|
Manuswini
| |
| Thursday, January 25, 2007 - 1:02 am: |
| 
|
कश्या बाई साड्या नेसुन स्कूटी वर फतकल मारतात देवास ठावुक? दहा बारा वर्षा पुर्वी पुण्यात गेले होते तेव्हा एक चक्क आजी केसाचा बॉबकट(आम्ही modern आहोत हे दर्शवायचे असेल तर एक जात सरसकट बॉबकट केला की झाले), नववारी साडी नेसुन का मारुन स्कूटी वर होत्या. no jokes इथील मराठी मंडळात गणपतीला गेले की नेहमीच नक्कीच एखादी नुकतीच पुण्यातील पेठेतुन आलेली 'काकु' दिसेल जीने सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लांब सडक केस कापुन बॉबकट केला असणार. तिच्या मते हीच fashion नी modern आहोत हे दाखवायचे लक्षण. आणी कापलेल्या केसांना हजार पिना. आणि हे सुर, अय्या how are you गं?
|
Pendhya
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:12 am: |
| 
|
आणी कापलेल्या केसांना हजार पिना. >>>>>> कापलेल्या केसांना पिना लावण्या मागे काय लॉजिक आहे, ते न कळे. डोक्यावर शाबूत असलेल्या केसांना लावा म्हणावं. हा, अजुन एक, पुणेरी कट्ट्यावरचा टोमणा. असो! मनु, दिवा घे ग बाई. BTW कशी आहेस?
|
Lajo
| |
| Thursday, January 25, 2007 - 2:23 am: |
| 
|
आदि७८७...मस्तच नमुना... परदेशात आले की शिंग फुटतात म्हणे... त्या फुटणार्या शिंगांसाठीच बहुदा केस कापुन जागा करत असाव्यात काही काकवा...
|
Adi787
| |
| Thursday, January 25, 2007 - 4:33 am: |
| 
|
"अय्या how are you गं ?">>>> ह.ह.पु.वा. 
|
Adi787
| |
| Thursday, January 25, 2007 - 4:40 am: |
| 
|
लाजो, शिंगे लवकर वाढावीत म्हनुन आमच्या कॉलनी मधिल एक काकु परदेशवारी करुन आल्यानंतर असल्या ऐटीत राहत.. बापरे. त्यावेळी आम्हि मुले त्यांना वीलायती काकु म्हणायचो...
|
Ajjuka
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:22 am: |
| 
|
मॉडर्न आहोत हे दाखवण्यासाठी आई बाबा न म्हणता मम्मी पप्पा म्हणणं ह्याच्यापेक्षा सुटसुटीतपणासाठी केस कापलेले काय वाईट? यावर दिवे नाही घेतलेत तरी चालेल.. पण हे खूळ मुंबईत जास्त आहे. आणि याला वैयक्तिक प्रश्न म्हणायचं तर केस कापून पिना लावणे हेही तसाच.. दिसेल ती वाईट गोष्ट विनोद विनोद म्हणत पुणेकराला चिकटवायची आणि मग दिवे घ्या म्हणायचं.. हा खास non पुणेकरी बाणा..
|
Manuswini
| |
| Thursday, January 25, 2007 - 7:16 am: |
| 
|
वरती कापलेल्या केसाबद्दल लिहिले ते माझ्या पाहणीत आहे म्हणुनच लिहिले. नाहीतरी कोणी केस कापो ना कपो आम्हाला कसले आलेय सोयर सुतक. पण परवा परवा पर्यन्त लांब शेपट्याचे कौतुक सांगणारी अमेरिकेत आल्यावर कापते नी असेच style म्हणुन सांगते आणी कुरतडलेल्या केस्संन वर पिना लावते तेव्हा ते नमुने दिसतात. अश्या दहा तरी बघितल्या. आहेत काकु. उगाच लिहायचे म्हणुन लिहित नाही कळ्ळे का? जावु दे, मला काय पण अज्जुका बाई तुम्ही खुप मनाला लावुन घेतलत हो? पेंध्या, मजेत एकदम, खुप दिवसाने दिसलास? तु कसा आहेस?
