|
Dineshvs
| |
| Sunday, April 02, 2006 - 11:28 am: |
| 
|
आज खरं सांगायचं तर, हे नाटक बघायचा अचानक योग आला. नेहमीप्रमाणे बाजारात गेलो. नेहमीप्रमाणेच कला अकादमीत एक फेरी मारायला गेलो तर तिथे या नाटकाचा प्रयोग लागला होता. तिकिटे संपतच आली होती, तरिही कोपर्यातले एक मिळालेच. हे नाटक आल्यापासुन मला पहायचे होते, पण तारखा जुळत नव्हत्या. आज तिकिट काढल्यावर बराच वेळ होता, म्हणुन मागे हिरवळीवर फेरफटका मारायला गेलो, तर या नाटकातली माझी आवडती कलाकार, सुप्रिया पिळगावकर, तिथल्या हिरवळीवर निवांत बसली होती. तो परिसर ईतका रम्य आहे, कि कुणालाहि तिथे बसायचा मोह होईल. कॅमेरा बरोबर नव्हता, याचे खुप वाईट वाटले. तर हे नाटक, अगाथा ख्रिस्तीच्या, विटनेस फ़ॉर द प्रॉसिक्युशन, वर आधारीत आहे. यापुर्वीहि हे नाटक, साक्षीदार या नावाने मराठीत येऊन गेले. आत्माराम भेंडे व आशा भेंडे ( लिली ईझिकेल ) त्यात होते. या प्रयोगात सुप्रियाबरोबर, विक्रम गोखले, विवेक लागु, सविता मालपेकर आहेत. निवेदनात अगाथा चे नाव जाहिरपणे घेतले गेले तसेच या नाटकाचा शेवट कुणाला सांगु नये अशी गळ पण घातल्याने, मीहि तो लिहिणार नाही. तर हे नाटक म्हणजे एक कोर्ट रुम ड्रामा आहे. नीतिन सावरकर या तरुणावर, कुण्या शिरिन वाडिया या एकाकि महिलेचा खुन केल्याचा आरोप आहे. हि केस धनंजय कर्णिकांकडे येते. सरकारतर्फे परिस्थितीजन्य पुराव्याबरोबर, शिरीनची नोकर, सावंत बाई नावाची साक्षीदार आहे. ज्या वेळेस खुन झाला, त्या वेळेस तो घरी आपल्यासोबत होता, असे फक्त त्याची पत्नी, आयेषाच सांगु शकते. पण लॉ ऑफ़ एव्हिडन्सच्या तत्वानुसार पत्नीची साक्ष तितकी विश्वासार्ह मानली जाणार नसते. तर तिची साक्ष होते का ? आयेषा त्याची पत्नी असते का ? त्याच्यावरचे आरोप सिद्ध होतात का ? आणि शेवटी वकिल धनंजय कर्णिक यशस्वी होतात का ? हे जाणण्यासाठी हे नाटक बघा. अभिनयाच्या बाबतीत सुप्रिया आणि विक्रमची जुगलबंदी आहे. सुप्रियाचा ऊस्फुर्त अभिनय आणि विक्रमचा स्टाईलिशपणा, ईथे आमने सामने ठाकलेत. एकमेकाना जोखत, त्यानी आपले सगळे कौशल्य पणाला लावलेय. विवेक लागुला त्यामानाने पडखाऊ भुमिका मिळालीय. सविता मालपेकर एकाच प्रवेशात प्रभाव पाडुन जाते. हल्ली शीतल तळपदे हे नाव प्रकाश योजनेत चमकत असते, ती उल्लेखनीय आहेच, पण आजच्या प्रयोगात दोनदा लाईट गेले होते. बाबा पार्सेकरांचे नेपथ्य योग्य तसेच आहे. वकिलाचे ऑफ़िस व कोर्ट यथायोग्य तर्हेने ऊभे केलेय. आॅड्व्होकेट शिरिष गुप्ते ( वंदना गुप्तेचे पति ) यांची मदत घेतलेली आहे. पण ती मदत फक्त लेखक दिग्दर्शकाना आवश्यक त्या मुद्द्यावरच घेतलेली दिसतेय. कारण चाणाक्ष वकिलाच्या नजरेतुन सुटल्या नसत्या अश्या काहि चुका राहिल्यात. या चुकांमुळे नाटक कुठेहि कोसळत नाही, तसेच या क्षेत्राची ओळख नसणार्याला त्या जाणवणार देखील नाहीत, तरिहि विक्रम काम करत असलेल्या नाटकाचा प्रयोग त्याच्या अभिनयप्रमाणेच पर्फ़ेक्ट असावा असे वाटते. तर या चुका अश्या. कोर्टाचा डेकोरम व्यवस्थित पाळला आहे तरिही, खुपदा वकिलांची न्यायाधिषांकडे पाठ होते. पण हा दोष दिग्दर्शकापेक्षा रंगभुमीचा आहे. वकिलाच्या ऑफ़िसमधली आसनव्यवस्था, अशीच दोषपुर्ण आहे. नाटक अर्थात अगाथाने अनेक वर्षांपुर्वी लिहिलेले आहे. त्याचे रुपांतर बर्यापैकी जमलेय. तरी यातली सायटेशन्स ( ईतर केसेसचे दाखले ) खुप जुनी आहेत. अशी शक्यता असेल कि त्या नंतर या मुद्द्यावर निर्णय झाले नसतील, किंवा त्यानंतरचे खटले अजुन निकालात निघायचे असतील. हे केस रेफ़रन्स १९८३ च्या आधीचे आहेत. तसेच ते सर्व महारष्ट्र राज्यासंदर्भात आहेत. ज्या तर्हेने त्यांचे उल्लेख केले जातात ते हि जरा चुकलेय. असे रेफ़रन्स सहसा कोर्टाच्या उल्लेखाशिवाय, पुर्ण होत नाहीत. क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर या सिनेमात दाखवल्याप्रमाणे अजुनहि आरोपीना बसायला साक्षीदारच्या पिंजर्यात खुर्ची द्यायची पद्धत नाही. या नाटकात तसे आहे. आरोपीच्या हातात एक कडे आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला असे दागिने घालता येत नाहीत. शिवाय तुमच्या चीजवस्तु ताब्यात घ्या, असे पोलिस त्याला शेवटी सांगतो, त्या कुठल्या वस्तु ? पोलिस ढेरपोट्या दाखवल्याने तो वास्तव वाटतो, पण त्याने कोर्टाला केलेला सॅल्युट योग्य नाही. कोर्टात जेंव्हा कागदपत्रे दाखल केली जातात, त्यालाहि एक प्रोसीजर आहे. ईथे ती थेट न्यायाधिशाच्या हातात दिली जातात. शिवाय कोर्या कागदार लिहिलेली पत्रे, ज्यावर पोस्टाचा स्टॅंप नाही, ती एखादा चाणाक्ष वकिल स्वीकारेल हे शक्य नाही. न्यायालयात ती स्वीकारली जातील हेहि शक्य नाही. कोर्टात पुरावे म्हणुन दाखल केलेल्या वस्तु, कश्या तर्हेने ठेवल्या जातात, हाताळल्या जातात, व ताब्यात घेतल्या जातात, याचे भान राखलेले नाही. कलाकारांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी बहुदा, कोर्टातील शिरस्तेदार, स्टेनो, मदतनीस या नाटकात नाहीत, त्यामुळे कोर्ट वास्तव वाटत नाही. अनेक प्रसंगात प्रेक्षकच कोर्टासमोरील माणसे आहेत, असा भास निर्माण केलाय. पण परत एकदा सांगतो हे दोष क्षुल्लक आहेत. याने नाट्यानुभवात अजिबात फरक पडत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या कथेत नाट्य आहे. फक्त आता पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेलेय. या नाटक ज्या ग्रुहितकांवर आधारित आहे, ती न्यायतत्वे आता कालानुरुप बदलली आहेत. जर हे नाटक जुन्या काळातले म्हणुन सादर झाले असते तर जास्त परिणामकारक ठरले असते. वकिलाच्या ऑफ़िसमधल्या टायपिंगच्या उल्लेखामुळे तसा वावहि होता ( सध्या बहुतेक वकिलांकडे पीसी आहेत ) पण मग मोबाईल फोन, वायरलेस फोन वापरायला नको होते, व काळाचा थेट उल्लेख करायला हवा होता. विक्रम आणि सुप्रिया हे आणखी किती प्रयोग करतील कुणास ठाऊक ? याचे चित्रीकरण व्हायला हवेय. पण ते होईपर्यंत आपल्या गावात याचा प्रयोग कधी होतोय, यावर लक्ष ठेवा.
