Zakki
| |
| Tuesday, March 06, 2007 - 7:52 pm: |
| 
|
लोक आग आहेच फुकटची म्हणून घरनं लाटलेल्या पोळ्या वगैरे पण घेऊन येत असतील भाजायला. पण मग तिथे अशी पाटी लावायला पाहिजे की आमच्या दुकानाला लागलेली आग म्हणजे व्यंकटेश्वरच्या चितेची आग नाही. इथे पोळ्या भाजू नयेत.
|
Disha013
| |
| Tuesday, March 06, 2007 - 9:48 pm: |
| 
|
खी खी खी प्रकरण मसाला दुधावरुन चितेवर गेलं की!
|
हो ना आणि हे करणारी लोक पुण्याची नाहीत बरका
|
Deshi
| |
| Wednesday, March 07, 2007 - 5:29 am: |
| 
|
हे करणारी लोक पुण्याची नाहीत बरका >>>. म्हणजे पुण्याची लोक हे करत नाहीत की काय? त्यांचा साठी ही पाटी. हे करुन पाहा. 
|
Sush
| |
| Wednesday, March 07, 2007 - 5:43 am: |
| 
|
बाकि बहेरच्या लोकानि इथे येवुनच पुणे बिघडवले आहे हे परवच्या रेव्ह पार्टिमुळे सिद्ध झालेच आहे.
|
Disha013
| |
| Wednesday, March 07, 2007 - 11:50 pm: |
| 
|
म. टा मधे वाचल्या या पुणेरी पाट्या- १. नम्र विनंती बोर्डिंगमध्ये जेवायला व बँकेत येणाऱ्या ग्राहकांनी आपली वाहने आत लावल्यास पंक्चर करून नो पार्किंगमध्ये लावण्यात येतील. २. (पोस्टमनला सूचना) कृपया खिडकीतून पत्रे टाकू नयेत. आमटीत पडतात. चव बिघडते. ३. (खड्डेभरल्या रस्त्यावरचा बोर्ड) भव्य मोटोक्रॉस स्पर्धा... सौजन्य पुणे महानगरपालिका ४. (लाकडी जिन्यावरची सूचना) चढण्यासाठी वापरा, वाजवण्यासाठी नव्हे. ५. कृपया दु. १ ते ४ या वेळात दार वाजवू नये. येथे माणसे राहतात व ती दुपारी झोपतात. अपमान कसा होतो, हे पाहायचे असल्यास वाजवून पाहा. ६. येथे कचरा टाकू नये. साभार परत केला जाईल.
|
Zakasrao
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:21 am: |
| 
|
http://www.esnips.com/web/Puner हे घ्या लिन्क. पहा.
|
Runi
| |
| Monday, March 12, 2007 - 7:27 pm: |
| 
|
झकासराव, ती वर दिलेली लिंक चालत नाहिये रुनि
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:33 am: |
| 
|
http://www.esnips.com/web/PuneriPatya अशी आहे ती लिन्क sorry रुनी. आता पहा.
|
परवा पुण्यात एका रिक्षा स्टॅंडवरच्या रिक्षावाल्याला नळ स्टॉपला येणार का विचारले. थोडेच अंतर असल्याने शंका होती. पण तो तत्परतेने म्हणाला. " या मागच्या रिक्षात बसा. " मी बसले आणि त्या रिक्षाचा चालक (जो त्या आधीच्या रि. वा. बरोबर चकाट्या पिटत उभा होता.) आल्यावर नळ स्टॉप सांगितले. त्याने त्रासिक मुद्रेने रिक्षा चालू केली आणि दोन मिनिटांनी म्हणाला " बघा मॅडम कसा आहे तो? स्वतः निवांत उभे राहून लांबच्या गिर्हाईकांची वाट बघतो आणि आम्हाला भंगार गिर्हाईकांबरोबर पाठवतो. " मला भंगार गिर्हाईक म्हणून वर माझ्याकडेच दाद मागत होता.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 20, 2007 - 4:27 pm: |
| 
|
तिथल्यातिथे, रिक्षाला भंगारात विकलीस तर किती येतील, असे विचारावे. ( अर्थात नळ स्टॉप आल्यावरच. )
|
सन्मि 
|
>>>>> मला भंगार गिर्हाईक म्हणून वर माझ्याकडेच दाद मागत होता   विनय....   सन्मे, पण मग तू काय केलेस ते ऐकल्यावर???
