Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 09, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through November 09, 2006 « Previous Next »

Ameyadeshpande
Tuesday, September 12, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याच्या पाट्या आणि दुकानदार कितीही वात्रट असोत, पुण्याचं पाणी मात्र अगदीच साखरेसारखं गोड आहे. अगदी २ घोट प्यालं तरी समाधान होतं. (ह्याचं श्रेय मुळे-मुठेला आहे पुणेकरांना नाही ह्याची नोंद घ्यावी)

Deepanjali
Tuesday, September 12, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का बरं पुणेकरांना नाही ??
आम्ही मुळा मुठेत आणि पर्वति शुध्दीकरण पाण्यात काय काय mix करतो किंवा काय टाकतो माहित आहे का ??
ते नाही केले तर शुध्द पाण्याची चव अशी गोड चव येणे शक्य तरी आहे का ?
तेंव्हा श्रेय हे पुणेकरांनाच द्यायला हवे तुम्ही !!
~D

Farend
Wednesday, October 04, 2006 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आठवलेला किस्सा: कोथरूड मधे एका अस्सल मराठी (मिठाईच्या) दुकानात मी अर्धा किलो बर्फी मागितली. त्याने छोट्यातली छोटी एक प्लास्टिक ची पिशवी काढली आणि त्यात बर्फी भरायचा प्रयत्न करत होता आणि मधुन वजनही करत होता. साधारण ३५० g झाल्यावर ती पिशवी पूर्ण भरली व आणखी बर्फी त्यात बसेना. मग मी त्याला म्हंटले की आणखी बसत नसेल तर तेव्हढीच द्या. हे ऐकून त्यानेही अगदी मोठा प्रॉब्लेम सुटल्यासारखी ती माझ्याकडे दिली आणि ३५० g ची किंमत घेतली. अर्धा किलो बर्फी खपावी म्हणून दुसरी पिशवी नाही घेतली!

Lajo
Thursday, October 05, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पाटी मी आधी दुसर्‍या BB वर टाकली होती.
पुण्यातल्या एका बंगल्याच्या गेटवर लावलेली पाटी. यांचा कुत्रा बिचारा मरून ५-६ वर्ष झाली आसतील पण पाटी मात्र आजुन आहे.



Rajeshad
Sunday, October 15, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात कधी नव्हे ते मी एक चांगली पाटी पण पाहिली आहे. कदाचीत पाटी लावणाय्राची आई पुण्याची व वडील गुजराती बिझनेसमन असावेत. ही पाटी पुण्यात सोडून कुठेही पाहिली असती तर मला ती जनकल्याणासाठीच आहे असं वाटलं असतं पण पुण्यातल्या पाट्यांचे व लोकांचे गमतीशीर अनुभव आल्याने मला त्या पाटीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं अजुनही वाटतं. वैशाली परिसरामधे MSEB चे ऑफीस आहे तिथे एक नारळाचे झाड आहे व त्याच्या खाली ही पाटी आहे. "येथे वाहने उभी करू नयेत. नारळ पडण्याचा धोका." असं लिहीलं आहे. ती वाचुन मला या इसमाने लोकांच्या भल्यासाठी ही पाटी आहे असं दाखवुन पार्किंगची कटकट सोडवली आहे असं वाटतं.

Bee
Monday, October 30, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कुठे सांगाव कळलं नाही म्हणून इथे लिहितो आहे. पुणेकर वेगळेच असतात इतर महाराष्ट्रीयन लोकांमधे. मी जे निरिक्षण केले आहे त्याबद्दल इथे लिहितो. ह्यातील बरेच अनुभव मी मायबोलिवर देखील घेतले आहेत. हे निरिक्षण 'बहुतेक' पुणेकरांबद्दलचे आहे. काही अपवाद नक्की भेटतील. कुणाला राग येऊ नये ही विनंती --

१) पुणेकर फ़क्त पुणेकरांशीच अधिक चांगली आणि पटकन मैत्री करतात.
२) फ़ार फ़ार तर ते मुंबईकरांशी 'आपणहून बोलतात' परंतू इतर लोकांशी ती अबोल असतात.
३) पुणेकरांचा स्वाभिमान जास्त असतो.
४) पुणेकर उपरोधिक भाषेत चांगले बोलतात.
५) पुणेकरांशी जर एकदा संबंध बिघडले तर ते परत कधीच चांगले होत नाही. शक्यता फ़ारच कमी.
६) पुणेकर जिथल्या तिथे न बोलता माघारी त्यावर चर्चा करतात.


