 |  |  |  | Monday, April 30, 2007 - 7:20 am: |       |  
 | 
 Runi,सहकार्याबद्दल धन्यवाद.
 
 अरे, बटाटेवड्याचे सारण तयार करुन कोणी लेन्स घालुन पाहिल्या आहेत का? काय सही मज्जा येते
 
 
 |  | | Manjud 
 |  |  |  | Monday, April 30, 2007 - 7:33 am: |       |  
 | 
 एकदा क्लासला जायला उशीर होत होता म्हणून सिग्नल वरुन यू टर्न मारण्या ऐवजी फुटक्या डीव्हायडर मधुन कायनेटीक काढली. कायनेटीक वळवून झाली आणि समोर पोलिस............तेवढ्यात मागुन बाबा............काय झाले असेल माझे...............
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |