|
बंदिनी पोलिसांची गाडी स्त्री कैद्यांना घेऊन तुरुंगाकडे येते. नव्याने आलेल्या कैद्यांची हजेरी तुरंगाधिकारी घेतो व कैद्यांची रवानगी बराकींमध्ये करतो. एवढ्यात आधी तुरुंगात असलेल्या एका स्त्री कैद्याची तब्येत बिघडते व डॉ. देवेंद्र तिला तपासतो आणि तिची कुणी देखभाल करु शकेल का, असे विचारतो. सार्याजणी नकार देतात पण त्यातलीच एक स्त्री कैदी रुग्णाची सेवा रुग्णाची सेवा करायला तयार होते. डॉक्टर देवेंद्र तिला तिचे नाव विचारतो. ती सांगते, 'कल्याणी'. क्रमश्:
|
continue.. डॉक्टर 'रुग्णाला क्षयरोग झालाय व तो संसर्गजन्य आहे तेव्हा तिने रुग्णाच्या सेवेची जबाबदारी स्वीकारु नये' असे मत प्रकट करतो. पण ती 'मी एकटी आहे, माझी चिंता करणारे कुणी नाहीत,' असे सांगून ती जबाबदारी स्वीकारते. जेलर तिला ओळखपत्राबद्दल विचारतो. ती त्याच्यापुढे ओळखपत्र सादर करते. तो ते पहातो आणि चमकतो; पण त्याच्यावर सही करतो. कल्याणी तुरुंगात गेल्यावर तो म्हणतो - 'या स्त्रीवर खुनाचा आरोप आहे, हे पाहून मी चमकलो. तिने विष देऊन कुणाचा तरी जीव घेतला आणि आज स्वत्:चा जीव धोक्यात घालून ती कुणाचा तरी प्राण वाचवू पहात आहे,'. कल्याणी रुग्णाच्या सेवेला लागते आणि डॉ. देवेंद्र रोज रुग्णाला तपासायला येतो. कल्याणीच्या सेवेमुळे व डॉक्टरच्या औषधामुळे रोग्याला बरे वाटू लागते. हळूहळू डॉक्टर कल्याणीकडे आकर्षिला जातो. स्त्री कैद्यांमध्ये कल्याणी व देवेंद्र यांच्याबद्दल चर्चा सुरु होते. त्यामुळे कल्याणी देव पासून दूर राहू लागते. त्याच्या प्रेमयाचनेला ती प्रतिसाद देत नाही. त्यामुळे तो राजीनामा देतो व आपल्या घरी येतो. कल्याणीचे स्वच्छ वर्तन आणि तिचा परोपकारी स्वभाव जेलरच्या मनात भरतो आणि तिच्या नावाची शिफ़ारस करुन तिची शिक्षा कमी व्हावी या हेतूने प्रयत्न करतो. तिला तो जेव्हा हे सांगतो तेव्हा ती 'तसे करु नका' म्हणून विनंती करते. तुरुंगातून बाहेर पडले तर मी कुठे जाऊ?' असा प्रश्न जेलरला करते. तो डॉ. देवेंद्रबद्दल तिला विचारतो तेव्हा त्याच्या प्रेमाला मी होकार दिला नाही, कारण 'माझ्या गतायुष्यामुळं त्याला कलंक लागू नये' असे वाटत असल्याचे ती जेलरला सांगते. जेलरला ती त्यावेळी तिच्या भूतकाळा बद्दल सांगते. बहादूरनगरमध्ये तिचे वडील पोस्टमास्तर होते. आई, वडील, भाऊ व कल्याणी असा छोटासा परिवार. कल्यणीच्या लहानपणीच तिची आई निधन पावते आणि आईचे प्रेम तिला भावाकडून मिळते. पूरग्रस्तांच्या मदतीला धाऊन जाताना तिच्या भावाला प्राण गमवावे लागतात. ही आठवण सांगताना दुखा:चा कढ अनावर झाल्याने कल्याणीला पुढे बोलताच येत नाही