|
दिनेश घाशीरामची तू म्हणतो ती सी डी माझ्याकडे आहे दुधाची तहान ताकावर मनोज भिसे फार थकलेले वाटतात आवाज ओढलेला येतोय हे भिसे जाहिरातीना अथवा निवेदनासाठी बुलन्द आवाज द्यायचे हे आता पटवून घ्यावे लागते यातला नाना फारच दांडगा दुंडगा आहे प्रत्यक्षात नाना म्हणजे अगदीच पाप्याचे पितर होते.... हल्ली हे नाटक सोलापूरचा ग्रुप करतोय.माधव अभ्यंकर आणि इतर पण मी त्याचा नुकताच प्रयोग पाहिला त्यात चक्क नाना आणि घाशिराम सी डी पेक्षा वेगळेच होते पण सुखद धक्का म्हणजे दोघानी सी डी तील नाना घाशिरामापेक्षा अधिक चांगली कामे केली आहेत नानाची चणही नाजुक आणि लहान असल्याने तो अधिक भावला....बाकी सर्व पात्रे तीच होती..... तू भास्कर चंदावरांचे भाष्य सी डी त ऐकलेले दिसते. मूळ कल्पना अशी आहे की घाशिराम हे प्रातिनिधिक उदाहरन आहे ती एक प्रवृत्ती आहे. जगाच्या इतिहासात ती पुन्हा पुन्हा ठिकठिकाणी अवतरत राहते.सत्ताधार्याना वैषयिक सामर्थ्यावर अंकित करून स्वता वाटेल तसा नंगानाच घालणे रास पुटीनचे उदाहरण घ्या. आणी बाणीत आपल्याकडे संजय गांधी व त्यांचे गणंग मित्र यानी घातलेला धुमाकुळ काहीना आठवत असेल. त्यातही कॅंडी रुख्साना असल्या बायका होत्याच.... आजही मतदार संघातले अनेक असे कार्यकर्ते आमदाराना मन्त्र्याना बायकांचा पुरवठा करून वाटेल तसे एक्स्प्लाॅईट करीत धुमाकूळ घालताना पदोपदी दिसतात. एनी वे, रार म्हणते ती आॅडिओ कॅसेट माझ्याकडेही आहे किती वेळा ऐकलीय त्याला गणती नाही रार ने सांगितलेल्या आठवणी फारच मोलाच्या आहेत छान झाले त्याचे डाॅक्युमेन्टेशन तरी झाले.... नाटकातला दिव्य करण्याचा प्रसन्ग फारच लाम्बलाय.... दिनेश म्हणतोय इन्ग्रज कशाला मुळात एतद्देशिय राज्यकर्ते तेव्हा विलासात अणि भाउबन्द्कीत रमले होते म्हणून तर इन्ग्रजाना पाय रोवा करता आला शतरन्जके खिलाडी मध्येही ते दोन्ही नबाब बुद्धीबलाच्या प्याद्या करीता आपसात लढत असताना इन्ग्रजांचे सैन्य अवधेत घुसते तसेच या नाटकाच्या काळातच इन्ग्रजांचा चंचू प्रवेश मराठी मुलुखात होत होता अस त्याचा सन्दर्भ आहे नाटकात ती सर्व मंडळी त्या इन्ग्रजापुढे लाळघोटेपणा करताना दाखवलेली आहेत व एकमेकावर आरोप करताना दाखवलेली आहेत पुढे मग शनिवार वाड्यावरचा भगवा उतरवून युनियन जॅक चढविणार्या व्यक्तिचे नाव पहाता ही अधोगती लक्शात येते भले तेन्डुलकर वाद टाळण्यासाठी त्याला कितीही अनैतिहासिक नाटक म्हणोत........