|
Bee
| |
| Thursday, January 25, 2007 - 11:09 am: |
| 
|
कुणावरती comments मी करत नाही पण वरचे पोष्ट वाचून आठवले. खूप वर्षांपुर्वी इरावती कर्वे ह्या केस कापून आणि नऊवारी परिधान करुन स्कूटर चालवत. जर्मनी वरुन त्या नुकत्याच देशात आलेल्या होत्या. फ़र्ग्युसन मधे जेंव्हा त्या दिनकर कर्वेंना भेटायला जात तेंव्हा म्हणत 'ये दिनू...'. त्याकाळी हे सर्व बघायला मिळणे rare/bold होतं. पुलंच्या आणि बर्याच लेखकांकडून इरावतीबाईंबद्दल मी हे वाचलेले आहे. त्याकाळी बायका नवर्यास एकेरी हाक मारत नसत, नऊवारी घालून गाडी काय सायकलही चालवत नसतं. पंढरपुरच्या वारी मधेही सामिल होणार्या कर्वेबाई.. महान व्यक्तिमत्त्व होते.
|
आमच्या गावाकडच्या एक बाई, वयाच्या साठाव्या वर्षी अमेरिकेला तीन महिन्यासाठी आल्या.. आयुष्यभर नऊवारी नेसणार्या बाई, परत गेल्या तेव्हा 'बॉबकट' आणि गाऊन घालून गावात हिंडू लागल्या.. 'अमेरिकेत केस लांब असले तर लोक हसतात', अश्या थापाही मारू लागल्या... माझी आई काही दिवसांनी इथून भारतात गेली, तेव्हा गावातली माणसं आई आता कशी दिसेल ते पहायला मुद्दाम यायची.. आणि 'नेहमीची साडी, आणि नेहमीचे केस' बघून भलतीच नाराज.. (माझ्या आईला गावंढळ म्हणत असतील पाठीमागून) 
|
Zakki
| |
| Thursday, January 25, 2007 - 4:36 pm: |
| 
|
या पेक्षा पुरुषांनी कसे, कुठलेहि वाद विवाद न करता, मुकाट्याने शर्ट, पॅंट नि कोट घालणे नि केस वाढवणे, शेंडी कापणे असा 'मॉडर्न' पणा केला!
|
Naatyaa
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:35 pm: |
| 
|
नि केस वाढवणे,>>> झक्की, तुम्ही पण हे केले होते का?? ~D
|
Zakki
| |
| Thursday, January 25, 2007 - 9:26 pm: |
| 
|
हो. केस वाढवलेलेच होते. वयपरत्वे गेले एव्हढेच. शिवाय मी माझ्या एकट्याबद्दल बोलत नव्हतो.
|
Zakasrao
| |
| Tuesday, February 06, 2007 - 4:50 am: |
| 
|
मला आत्ताच मेलवर एक अस्सल पुणेरी पाटि मिळाली. size limit मुळे फोटो टाकु शकत नाही. फ़क्त लिहतो तुम्ही कल्पना करा कशी असेल ते. नम्र विनंती बोर्डिंग मधे जेवायला व बंकेत येणार्या ग्राहकांनी आपली वाहने आत लावल्यास पंक्चर करुन नो पार्किंग मधे लावली जातील.
|
झकासराव ही घ्या ती पाटी,

|
जाता जाता ज्याना इमेजेस रीसाईज करायच्या असतील तर ऑनलाईन सोय आहे... कृपया येथे जा आणि पहा.. http://www.shrinkpictures.com/
|
Rakhalb
| |
| Wednesday, February 14, 2007 - 12:54 pm: |
| 
|
Ajun ek namuna. Hope its not a repeat.

|
Zakki
| |
| Wednesday, February 14, 2007 - 2:48 pm: |
| 
|
नुसते 'दारू' असे म्हंटले, तरी दहा रू. जास्त पडतील!
|
नमस्कार मन्ड्ळी.. ह्या विषयावर जेव्हढी चर्चा होइल तेवढी कमीच पडणार आहे... तरी पण वाचायला मजा आली.. चालू द्या.. मी पण लिहिनच् लवकर..
|
टिवल्याबावल्या, मायबोलीपरिवारातर्फे आपलं हार्दिक स्वागत! 
|
हे घ्या आणखी अस्सल....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|