तेव्हा जेलर 'राहू दे. पुढची कहाणी तू मला लिहून कळव' असे सांगून तिच्यासाठी लेखनाची व्यवस्था करतो. तुरुंगातील वातावरणात आणि दूरवर असलेल्या दिव्याच्या प्रकाशात ती आपली कहाणी लिहू लागते. काही दिवसांनी ती आपली कहाणी जेलरला देते. तो ती वाचू लागतो. भावाच्या मृत्यूनंतर एकाकी बनलेली कल्याणी नदीच्या किनार्यावर तासनतास विचार करीत बसून असते. वडीलांनी कामात गुंतवून घेतलेले त्यामुळे ती अधीकच एकाकी. एकेदिवशी तिचे वडील विचारात मग्न असतात तेव्हा ती कारण विचारते, तेव्हा शेजारी तुझ्या विवाहा बद्दल मला विचारतात. तुझे हात आता पिवळे करायला हवेत, असे सांगतात तेव्हा कल्याणी शांतपणे पुस्तके उचलून त्यांना सांगते की नका लक्ष देऊ त्यांच्याकडे, मला अजून खूप शिकायच आहे. बिकाश घोष एक क्रांतिकारक. पोलिसांच्या हाती सापडल्यामुळे त्याला ब्रिटिश सरकारने बहादूरनगरमध्ये स्थानबद्ध केलेले असते. त्याला गावात हिंडायफिरायची परवानगी असते. रोज पोलिस चैकीत जाऊन त्याला हजेरी द्यावी लागते. कल्याणी त्याला दूरून रोज पहात असते. कल्याणी शिकायला संध्याकाळी आपल्या मास्तरीणबाईंकडे गेली असताना अचानक जोराचा पाऊस सुरु होतो आणि ती आपल्या घरी परतू शकत नाही. तिला रात्र बाहेरच काढावी लागते. रात्रीच्या वेळी कसलीतरी खुसपुस तिच्या कानावर येते. आपली टीचर स्वातंत्र्यसैनिकांना मदत करते हे तिला समजते. एल क्रांतिकारक तिच्याकडे एक चिठ्ठी देतो व बिकाशबाबूला द्यायला सांगत. कल्याणी ती पोचवते आणि तिची बिकाशबरोबर ओळख होते. तिचे वडील पोस्टमास्तर आहेत हेही त्याला ती सांगते. दुसर्या दिवशी बिकाश तिच्या घरी जातो. कल्यणीच्या वडीलांकडचा वैष्णव कवितांचा संग्रह पाहून त्यालाअ अतिशय आनंद होतो. त्या कविता शिकायला तो रोज पोस्टमास्तरांकडे यायला लागतो. कल्याणी व बिकाश ह्यांच्यातले स्नेहरज्जू घट्ट होत असतात. एकेदिवशी बिकाश कल्याणीकडे आलेले असताना त्यांना ताप आल्याचे तिच्या लक्षात येते. ती गोळी देऊन त्यांना पडून रहायला सांगते. रात्र होते. पोलीस बिकाशबाबूंचा शोध घेत कल्याणीच्या घरी येतात व त्या दोघांना रात्रीच्या वेळी एकत्र पहातात. बिकाशवर ते घाणेरडे आरोप करतात. कल्याणीची समजूत घालून बिकाश पोस्टमास्टरकडे जाऊन तिचा हात मागतो. थिजून गेलेल्या कल्याणीच्या वडीलांना विचार करायला थोडा वेळ हवा असतो. बिकाशबाबू पोलिसांबरोबर निघून जातात. दुसर्याच दिवशी बिकाशबाबूंचे स्थलांतर करण्याचा हुकूम येतो. बिकाशबाबू परत पोस्टमास्तरना कल्याणीबाबतचा निर्णय विचारतात व त्यांची संमती घेऊन जायला निघतात. कल्याणी बिकाशबाबूंना पती मानून त्यांच्या