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 04, 2006 - 1:46 am: |
| 
|
रॉबीन, तु पाटलांचे पानिपत वाचलेस का, त्यात नानाबद्दल काहि वेगळेच आहे. पण तु म्हणतोस तसे हे नाटक ऐतिहासिक असो वा नसो, या प्रवृत्ती सार्वकालिक आहेत. अजुनहि गाव ते जग, या सगळ्या पातळ्यांवर हेच चालतेय.
|
Mai
| |
| Wednesday, April 05, 2006 - 2:04 am: |
| 
|
इथे सिडनीत माग्च्या वर्षी इथल्या लोकल कलाकारानी घाशिरामचा प्रयोग केला फारच सुन्दर व यशस्वी झाला
|
Dhani
| |
| Tuesday, May 23, 2006 - 2:05 pm: |
| 
|
वामन केंद्रेच 'झुलवा' नाटक पाहिले. अर्थातच आवडले. सातारातल्या एका खेड्यात मुलींचे लग्न देवाशी लावुन देतात ह्याला झुलवा म्हणतात आणि ती मुलगी गावोगावी लोकांकडे जोगवा मागते. या नाट्कात जगन या मुलीची जीवन कथा आहे. जगनची आई जोगवा मागते पण जगनला शिकवण्याची तिला ईच्छा पण असते पण अर्थात हि फ़क्त ईच्छाच रहाते. जगनला आपल्या ईच्छा आहेत, तिला या सर्वांतुन बाहेर पडायचय पण लोक तर ती आपल्या आईच्या जागी कधी येते याची वाटच पहात असतात. लोकांकडुन आता न मिळणारा जोगवा, पॆशांची गरच म्हणुन जगनची आई तिचा झुलवा करते तर जगन आपल्याला फ़सवुन लहानग्या मुलीशी लग्न करण्यारा तिच्या मित्रावर चिडुन झुलव्याला तयार होते. (गावात हे सर्व वाढूवुन पसरलेले असते.) पण नंतरहि समजाकडुन येणारी संकंट कमी होत नाहित अन्याय, अत्याचार, अपमान होतच राहतात ते कमीच होत नाहित. यावर शेवटी जगन आपल्याच परीने एक मार्ग काढ्ते. संगीत ही एक जमेची बाजु आहे. गीत-रचना प्रसंगानुरुप, अर्थबोधक आहे. 'जगनीने जगन जन्मला घातली' अश्या प्रकारच्या रचना मनाला भिड्तात. अजुन एक मला आवड्लेलि गोष्ट म्हणजे नाट्काच्या सुरुवातीला देव आणि दानव यांच्यातला संघर्ष. हे रुपक आपल्याला वेगळ्याच बाजुने विचार करायला लावते, याला एक वेगळा अर्थ आहे. जगनची भुमिका केलेल्या मुलीचा अभिनय छान आहे, लहान निरागस मुलीपासुन ते परिपुर्ण स्त्रीचा प्रवास तिने उत्तमरित्या साकारलाय. अभिनय सर्वांनचाच चांगला आहे. प्रकाशयोजना, नेपथ्य हि परिणाम साधतात. नाट्कान मनावर परिणाम करतेच, मनात रेंगाळ्ते. यात कुठ्लाच भड्कपणा नसुन सर्व पात्रे व प्रसंग संवेदनशीलतेने हातळले आहेत, त्यामुळे हे नाटक माझ्या मनात कोरुनच राहिले आहे.
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 24, 2006 - 2:22 am: |
| 
|
are he shevatache post mala disat ka nahiye? sagale choukon ka disatayat? view madhe jaun unicode setting kele tari?
|
Bee
| |
| Wednesday, May 24, 2006 - 2:52 am: |
| 
|
धनी, छान वाटले तुझे पोष्ट वाचून. हे नाटक लक्षात राहीन..
|
Cool
| |
| Monday, June 26, 2006 - 7:43 am: |
| 
|
शनिवारी प्रशांत दामलेचं 'जादु तेरी नजर' बघण्याचा योग जुळुन आला. अगोदरच या नाटकाविषयी बरचं ऐकुन होतो, त्या सर्व अपेक्षांवर हे नाटक पुर्ण पणे उतरते. प्रशांत दामलेच्या अभिनयाच्या बाबतीत तर बोलायलाच नको, पण सर्वात जास्त पसंती मिळते ती सतीश तारे ला. सुरुवाती पासुन शेवट पर्यंत प्रत्येक प्रवेशाला हास्याचे कल्लोळ निर्माण करतो हा माणुस. यातच प्रशांत दामलेच्या बहिणिचे काम केले आहे (त्या मुलिचे नाव लक्शात नाही आता) त्या अभिनेत्रीचे काम खुपच आवडले, प्रेमासाठी आतुर तरुणी फार सुंदर रेखाटली आहे तिने. नाटकात बरिच गाणी आहेत, एक-दोन गाणी सोडली तर बाकी सर्व गाणी संगित, शब्द आणि प्रसंग सगळ्याच बाबतीत चांगली आहेत. खुप खुप हसवणारी एक Romantic comedy , अवश्य पहावे असे नाटक..
