Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 27, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लहान मुलांच्या उचापती आणि खूप काही » Archive through May 27, 2006 « Previous Next »

Rachana_barve
Friday, February 03, 2006 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता मी भारतात गेले होते तर सकाळी आमच्या कामवालीचा २रीतला मुलगा अभ्यासाला यायचा. त्याला हाच्याचे भागाकार मी इतके जबरी शिकवले की तो आता 55 - 11 देखिल हाच्चा घेऊन करतो.

Bee
Saturday, February 04, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाच्याचे भागाकार.. म्हणजे काय रचना? हाच्चा? भारतात जाऊन तुच उचापती करून आलेली दिसतेस मला :-)

Manuswini
Saturday, February 04, 2006 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या लहान भाचीला टीवी बघायची सवय लागली होती, आम्ही मुद्दम्हून wire unplug ठेवत असत कारण खूप तिला tv ची सवय लागली होती आणि रडायची. पण tv च button on off करून आम्ही दाखवू आणी सांगू TV खराब झाला आहे.

तीने एक दोनदा मला स्वःतासाठी TV plug in करून switch on करताना बघितला होता, म्हणजे मला वाटते तिला साधारण sequence कळल्या कि aunty wire घेवून काहीतरी करते आणि मग remote control दाबते की tv on होतो. remote control तर स्वःताहून आधिच येत होता.
दोन वर्षाची होती पण ईतके डोक हुशार ना, आम्ही घरात नसताना आणि आई(माझी आई) आजुबाजुला नसताना हिने काय करावे tv ची wire घेवून लावायला गेली plug मधे, unfortunately नक्की काय झाले का shock बसला तिला shock का काय ते बसल्यासारखा झाला कळले नाही पण जोरात ओरडली आणि आई घाबरून पळत आली बाहेर.
भू झाला tv बोट दाखवत म्हणाली.

एक गोष्ट झाली पुन्हा tv लावायला गेली नाही. आणि हट्ट ही कमि करायची कारण आम्ही तेच कारण सांगायचो की मला भू होईल ना tv ला tocuh केले तर. जाम वैतागयची. पण problem हा होता ना आम्हाला पण tv ती झोपल्यावर बघयाला मिळायचा नाहीतर बाईसाहेब विचारतील आता नाही भू होत ह्या भितीने.


Manuswini
Saturday, February 04, 2006 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक गोष्ट म्हण्जे लहान मुलांसमोर आपण काय बोलतो ह्याचे भान बहुतेक ठेवावे लागते

एकदा माझी बहिण phone वर माझ्या आईला सकाळी सांगत होती, अग आज काय office मधे जायचा mood नाही म्हणून boss ला सांगितले की बरे नाही.

माझी हिच भाची होती बाजुला अर्ध्या झोपेत couch वर,कारण बहिणीने तिला उठवले होते तरिपण आणी playschool मधे सोडून काही अशीच घरची काम करायची होती. phone खाली ठेवून बहिण तिला म्हणाली चला माझी सोनाला mom plyaschool मधे सोडणार, daddy नाही, हिचे उत्तर माझा आज mood नाही तु कशी office ला गेली नाहेस mood नाहे म्हणून. तु आजीला सांगत होती ना

चिमुरडी तेव्हा जवळपास अडीच्-तीन वर्षाची होती.
घ्या आता


Maudee
Friday, April 28, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी भाची आहे ३ वर्षन्ची.
तीला घेऊन एकदा तिची आई रस्त्यावरून चालत चालली होती. तिथेच कोपर्‍यावर काही मुले उभी होती. आता कोपर्‍यावर थाम्बलेली मुले कशी असतात हे सान्गायला नको.
तर माझ्या भाचीला चालायचे नव्हते...म्हणून ति कडेवर घे म्हणुन हट्ट करत होती.आईने सान्गितले कडेवर घेतले तर तिथे उभा असलेला दादा ओरडेल तुला...त्याच क्षणी ही त्या मुलापाशी गेली आणि त्या मुलानाच ओरडली कि तुम्ही का मला ओरडणार म्हणुन?


Rupali_rahul
Friday, April 28, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही तर परवाचीच गोष्ट. माझी भाची(अडिच वर्षे) आमच्याकडे रवीवारपासुन रहायला आली होती. तिला आईस्क्रिम हवे होते म्हणुन माझ्यामागे त्रागा करत होती. मग आम्ही रात्री जेवण जेवुन तिला घेउन गेलो. तिने माझ्या कडे पैसे मागितले तर मी २ रुपयाचे नाणे तिला दिले. बरोबर माझे पैश्याचे पाकिट आणि जेवणाच्या डब्याची बॅग आईस्क्रिम आणायसाठी घ्यायला लावली. तिचे पैसे, मझी पर्स त्या बॅगेत टकली अणि मॅडम तयार झाल्या आईस्क्रिम आणायला. त्या आईस्क्रिमवाल्याकडे फ़ार गर्दी होती त्यामुळे तिच्याकडे त्याचे लक्ष नव्हते. तर ही बया त्याला ओरडुन सांगु लागली की मला आईस्क्रिम दे म्हणुन. त्याने आईस्क्रिम दिल्यावर मी तिला बोलली, "सिद्धि त्याल पैसे दे आईस्क्रिमचे." तर म्हणते कशी," माझ्याकडे पैसे नाही आहेत", आणि बॅग खांद्याला लावुन सरळ चालु पडली.