|
>> पण मग तू काय केलेस ते ऐकल्यावर??? जे पुणेरी वागण्यावर इतर लोक करतात तेच. दुर्लक्ष अजून एक आठवले. दुसर्याच दिवशी सलील - संदीपचा स्वराक्षरे नावाचा कार्यक्रम पहिला. पहिला प्रयोग. पहिल्याच गाण्याला सूर जरा चढा लागला होता. जरा कर्कश्श वाटत होते. गाणे संपले आणि सलील कुलकर्णी पुढचे निवेदन करत होता. मी भावाला "म्हणून मागची तिकिटे घेऊ या म्हणत होते" वगैरे मोबाईलवर टाईप करून दाखवतेय तोच आमच्याच रांगेतला एक माणूस सानुनासिक आवाजात (अगदी " तिकडे सुभद्रेचे लग्न होऊन तीस पोर देखील झाले असेल " च्या चालीवर) जोरात ओरडला. " आवाज कमी करा. कानठळ्या बसतायत. " स्टेजवरचे आणि प्रेक्षकातले पब्लिक अर्धा क्षण स्तब्ध. त्यानंतर काही झालेच नाही अशा प्रकारे सलीलने निवेदन पूर्ण केले आणि शेवटी म्हणाला, " जी गोष्ट सांगायची ती जरा बर्या आवाजात सांगितली तर बरे होईल. सारखी कार्यक्रम पुण्यात चालूय याची जाणीव करून द्यायची गरज नाहीय. "
|
Farend
| |
| Wednesday, March 21, 2007 - 7:24 am: |
| 
|
हे वाचून मलाही एक जुना किस्सा आठवला. बरीच वर्षे झालीत तेव्हा काहीतरी तपशीलात चूक असेल, पण मी स्वत: अनुभवलेला आहे. रेणुका स्वरूप शाळेत सुधीर फडकेंचे गीतरामायण चालू होते. बाजूच्या बिल्डिंगच्या गॅलरीत कोणीतरी मोठा टेप घेऊन बसले होते आणि ते डायरेक्ट टेप करत होते. आणि त्याहीपेक्षा वैताग म्हणजे (आणि हे त्यामुळेच कळले) बाबूजी एक गाणे म्हणून पुढचे सांगू लागले की हे महाशय आधीचे गाणे 'नीट झाले' आहे का ते पुन्हा वाजवून पाहायचे शेवटी एकदा बाबूजीच स्वत्: ओरडले तेव्हा हा प्रकार (निदान ऐकू यायचा) थांबला.
|
>>>>> सारखी कार्यक्रम पुण्यात चालूय याची जाणीव करून द्यायची गरज नाहीय! ही पण पुणेरीच कॉमेण्ट वाटतेय
|
Mahaguru
| |
| Friday, March 30, 2007 - 3:40 am: |
| 
|
पुणेरी पाट्या असलेले संकेतस्थळ www.puneripatya.com http://www.busybeescorp.com/puneripatya/patya.html
|
Zakasrao
| |
| Saturday, March 31, 2007 - 10:33 am: |
| 
|
महगुरु जबरा पाट्या आहेत तिथे. काही नवीन मिळाल्या वाचायला. त्यांच्या मेन पेज पासुनच सुरुवात आहे अगदी.
|
Mansmi18
| |
| Sunday, April 01, 2007 - 4:07 am: |
| 
|
mahaguru, great.. loved last patee. last and best
|
Rahul16
| |
| Monday, April 16, 2007 - 6:01 am: |
| 
|
  
|