|
काही दिवसांपूर्वी Golmaal - Fun Unlimited हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची कथाकल्पना एका गुजराती नाटकावरून घेतली आहे असे वाचले होते. पण मुळात ते गुजराती नाटक हर्ष शिवशरण यांच्या एका मराठी नाटकावर बेतलेले आहे. त्या नाटकाचे नाव कोणाला माहित आहे का ? त्या नाटकात विजय पाटकर व जयवंत वाडकर यांनी काम केले होते. चार तरुण एका आंधळ्या जोडप्याच्या घरी आश्रय घेतात, अर्थातच त्यांना फ़सवून, असे कथानक होते.
|
Mbhure
| |
| Thursday, October 05, 2006 - 10:32 pm: |
| 
|
त्या नाटकाचे नाव " घरघर " . मला वाटत पुरुषोत्तम बेर्डेंनी त्याचे दिग्दर्शन केले होते. विजय पाटकरचे ते पहिले व्यावसायिक नाटक असावे. रबर मॅन अशी त्याला जाहिरातीत विशेषण लावले होते.
|
धन्यवाद , Mbhure. इतरही काही नाटके मराठीतून गुजराती मध्ये भाषांतरित झाली आहेत. जसे, सही रे सही, डॅक्टर तुम्हीसुद्धा .
|
Meenu
| |
| Monday, October 16, 2006 - 8:04 am: |
| 
|
माकडाच्या हाती शॅंपेन पाहीले. मस्त नाटक .. खुप नवनविन कल्पनांनी व व्याख्यांनी मजा आणलीये नाटकात .. कलाकार फारसे प्रसिद्ध नाहीयेत पण अप्रतिम काम केलय सर्वांनीच. intelligent script... लेखकाची कमाल आहे व प्रेमाच्या त्रिकोणाची राजकीय घडामोडींशी केलेली तुलना छान जमलीये. प्रत्येक परीस्थीतीचा media कसा फायदा उठवतो .. अगदी बघण्यासारखे
|
Mbhure
| |
| Wednesday, November 08, 2006 - 5:12 pm: |
| 
|
काल VCD वर " ज़ांभुळ आख्यान " पाहिले. चांगले कव्हर केले आहे. ज्यांना रंगमंचावर ते पहाता आले नाही त्यांनी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा.
|
Yog
| |
| Thursday, November 09, 2006 - 5:17 am: |
| 
|
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/318766.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/318705.cms विचार करायला लावणारे लेख आहेत.. दुष्टचक्र आहेच, यातून नाटके बाहेर पडतात का सम्पून जातात हे प्रेक्षकावरच अवलम्बून आहे हेही खर!
|
Ajjuka
| |
| Friday, November 10, 2006 - 3:33 am: |
| 
|
लेख वाचले. राऊतांचा लेख आवडला पटला. संतोष पवारचा लेख पहिला भाग छान पण उपदेशात्मक सुरू झाला तेव्हा खोटा वाटायला लागला किंवा प्रचारकी. प्रेक्षकांच्या हाती खूप काही आहे हे खरेच. प्रेक्षकांनी स्वतःला वाढवले पाहिजे. तेच ते तेच ते नाकारले पाहिजे नक्कीच. पण जबाबदारी प्रेक्षकांच्याच गळ्यात घालून प्रेक्षक नाहीत हो असे ढोल पिटणार्या निर्मात्यांनाही मी तेवढाच दोष देईन.