पाया पडते. काही दिवस जातात. कल्याणीला तिच्या मैत्रिणी लग्नाबाबत छेडतात. ती काही उत्तर देत नाही. तिने बिकाशबाबूंना लिहिलेली चिठ्ठी परत आलेली असते. ते नेमके कुठे आहेत याचा पत्ता कुणालाच नसतो. काही दिवसांनी कल्याणीच्या टीचरला बिकाशची हकीकत कळते. पोलिसांनी त्यांना बंधमुक्त केलयं व त्यांनी लखनौमध्ये नोकरी पत्करलीय आणि विवाहही केलाय. एकाकी कल्यानी दु:खी असते पण तितकीच मानीही असते. आकाश कोसळलेले पोस्टमास्तर बिकाशला पत्र लिहू पहातात पण कल्याणी त्यांना विरोध करते., तेव्हा चिडून 'आता तू या घरी रहा नहीतर मी तरी राहीन' असे निर्वाणीचे शब्द तिला ऐकवतात. कल्याणी घर सोडून निघून जायचा निर्णय घेते. तसे पत्र वडिलांकरिता लिहून ती घर सोडते. घर सोडल्यावर कल्याणी कोलकतामधील आपल्या मत्रिणीकडे येते. तिची सासू कल्याणीचा अपमान करते तेव्हा ती घर सोदून जायला निघते. तिची मैत्रीण तिला थांबवते व तिचा पती येईपर्यंत थांब, तो काहीतरी व्यवस्था करील, असे कल्याणीला सांगते. कल्याणीचा नवरा तिला एका हॉस्पिटलमधे नोकरी मिळवून देतो. रात्रीची वेळ. आपले काम संपवून कल्याणी एकटीच अंधाराकडे पहात उभी असते, अचानक एका पेशंटचा दंगा तिच्या कानावर येतो. तो पेशंट हिस्टेरीक झालेला असतो आणि तिच्या देखभालीला कल्याणीला ठेवले जाते. ही पेशंट शकुंतला कल्याणीला खूप त्रास देते पण ती तो सर्व सोसते. कल्याणीचे वडील तिला शोधायला कोलकत्याला येतात पण तिला भेटण्या आधिच त्यांचे अपघाती निधन होते. कल्याणीच्या दु:खाला पारावर नसतो. शकुंतला तिचा पती येणार म्हणून कल्याणीजवळ खुशी व्यक्त करते. तो येतोही. बिकाशबाबूंना तिथे पाहून आतून उध्वस्त असलेली कल्याणी वरकरणी अत्यंत शांत स्थिर चेहरा करुन बघत रहाते. शकुंतलेच्या सांगण्यावरुन कल्याणी बिकाशसाठी चहा आणायला जाते. शकुंतलेच्या खोलीत ती प्रवेश करते तेव्हा त्यांच्या एकांताचा भंग केला म्हणून शकुंतला कल्याणीचा वाईट अपमान करते. ह्यावेळी मात्र बिकाशसमोर झालेला अपमान कल्याणी सहन करु शकत नाही आणि शकुंतलेच्या चहात विष घालून ती तिचा प्राण घेते. शकुंतलेचा अपघाती व आकस्मिक निधनामुळे पोलिस येतात. बिकाशबाबू संशय तिच्या नोकरानीवर व्यक्त करतात पण जेव्हा कल्याणीलाच तिची नोकराणी म्हणून समोर आणले जाते तेव्हा ते चमकतात आणि शकुंतलेने आत्महत्या केली असावी असे प्रतिपादन करतात. पण कल्याणी मात्र किंचाळून 'ती आत्महत्या नाही, हत्याच आहे, मीच तिला विष घालून ठार मारले' असे सांगते. जेलर कल्याणीची कहाणी वाचतच असतो. ती पुढे लिहिते की, खुनाबद्दल तिला आठ वर्षांची शिक्षा होते. बिकाशबाबू तिला परतपरत भेटायचा प्रयत्न करत रहातात पण कल्याणी त्यांना भेटण्याच नाकारते. सारी कहाणी वाचून झाल्यावर जेलर देवेंद्रच्या आईकडे जाऊन तिला कल्याणीची कहाणी वाचायला देतो व देवेंद्रसाठी तिचा विचार करायला सांगतो. कल्याणीची उरलेली शिक्षा माफ़ झालेली असते. तुरुंगातून ती बाहेर पडल्यावर जेलर तिला बोलावून देवेंद्रच्या आईचा होकार आल्याचे सांगतो. आपला भूतकाळ त्यांना ठाऊक आहे तरीही त्यांनी आपल्याला स्वीकारले ह्याचे कुतूहल वाटून ती देवेंद्रकडे जायला निघते. जेलर तुरुंगातील एक स्त्री नोकर सुशीला तिच्याबरोबर देतो. स्टीमरचा प्रवास असतो. कल्यणी एका खोलीत आपले नवे आयुष्य जगण्याच्या इराद्याने बसलेली असते. सुशीला काही निमित्ताने खोलीबाहेर जाते आणि कल्याणीला शेजारच्या खोलीतून खोकल्याची प्रचंड उबळ ऐकू येते. ती त्या खोलीत जाते. पेशंटला औषध देणार तोच तिला समजते ते बिकाशबाबूच आहेत. त्यांना औषध देऊन ती आपल्या खोलीकडे परतते. क्रमश्:
|
thanks junnu . नाही. सगळच माझ्या लक्षात नव्हतं. बिमलदांच्या पटकथांवरच्या पुस्तकांचा संदर्भही वापरला आहे. continue... बिकाशबाबूंचा नोकर तिच्याकडे येऊन तिला काळजी घ्यायला सांगतो कारण बिकाशबाबूंना संसर्गजन्य रोग झालेला असतो. बोलता बोलता तो बिकाशबाबूंच्या विवाहाबाबत तिला सांगतो. त्यांची सुटका झाल्यावर त्यांच्या पक्षाच्या नेत्याने बिकाशबाबूंना एका खूप मोठा पोलिस अधिकार्याच्या मुलीशी विवाह करण्याचा हुकूम दिलेला असतो. बिकाशबाबू सुरुवातीला नकार देतात. पण या विवाहामुळे पक्षाला ब्रिटिश पोलिसांचे सारे व्यवहार छुप्या मर्गाने कळतील व त्यामुळे पक्षाला फायदा होईल असे तो नेत म्हणतो. देशाच्या भल्यासाठी आपले प्रेम, विवाहाच्या आणाभाका विसरुन बिकाशबाबू त्या मुलीला पत्नी म्हणून स्विकारतात. तीच ही शकुंतला. कल्याणी 'बिकाशबाबूंना कुठे घेऊन जात आहात,' म्हणून त्यांच्या साथिदाराला विचारते. तो सांगतो,'जिद्द करुन ते आपल्या गावी जायला निघालेत. तिथे कुणी डॉक्टर नाही, हॉस्पिटल नाही किंवा त्यांची सेवा करणारेही कुणी नाही. आम्ही त्यांना खूप समजावलं पण दादा फक्त एकच गोष्ट वारंवार सांगतात,' अब जी कर भी क्या करूंगा?' कल्याणी आपल्या खोलीत परत येते. तिची चाहूल लागताच बिकाशबाबू तिला बोलावतात आणि तिची माफी मागतात. स्टीमर सुटण्याची वेळ येते. बिकाशबाबू जायला निघतात. कल्याणी दुरुनच ते पहात असते. तिच्याही प्रवासाची वेळ येऊन ठेपलेली असते.व ती रेल्वे स्टेशनकडे येते. स्टीमरचा भोंगा होतो व रेल्वेचीही शिट्टी होते. अचानक कल्याणी रेल्वेमधून उतरते आणि स्टीमरच्या दिशेने धाऊ लागते. धावतच ती स्टीमरमधे चढते. समोरच बिकाशबाबू बसलेले असतात. भावनातिरेकाने ती त्यांचे पाय धरते. ते तिला जवळ घेतात आणि बंदिनी कल्याणीचा सहप्रवास आपला प्रेमी बिकाश बरोबर सुरु होतो. समाप्त. कलाकार अशोक कुमार, नूतन, धर्मेन्द्र, तरुण बोस गीते शैलेन्द्र, गुलजार संगीत एस. डी. बर्मन १९६३ सालचा हा चित्रपट म्हणजे पडद्यावरची एक मनस्वी कविताच अहे. बिमलदांनी अत्यंत समरसून आणि काव्यमय पद्धतीने हा चित्रपट पडद्यावर साकारला आहे. खरेतर कथा लेखक चारु चक्रवर्ती ह्यांची असतानाही त्यांनी कथेचे श्रेय त्यांना दिले नाही म्हणून त्याकाळी जरासे वादळही उठले होते. मनाचा ठाव घेणारी विलक्षण जबरदस्त कथा, सचिनदांचे अतिशय काळजापर्यन्त भिडणारे संगीत, कमल बोस ह्यांचे छायाचित्रण आणि याहीपेक्षा महत्वाचे कल्याणी या बंदिनीची भूमिका साकारणार्या नूतनचा मनस्वी अभिनय. नूतनचा लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट. जीव तोडून पण अत्यन्त सहज वाटणारा अभिनय हे तिचे वैशिष्ट्य बंदिनीत सर्वात जास्त जाणवते. खरतर विवाहानंतर तिने चित्रपट संन्यासाची घेषणा केली होती. पण बिमलदांबरोबर काम करण्याचा मोह तिला नाकारता आला नाही आणि चित्रपट रसिकांवर मोठेच उपकार झाले. ह्या चित्रपटाची आणखी एक बहुमोल देणगी म्हणजे कवी गुलजार ह्यांनी 'मोरा गोरा अंग लैले' ह्या सुमधूर गीताद्वारे गीतलेखनाच्या क्षेत्रात केलेला प्रवेश. वेगळ्या धर्तीची गाणी हा बिमलदांच्या चित्रपटांचा कायमच खास भाग मानला जातो. 'मेरे साजन है उसपार..' गाण्यात नूतनच्या चेहर्यावरचा छायाप्रकाशाचा खेळ आणि तिच्या नजरेतले भाव अप्रतिम. ' जोगी जबसे तु आया मोरे द्वारे, मेरे सज गये सांजसकारे ' हे शैलेन्द्र, लता, S.D. त्रयीचे असेच एक सुरेल गाणे. मुकेशच्या 'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना ... गाण्यातला खास बंगाली र्हीदम ऐकण्यासारखा. मधुमती आणि देवदास च्या झगमगत्या यशात बंदिनी जरासा दुर्लक्षिला गेला पण बिमलदांनी त्यांच्या खजिन्यात रत्नेच इतकी अनमोल जमवून ठेवली होती की रसिकांनी तरी कौतुक कुणाकुणाचे आणि किती करायचे! सुजाता, काबुलीवाला, परिणिता, यहूदी, बिराजबहू, उदयेर पाथे, मंत्रमुग्ध, परख, नौकरी आणि अर्थातच दो बिघा जमीन .... रत्ने खरोखरच अजोड आहेत.
|
अप्रतिम! आणि काय लिहू!!
|
ह्यातलं 'अब के बरस भेज भय्या को बाबुल' ऐकून डोळे लाल होतातच!
|
लाल की -"पाणावतात"( no offence please!!! हं!!!!- माझे ही आवडते गाणे आहे आणि मीही इतकाच व्यथित होते-माझ्या विदेशातील मुलीच्य आठवणीने <seriously>
|
'पाणवतात' हे कबूल करायची लाज वाटत होती.
|
Ajjuka
| |
| Saturday, March 08, 2008 - 11:54 am: |
| 
|
आत्ता परत (कितव्यांदा ते आठवत नाही.) बंदिनी पाह्यला. परत एकदा उफ्फ काय मोमेंट आहे, डोळे भरून येणे, नादावल्यासारखी गाणी गुणगुणणे इत्यादी इत्यादी!! अब के बरस भेज सुरू होण्याआधी काही क्षण एक फ्रेम आहे ज्यात आकाश, जेलची उंचच उंचच भिंत, उनसावलीची शार्प रेषा आणि भिंतीच्या पल्याडचा वेध घेत उन्हात उभी कल्याणी... अशक्य!!!! उन्हाची गर्मी, तुरूंगातला रखरखाट, सगळा रस काढून घेतल्यासारखं वातावरण आपल्याला अक्षरशः जाणवतं!!
|
संपूर्ण सहमत आहे अज्जुका!!! त्यात नूतनचा अभिनय म्हणजे प्रत्येक क्षणी एक नवा अविष्कार्-कहां गये वो लोग???
|
Ajjuka
| |
| Sunday, March 09, 2008 - 1:06 pm: |
| 
|
नूतनचा अभिनय तर खरंच पण मुख्य जादू बिमल रॉय नावाच्या माणसाची.
|
Dineshvs
| |
| Monday, March 10, 2008 - 3:15 am: |
| 
|
शर्मिला, छान लेख पण गाण्यांचा संदर्भ हवाच आहे बरं का. बंदिनी मधले आणखी एक गाणे, ओ पंछी प्यारे, सांझ सकारे, बोले तु कौनसी बोली, बता रे. हे गाणे नूतन जेलमधे असताना, तिथली एक कैदी गाते. या गाण्याला पार्श्वसंगीत म्हणुन, काहि नैसर्गिक आवाज वापरलेत. आशाचे हे आवडते गाणे, तिच्या दूरदर्शनवरच्या पहिल्या कार्यक्रमात तिने ते गायले होते. अब के बरस मधे पण आशाच्या वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ आहेच शिवाय, तिसरी कसम सिनेमातल्या, महुआ घटवारनच्या कथेचाहि संदर्भ आहे. या कथेच्या शेवटाबाबत वाद झाला होता. त्यावेळी धर्मेंद्र नवा होता आणि अर्थात जास्त लोकप्रियही होता. त्यामुळे नायिकेने वयस्कर आजारी अशोककुमारकडे धाव घेण्यापेक्षा ती धर्मेंद्रचा प्रस्ताव स्वीकारते, असे दाखवले तर सिनेमा व्यायसायिक दृष्ट्या जास्त यशस्वी होईल, असे सगळ्यांचे मत होते. बिमलदा मात्र याच शेवटाशी प्रामाणिक राहिले कारण, त्यांच्या मते जर कथेचे शीर्षक बंदिनी असेल, तर असाच शेवट पाहिजे. हे नाव इतके डोक्यात फ़िट्ट बसले आहे ना कि पुढे अधिकारी बंधुनी एक मालिका काढली आणि त्याच्या शीर्षकगीतातली इवळ ऐकली त्यावेळी किळस आली होती. मला नीट आठवत असेल तर नूतनच्या वडीलांची भुमिका, मराठी कलाकार राजा परांजपे यानी केली होती. मोरा गोरा अंग लैले, या गाण्याला ते गावकर्याना सांगत असलेल्या एका कथेचा संदर्भ आहे, शिवाय अश्या कथांमूळेच कल्याणी बिघडली, असे त्याना ऐकवण्यात येते. अशोककुमार नजरकैदेत असतो तरी त्याला नूतनच्या घरापर्यंत यायची मुभा असते, असेही आठवतेय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|