Atul
Monday, October 30, 2006 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पुण्याचं पाणी मात्र अगदीच साखरेसारखं गोड आहे.
अमेय, तुम्हाला कुठले पाणी प्यायची सवय आहे, त्यावर हे अवलम्बून आहे. कारण पूर्वी जेन्व्हा मी पुणेकर नव्हतो तेन्व्हा मला पुण्याचे पाणी चक्क कडू लगायचे (क्लोरिन मूळे असेल कदाचित); असो बी ची वरची पोस्ट पाहता माझी ही पोस्ट लवकरच वाहून जाईल :-)

Farend
Wednesday, November 08, 2006 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"भेळ संपली, धन्यवाद", हा बोर्ड कोणाला आठवतोय का? मी त्या दुकानात भेळेपेक्षा हा बोर्डच जास्त वेळा पाहिला आहे :-)

Maitreyee
Wednesday, November 08, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेळ संपली धन्यवाद
बहुधा विश्राम बाग जवळ पुष्करिणी भेळ चे दुकान असावे.. हे तर पुणेरी दुकानदाराचे 'व्यवच्छेदक लक्षण' का काय म्हणतात तसे आहे! माझा नवरा म्हणतो पुण्यात वडे हातोहात खपले जायला हवे असतील तर आधी काही महिने नुस्ते ' वडे संपले धन्यवाद' अशी पाटी लावायची!! मग नन्तर नुस्त्या hype वर वडे खपतील :-)
अगदी याच धर्तीवर परांजपे स्कीम्स चा एक अनुभव
'इथे' लिहिलाय आज मी! 'फ़्लॅट संपले धन्यवाद' अशी पाटी च बाकी आहे तिथे!!

Farend
Wednesday, November 08, 2006 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर तेच दुकान. हे दुकान आणि तिथेच बाजूच्या बोळात 'श्री' मिसळ हे संध्याकाळी ७ नंतर लोकांना काहीही अबरचबर खाऊ देणे म्हणजे पाप असावे असे समजत असावे. जरा संध्याकाळी तिथे जायला उशीर झाला की दुकान सुद्धा बंद झालेले असते. ८ च्या पुढे कधीही भेळ तिथे खाल्ल्याचे आठवत नाही.

जवळच असलेले नवरत्न भेळ चे दुकान केवळ यांच्या निराश गिर्‍हाईकांच्या जोरावर चालत असावे :-)

आणि शनिपाराच्या जवळच्या एका अमृततुल्य मधे पाण्याच्या पेल्यांवर 'भांड्यांवर नावे घालणार' कडून ' xxx हॉटेल मधून चोरलेले' असे लिहिलेले असायचे. xxx हे त्याच हॉटेल चे नाव, जे आत्ता आठवत नाही. फक्त ते त्यांनी स्वत: लिहून घेतले की अशाच नावाच्या दुसर्‍या एखाद्या हॉटेल मधून चोरले ते माहीत नाही :-)


Kedarjoshi
Thursday, November 09, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते त्यांनीच लिहुन घेतल्याची शक्यता जास्त कारण लोकेशन. आधीच अमृततुल्य त्यात सदाशिव च्या बाजुला. शिवाय मालक कोक्या असेल.

बर मागे मी माझ्या रवि नावाच्या मित्राचा किस्सा सांगीतला होता. तर रव्याचे लग्न बालगंधर्व पुल जिथे संपतो तेथे एक मंगल कार्यालय आहे तिथे झाले. आधी त्याच्या आत्याने शिरा न दिल्या मुळे मी विचार केला की चला त्याचा वचपा लग्नात काढु. शिवाय नवर्याचा मित्र म्हणल्यावर काहीही करता येने शक्य. ( निदान मराठवाड्यात तरी). पण हाय रे दैव. वधु पक्ष होते लोंढे. (१२१० सदाशिव मधीलच काय की रव्याने लोचा केला होता). त्यानी सिंमत पुजनाच्या दिवशी फक्त साखरेचे पाणी लिंबु घालुन ( पण नेमके लिंबु शरबत न्हवते) दिले व जेवन करताना वाढप्याने एकदाच व एकच पुरी वाढली. नंतर आलाच नाही पठ्या. ( काय माझ वझे नी लोंढेशी वाकड आहे काही कळले नाही) परत एकदा रव्या कडुन पैसे घेउन मग अभिरुची मध्ये हादडले.


Mrinmayee
Thursday, November 09, 2006 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसांपूर्वी मी मैत्रीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पुण्याला फोन केला. एरवी मी तीच्या सेलफोनवर बोलत असे. पण आता घरी फोन लागलेला आणि सेलफोन नादुरुस्त म्हणून लँडलाईनवर लावला.तिने तिथल्या वेळेनुसार 'रात्री दहाच्या पुढे कर' म्हणुन सांगीतलं होतं. म्हणून मी सव्वादहाला फोन केला. रॉंग नंबर लागला. परत केला तर त्याच घरातल्या सद्गृहस्थांनी परत उचलला. मला वाटलं झालं आता खेकसणार बहुतेक. पण त्यांनी कुणाचा नंबर हवा ते विचारलं, मी नाव सांगीतलं. 'कुठून फोन करताय' म्हणुन विचारणा झाली. 'यु. एस मधून' . 'एक मिनिट थांबा मी डीरेक्टरी पाहून सांगतो'. लागलीच मला बरोबर नंबर काढून दिला. (तो नंबर बरोबर असल्याचं मैत्रीणीशी बोलल्यावर कळलं. पण येव्हड्या रात्री परत थँक्स चा फोन करणं जमलं नाही. म्हणून मी दुसर्‍या दिवशी आवर्जून फोन करून डीरेक्टरीतून नंबर शोधून देणार्‍या भल्या माणसाला धन्यवाद दिले!).
यावर 'मुळचे पुण्याबाहेरचे असतील ते गृहस्थ' असा युक्तीवाद करणारे पण इथे सापडतील. पण मला मात्र इतक्या रात्री ही कर्टसी दाखवणारी व्यक्ती फार भली वाटली.


Kedarjoshi
Thursday, November 09, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मुळचे पुण्याबाहेरचे असतील ते गृहस्थ' LOL

पण असे चांगले लोकही असतातच. पुणे काही एवढे वाईट नक्कीच नाही. पण पुण्यात राह्यायला पुणेकरच व्ह्यायला पाहीजे.

अमोल तु रुपालीत जात होतास का? असशील तर रुपाली वद्दल ही लिहीशिल का?


Farend
Thursday, November 09, 2006 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रूपालीत फारसा गेलेलो नाही, वैशालीत थोडाफार गेलो आहे, पण त्याबद्दल लिहिण्याएवढा नाही. पण तेथे एका चहाच्या जोरावर १-२ तास काढू देतात असे ऐकले होते.

Farend
Thursday, November 09, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार ते विष्णुकृपा मंगल कार्यालय असेल (जर अगदी चौकाच्या जवळ असेल तर) आणि तो (साखरेचे पाणी ई.) सुधारस करण्याचा प्रयत्न असावा. वास्तविक नीट केलेला सुधारस खूप छान लागतो (अगदी गुलाब जाम च्या राहिलेल्या पाकाचा असला तरी, किंबहुना तोच जास्त चांगला), पण कार्यालयात काही भरवसा नाही.

स.प. च्या कॅंटीन मधे पहिल्या दिवशी वांग्याची भाजी, दुसर्‍या दिवशी मटकीची उसळ आणि तिसर्‍या दिवशी 'वांगा मटकी' असायची असे एका मित्राकडून ऐकले होते, तसला प्रकार असू शकतो हा :-)


Bee
Thursday, November 09, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार to be frank , geographical locations नुसार माणसांचे स्वभाव बदलतात असे मला तरी मुळीच वाटत नाही. त्यामुळे बर्‍याचदा हा बीबीही खटकतो. माझे असे प्रामाणिक मत आहे की मराठी माणसात ब्राह्मण मनुष्य थोडा वेगळा असतो. even अकोल्यातील ब्राह्मणांचे स्वभावगुण अब्रह्मणांएपेक्षा वेगळे असतात. पुण्यात जागोजागी ब्राह्मण भेटतात म्हणून पुणे इतके typical शहर झाले आहे. इथे जातीवाद वगैरे म्हणून मी हे लिहित नाही.

एकदा मी वैशालीत छान जेवन केलं मग माहिती पडलं की खिशात पाकीटच नाही, घरी विसरलो. तिथल्या मालकाशी बोललो आणि त्यांनी नम्रपणे उत्तर दिले आज संध्याकाळी या नाहीतर उद्याला या. हे उत्तर ऐकुन मला खूप नवल वाटले. जर एखादा असंस्कृत मनुष्य असता तर मला कपबशा विसळाव्या लावल्या असत्या पण तसे झाले नाही हे माझे नशिब पण त्यावेळी खूप गाळण उडाली होती.


Milindaa
Thursday, November 09, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, पण यातला नमुना कोण? तू की वैशालीचा मालक? :-)

Robeenhood
Thursday, November 09, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका निरागस आणि सलज्ज व्यक्तीची अशी खिल्ली उडविणे चांगले नाही.
शो. ना. हो!


Zakki
Thursday, November 09, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तो जर वृद्ध नि अमेरिकेत रहाणारा असला, नि खरे बोलणारा असला तर गोष्ट वेगळी! मग त्याची कितीही का खिल्ली उडवा ना!


Shonoo
Thursday, November 09, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड

तिकडे शब्दार्थ वरती किती प्रश्न विचारले आहेत मी एकाच पोस्टमधे! तिथे बघा ना प्लीज!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators