|
hey ithe tsa me nvinnch. pan vendhlepna kaahi kmi naahi.Office la jaatana davya paayat - white socks & ujvya paayat - cream color cha socks ghalun gelo hoto. Ani jeva mitrani vichrle tenva sangitle ki to cream color cha socks ALA madhe ghatla hota. ha ha... (Smily tkta yet nahi ajun tri)
|
mala sanga koni confidntly ulta shirt ghalun baher office madhe tie baanfhun presentation dile aahe ka??? Me dile aahe ani nantr mazi phjiti lpvnyasathi mi sangitle ke ya shirt chi shivn / style ch tashi aahe.
|
माझ्या newsreel चं anchor shoot व्हायचं होतं. शाॅटला बसायच्या आधी पटकन 'जाऊन येऊयात' म्हणून रेस्टरूम मध्ये जाऊन आलो, केसांवरून कंगवा फिरवला, चापूनचोपून बाहेर आलो. लोकेशनवर येईपर्यंत सगळे माझाकडे वळूनवळून पाहत होते. माझ्या ते लक्षात आलं होतं, पण फार evidently प्रतिक्रिया न देता डोक्यावरून बेमालूम हात फिरवला ('अरे! केस तर ठीक आहेत, काही गेलं नाहिये त्यांत!'), चेहरा सुद्धा चाचपडून पाहिला (पाणी लागलंच नव्हतं, मेक-अप ओघळला नव्हता, सगळं व्यवस्थित होतं) तरीही... आणि कानावर हात जाताच खाडकन live wire ला शिवल्याप्रमाणे दचकलो... जानवं कानावरच होतं!! Imagine going on air that way!! नशीब जानव्याच्या ह्या ' logic' चा उलगडा करू शकणारं कुणीच नव्हतं. नाहीतर मला "वह ईअरपीस का एक अटॅचमेंट है" सारखं धादांत फालतू निमित्त शोधावं लागलं असतं (ऐनवेळी हे 'प्रसंगावधान' सुचलं नसतं ही गोष्ट वेगळी! )
|
Bhagya
| |
| Monday, January 29, 2007 - 9:55 pm: |
| 
|
दिनेशदा, हल्ली वेगवेगळ्या चपला घालायची fashion आहे? काय काय बघायला मिळणार आहे आल्यावर काय माहित? आणि सुनिधी तू लकी आहेस... आम्ही california ला असताना असाच प्रकार केलेल्या एका साऊथ ईंडियन माणसावर घरमालकाने गोळी झाडली होती.
|
Sunidhee
| |
| Tuesday, January 30, 2007 - 4:40 pm: |
| 
|
bhagya बरोबर बोललीस.. मला तेच मनात आले आधी. मी आता दुसर्या राज्यात आहे पण इथेही आमच्या residential एरीया मधे १-२ केसेस अश्या झाल्यात, फक्त ते खरे चोर होते.
|
Chyayla
| |
| Tuesday, January 30, 2007 - 7:08 pm: |
| 
|
माझी एक मावशी व काका म. प्र. तल्या Hindustan Copper Project मलान्जखन्डला रहायचे. काका ईलेक्ट्रिक डिपार्टमेन्ट मधे होते आणी त्यान्चा सहाकारी त्याच नाव "गन्डोत्रा" हा Colony चा पॉवर सप्प्लाय चे काम पहायचा. तर जेन्व्हा कधी वीज गेली की काका विनोदाने म्हणायचे "गन्डोत्रा गेलाSSS". एक दीवस ते त्यान्च्या ६ वर्शाच्या मुलाबरोबर सन्ध्याकाळच्या वेळेस दुकानात गेले. आणी नेमकी तेन्व्हा वीज गेली तर तो लहाना सुरु झाला "गन्डोत्रा गेलाSSS बाबा.. बाबा.. गेलाSSS गन्डोत्राSSS.....". आणी जेन्व्हा ते मागे फ़िरले तेन्व्हा नेमका तो गन्डोत्रा समोर हजर होता. काका चपापलेच पण गन्डोत्राला मराठी समजत नसल्यामुळे त्यानी सावरुन घेतले आणी म्हणाले "बच्चा आपकोही देखकर बोल रहा गन्डोत्रा अन्कल आया है....". अशाप्रकारे गया चा आया करुन सुटका करुन घेतली.
|
Kiru
| |
| Wednesday, January 31, 2007 - 6:49 am: |
| 
|
आमचा एक मामा गिरगांवांत रहायचा. त्याच लग्न झालं ते एका गावातील मुलीशी. नविन लग्न झाल्यावर एकदा मामा मामीला घेऊन एका रेस्टॉरंट मध्ये गेला होता. ऑर्डर दिल्यावर गप्पा गोष्टी चालू असताना अचानक मामाच्या लक्षात आलं की मामीच्या पायात चपला नाहीयेत. त्याबद्दल विचारल्यावर मामीने जे उत्तर दिल ते ऐकून आम्ही हसून पडायच्या बेतात होतो. मामीने चपला हॉटेलच्या बाहेरच काढून ठेवल्या होत्या... देवळांत जाताना बाहेर काढतात तश्या.. आजही त्यावरून आम्ही फिरक्या घेतो मामीच्या..
