Paragb
| |
| Tuesday, October 24, 2006 - 6:49 am: |
| 
|
Ya varshi vachlelya diwali Ankavaril Prtikriya va vachnya joge ank !
|
Paragb
| |
| Tuesday, October 24, 2006 - 7:01 am: |
| 
|
कालनिर्णय चा अन्क हाती आहे. इर्साल माल्वणी माज़े लन्डन, London, New York, Barlin, Shanghia या शहरा वरील लेख fransa trufo, Akira Kurosava, Majid Majidi, Sargeyi या चार दिग्दर्शका बद्दल चे लेख यानी नट्लेला आहे वाच नीय आहे
|
Kshipra
| |
| Tuesday, October 24, 2006 - 2:25 pm: |
| 
|
मौजेत 'इजाजत एक पाऊसगाणे' हा विजय पाडळकरांचा लेख मस्त आहे. तसेच वास्तुपुरुष चित्रपट निर्मितीचा प्रवास देखील सुरेख. कवितांमध्ये नलेश पाटील आणि श्रीपाद प्रभाकर जोशी ह्यांच्या कविता आवर्जून वाचाव्या अश्या
|
Bee
| |
| Monday, October 30, 2006 - 5:47 am: |
| 
|
दिवाळी अंक कुणी वाचले नाहीत का?
|
Paragb
| |
| Monday, October 30, 2006 - 8:26 am: |
| 
|
'Maaher', as usual stree pradhan, phakta eka purushachi dirgha katha tyat aahet. Maher madhe 'Kavita' kaa nahit ? Karvarkarache aaharavaril lekh va Gadndhiji che kahi maitri che prasanga varil lekh he vishesh. Katha as usual.
|
Raina
| |
| Monday, October 30, 2006 - 10:24 am: |
| 
|
म.टा चा अंक वाचला. online पण उपलब्ध आहे- मटाच्या संकेतस्थळावर. अंक बरा आहे. फार ग्रेट नाही. काॅल सेंटरवाल्यांचे संभाषण जरा धक्कादायक होते. बाळासाहेबांच्या मुलाखतीचा point च हरवला आहे. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचे सिंहावलोकन करायचा ईरादा होता की काय हे नीटसं समोर येत नाहीये. गुगलची खिडकी हा लेख सुरेख आहे. मुद्देसुद. गाॅडफादर या चित्रपटावरचा लेख छान आहे. नरेंद्र जाधवांनी सशी थरुरांवर लेख लिहीला आहे. तोही जरा botched up वाटतो. घाईघाईने कोंबलेला. किरण बेदींची मुलाखत छान आहे.
|
फार ग्रेट नाही.>>>. हो अगदीच अपेक्षाभंग केलाय म.टा. ने..!!!
|
Shonoo
| |
| Monday, October 30, 2006 - 12:43 pm: |
| 
|
नरेंद्रा जाधवांचा शशी थरूर वरचा लेख अगदीच विस्कळीत. शिवाय एका अ वि म ने दुसया आपल्या पेक्षा वरचढ अ वि म ची नाईलाजाने स्तुती करावी तसा सूर वाटतो- थरूर यांच्या आई वडीलांनी लिखाणाला दिलेल प्रोत्साहन वगैरे च्या वर्णनात ' आमच्या आई बाबांनी इतके लाड केले असते तर आम्ही नोबेलच मिळवले असते' असा सूर वाटतो. त्या लेखाचं काही संपादन न करताच छापलाय असं वाटलं. शशी थरूरांची माणूस म्हणून, लेखक म्हणून, आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जवळून संबंध असणारा मुत्सद्दी म्हणून ओळख होईल या अपेक्षेने वाचला लेख. पण निराशा पदरी आली. गूगल वर यापेक्षा बरी माहिती मिळेल त्यांच्याबद्दल.
|
Raina
| |
| Monday, October 30, 2006 - 1:55 pm: |
| 
|
शोनू- हात मिलाओ. अगदी १००% तसच वाटत.- आणि त्या लेखातलं ते सारख "कमावलेल"- विशेषण वाचून वैताग आला. ते शशी थरुर एवढे PR savvy नसते तर ईथपर्यंत पोचलेच नसते. आणि जाधवांच काय कमी "कमावलेले" बोलणं असेल का? नरेंद्र जाधवांनी रतिब घातलाय लेखांचा या वेळेस. सा. स मध्ये ही त्यांचा त्यांच्या भावावर लेख आहे. तो या (शशी थरुर वरील) लेखापेक्षा चांगला आहे पण तिथे ही जाधवांचा अहंगंड जाणवतो. सा.स- पुर्ण वाचून होतोय. मग details टाकेन. लोपा- होना- मटा ने पाटी टाकलि ह्या वर्षी.
