|
म्हणून तर मी म्हणतो, वयाची चाळीस, पंचेचाळीस वर्षे झाल्याशिवाय तुम्हाला काऽही अक्कल नसते! >>>>एवढेच कशाला, मी तर तर म्हणतो बर्याच लोकाना ४०-४५ उलटून साठी गाठली तरी का s ही अक्कल येत नाही...
|
Bee
| |
| Thursday, February 08, 2007 - 6:28 am: |
| 
|
अरे पण गेल्या महिन्यात मी दादरला कित्येक दुकानात डोम्बीवली फ़ास्टची DVD/VCD शोधली. ते म्हणालेत अजून ती बाजारात आली नाही. तुम्ही पोरांनी कुठे बघितला मग हा चित्रपट.. कायद्याच बोला चा review लिहा ना इथे कुणीतरी..
|
Mahesh
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:38 am: |
| 
|
कायद्याच बोलाबद्दल काय बोलणार ? चुकवू नये असा चित्रपट आहे. खुप काळानंतर अप्रतिम कथा आणी त्याहून अप्रतिम सादरीकरण पहायला मिळाले. मला आवडला त्याचे कारण वेगळा आणी चांगला विषय, एकही गाणे नाही (बहुतेक निर्माता आणी दिग्दर्शकाचे एकमत झाले असावे की आजकाल चांगली गाणी निर्माण होउ शकत नाहीत. दोघांनाही अनेक धन्यवाद.) आणी वेग पण फार छान आहे. कुठेही रटाळ वाटत नाही. आणी शेवट पण अगदी वास्तववादी आहे. तशी पुर्ण कथाच वास्तववादी आहे. याच्या बरोब्बर उलट अगबाई अरेच्या, कथा वास्तववादी नाही, पुर्णपणे कल्पनारम्य आणी तरीही छान चित्रपट. फक्त त्यामधे असलेले एक भयानक गाणे सोडले तर बाकी प्रश्नच नाही.
|
दाना बाझार , Fremont च्या सौजन्याने फ़क्त $ 9.99per month मधे मराठी DVDs चा खजिना मिळाला . काय द्याचं बोला , खबरदार , डोंबिवली फ़ास्ट , उत्तरायण , सिंहासन , उंबरठा , अनाहत .. बर्याच मराठी DVDs आल्यायेत . डोंबिवली फ़ास्ट फ़ारच सुरेख घेतलाय ! संदीप कुलकर्णी चा अभिनय कुठल्याही oscar winning अभिनेत्याच्या तोडीचा आहे . काय द्याचं बोला ही झक्कास आहे पण कथेचे श्रेय मात्र originl हॉलीवूड चित्रपट My cousin Viny लाद्यायला हवं . 
|
Deemdu
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:05 am: |
| 
|
पण मला तो संदीप कुलकर्णी, मृणाल देव च्या अवंतिका मध्ये अजिबात आवडला नव्हता. पण डोंबिवली फास्ट मात्र अगदी सुपर फास्ट एक्सप्रेस आहे
|
Mahesh
| |
| Thursday, February 08, 2007 - 12:06 pm: |
| 
|
कायद्याच बोलाची कथा ईंग्रजी चित्रपटावरून घेतली असली तरीही त्याचे देशीकरण एवढे बेमालुम केले आहे की त्याला तोड नाही.
|
Shonoo
| |
| Thursday, February 08, 2007 - 1:54 pm: |
| 
|
पार्ल्यातनं बर्याच सीड्या घेतल्या होत्या. त्यातल्या भारतात राहणार्या नातेवाईकांनी काही लाटल्या. पण कायद्याचं बोला इथपर्यंत पोचली. सुपर बोल च्या आदल्या रविवारी पाहिला सुद्धा सिनेमा. अनेक वर्षांनी मराठी चित्रपट पाहिला. बरं, या काळात काही मराठी सिरियल पण पाहिल्या नव्हत्या. त्यामुळे सर्वांचं ओव्हर acting जरा जड गेलं सुरुवातीला. तरी वकिलांच्या गर्लफ़्रेंडची तोकडे कपडे आणि नाकात ही भली थोरली नथ घातलेली एंट्री खटकली. सरकारी प्रोसिक्युटर चा घरचा सीन पाहून जेठमलानी आणि पालखीवाला सारख्या यशस्वी वकिलांना पण न्यूनगंड वाटेल. पण हिन्दी सिनेमात अगदी हवालदार किंवा शाळा मास्तरांची घरं पण अशीच असतात. मधलं बेटिंग चं प्रकरण उगाच घुसवलंय असं वाटतं. तो गुंड पर्स पळवणार हे माझ्या लेकीने पण ओळखलं होतं ( "Why is that bad guy hanging around her mommy"? ) केशवरावांनी ज्या पद्धतीने उलटतपासणी केलीय अन सारा circumstantial evidence खोडून काढलाय ते छान रंगलंय. एकदा तरी नक्कीच बघावा. गाणी नाहियेत ते छानच आहे. shorts, halter T-shirt आणि नाकात नथ घातलेली गुटगुटीत नायिका आणि शर्ट्-पायजमा वाला नायक काय डबल डेकर बस मधून 'मुम्बै दर्शन' करत गाणार होते
|
Zee
| |
| Thursday, February 08, 2007 - 3:33 pm: |
| 
|
दीपांजली, दाना बझारची लिंक किंवा फ़ोन न. टाकतेस का मी खुप दिवसांपासुन शोधते आहे मराठी चित्रपट.
|
Sas
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:40 pm: |
| 
|
Hello Sayuri Please check email for Fremont CA Library Address, Phone No and Web Site.
