Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 06, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through March 06, 2007 « Previous Next »

Adi787
Wednesday, February 28, 2007 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हा बघा खास पुणेरी traffic signal :-)

Deepanjali
Thursday, March 01, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा, अशा पाट्यानी पुणेकर सुधारले अस्ते तर काय पाहिजे होते?त्याना लाल सिग्नल नीट दिसूनही त्याकडे ते दुर्लक्ष करतात..

<<<<<लाल सिग्नल तोडला तर काही बिघडत नाही फ़ारसं , पोलीसाला पटवणे फ़ार सोपे:-)
पण दहा म्हणजे दहाला खरच kitchen बन्द करून स्वयंपाकी घरी गेलेले दिसले कि वांधे येतात त्यामुळे ही शिस्त पाळावीच लागते ,rather कार्यलय वाले पाळायलाच लावतात , दहा नंतर खुद्द वर वधुंनी जरी मागितले तरी kitchen बंद ..
गुरुजी पण बरेचदा कार्यालयाचेच असतात त्यामुळे लग्नाचे विधी किती वाजे पर्यंत उरकायचे यात चांगले trained असतात !
काही कार्यालांमधे तर ' मंगलाष्टका नंतर वराला उचलु नये ' अशी पाटी पण असते .
ही खासियत च आहे पुणेरी कार्यलयांची , उगीच आजमाउन पहा एकदा .
:-)

Upas
Friday, March 02, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहानंतर वधु वर कीचन कशाला मागतील पण.. अर्थात पुण्यात काहीही शक्य आहे म्हणा..

Farend
Friday, March 02, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात दहाच्या आधी तरी कशाला मागतील :-)

Manuswini
Friday, March 02, 2007 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,
LOL

वधु वरांना काय काम नाही काय दहा नंतर kitchen मागयला:-)


बाकी पुण्यात अश्या पाट्या लावयची गरज जर बाहेरुन येणार्‍यांसाठी आहे तर मुंबईत बर्‍याच हव्या होत्य अश्या 'तिरकस' पाट्या.
हे एक उदाहरण एका घरमालकाने लावलेल्या पाटीचे,
'चपला दाराबाहेर काढुन ठेवा, दाराबाहेर ठेवलेल्या चपला हरवल्यास पाहुण्यांची जबाबदारी राहील'.

काय हे, पाहुणे पण असे treat करतात.

सांगीतले ना मागे पप्पांच्या एका मित्राची पक्की पुणेकरीण बायको गेट मध्ये आल्यावर चहा अर्धा कप तरी घ्यायचा होता.....
त्यावर पप्पा मोठ्याने म्हणाले अहो पण अर्धा कप तरी घेता का विचारायचे तुम्ही विसरलत बघा ना वहीनी.
वहीनी दात दाखवुन, हो नै भाऊ काहीच भाव नाही वरमण्याचे वगैरे



Deepanjali
Saturday, March 03, 2007 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol उपास
पण असे वेळी अवेळी जेवायला किंवा चहा मागणारे हमखास non पुणेकर असतात , त्यांच्या साठी हवीच कि ही सावधगिरीची पाटी !
अता हेच बघ , मनुच्या बाबांनी नाही का त्या बिचार्‍या वहिनींचे kitchen बन्द झालेले असून चहाची अपेक्षा केली !
~D

Zakki
Saturday, March 03, 2007 - 10:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे आहे हो. पण नॉन पुणेकरांचे असे काही खास वैशिष्ठ्य नाही, नि जे असेल ते इतके मनोरंजकहि नाही. पुणेकरांबद्दल मात्र गेली साठ वर्षे तेच तेच बोलून सुद्धा सगळ्यांना ते परत गमतीचे वाटते. म्हणून पुण्याबद्दल बोलायचे! बोलून चालून पुण्याला तुम्ही सरसकट इतरांच्या बरोबरीने कसे बसवता? पुणेकरांच्या मते तरी ते इतरांपेक्षा जास्त शहाणे!!

Chyayla
Sunday, March 04, 2007 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की खरे आहे ते, भारतात सरदारजीवरुन जसा विनोद होतो ना तसेच महाराष्ट्रात पुणेकरान्च्या बाबतित होत.
दुसरे उदाहरण जसे शिनिमा मधे हिरो सोबत एखादा विनोदी कलाकार असला ना की शिनिमा पहायला मजा येते. आता हिरो कोण ते सान्गायची गरज आहे का? तेवढ समजायला सगळेच हुश्शार आहेत हो.


Deshi
Sunday, March 04, 2007 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वधु वरांना काय काम नाही काय दहा नंतर kitchen मागयला>
मनु, ऊपास, फारैन्ड असें कसें. मग हिंदी पिक्चर मधील मसाला दुध कोठून मिळनार?

Maitreyee
Monday, March 05, 2007 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या! मसालादूध वगैरे 'कार्यक्रम' हल्ली कार्यालयातच उरकतात की काय.. पूर्वी असं नव्हतं

Farend
Monday, March 05, 2007 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्नाच्या आधीच मसाले दूध वगैरे? हे तर "पूर्वी" च्या पूर्वीही नसेल :-) कारण ती दहा वाजण्याबद्दलची नम्र ई. सूचना आदल्या दिवसाबद्दल ची वाटते.

Deepanjali
Monday, March 05, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग हिंदी पिक्चर मधील मसाला दुध कोठून मिळनार?
मसालादूध वगैरे 'कार्यक्रम' हल्ली कार्यालयातच उरकतात की काय..


Sanghamitra
Monday, March 05, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> दहानंतर वधु वर कीचन कशाला मागतील पण..
घरी पाटी असेल तर? दहानंतर घरात पाऊल टाकू नये अशी. मग काय कुठेतरी सोय बघायची आणि काय. आचारी पण दहानंतर गेलेलेच असतात नाहीतरी :-)

Manuswini
Monday, March 05, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेच तर संघा घरी आलेल्या पाहुण्यांना पण पाटी दाखवायची आमचे kitchen बंद आहे तेव्हा चहा वगैरे मागु नये मग अतीथी देवो भव ह्याचा अर्थ पुणेकरांना कोण समजवणार, त्या आपल्या वेळा सांभळनारच ना

ते असे आग लागले तरी दुकान चार पर्यन्त बंद आहे ह्यातला प्रकार. असो.

आता ह्याच्या पुढे आणखी कोणाला वात्रटपणे comemnt add करायचे असेल तर करा, माझी 'ना' नाही. खरे लिहिले तर कडू लागणारच.

आणी हे personal statement समजु नये, समजायचे असेल तर तुमचा दोष. :-)
दीपांजली,
तुला कसे माहीती गं वहीनीचे kitchen 'त्यावेळी' बंद होते??
दिवा घे


Deepanjali
Monday, March 05, 2007 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतीथी देवो भव ह्याचा अर्थ पुणेकरांना कोण समजवणार

<<<तेच तर समजतात ना पुणेकर !
देवाला फ़क्त नैवेद्य दाखवला म्हणजे झालं , तो खायचा आपण च असतो !
देव स्वत : थोडीच खातो ..
देवाचे पोट तर भक्तांनी खाल्लेले पाहूनच भरून जाते


कोणाला वात्रटपणे comemnt add करायचे असेल तर करा, माझी 'ना' नाही
<<<अता वात्रट BB वर वात्रट नाही लिहायचे तर काय लिहायचे !

Arch
Monday, March 05, 2007 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते रेव्ह पार्टीतले बाहेर गावाहून आलेल्या नमुन्यांपेक्षा हे नमुने खूपच चांगले

Sanghamitra
Tuesday, March 06, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>ते असे आग लागले तरी दुकान चार पर्यन्त बंद आहे ह्यातला प्रकार.
हो ना. हेही सांगून ठेवलेले बरे. नाहीतर काय सांगावं? लोक आग आहेच फुकटची म्हणून घरनं लाटलेल्या पोळ्या वगैरे पण घेऊन येत असतील भाजायला.
(मनू आता तू म्हणालीस म्हणून हो नाहीतर अज्जिबात वात्रटपणा नव्हता करायचा मला )


Adi787
Tuesday, March 06, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मसालादूध वगैरे 'कार्यक्रम' हल्ली कार्यालयातच उरकतात की काय.....

हे बाकी माहित नव्हते हं :-) खरचं जग किती fast झाले ना.


Kedarjoshi
Tuesday, March 06, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जग किती fast झाले ना>>

आदी अरे जग कुठे फास्ट झाले आहे. अजुनही दिवस २४ सच तासाचा असतो.

आता ज्याना मसाल दुध प्यायचे आहे त्यांना आपण कोण बापडे आडवनार म्हणुन किचन मध्ये विरोध दर्शविन्यासाठी पाटी लावली असनार की किचन १० नंतर बंद आहे.

Adi787
Tuesday, March 06, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, अरे जग , निसर्ग नाहि ;-)

आणी दिवस कधीपासुन २४ तासांचा झालाय? :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators