|
आज मला अंतिम सत्य समजले जे मी मोबाईलने टिपून घेतले :

|
Storvi
| |
| Friday, April 20, 2007 - 1:03 am: |
| 
|
ह्यो रिक्षा वाला नक्कीच किरिस्ताव असणार 
|
Zakasrao
| |
| Saturday, April 21, 2007 - 4:49 am: |
| 
|
राफ़ा त्या अंतिम सत्याच्या ओळी लिहिल्या असत्या तर जास्त धमाल आली असती. माझा एक मित्र आहे जन्मल्यापासुन नारायण पेठेत राहिलाय. तर त्याने लग्नानंतर एक फ़ोटो काढला होता. त्यामधे उभयंता होते. त्याखाली लिहिल होत " कोण म्हणतय ह्या जगात कोणी सुखी नसतय आमच्याकडे बघा आणि जगायला शिका " हे हॉल मधे लावल आहे त्याने.
|
स्तो ! झकास अरे स्पष्ट दिसत आहेत ना ओळी 'परमेश्वर माझा मेंढपाळ आहे." आणि त्याखालील लहान अक्षरे म्हणजे "स्तोत्र २३ १ " त्याच्या रिक्षाच्या नंबरमधे मात्र 'मेंढी' (मटक्यातली) नसावी . 'जाणकार' खुलासा करतील काय
|
ह्या रीक्शावाल्याला ओपन आणि क्लोज दोन्हीला मेन्ढी लागली असेल एखाद्या दिवशी.. म्हणुन लिहिले आहे त्याने हे.. नवटाक लागला असता तर बहुतेक त्याने लिहिले असते, परमेश्वर माझा हाथभट्टी लावतो..
|
Dineshvs
| |
| Saturday, April 21, 2007 - 11:35 am: |
| 
|
येशु आमचो गौळी आमी त्याचे शेळी असे एक कोकणी गाणेहि आहे, त्याचा संदर्भ असावा बहुतेक.
|
रिक्षाच्या नम्बरात 'मेंढी' आहे ना... स्पष्टच दिसते आहे...
|
ह्यो रिक्षा वाला नक्कीच किरिस्ताव असणार 
|
Disha013
| |
| Saturday, April 21, 2007 - 7:59 pm: |
| 
|
हे किरिस्ताव काय प्रकरण आहे बुवा?
|
Zakki
| |
| Sunday, April 22, 2007 - 2:37 am: |
| 
|
दिशा०१३, किरिस्ताव म्हणजे ख्रिश्चन.
|
Bee
| |
| Sunday, April 22, 2007 - 10:15 am: |
| 
|
नंबरात मेंढी आहे म्हणजे नक्की काय..
|
या बी चे काही खरे नाही बुवा! ही मटक्याची परिभाषा आहे. अब ये मत पूछना मटका म्हणजे काय ते. मेंढी म्हणजे शून्य. सात ला मटक्यात लंगडा म्हणतात. असे प्रत्येक नम्बरला कोड वर्ड असतात. आता फारसा मटका राहिला नाही... दुबारा मत पूछना..
|
Bee
| |
| Monday, April 23, 2007 - 2:16 am: |
| 
|
खरच मला हे काहीच माहिती नाही.. पण interesting.. आहे..
|
धन्यवाद रॉबीनहूड. आपले चौफेर ज्ञान पाहून मी impress झालो आहे (मला बर्याच दिवसात टच मधे नसल्याने आठवले नाही )
|
Giriraj
| |
| Monday, April 23, 2007 - 5:23 am: |
| 
|
दुबारा मत पूछना....... पण त्याने ऐकले तर तो बी कसला
|
बी, अरे असा कसा रे तू? पाच तीन दोन, challenge तीन पत्ती वगैरे कळत नाही. मटका समजत नाही. अरे, इतकी कशी तू सुधारीत आवृत्ती? थोडा बिघड...
|
Bee
| |
| Monday, April 23, 2007 - 9:28 am: |
| 
|
नंदीनी, मी पत्त्याला कधीच हात लावलेला नाही. ह्याला कारण एकच की पत्ते म्हणजे जुगार हा झालेला समज, मग मनोरंजन म्हणूनही हा खेळ मी खेळलेलो नाही. रमी, डाव, ऐक्का, दुर्री, तिर्री हे शब्द फ़क्त ऐकीवात आहेत.. पण मटकी, मेंढी, लंगडा हे मात्र आज प्रथमच इथे वाचतो आहे.. सुधारीत आवृत्ती म्हणत असशील तर मला माझ्यापेक्षा तुच अधिक सुधारीत वाटतेस. तुझे विचार प्रगल्भ आहेत.
|
मेन्ढी, रमी, लन्गडा..... आणि... >>>>>> तुझे विचार प्रगल्भ आहेत.     पोट धरधरुन हसलो बुवा! बी, तुझी प्रगल्भतेची व्याख्या काय हे? की यालाच "शालजोडीतला" म्हणायच?????? आता "शालजोडीतला" म्हन्जे काय अस मला तरी विचारु नकोस! 
|
लिंबू.. तू अशक्य आहेस. अरे बी, सगळे पत्त्याचे खेळ जुगाराचे नसतात. काही काही खेळ तर अख्खे कुटुंब मिळून सुद्धा खेळू शकते. उदा. बदाम सात. मी कधी मटका खेळले नाही. पण पेपरात वाचून त्याची परिभाषा समजली. तुझे वाचन तर इतके दांडगे आहे तरी तुला माहित्त नाही हे बघुन आश्चर्य वाटले. बाकी माझे विचार म्हणशील तर लहानपणापासूनच प्रगल्भ आहेत. आणि ते मटका आहे... मटकी नव्हे....
|
>> आता "शालजोडीतला" म्हन्जे काय अस मला तरी विचारु नकोस! लिंब्या त्याला तिकडे नेऊ नको बाबा. इतक्या डिस्कशनवरून तो निष्कर्ष काढेल की शालजोडीतले म्हण्जे शालीत जोडीने बसून पत्ते खेळणे >> थोडा बिघड... आता वेळ गेली. ती प्रोसेस फार लहानपणापासून चालू व्हावी लागते. मटकी
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|