|
Zee, Dana Bazar 5113 Mowry Ave(Intersection of Mowry & Blacow) Fremont, CA 94538 (510) 742-0555
|
Sayuri
| |
| Thursday, February 08, 2007 - 6:15 pm: |
| 
|
Sas, Got your email. Thanks for that
|
Zee
| |
| Thursday, February 08, 2007 - 8:10 pm: |
| 
|
दीपांजली धन्यवाद! अगं ते इन्डियन ग्रोसरी आहे वाटत.. पण ते ऑनलाईन रेन्ट वर देतात का व्हीसीडीज? शिप करतात नेटफ़्लिक्स सारखे?... मी शिकागोत आहे पण मला मराठी पिक्चर्स कुठेच मिळत नाहीत म्हणुन एवढे प्रश्न.
|
Sashal
| |
| Thursday, February 08, 2007 - 8:16 pm: |
| 
|
netflix सारखं ship करत असतील असं वाटत नाहि .. Netflix कडे हिंदी movies असतात बर्याचशा पण अजून मराठी movies rental basis वर ship केल्याचं ऐकलेलं नाहि ..
|
Mbhure
| |
| Friday, February 09, 2007 - 4:17 pm: |
| 
|
सध्या Turner Classic Movies (TCM), USA वरती 31 Days of Oscar मालिका चालू आहे. ह्यात नवे - जुने वेगवेगळ्या Catagory तेल विजेते चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. कालच माझा आवडता "lilies of the Field दाखवला. (कधीही पाहायला मिळाला तर अवश्य पहा. DVD मिळवून पाहावा असा हा चित्रपट आहे.) american Beauty, Bridges of Madison County, Philadelphia, 20,000 Leagues Under The Sea, Zorba The Greek(Must See), Reds, Children of a Lesser God, Annie Hall, Bridge On The River Kwai, Edison The Man.... असे असंख्य एकापेश एक सरस चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. बरेचसे " जरुर " पहावे असे हे चित्रपट आहेत.
|
Farend
| |
| Saturday, February 10, 2007 - 12:31 am: |
| 
|
You, Me and Dupree टाईमपास आहे, Owen Wilson चे काम चांगले झाले आहे.
|
Yog
| |
| Monday, February 19, 2007 - 5:11 am: |
| 
|
एकलव्य : pathetic!! फ़ुकट दाखवला तरी पाहू नये.
|
Svsameer
| |
| Monday, February 19, 2007 - 7:00 am: |
| 
|
एकलव्य: अतिशय सुरेख. जरूर पहावा. शेवटची २ मिनीटं घातली नसती तर सिनेम ५ star देण्या जोगा झाला असता.
|
एकलव्य :Big star cast,big banner,big rewards !! खूप अपेक्षा होत्या पण उगीच अर्ध्या तासाची कथा सव्वा दोन तास रेटलीये असे वाटले . सुरवातीला खूप interesting वाटला पण नंतर बराच वेळ फ़ार काही घडतच नाही ! बोमन इरानी , सैफ़ , रायमा सेन , जॅकी , आणि छोट्या role मधे संजय दत्त , शर्मिला टागोर , जिम्मी शेरगिल यांनी सुरेख अभिनय केलाय .. stars न वाटता खरोखरच सगळी कथेतली characters वाटतात ! त्या मानानी अमिताभ च जरा फ़िम्ली दिसतो ! अर्थात अमिताभ म्हणजे तो भूमिका निभावुन नेतो पण त्या साठी इतके प्रभावित होउन साडे तीन करोड ची Rolls-Royce Phantom ओवाळून टाकण्या सारखे काय आहे कळले नाही ! विद्या बालन चे character कशाला घेतलेय काय माहित ! काहीच गरज नव्हती तिच्या भूमिकेची ! दिसते चांगली पण मधुबालाची फ़ार म्हणजे फ़ारच copy करते ! तिच्या तोंडी असलेले एकमेव गाणे सुध्दा नसले तरी चालले असते ! ' एकलव्य ' ची सर्वात जमेची बाजु म्हणजे cinematography! निरनिराळ्या light effects मधे नटलेल्या राज महालाच्या देखण्या frames आणि चित्रपटाची प्रत्येक frame म्हणजे visual treat आहे ! तरी पण 5 stars फ़ार झाले , अडीच ठिक आहेत ! -------------------------------------------- ता . क . मुन्नाभाई चले अमेरिका चे धमाल विनोदी ट्रेलर पण आहे सोबत त्यामुळे फ़ुकटात तर नक्कीच पाहाण्या सारखा आहे ! सर्कीट - मुन्ना चे English lessons झक्कास ! वॉशिंग्टन = धोबीघाट अबे खजुर दूक्या खर्चा पानी = Come on a date,I'll pay you !
|
Mahaguru
| |
| Monday, February 19, 2007 - 3:11 pm: |
| 
|
एकलव्य ... फ़ुकट दाखवला तरी पाहू नये. ....खूप अपेक्षा होत्या >> नेहमीच zee वरची प्रोमोज/ ट्रेलर वगैरे पाहुन मत ठरवता येत नाही. डेमो पॅकेज चांगलेच वाटतात आणि खरे पॅकेज भलतेच काहीतरी निघते. (मायक्रोसॉफ्ट इस्टाईल) :D मुन्नाभाई चले अमेरिका कधी रिलीज होणार आहे?
|
Dineshvs
| |
| Monday, February 19, 2007 - 5:38 pm: |
| 
|
DJ चित्रीकरणावर ईतका खर्च करतात तर थोडासा, कथा आणि पटकथेवर पण करावा कि, हो ना. मला पण ट्रेलर बघुन बघावासा वाटतोय. अजुनहि बघीन, फक्त अपेक्षा ठेवणार नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|