|
Rahul16
| |
| Saturday, April 08, 2006 - 6:49 am: |
| 
|
माझ्या बाहिनी चा किस्सा, तिला पाहायाला मुलाचे वडील आणी आई आले होते. वडीलांजवळ प्रशनांची मोठी लिस्ट होती. एकामागे एक असे ३०-४० प्रशन विचारुन झाले. नमुने दाखल, दासबोध वाचले आहे का? ५ संतांची नावे सांग? एकतर्फी प्रेमातुन होनारे खुन याबद्दल मत काय? बहिन पारिक्षेत पास झाली... मुलाचे वडील आमच्या काकांचे मित्र आहेत. नंतर काकांनी त्यांची चांगली काढली,.. मग मुलाच्या वडीलांनी हात जोडुन माफी मागीतली. लग्न तेथे झाले नाही.
|
Ananta
| |
| Sunday, April 09, 2006 - 9:57 am: |
| 
|
जाम मज्जा आली हे सर्व किस्से वाचुन....!!!
|
Anaani
| |
| Tuesday, April 11, 2006 - 10:36 am: |
| 
|
हे किस्से वाचुन मज्जा आलि. I am lucky i didn't have to go through all this process.
|
धमाल आली हे सगळे किस्से वाचताना!!!!
|
Ludabuda
| |
| Wednesday, August 09, 2006 - 12:24 pm: |
| 
|
मुलगी बघताना कांदेपोहेच क? खूप तिखट करुन डोळ्यासमोर अश्रुंचा पडदा झाला की मुलगी आणायची समोर, म्हणजे कशीही असली तरी नीट दिसत नाही परत आम्ही मुलगी दाखवली असे म्हणायला मुलीकडचे मोकळे----कल्पना चंगली आहे आणि समजा मुलगी बघताना मला पिझ्झा हवा असेल तर मी काय करु? कोणी अनुभवी मला मार्गदर्शन करतील काय मला निराश करु नका
|
Arch
| |
| Wednesday, August 09, 2006 - 12:44 pm: |
| 
|
आणि समजा मुलगी बघताना मला पिझ्झा हवा असेल तर मी काय करु? >> मग इटॅलियन मुलगी बघायला जा.
|
Chafa
| |
| Wednesday, August 09, 2006 - 1:19 pm: |
| 
|
किंवा डब्ब्यात पिझ्झा घेऊन जा. मुलगी समोर आली की लगेच डबा उघडून पिझ्झा खायला सुरुवात कर.
|
किंवा मग मुलीला घरी बोलाव आणि KP ऐवजी पिझ्झा कर
|
आणि समजा मुलगी बघताना मला पिझ्झा हवा असेल तर मी काय करु?>>>>>>>>>> HHPV. LOL. किंवा पिझाह्ट मधे बघन्याचा कार्यक्र्म उरक नी तिलाही पिझा खाउ घाल.
|
Ludabuda
| |
| Thursday, August 10, 2006 - 9:00 am: |
| 
|
बरेच सल्ले मिळाले पण या सगळ्यात माझेच बरेच पैसे ख़र्च होतील हे कसे रे डोक्यात शिरत नाही रे तुमच्या. अरे तुम्ही कांदेपोहे काय मुलीकडे बरोबर घेऊन जातारे शिंच्यांनो? मला असे सल्ले देता ते उपयुक्त सल्ले हवे आहेत देणार कारे? आपला लुडबुड
|
बरेच सल्ले मिळाले पण या सगळ्यात माझेच बरेच पैसे ख़र्च होतील हे कसे रे डोक्यात शिरत नाही रे तुमच्या <<<पैसे खर्च होउ नयेत म्हणून जालीम आणि एकमेव उपाय : लग्नच करु नकोस , त्यामुळे हे आणि लग्नानंतर होणरे सगळे खर्च वाचतील आणि त्या पैशातून तुला हवे तेवढे पिझ्झे खाता येतील .
|
>>>> खूप तिखट करुन डोळ्यासमोर अश्रुंचा पडदा झाला छे छे छे, लग्नच करु नकोस हा उपाय नाही! तुला तिखट लागत असेल, तोन्ड आल असेल तर कच्ची तोन्डली खावुन मग जा, आख्खी मिरची कराकरा चावलीस तरी तिखट लागायच नाही! अन येवढीच पिझ्झा खायची हुक्की आली तर तू मुलीच्या आईला सरळ पिझ्झाची ऑर्डर दे! मग ती घरात जाईल, कालची शिळी कड्डक भाकर घेइल, त्यावर कालचा झुणका काधुन त्याचा लेप भाकरीला देइल! वर थोडी कोबी, कान्दा, कोथिम्बीर बारीक चिरुन पेरेल, दोन चमचे साजुक तुपाची धार टाकुन तुला सर्व्ह करेल! (आईच देणार, मुलगी नाय येणार येवढ्यात तुला सर्व्ह करायला! उगा भलतीच स्वप्ने बघु नकोस) अन मग तो कालच्या शिळ्या भाकरीझुणक्याचा पिझ्झा तू चाखत माखत हाण लेका! DDD
|
Moodi
| |
| Thursday, August 10, 2006 - 11:02 am: |
| 
|
लिंब्या तुझी ही दणदणीत पाककृती रेसेपी बीबीवर लिही. इथे वाहुन जाईल. 
|
>>>> आपला लुडबुड यापेक्षा "आपली" लुडबुड हेच व्याकरण दृष्ट्या जास्त बरोबर ना? अन तस असेल तर वरची पिझ्झ्याची कृती तुच करुन लचकत मुरडत लाजत बाहेर नेवुन दे!  DDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDDddd
|
Ludabuda
| |
| Thursday, August 10, 2006 - 11:12 am: |
| 
|
अरे बा लिंब्या तू सतत माझ्या पाळतीवर असतोस का जेथे जतो तेथे कटकट. अरे माझ्या वयाचे तरी भान ठेव जरा
|
Maudee
| |
| Thursday, August 10, 2006 - 11:19 am: |
| 
|
अनुमोदन लिंबू तुमची शिळ्या झुणका भाकरीच्या रेसिपीने तोंडाला पाणी सुटले आहे. लुडबुड, "अरे माझ्या वयाचे तरी भान ठेव जरा " -वय झालं आहे तर कशाला मुली पहात फ़िरतो आहेस
|
कालची शिळी कड्डक भाकर घेइल, त्यावर कालचा झुणका काधुन त्याचा लेप भाकरीला देइल! वर थोडी कोबी, कान्दा, कोथिम्बीर बारीक चिरुन पेरेल, दोन चमचे साजुक तुपाची धार >>>>>> लिंबुभो तुम जियो हजारो साल. काय फक्क्ड रेसीपी आहे. माउडे, सही.
|
Princess
| |
| Thursday, August 10, 2006 - 5:49 pm: |
| 
|
माउडी... छान उत्तर दिलस
|
Hmm..khoop maja ali warche kisse pahun. Mazha pan asach kissa. Bap re ajunhi kata yeto anga war. Amhi nuktech suru kele hote sthala pahayla. Tar hya mulche thal ale (mulga US madhye hota mag kay pay jaminiwar kase tiknar). Punyat bhandarkar rd la ghar hota. Amhi gelo tevha sarva pratham mulachya wadlani maza zhdun interview ghetla. Uda: geeta yete ka? Mag 15 va adhyay mhanun dakhaw. Namke te mazhyach feild che nighale mag kay zhala FE te BE che sarva vishyavar mazhi viva suru. Mazhya barobar mazhi mami wa kaka kaku ale hote. Mazhi ulat tapasni zhalyawar tyachya kade morcha walavla. Mazhi Mami BSNL madhye kamala ahe. Tar tila BSNL chi arthik shtit, kontya technology ne kaay sudharta yeil and what not... Mag rit sar kaka kauncha interview. Shewti to mulga chidla tyala mazhyashi bolache hote... Mag amhala atlya kholi madhye pathawnyat ale.. Tar hya pathyane survatilach mala sunavle - Mhane ki Arranged marraige madhye sarv gaal asto mhane...Tithe matra mazha sayam sampla..mi asa sunawla na tyala... Amhi ghari jaun itka haslo...bap re. Bar itke houn suddha tyacha Hokar ala(???). Ani mazhya wadilani nahi sangtle tar mulache wadil bhandayla lagle ... Namune astat bai ek ek....
|
Sayuri
| |
| Monday, October 23, 2006 - 7:02 pm: |
| 
|
माझे अनुभव मी इथे लिहिले..'शुभमंगल...सावधान" http://manasokta.blogspot.com/2006/09/blog-post_28.html
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|