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 6:10 am: |
| 
|
मला मटाचा 'विदर्भ' दिवाळी अंक सर्वात छान वाटला.
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 6:30 am: |
| 
|
कॉलनीपलीकडचं विश्व... हे नाटककार 'गिरीश ओक' नागपुरचे आहेत हे मला माहिती नव्हतं. खरच 'विदर्भ' भाग रसरशीत झाला आहे. प्रत्येक लेख वाचला की समाधान मिळतं. मे बी मी विदर्भीयन असल्यामुळे असेल.. पण खरच पावती द्यावी असे एकेक लेख आहेत त्यात.
|
Shonoo
| |
| Tuesday, October 31, 2006 - 12:56 pm: |
| 
|
रैना सकाळ मधल्या लेखाची लिंक टाकणार का का मूडी देशातून परत यायची वाट पहावी लागेल :-)
|
Sayuri
| |
| Tuesday, October 31, 2006 - 5:51 pm: |
| 
|
कोणी निसर्गसेवकचा 'अभिजात' वाचला का? कसा आहे? I am really missing it. हा निसर्ग-पर्यावरणाला वाहून घेतलेला 'अभिजात' खरंच वाचनीय असतो.
|
Raina
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:16 am: |
| 
|
शोनू- अग- मी hard copy अंक वाचला. सा.स च paid subscription आहे for reading online. I have not subscribed . त्यामुळे लिंक देऊ शकत नाही. सा.स मधील विनय हर्डिकरांचा प्रमोद महाजनांवरील लेख वाचनीय आहे. फक्त स्वत्:च्या सगळ्या राजकिय निष्ठा बाजूला ठेऊन वाचावा. उदो-उदो न करता objective मुल्यमापन केलं आहे. पण हर्डिकरांनी त्यांच्या चिरंजिवांचा किंवा बंधूराजांचा उल्लेख साफ टाळलाय. म्हणे पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी- हा युनिक फीचर्स चा लेख ही वाचनीय आहे. छान तोलूनमापून लिहिलाय. शहराच्या कायापालटाचे नेमके विश्लेषण आहे. चक्क मुद्रणदोष आहेत- एका ठिकाणि चक्क "पुमे" असं छापलय. Mr.Dumbre your team has been caught napping ! सायुरी- Thanks अभिजात बद्दल माहित नव्हतं. बघते आता शोधून.
|
Bee
| |
| Wednesday, November 08, 2006 - 9:05 am: |
| 
|
इथे आणखी काही लिहा रे.. केवढे तरी दिवाळी अंक आहेत मग लिहायला काय झाले. मी साप्ताहीक सकाळ वाचतो आहे. त्यात अनिल अवचटांचा मध माशांवरचा लेख खूप सुंदर आहे. त्याचदिवशी मला National Geographic वर मधमाशांची एक documentary पहायला मिळाली त्यामुळे एकीकडे वाचन होत होते आणि एकीकडे कार्यक्रम बघणे. शिवाय रविवारही होता. पण राणी बंगवरचा जो लेख आहे तो मुळीच आवडला नाही. काहीतरी थातूरमातूर लिहिल्यासारखा. मेघना पेठेंची एखादी कथा वगैरे वाचायला मिळाली असती तर किती बरे झाले असते. आहे का कुणाला माहिती तिनी कुठल्या काही लिहिले असेल तर.
|
Paragb
| |
| Friday, November 10, 2006 - 6:55 am: |
| 
|
Avaj- Patkarancha.Marathi vinodi (?) Marathitil Vyanga Chitrakar kami hotat aahet ase janvate.
|
Me_sakhi
| |
| Thursday, November 30, 2006 - 11:22 am: |
| 
|
कुणी "यज्ञ" नावाचा दिवाळी अंक वाचलाय का?संपादक कुणी गुप्ते म्हणून आहेत
|