स्वप्नांना काही अर्थ असतो का ? मुळात आपल्याला स्वप्न पडतातच का ? कारण स्वप्नात आपल्याला आपला चेहरा कधीच दिसत नाहि atleast आत्तापर्यत मला तरी दिसला नाहि ? तुमचा काय अनुभव आहे ? काही वेळा म्हणतात की मनी वसे ते स्वप्नी दिसे ! पण काही अशा गोष्टी स्वप्नात दिसतात की त्या आपण आयुश्यात कधीच पाहिलेल्या नसतात मग असे कसे होते. स्वप्न ही एक मनाची जाणीव असते असे आहे का ? स्वप्नाबद्द्द्ल खुप प्रश्न आहेत ?
|
Gs1
| |
| Friday, July 28, 2006 - 7:13 am: |
| 
|
मायबाप sigmund freud चे interpretation of dreams वाचा. थोडे किचकट व कंटाळवाणे वाटेल पण अभ्यासपूर्ण आहे. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे बिरबलाची एक कथा आहे की बादशहाला एकदा त्याचे सगळे दात पडून गेले आहेत असे स्वप्न पडते. त्याचा अर्थ विचारला असता सगळे ज्योतिषी 'तुमचे प्रियजन तुमच्या आधी मरणार' असे सांगतात, बादशहा चिडून त्या सगळ्यांना हाकलून देतो. मग बिरबल ' आपल्या प्रियजनात आपण सगळ्यात दीर्घायुषी आहात' असा अर्थ लावतो व राजा प्रसन्न होतो वगैरे. तर सांगण्यासारखे म्हणजे हे अतिशय कॉमन स्वप्न आहे असे freud म्हणतो. एवढेच नव्हे तर त्याचा अर्थही 'प्रिय व्यक्ती सोडुन जाण्याची भीती' असाच आहे असे म्हणतो. freud ने बिरबल वाचला नसावा, पण साधर्म्य बघता आपल्याकडेही पूर्वी याचा काही अभ्यास झाला असण्याची शक्यता आहे.
|
Nilam1211
| |
| Thursday, October 12, 2006 - 11:04 am: |
| 
|
Tichya dolyaat paahun bolalo...... "Malaa tujhyashiwaay nahi jagaayche" Ti othaanwar haat theun mhanali, "Swapnaat ase nahi waagayache" .....
|
Disha013
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:03 am: |
| 
|
माझ्या मुलाला त्याचा दात तुटल्याचे स्वप्न पडले दुसर्याच दिवशी बातमी कळाली...माझे चुलत आजोबा गेल्याची... मला काल स्वप्नात समुद्र दिसला.... असे समुद्र दिसणे काही सुचित करते का?
|
Meggi
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:03 pm: |
| 
|
दिशा, दात तुटण्याचं स्वप्न common असतं. insecurity च्या भावनेने ते स्वप्न बर्याच लोकांना पडतं. तू जे सांगितलस तो योगायोग होता. पुढच्या वेळि अस स्वप्न पडलं तर घाबरु नकोस. दात पडणे, परीक्षेला उशीर झालाय, उंचा वरुन पडतोय, घाबरुन पळायचा प्रयत्न करतोय पण पळताच येत नाहिये ही स्वप्न खुप common आहेत. अस्थिर मनामुळे अशी स्वप्न पडतात खूप वेळा.
|
Disha013
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:14 pm: |
| 
|
thanks तुझ्या म्हणण्यात तथ्य वाटतेय ग मेगी!खरच योगायोग असावा. त्याचा एक दात आता पड्तोय की मग पडतोय असा हलत आहे
|
Nilam1211
| |
| Thursday, November 23, 2006 - 7:52 am: |
| 
|
मला खात्री आहे तिलाहि झोप आली नसेल . . .सुंदर स्वप्नं पडत असतील तरिही कुशिवर वळेल ...उसासेल...मला खात्री आहे तिलाहि झोप आली नसेल तिच्यासमोरहि तेच ढग .. जे माझ्यासमोर.. तिच्यासमोरहि तेच धुकं ...जे माझ्यासमोर.. तिचे नि माझे स्वल्पविरामही सारखे अन पुर्णविरामही..म्हणुन तर मी असा आकंठ जागा असताना तिची पापणीहि पूर्ण मिटली नसेल .. मला खात्री आहे तिलाहि झोप आलि नसेल (Mazi nahi)
|
माझा एक प्रश्न आहे कोणी सोडवु शकेल कय? मला खुपदा वेगवेगळी स्वप्न पडतात. वेग़वेगळ्या घटना दिसतात, काही वेळा तर अशक्यही पण काही काळाने अगदी काही वर्षानीही त्या तशाच्या तश्याच वास्तवातही घडतात. मग मला जाणवायला लागत की आता पुढे काय घडणार आहे.आणि मग मला त्या गोष्टीचा खुप त्रास व्हायला लागतो. बर्याचदा भेटणारी माणसं मला आधीच भेटल्यासारखी का वाटतात? आणि कुठे फिरायला गेलो की काही ठिकाण खुप ओळखीची का वाटतात कळत नाही. आणि उत्तर देता आले नाही तर pl. ही माझी समस्या आहे कोणी चेष्टा करु नका निदान
|
Rahul16
| |
| Thursday, November 23, 2006 - 10:25 am: |
| 
|
ekhadi gost / ghatana ( may be ekdam kshanapurti) hot asatanna mala ase watate ki agadi ase chya ase ya purwi kadhi tari zale aahe. pan mi tyacha jast vichar karat nahi. tumhala hote ka ase?
|
Asmaani
| |
| Thursday, November 23, 2006 - 1:04 pm: |
| 
|
हे असं घडत असलेली घटना पूर्वी घडल्यासारखी वाटणं माझ्याही बाबतीत होतं खूपदा.
|
Lajo
| |
| Friday, November 24, 2006 - 3:00 am: |
| 
|
मलाही असाच अनुभव खूप वेळेला आलाय. काय कारण असावे बरे?
|
Nilam1211
| |
| Monday, November 27, 2006 - 7:42 am: |
| 
|
yes..same here..mala pan asecha hote.. घडत असलेली घटना पूर्वी घडल्यासारखी वाटणं माझ्याही बाबतीत होतं खूपदा. kya karan asel ya mage..?
|
याला deja vu असे म्हणतात.. बहुतेकानी याचा experience घेतलेला असतोच.. पण कधी कधी स्वप्नात पुढच्या घडामोडी दिसतात.. मी खूपदा हा अनुभव घेतला आहे.. ही साधारण तीन वर्षापुर्वीची गोष्ट आहे.. दिवाळी चार पाच दिवसावर आली होती.. मी हॉस्टेलवरून घरी आले होते. माझे आई बाबा आणी भाऊ वरच्या मजल्यावर झोपतात. मी मात्र भाड्याने देण्यासाठी जी रूम खाली आहे तिथे झोपते (सकाळी उशीरा उठणे हे एकमेव कारण) दोन रूम भाड्याने देण्यासाठी आहेत. एक रिकामी होती आणि एकात मी झोपले होते. दिवसभर फ़राळचे केले होते. त्यामुळे दहा वाजताच मी झोपले. तेवढ्यात मला स्वप्न पडले की एक मोठा बैल माझ्या रूम मधे घुसतोय आणी मी दरवजा लावायचा प्रय्त्न करतेय... माझे वडिल नाहेर अंगणात उभे आहेत आणि म्हणत होते .."काही झाले तरी दरवाजा उघडू नकोस".. धाड असा जोरात आवाज झाला आणि मी जागी झाले. माझ्या कॉटलगतच खिडकी आहे. तिथून मला torch चा लाईट दिसला. मला वाटल वडिलच बाहेर फ़िरतायत. मी बाबा असा आवाज दिला.. तर तो माणूस काही न बोलता निघून गेला. "असे काय बाबा " रात्रीचे का फ़ेर्या मारतायत हा विचार करून परत झोपले.. सकाळी सात वाजता उठले.. बाहेर आले तर शेजारच्या रूमचे कुलुप उघडलेले आणि दरवजा सताड उघडा... आत मात्र झाला प्रकार लक्षात आला आणि धावत वर गेले.. घरात सगळ्याना चोर येऊन गेल्याचे समजलेच होते.. पोलिसाना फ़ोन केला. त्यानी विचारले काही माल गेलाय?बाबा म्हणाले नाही.. कारण घर रिकामे होते... पोलिस म्हणाला नशीब समजा..कल एका रात्रीत तीन चोर्या झाल्या आणी एके ठिकाणी तर घरात कामवाली आहे हे समजताच तिचा कोयतीने वार करून खून केला. माझे नशीब चागले होते म्हणून मी बाबा समजून दरवाजा उघडला नाही,,, पण दहा मिनिटे आधी मला बाबा सागत होते ना.. .."काही झाले तरी दरवाजा उघडू नकोस"..
|
Nilam1211
| |
| Saturday, December 02, 2006 - 10:35 am: |
| 
|
तुमच स्वप्न ..... तिला काय खायला आवडतं ? ग़ुलाब जाम घेताना ती वाटीत एका वेळी किती घेते ? रस मलाई घेताना ती रस जास्त घेते की मलाई ? ठेचा खाताना तिच्या डोळ्यातुन पाणी येत का? आणि येत असेल तर एकाच डोळ्यातुन की दोन्ही डोळ्यातुन ते मला बघायचं.. मला तिच्या आवडीचे पदार्थ बनवुन ती थकलेली वैतागलेली असताना तीला सरप्राईज द्यायचयं.. मी कपडे बेडरुममद्ये इकडे तिकडे पसरवुन टाकले की तिची होणारी चीडचीड, तीच लाल होणार नाक... मला सगळं सगळं बघायचयं … लाईट गेल्यावर ती घाबरेल का? तिला लहान मुले आवडतात का? आम्हाला पहिला मुलगा झालेला तिला आवडेल की मुलगी.. हे मला तिला विचारायचयं.. तिला उगवणारा सुर्य आवडतो की मावळलेला? तिला कोणता खेळ बघायला/खेळायला आवडतो ? पत्ते खेळत असताना मी मुद्दम तिच्याशी हरतोय, हे तिच्या लक्षात येतयं का. .. ते मला बघायच यं... आई बाबा त्यांच्या रुम मध्ये असताना आणि त्यांच लक्ष नसताना .. मी तिचा हात पकडल्या वर तिचे गुलाबी होणारे गाल आणि लाजुन खाली गेलेली नजर मला शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवायचयं... मि रात्री उशीरा घरी आल्यावर, माझी वाट पाहता पाहता सोफ़्या वरचं झोपलेली ती नाजुक बाहुली मला अलगद उचलुन नीट पलंगावर ठेवायचिये आणि तिच्या अंगावर पांघरुण घालायचंय.. कधी तीला घरी यायला उशीर झाला, तर मी केलेला तिच्या आवडीचा स्वयंपाक बघुन संसार सुखाने सुखावलेली ती मला बघायचिये.. तिचा स्वभाव जाणुन घ्यायचायं.. अगदि तिच्या मनात येणारा प्रत्येक विचार तिला स्वतः हा मला सांगण्या आधी माझ्या ओठातुन तो बाहेर येईल इतकं तिला कळुन घ्यायचयं.. ती नर्व्हस असेल तेव्हा गच्चीत चांदण्यामध्ये तिला कुशीत घेवुन झोपवायचयं… तिच्याशी भांडायचयं, नंतर वेडे वाकडे चाळे करुन तिचा राग पळवायचायं आणि तीच्या कडुन कधी माझी स्वतःची पण समजुत काढुन घ्यायचीये.. तिला कधी माहेरची आठवण आलीच तर जवळ घेवुन समजवायचयं.. मला आलेल एखाद अपयश, तिच्या मिठीत विरघळुन मला विसरायचयं.. आणि आम्हाला मिळणा-या यशाचा पत्येक क्षण अन क्षण काय मला लक्षात राहील असा साजरा करायचाय...
|
Asmaani
| |
| Saturday, December 02, 2006 - 3:26 pm: |
| 
|
निलम, सुंदर आहे लिखाण! पण हे ललित मधे टाकायला हवं होतस.
|
Bsk
| |
| Saturday, December 02, 2006 - 6:11 pm: |
| 
|
hI fwded mail ahe..i think..
|
Prasik
| |
| Sunday, December 03, 2006 - 6:32 pm: |
| 
|
निलम छान स्वप्न आहे सकाळी बघ जरूर खंर होईल
|
Prasik
| |
| Sunday, December 03, 2006 - 6:44 pm: |
| 
|
नंदिनीचे हॉरर स्वप्न वाचून आगांवर काटा आला असेल तर आता हे कॉमेडी स्वप्न वाचा ( हो कॉमेडीच! मला कसलीही स्वप्न पडू शकतात). एकदा माझ्या स्वप्नात आमीरखान आला होता. तेव्हा त्याचा गेट-अप 'राजा हिदुंस्थानी' मधील तो करिश्माला ईम्प्रेस करायला लाल ब्लेझर घालतोना अगदी तसाच होता. तर सिन असा होता (स्वप्नातला) माझे काही मित्र आणि मी कट्ट्यावर गप्पाटप्पा मारत होतो, तेव्हा हा तिथे कुठुनतरी ऊगवला. माझे सर्व मित्र त्याचा ऑटोग्राफ घ्यायला गेले, पण मी मात्र तिथेच थांबलो. नंतर हा भाई स्व:ताहुन माझ्याकडे साईन द्यायला आला, आणि मी चक्क त्याला नको म्हणुन सांगितले.
|
Nilam1211
| |
| Monday, December 04, 2006 - 5:09 am: |
| 
|
hi to all.. ho he maze likhan nahi aahe..me chkun mention karayala visarali.....iam sorry for that... mala he search kartana bhetale..,..mala wadale.. ..kadachitt serwanan awadale manun me ethe post kele..thanks for reply..
|
Rajeshad
| |
| Tuesday, December 05, 2006 - 5:12 am: |
| 
|
मला बरीच गमतीशीर स्वप्न पडतात. दररोज काहीना काही स्वप्न पडतच. काल रात्री मी झोपण्याआधी रेड बुल प्यायलं. त्याच्या बाटलीवर स्पष्ट लिहीलं आहे की याने खूप उत्साह येतो, झोप जाते वगैरे वगैरे. लोकांकडून ऐकलं ही आहे की खूप काम असेल व झोप घालवून जोम आणायचा असेल तर हे फार उपयुक्त आहे. तरी देखील मला ते रविवारी रात्री पिण्याची लहर आली. याआधी प्यायलं नसल्याने त्याचे परिणाम माहीत नव्हते. पिऊन वाट पाहू लागलो की अंगात आता संचारतं आहे का. तसं काही झालं नाही. नेहमीप्रमाणे रात्री १२ला झोपलो. रात्रभर मला एकच स्वप्न पडलं की मी रेड बुल प्यायलं आहे व त्यामुळे मी रात्रभर जागा आहे. सकाळी उठलो तेव्हा लक्षात आलं की मला झोप लागली नाही हे स्वप्न होतं व माझी छान झोप झाली होती !
|