Storvi
Wednesday, May 24, 2006 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा आरोहीला swimming ला नेले होते. तिथे, swimming झालं की गाडीतच मी तिला जेवण घालते आणि घरी येई पर्यंत ती झोपी जाते. तर parking lot मधल्या गाड्यांचे रंग दाखवत मी तिला भरवत होते. ' ती बघ रेड कार. ' वगैरे अस चालू होतं आमच. एवढ्यात समोरून एक भरतीय आजीबाई गेल्या. सहजिकच मी म्हटलं ती बघ आजी.. ईथे पटकन आमची कन्या उद्गारली black आजी, नशीब आम्ही कार च्या आत होतो. :-O

Bee
Friday, May 26, 2006 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी, माझ्या भावाची १६ वर्षांची मुलगी, बहिणीची ५ वर्षाची मुलगी असे आम्ही तिघे पानीपुरीच्या गाडीवर गेलो. तिथे थोडी गर्दी बघुन बाकावर गर्दी ओसरण्याची वाट बघत बसलो. नंतर एक छोटा मुलगा आला म्हणाला क्या चायीये मी म्हंटले हीला काही तिखट देऊ नका, आणि हीला फ़क्त पानीपुरीच द्या, मला एक मोठी कचोरी. तर धाकटीला तिथे काहीच खायचे नव्हते. मला खूप आश्चर्य वाटले कारण ही मुलगी आपल्याला काहीबाही मागेल अशी अपेक्षा केली होती. मग काय हवे ह्यावर तिने उत्तर दिले गायीचे दुध. सगळे जण माझ्याकडे बघायला लागले. शेवटी आम्ही घरी पोचलो तेंव्हा वाटीभरुन मी तिला दुध दिले तर म्हणाली आत्ता नको, उद्या सकाळी. ते तर तिला मिळतेच मग उद्या सकाळीच का ह्याचे आणखी मला नवल वाटले. पहाट झाली, इकडे बाजुला वाटी घेऊन भाची उभी होती. बाजूला कोपर्‍यात कुठून तरी आणलेले कुत्र्याचे पिल्लू होते. मग सगळा किस्सा उलगडला. घरात एक कुत्रा आधीच असल्यामुळे आणि त्याची खास करून आंगोळ होत नसल्यामुळे आम्ही अजून कुठला प्राणी पाळणार नाही ह्यावर सगळ्या मोठ्यांचे एकमत झाल्यामुळे माझ्या भाचीने ही चोरचपाटी सुरू केली होती. तिने हे पिल्लू आणले आणि त्याच्यासाठीच तिला दुध हवे होते. पण एकूणच तिचा निरागसपणा आणि त्या पिल्लाविषयीची माया खूप भावली.

Maitreyee
Friday, May 26, 2006 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही एक नुकतीच घडलेली 'उचापत'!
आर्यक ला(माझा मुलगा, 1st grader )इतर बर्‍याच त्याच्या वयाच्या मुलांप्रमाणे आपण फ़ार Bigg boy झालो आहोत असे वाटते. तर शाळेत मित्रांमधे बढाया चालू होत्या कोण किती 'बिग'!
आमच्या सुपुत्राने सांगितले 'मी तर इतका बिग झालोय आता की माझ्या baby sister चा मीच ' in charge 'आहे. माझे parents तर तिला माझ्याकडे ठेवून बाहेर शॉपिन्ग ला सुद्ध जातात!!' (अरे देवा ss !!)
त्याच्या टीचर ने नेमके ऐकले आणि अशा वेळी जे करायचे तेच तिने केले! लग्गेच school district च्या Counselor चा मला फ़ोन!तोही नमुनेदार! त्यांच्या typical भाषेत typical पद्धतीने आधी सुरुवात अशी की 'आर्यक फ़ार चांगला मुलगा आहे, i m sure u must be proud of him.. ' वगैरे.. मी मनात 'मुद्द्याअवर ये बाबा, मला फ़ोन केलायस तो आर्यक कसा छान आहे हे सांगायला नक्कीच नाही' तरी याचे चालूच, 'तो किती आता ७ वर्षाचा असेल ना? आणि त्याला याची बहीण फ़ार आवडते, ती केवढी आहे आता?' मी अता नर्व्हस! ' मग शेवटी आला एकदाचा मुद्द्यावर ' ७ वर्षाच्या मुलाला १ वर्षाच्या baby ची काळजी घेता येत नाही, त्यांना एकटे सोडणे unsafe आणि कायद्याने गुन्हा आहे!'मी म्हणजे फ़क्त ' what?? whatt r u talking abouttt ?? ' असे जवळपास किन्चाळण्याच्या पातळीला गेले होते! मग काय ते लक्षात येऊन टोटल हतबुद्ध झाले होते. आता याला कसे समजावून सांगू की बाबा आम्ही असे करणे अशक्य आहे, मुलाने सहज बढाई मारली असेल वगैरे! पण इथल्या कायद्याप्रमाणे त्याने आमच्यावर नव्हे तर मुलावर विश्वास ठेवून आमची चौकशी करणेच अपेक्षित होते ना!केवळ शाळेच्या principal शी माझी थोडीफ़ार ओळख होती, निदान मी असे करणार्‍यातली नाही एवढे त्यांना माहित असावे म्हणून ते प्रकरण मिटले नशीबाने! नाहीतर आज हे पोस्टिन्ग एखाद्या correctional facility मधे बसून करावे लागले असते बहुधा:-O


Seema_
Friday, May 26, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Oh my god मैत्रेयी . वाचुनच tension आल मला .
पोराना हल्ली काय आवडत कळत नाही आपण फ़ार मोठे झालो आहोत दाखवायला .
माझी लेक मला mommy न म्हणता सीमा म्हणायला लागली आहे या week मध्ये



Mrinmayee
Friday, May 26, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, आर्यकचा (नाव खूप छान आहे) किस्सा वाचून खरंच विचारात पडले. ईथे मुलांवर होणारे आत्याचार खरं भयंकर आहेत म्हणूनही कायदा असा असेल. पण तू शेवटी आर्यकला काय काय सांगीतलंस?
आम्ही SUNY, stonybrook' ला रहात असताना आमच्या भारतीय शेजार्‍याच्या मुलीनं (वय वर्षे ९), आई " homework न संपवता TV का बघतेस" म्हणून रागावली असता ९११ ला call केलं. ३ मिनिटात पोलिसच्या ४ गाड्या हजर. आई दार उघडून बघते तर २ डीटेक्टिव्स दारात उभे! पहिलं त्यांनी काय केलं तर मुलींना (फोन करणारी आणि तिची धाकटी बहीण) बाजूला घेतलं आईपासून आणि चौकशी सुरु. आई बिचारी रडकुंडीला! अर्थात थोड्याच वेळात खरी परिस्थिती कळल्यावर सगळं सुरळीत झालं.
सीमा :-)


Storvi
Friday, May 26, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या मारी मला तर जाम टेन्शन आलय हे सगळं वाचुन!

Maitreyee
Friday, May 26, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग हो ना, मी ही जाम हादरले होते! पण इथे असे किस्से झाले आहेत, 6-7 वर्षाचा मुलगा डे केअर परवडत नाही की अशाच काही कारणाने घरी एकटा आणि घराला आग लागली:-(
त्यामुळे त्यांनी केले तेही बरोबरच.
मी मुलाला एवधेच नन्तर म्हटले की अरे आई बाबा असे जातील का तुम्हाला एकटे सोडून कुठे! .. वगैरे!जास्त lecture दिले असते आणि नन्तर त्या लोकांनी विचारले असते तर तेही बोलायचा नाहेतर, की आई रागावली असे का बोललास म्हणून :-)


Ninavi
Friday, May 26, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे हे कठीण आहे प्रकरण.

Ninavi
Friday, May 26, 2006 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सार्वजनिक ठिकाणी माझा लेक ' अती' करायला लागला तर एकदम गोड अविर्भावात ' शोन्या, फटका पाहिजे बाळाला?' असं विचारते.

Mrinmayee
Friday, May 26, 2006 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी.......
घरी काय अन बाहेर काय. मुलांना समजावून (आणि लागलच तर दटावून) सांगितलेलं बरं नं? मारायला कशाला हवं?


Storvi
Friday, May 26, 2006 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रिणमयी ग्रेटच आहेस की. हवं म्हणून कोणी मारतं का? :-O
हे सगळं ऐकुन मला वाटतंय की माझं काही खरं नाही आता. ती अत्ताच नुसतं घट्टं हाताला धरून खाली बसवलं तर म्हणते ' नो पूSशिन्ग आई ' :-O

Mrinmayee
Friday, May 26, 2006 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं शिल्पा, मुलं लाज काढतात कधी कधी!
आता "no pushing" म्हणतेय, उद्या जरा आवाज चढवून बोललीस की " I am scared, please don't yell " असं बोलून आई म्हणजे जगातली सगळ्यात कजाग बाई असं भासवेल.
आवाज थोडा वरच्या पट्टीत गेला की माझं पोर मला " mom, please calm down" म्हणून आणखी डोक फिरवतं! वर "let me explain.. " म्हणून शहाणपणाचे डोज पाजतं!


Gajanandesai
Saturday, May 27, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, त्याला हे माहित नसेल नाहीतर तो पण त्याच अविर्भावात म्हणेल, 'आता आपन जला फोन कलू हां पोलीशमामांना!'

Arch
Saturday, May 27, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे! मैत्रेयी नशिब तुझ, atleast principal ने सांभाळल.

हल्ली मुलांशी कस वागायच समजत नाही हेच खर. मी मुलांना खाली या अस सांगत होते एकदा. तर माझा मुलगा मुलिला म्हणत असलेल मी ऐकल. अजून mom ओरडून बोलावत नाही म्हणजे अगदी लगेच जायची गरज नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators