|
Ninavi
| |
| Saturday, May 27, 2006 - 10:41 am: |
| 
|
माझा लेक ( वय वर्षे ७) सकाळी आवरताना मी घाई घाई करायला लागते तेव्हा एकदा म्हणाला होता 'Mommy, you are an impatient lady. You need to calm down.'
|
hehehehe काय काय एक एक किस्से आहेत खरच आमची किंवा तुमचीही एक अक्षर तोंडातून काढायची हिम्मत नसायची नुसते आई किंवा बाबांनी डोळे जरा मोठे केले तरी... आणि शाळेत ही कधी कधी धपाटे मिळायचे अरे हो... माझ्या शेजारणीचा मुलगा ५ वर्षाचा आहे... आई त्याला एकदा सांगितलं की ऐकत नाही म्हणून जोरात बोलू लागली की हाच ओरडतो "don't scream at me... i don't like it" ... पण मग आई ही ओरडते "then listen to me when I tell you first time" पण खरतरं त्याचा स्वभावच जरा मनस्वी आहे त्याला असलं काही चालतच नाही... ह्या उलट तिची ९ वर्षांची मुलगी आहे तिला बाबा जरा जोरात बोलले की डोळ्यात पाणीच येतं एकदम... मैत्रेयी, तुझा प्रसंग मात्र खरच भलताच serious होता!
|
Dineshvs
| |
| Saturday, May 27, 2006 - 4:03 pm: |
| 
|
मला या सगळ्यावरुन द लिटील प्रिंसेस नावाचा सिनेमा आठवला ( नाव कदाचित वेगळे असेल याला उत्तम कलादिग्दर्शनाचे ऑस्कर मिळाले होते ) तर या सिनेमात एक अनाथ मुलगी आपल्या शिक्षिकेला सुनावते, लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असतात, हे कुणी तुला सांगितले नाही. का ? लहान मुलांशी असे वागतात का ? तुझ्या लहानपणी तुझ्याशी असे वागत होते का ? अर्थात यानंतर त्या शिक्षिकेचे मतपरिवर्तन होते. कळत्या वयातील मुलाना आवर्जुन दाखवावा असा सिनेमा होता तो.
|
Bee
| |
| Tuesday, June 20, 2006 - 10:30 am: |
| 
|
घरी पीसी घेतला त्यावेळेसची ही गोष्ट आहे. एक security म्हणून मी user name/password compulsary ठेवला. तर हळुहळू भाचीला कळत गेले की पीसी चालू करायचा म्हणजे सुरवातीला ही लोक काही तरी type करतात. जिथे password असतो तिथे ****** यायचे. एकदा आमच्या अपरोक्ष तिने पीसी चालू केला आणि password होते ****** , तिने * key शोधून काढली आणि तिथे ***** type केले. पीसी मात्र चालू झाला नाही तेंव्हा ती जाम वैतागली पीसीवर. तिच्या ह्या आकलनशक्तीवर जाम खुश होऊन शेवटी बक्षिस म्हणून मी तिला password देऊन टाकला आणि ते तिचेच नाव होते त्यामुळे न चुकता ती password type करते
|
Suvikask
| |
| Saturday, December 16, 2006 - 7:46 am: |
| 
|
हा माझ्या लाडक्या भाच्याचा किस्सा... एकदा तो, बहिण आणि मेव्हणे त्यांच्या एका मित्राक्डे गेले होते. काही कामासठी लगेचच दुस-या दिवशीही ते त्याच मित्रकडे सर्वजण गेले. हा पठ्ठा त्या मित्राकडे बघुन म्हणतो.. "काका तुम्ही आज आंघोळ नाही केली?" ते म्हणाले "केली ना? पण असे का विचारलेस?" त्यावर तो म्हणाला "मग तुम्ही आज पण कालचाच शर्ट का घातला?" घ्या आता... काय बोलनार???
|
माझा मुलगा आता तीन वर्षाचा आहे. तो दोन वर्षाचा होता. गल्लीत दोघा शेजार्यांचे भांडण सुरु होते. हा गल्लीतच खेळत होता. अचानक त्यांच्या जवळ गेला. आणि बस बस म्हणू लागला. आता हमरी तुमरीवर आलेले ते चक्क ह्सू लागले. आमच्या घरातही थोडं वातावरण तापलेलं असलं तर तो असं करायला लागला म्हणजे वातावरण निवळतं.
|
Runi
| |
| Saturday, March 10, 2007 - 12:29 am: |
| 
|
माझ्याकडे काही दिवसांपुर्वी माझी मैत्रीण आली होती, तिच्या ३ वर्षाच्या मुलीला घेवुन. ती छोटी मुलगी आणि मी मिळुन चित्रं काढत होतो, म्हणजे ती सांगत होती आणि मी काढत होते, ती शांतपणे बघत होती. पण मी मासा काढला की तिने तो लगेच दुसर्या पेनाने खोडला, मी परत काढला परत तोच प्रकार, तिला विचारले असे का करतेयस तर मला ती म्हणे कि अग ते पाणी आहे, मासा पाण्याबाहेर राहिला तर मरुन नाही का जाणार म्हणुन त्याला पाण्यात ठेवतेय. 
|
Mahesh
| |
| Saturday, March 10, 2007 - 8:14 am: |
| 
|
बर्याच जणांचे अमेरिकेतले अनुभव वाचून मला आश्चर्य वाटले. आपण आपल्याच मुलांना रागवायचे नाही की काय ? हे म्हणजे अतीच आहे. नशिब जपानमधे असे काही नाहीये.
|
Maitreyee
| |
| Saturday, March 10, 2007 - 3:47 pm: |
| 
|
अरे महेश, तसं नाहिये ते, रागवा, पण अपमानास्पद बोलणे, मारणे तर नाहीच, मूलभूत गरजांपासून अडवायचे नाही (उपाशी ठेवणे, घराबाहेर उभे करणे इ.!) असे आहे ते. आणि आपल्याला जाचक वाटते पण इथली चित्र विचित्र (तो, ती, तिची, त्याची आणि त्यांची मुलं एकत्र!अशी राहणारी!!) कुटुंबे पहाता मुलांच्या हितासाठीच आहेत हे कायदे.एवढं करून काही लहान मुलांना येणारे अमानुष अनुभव ऐकले की वाटते याहून कडक कायदे असते तर..!अर्थात कायदा केल्याने सगळे सुरळित राहते असे नाही पण त्यातल्या त्यात आळा बसतो.. .. असो. मोठा विषय आहे खूप.
|
Bee
| |
| Sunday, March 11, 2007 - 9:13 am: |
| 
|
अगदी latest गोष्ट आहे. माझ्या भाचीने सकाळी साखरेची बरणी फ़ोडली, त्यानंतर दुपारी शरबताची बाटलीही फ़ोडली. नविन होती, सर्व घरात चिकट शरबत आणि मग पाठोपाठ मुंग्याही धावत आल्यात. संध्याकाळी तिच्याहून लहान असलेल्या भाचीला तिखट घास चारण्याचा प्रयास केला आमचे लक्ष नसताना. अशा वेळेस मुलांना नक्की कसे समजवून सांगावे कळत नाही. मुलांना रागवणे हे मलाही योग्य वाटत नाही. एकाच दिवशी इतक्या चुका करुन परत नविन तोडफ़ोडीला मुल तयार असतात आणि काही म्हणण्याबोलण्यापुर्वीच मोठ्यानी रडायला उस्ताद.
|
Varsha11
| |
| Wednesday, March 14, 2007 - 11:02 am: |
| 
|
आम्ही सगळे जेवत होतो. माझे सासु-सासरे हॉल मध्ये टि.वी. बघत जेवतात आणि मी, नवरा, मुलगी (वय वर्षे ८) किचन मध्ये बसुन जेवतो. तर बाप्-लेक दोघे जण जेवताना तोंडाचा मचमच आवाज करत होते (आमच्याकडे सगळेच जण असा आवाज करत खातात. मी सगळ्यांना तर बोलु शकत नाही, या दोघांना सारखी ओरडत असते) मी विचारले की कोण आवाज करतेय? तर मझ्या लेकीने सांगितले की "आम्ही दोघे करतोय आवाज तुही करु शकतेस तुला कोणि नाहि म्हनले नाहि." यावर माझा राग जाउन हसु आले. (नवरोबा तर काय जोरत हसत होते कशी जिरली असे वाटुन)
|
Milindaa
| |
| Wednesday, March 14, 2007 - 11:58 am: |
| 
|
.. .. .. ..