|
Yog
| |
| Tuesday, November 14, 2006 - 9:17 pm: |
| 
|
बरोबर. दुष्टचक्र याच अर्थी म्हणायचे होते. एकमेकाना सहकार्य करतच निर्माते व प्रेक्षक यातून मार्ग काढू शकतील. "निर्मात्या" ला शेवटी आर्थिक धोका पत्करावा लागतोच. एखाद्याने असा पत्करून वेगळ्या धाटणिच पण सकस नाटक उभ केल तर ते मुद्दामून बघण ही जबाबदारी प्रेक्षकाने उचलायला हवी. (आधी अन्ड का आधी कोम्बडी ?) मला वाटत दुर्दैवाने आजच्या "झट्पट" युगात सर्व गणिते बदलली गेल्याने हे कोडे सुटण्याचा मार्ग अधिकच अवघड होवून बसला आहे. असो. फ़ार मोठा आवाका असू शकतो या विषयाचा अन चर्चेचा.. पण हुरहुर कायम आहे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 15, 2006 - 5:23 pm: |
| 
|
विक्रम गोखले ने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे सध्या जे घडतेय त्यालाच मराठी नाटक म्हणतात, असा तरुण पिढीचा ग्रह होवु शकेल. विनोदी नाटके मला आवडतात. पण मराठी नाटक म्हणजे त्याहुन खुपच जास्त काहि आहे. शिवाय विनोदातहि खुप तोचतोचपणा यायला लागला आहे.
|
मी मागच्याच आठवड्यात २ नाटकं पाहिली गेला माधव कुणीकडे आणि जादु तेरी नजर दोंन्ही नाटके डोक्याला ताण न देणारी आणि मनोरंजन करणारी. हल्ली जे सिनेमा यतात त्यापेक्षा अशी नाटके बरी वाटता. मलाही विनोदी नाटके आवडतात. आता ह्या रविवारी मी मराठी बाणा ला जाणार आहे येउन सांगेनच कसे झाले ते.
|
Deepstambh
| |
| Thursday, December 21, 2006 - 12:30 pm: |
| 
|
अचानक म्हणजे अगदी अचानक.. तडकाफडकी म्हणतात तसा योग जुळोनी आला.. आधी या कार्यक्रमाबद्दल ऐकीवातही नोहते.. कालच ४.०० वाजता सवंगड्याने यासंदर्भात मेल केली.. ५.१५ ला जाण्याचे ठरवीले.. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला फोन केला.. ९.३० च्या खेळाची थोडीच तिकीटे शिल्लक होती.. कल्याणी नगरवरुन कोथरुडला लगेच जाणे शक्य नव्हते म्हणुन तिकीटांसाठी मायबोलीच्या मिनूची मदत घेतली आणि बरोबर ९.३० ला तिथे पायऊतार जाहलो.. 'मराठी बाणा' नाटक नोहे.. आणि निव्वळ वाद्यवृंदही नोहे.. आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा, संस्कृतीचा हा एक अविष्कार आहे.. असे ऐकले होते की हा कार्यक्रम सर्वत्र घरभर (हाऊसफुल) असतो.. आमच्या खेळालाही मराठी बाणेकरांनी प्रेक्षागृह अगदी खच्चाऽऽऽखच्च भरले होते.. पडदा वरती जाहताच ऊनसावलीचा एक रम्य देखावा पहावयास मिळाला.. अर्थात.. प्रकाशरचनेला भरपूर वाव होता आणि संपूर्ण कार्यक्रमात त्याचा पुरेपूर वापर करुन घेण्यात आला आहे.. नेपथ्यतही सुंदर आहे.. आणि मग सुरु होतो तीन तासांचा नृत्यसंगीताचा अविस्मरणीय प्रवास.. कधी वीररसाने ओथंबलेला.. कधी शृंगारीक.. कधी अध्यात्मीक.. कधी उडत्या चालीचा.. कधी प्रबोधनपर.. कधी संथ हळूवार तर कधी प्रेमळ. याचे सर्वेसर्वा अशोक हांडे असुन एकूण १२५ जणांच्या सैन्याने हा डोलारा पेलला आहे.. एव्हढे सर्व स्टेजवर पाहुन मी अवाकच झालो.. मी काही फार नाटके पाहिली आहेत अशातला भाग नाही पण एव्हढ्या मोठ्या संख्येने कलाकार मी फक्त जाणता राजाच्या वेळीच पाहिले होते.. म्हणुन मोजुन पहिले तर नुसते नृत्य करणारेच ५०-६० कलाकार होते (त्यांच्या हालचली.. स्टेजवर येणेजाणे विद्युतगतीने होत होते). अशोक हांडे यांच्या व्यतिरीक्त ४ पुरुष आणि ४ स्त्री गायीका होत्या.. १५-२० जणांचा वाद्यवृंद होता.. सगळ्यांचे आवाज एकसे एक.. आणि नाचणार्यांची enery level काय वर्णावी?? अगदी तडफदार.. जबरदस्त.. प्रत्येक नृत्यामधील त्यांचे पोषाख डोळे सुखावणारे होते.. आणि एव्हढा जबरदस्त ठेवा महाराष्ट्रात आहे याचा हरक्षणी प्रत्यय येत होता.. खरेच.. आपण भांगड्याचा ऊदोऊदो करतो.. गरब्याच्या मागे लागतो.. अरे पण जरा घरात पहा.. अगदी चर्मवाद्यांचे घ्या.. मगे पुण्याच्या बालाजी मंदीरात गेलो होतो.. आरतीच्या वेळी फक्त एक मृदुंगासारखे वाद्य ढब ढब वाजवत होते.. एकलयीत एकासुरात वाजवल्यासारखे.. भांगडा पण काय तर फक्त ढोल... गरब्याचेही तसेच.. अरे आपल्या महाराष्ट्रात पहा.. मृदुंग, ढोल, डफ, हलगी, ताशा, ढोलकी, चौघडा, पखवाज, अगदी अगडबंब नगाराही.. अरे किती चर्मवाद्य आहेत.. त्यांचे नाद किती.. ढोलकीचेच घ्या.. भल्या भल्यांना आपल्या तालावर नाचवते.. तो माय - का - लाल जॅक्सनही नाशिक ढोलच्या तालावर ठेका धरुन गेला.. कोळी नृत्य, बाल्या नृत्य, धनगर नृत्य, भिल्ल नृत्य, कातकरी नृत्य, वारली नृत्य, लेझीम, मंगळागौर, लावणी, वासुदेव, कडकलक्ष्मी, पोवाडा, भजन.. एक ना दोन किती ते नृत्य / संगीत प्रकार.. पोषाखही विविध.. दुसर्या देशांचे सोडा.. ते तर गरीब आहेतच.. पण भारतातही दुसर्या कोणत्या राज्यात इतकी विविधता आणि सांस्कृतीक संपन्नता आहे सांगा.. पण आपण ते जपत नाही ही खंत आहे.. आणि आपल्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत आहेत अशोक हांडे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.. जणू ते म्हणत आहेत जागवा जागवा आपला मराठी बाणा.. कार्यक्रमत एव्हढ्या चकचकीत नेत्रदीपक वेशभुषा पाहिल्यावर मध्यंतराच्या आधी डोक्यावर मळकं बोचकं घेतलेली, जुनी साडी नेसलेली, हातात काठी आणि कमरेवर मुल घेतलेली एक बाई आणि अशोक हांडे (एका नेत्याच्या भुमीकेत) एक संवाद आहे.. आधी त्या बाईंचा गेटप बघुन वाटले कोणाला आणलं यांनी स्टेजवर.. पण नंतर तिचा कणखर आवाज ऐकुन चाटच पडलो.. नंतर त्या दोघात जे काही घडते ते पाहणेच योग्य ठरेल.. जबरदस्त.. निदान एकदा तरी (असं नेहमी बोलतात) हा भव्यदिव्य कार्यक्रम आवर्जुन पहावा असा आहे. तसेच हा कार्यक्रम वेगाने पुढे सरकतो, त्यामुळे कुठेही कंटळवाणा वाटला नाही. एखादे गाणे तुमचे नावडते निघाले तर गोष्ट वेगळी. चु. भु. द्या. घ्या..... अज्ञानाबद्दल क्षमा असावी.. तसेच गजानन देसाईंनी इथे लिहायला सांगीतल्याबद्दल त्यांचेही आभार..
|
Kiru
| |
| Thursday, December 21, 2006 - 12:36 pm: |
| 
|
>>>>> डोक्यावर मळकं बोचकी घेतलेली, जुनी साडी नेसलेली हातात काठी... दीप.. सगळा कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखाच.. पण खरच त्यातला हा भाग म्हणजे कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|