|
Storvi
| |
| Wednesday, January 31, 2007 - 7:55 pm: |
| 
|
>>"बच्चा आपकोही देखकर बोल रहा गन्डोत्रा अन्कल आया है....". >>बघा ऐन वेळी हिन्दी कशी मदतीला आली 
|
कालचा वेंधळेपणा हा ढळढळीत गाढवपणात मोडेल. फोन लॉक न केल्याने काय होऊ शकतं... आमच्या मित्राची कुत्री भयंकर लाडात येते... अगदी Flintstones Dino सारखी... काल मला असंच ड्रॉइंगरूममधल्या सेटी वर आडवं पाडून-गुरगुरून-शेपटाचं 'थोटूक' हलवत (बॉक्सर आहे) भरपूर चाटणं चाललं होत... शेवटी तिच्या मालकाने येऊन तिला माझ्यावरून 'उचललं'. खिशातून फोन चा आवाज आल्यामुळे मी चक्रावलो. फोन पाहिला आणि मेल्याहून मेल्यासारखं झालं. Elsa च्या पंज्याने माझा फोन trigger होऊन काॅल थेट ex-Boss ला गेला. आता boss ला हेच ऐकू आलां असणार.... ऍल्स च्या धापा, माझं हसत-हसत, "नाऽऽऽऽय, Elsa , नाऽऽऽऽय!!" करणं!!
|
Chyayla
| |
| Monday, February 05, 2007 - 12:50 am: |
| 
|
मग थोड्या वेळानी Boss चा परत फ़ोन येतो... अहो द्यामले... नक्की कुत्रीच होती ना ती...
|
Zakki
| |
| Monday, February 05, 2007 - 1:22 am: |
| 
|
आणि बॉसच्या बायकोचे नाव एल्सा असले तर?! आपला CV तयार ठेव.

|
Arch
| |
| Monday, February 05, 2007 - 2:14 am: |
| 
|
झक्की, म्हणून तर तो ex boss झाला न. 
|
मित्रहो, खरी गोची तर इथेच आहे!! माझा एक्स्-बाॅस नसून 'माझी' एक्स-बाॅस आहे!! : O एका शूट मध्ये पोरींच्या घोळक्यात मी अडकल्यावरून ( Disclaimer: मी अजूनही 'मी त्या घोळक्यात गेलो' असं म्हटलं नाहीये!) तिचं मला चिडवून झालंय!! हा किस्सा माझ्या मित्रांना ऐकवायचा वेंधळेपणा केला आणि काय काय नाही ऐकावं लागलं मला!! इथून मात्र मीच कात्री लावतोय!!
|
Chyayla
| |
| Monday, February 05, 2007 - 6:30 pm: |
| 
|
आर्च... सुधारणा... म्हणुन तर Ex-Boss झाली ना ती
|
Runi
| |
| Monday, February 05, 2007 - 11:03 pm: |
| 
|
तशी मी बर्यापैकी वेंधळी, धडपडी आहे, जरा पटपट लिहिता यायला लागले मराठीत की मग सांगेन माझे किस्से. हा किस्सा माझ्या मावस भावाच्या लग्नातला. माझ्या मामाने मला त्याच्या साठी त्रिफळा चुर्ण पाण्यात घालुन आणायला सांगितले, तसे ते मी त्याला नेवुन दिले, एक घोट घेतल्यावर तो म्हणे अगं जरा वेगळी लागतेय चव, मी म्हणाले नाही अरे, अशीच चव असते तू खुप दिवसात घेतले नसशील म्हणुन तुला असे वाटतेय.... वाटल्यास तुला बाटली आणुन दाखवते असे म्हणुन मी जी बाटली दाखवली त्यात मुलतानी माति होती. ... कपाटा मधली चुर्णाची बाटली कोणी तरी दुसरीकडे नेली होती आणि मी सवयी प्रमाणे न बघताच त्या ठिकाणी ठेवलेली बाटली उघडुन मामाला चुर्ण दिले होते.
|
रूनी मुलतानी मातीने चेहरा उजळतो म्हणे. हे एकदम " पी मुलतानी माती आणि हो गोरा " झालं.
|
Athak
| |
| Tuesday, February 06, 2007 - 6:48 am: |
| 
|
रामबाण उपाय .. घ्या त्रिफळा मुलतानी मातीचुर्ण
|
Suvikask
| |
| Tuesday, February 06, 2007 - 10:01 am: |
| 
|
त्रिफळा उडुन माती उडाली का मग???
|
वा!!! ह्यालाच 'धूळ चारणं' म्हणतात का?
|
Runi
| |
| Tuesday, February 06, 2007 - 6:25 pm: |
| 
|
एकदम " पी मुलतानी माती आणि हो गोरा " झालं. >>>> म्हणजे आता माझ्या मामाचे अंतरंग पण एकदम साफ + शुभ्र झाले असेल. वा!!! ह्यालाच 'धूळ चारणं' म्हणतात का? >>>> तेव्हा पासुन माझा मामा जरा वचकुनच असतो, तो आईला म्हणाला पण, तुझ्या पोरीचा काही भरवसा नाही ती लोकांना माती सुद्धा खायला घालते 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|