|
Supermom
| |
| Wednesday, March 14, 2007 - 12:23 pm: |
| 
|
माझी मुलगी आम्ही मधे भारतात होतो तेव्हा आमच्या लग्नाचा अल्बम पाहून रडायला लागली 'यात माझे फोटो का नाहीत' म्हणून. मग म्हणाली 'तू मला मावशीजवळ ठेवून गेली असशील. नेहेमी बाजारात जाताना ठेवून जातेस तशी.'
|
Dinesh77
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:59 pm: |
| 
|
सुपरमॉम, सही किस्सा आहे. माझा चुलत भाऊ पण असेच विचारयचा, तर माझे काका त्याला सांगायचे की अरे तु पाणी वाढत होतास ना म्हणुन नाही आहेस फ़ोटोत.
|
Storvi
| |
| Wednesday, March 14, 2007 - 7:50 pm: |
| 
|
मी आणि KT चा जरा वाद चालु होता.. ते आइकुन आ:बाबा तु चिडलायस का? बाबा: हो. आ: काय problem आहे तुला?
|
Supermom
| |
| Wednesday, March 21, 2007 - 2:04 am: |
| 
|
माझ्या मुलाचे मराठी दिवसेंदिवस 'जीवघेणे' होत चालले आहे. म्हणून त्याला मराठीच्या क्लास ला घातले. पहिल्याच दिवशी वर्गात पुंगीवाल्याची गोष्ट शिकवण्यात आली. ती सांगून झाल्यावर त्यातील शब्दांचे अर्थ विचारणे सुरू झाले. बाईंनी पुंगी शब्दाचा अर्थ विचारताच चिरंजीवांनी हात वर केला. मागच्या रांगेतून हे पाहणारे आम्ही उभयता खुशीत आलो. त्याला उभे राहायला सांगून अर्थ विचारताच अतिशय आत्मविश्वासाने तो ओरडला, ' ants, ants . हे पुरेसे नव्हते की काय म्हणून आज जेव्हा त्याला मी घरी शिकवताना सांगितले, 'क कमळाचा. कमळ म्हणजे काय?' पुन्हा हात वर आणि आधीपेक्षाही आत्मविश्वासाने, 'टॉयलेट, टॉयलेट...' कमळ आणि कमोड यात तो cofuse झाला होता
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:58 am: |
| 
|
सुमॉ .. .. .. ..
|
Zakki
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:12 pm: |
| 
|
अनेक वर्षांपूर्वी, जेंव्हा माझी मुलगी तीन चार महिन्यांची, नि मुलगा चार वर्षाचा असताना झालेली गोष्ट. मुलगी पायाचा अंगठा धरून तोंडापर्यंत आणत होती. (आधीच मुलगी नि त्यातून लहान, काय करत होती हे म्या पुरुषाला काय कळणार?) आजूबाजूला असलेल्या बायका म्हणत होत्या, पहा पहा, पाय खाते आहे. झाले, त्यानंतर दोन तास माझा मुलगा हट्ट धरून बसला होता, मला पण दे ना पाय, तिला एकटीलाच का देता? बिचार्याला वाटले पाय म्हणजे Apple pie !
|
Disha013
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:19 pm: |
| 
|
SM ,झक्कीकाका, same here ! माझ्या मुलाचीही सध्या हीच गत आहे. भुत,वर्तमान,भविष्य या ३ काळांशी त्याला देणे घेणे नसते. बरेच नवीन शब्दहि शोधलेत त्याने. तुकडुन दे==तुकडे करुन दे हे 'होईला' की आपण जावु== हे झाले की आपण जावु! (त्याच्या भाषेत 'होईला' म्हणजे 'झाले'!)
|
Zakki
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:56 pm: |
| 
|
आता गेलेला, झालेला म्हणतातच, मग होईला काही अगदीच वेगळे नाही!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|