|
शाळेत जरी इंग्रजी शिक्षण झालं असलं तरी पुढे आयुष्यात ते वापरताना ऐकताना झालेले घोटाळे हे मजेशीर असतात. इथे तसे स्वतःचे अनुभव टाका... ऐकीव विनोद कृपया नकोत, सुरूवात मी करतो...
|
पहिल्या पहिल्यांदा US मध्ये आलो, तेव्हा एकदा Baseball ची Match बघताना प्रेक्षकांतून We will, we will xxxxxx You असं काहीतरी मी ऐकलं. तो मधला शब्द क' ने संपतो, हे कळलं, पण नक्की काय होता कळेना. आजूबाजुला तत्सम शब्द बर्याचवेळा ऐकायला आल्यामुळे कुणाला विचारता ही येईना. टीमचं प्रेम वगैरे ठीक आहे, पण उघड उघड असं म्हणायचं म्हणजे.... anyway , बर्याच वर्षानी मला कळलं की ते We will, we will rock you आहे..
|
Badbadi
| |
| Wednesday, January 18, 2006 - 11:32 pm: |
| 
|
विनय ते पुस्तकांमध्ये नाही का Unleashed, Wrox अशा series असतात.. तशी तुमची बीबी ची " चुकलेली " series आहे का?
|
Moodi
| |
| Thursday, January 19, 2006 - 2:18 pm: |
| 
|
भारतीय English अन British English तसाच फरक आहे. बीबीसीच्या मी बातम्या ऐकायची तेव्हा ते समजायचे पण प्रत्यक्ष युके मध्ये आल्यावर समजला हा फरक. साधारणपणे आपण एखाद्याला चहा किंवा कॉफी घेण्यासाठी विचारतो की would you like to have अशी सुरुवात करुन. पण जेव्हा मी इथे British heart foundation मध्ये व्हॉलींटीयरचे काम करण्यासाठी गेले तेव्हा तेथील सुपरव्हायजरने एकदा मला विचारले a cup of tea? मला ते कपटी कपटी असेच ऐकु आले. मला माहीत होते की या उच्चारांचा अर्थ असा नाहिये. पण मी तिला म्हटले pardon!! तेव्हा मग ती सावकाश म्हणाली अन मग मला ते समजले. ब्रिटनमध्ये हे लोक म्हणतात की भारतीय English चांगले बोलले तरी फार भराभर बोलतात. इथला लिव्हरपूल या शहरातील accent तर फार प्रसिद्ध आहे, तिथले लोक काय बोलतात ते इथल्या सामान्य ब्रिटिशाना देखील समजत नाही, प्रत्येक शब्दाचा short form करुन बोलुन वैताग आणतात.
|
Naatyaa
| |
| Thursday, January 19, 2006 - 3:42 pm: |
| 
|
Vinay, rofl.. ending with K. 
|
Naatyaa
| |
| Thursday, January 19, 2006 - 3:52 pm: |
| 
|
माझ्या एका co-worker ला साहेबानी काहितरी interesting काम दिले. शुक्रवारी संध्याकाळी बाॅस येऊन म्हणाला.. Did you get a chance to work on that thing? Can't wait to see it working. आमच्या गुल्टि मित्राला वाटले की काम अत्ताच्या आत्ता पुर्ण झालेले हवंय. झालं. पुर्ण वीकेंड बसुन त्याने काम पुर्ण केल. सोमवारी बाॅसकडे गेला आनी म्हणाला झाले काम. बाॅस म्हणाला शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुरुवात केली नव्हतीस, एवढ्यात कसे झाले. तर हा माणूस म्हणतो तुम्ही म्हणालात Can't wait म्हणुन वीकेंड ला बसुन पुर्ण केले. गोर्या बोॅस ने कपाळाला हात लावला, म्हणाला हि phrase आयुश्यात कुठल्याही देसी समोर कधी वापरणार नही..
|
Maetrin
| |
| Thursday, January 19, 2006 - 4:27 pm: |
| 
|
यहूदी समाजाचे दोघे जण बायबल चा प्रचार कर्ण्यासाठी आले.दोघे गोरे होते. बर्याच गोष्टी झाल्यावर बाई काहीतरी समजावण्यासाठी बायबल वाचून दाख्वायला लागली.मला जाम कळेना की कुठलया भषेत बोलत आहे,शिवाय कुठलेही translationपण दिले नाही. थोड्या वेळानी लक्षात आले की हिंदी मधून बोलत होती. 
|
Supermom
| |
| Thursday, January 19, 2006 - 5:27 pm: |
| 
|
मी सिंगापूरला असताना एकदा एक चायनीज बाई मला रस्त्यात थांबवून माझ्या मुलाच्या गालाला हात लावून बरेच काही भराभर बोलली. अगदीच कळेना तेव्हा मी तिला म्हटले की i dont understand chinese. यावर ती सावकाश म्हणाली, नो नो आय यम स्पीकिंग इंगलिश
|
Intellect
| |
| Thursday, January 19, 2006 - 6:54 pm: |
| 
|
मैत्रीण, तु नक्की कोणत्या देशात आणि कुठल्या ग्रहावर राहतेस? नाही म्हणजे तुला, यहुदी म्हणजे कोण ते माहित नाही का बायबल काय आहे ते माहित नाही, की ते लोक अति असामान्य धर्मनिरपेक्ष होते की यहुदी असुनही बायबलचा प्रसार करित होते. हे जरा जास्तच झाल. जरा समजावुन सांगशील काय? जरा सामान्य ज्ञानाची पुस्तके पण वाचत जा की. ~DD
|
Anilbhai
| |
| Thursday, January 19, 2006 - 6:56 pm: |
| 
|
आम्ही एकदा असेच सगळेजण फ़िरायला गेलो होतो. माझ्या साऊथ इंडीअन मित्राची बायको स्ट्रोलर मधे मुलाला झोपवुन पुढे होती. मधेच एका बाईने स्ट्रोलरमधे डोकावुन विचारले. Is he awake? तर ही म्हणाली no. no. he is vivek 
|
Maitreyee
| |
| Thursday, January 19, 2006 - 7:02 pm: |
| 
|
भाई, तुम्ही तयार' केलेला किस्सा दिसतोय हा 
|
बडबडे, मी काही वर्षांपूर्वी ' नमुने' नंतर ' पिक्चर पोस्टकार्ड' आणि आता ' चुकीची' अशा Serial टाकतो आहे... अनिलभाई,
|
Maetrin
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:02 pm: |
| 
|
नाही नाही,ती यहुदी लोक नाहीत रे,ही chritianachहोती,पण देवाला यहुदा म्हटले पाहिजे व बायबल मधे तसे लिहिले आहे असे समजावत होती.त्यांनी बायबल हिंदी मधे ट्रांस्लेट केलेले,पण बाईचा accent भारी होता 
|
Charu_ag
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:38 pm: |
| 
|
sorry intellect पण तुझी भाषा जरा जास्तच harsh वाटली. पण आश्चर्य आहे की इथे कुणालाच त्यात गैर वाटले नाही. मला इथली चर्चा गंभीर करायची नाहीये. मैत्रीण इथे ठिक आहे, पण उद्या चार चौघात हे म्हणाली असतीस तर नाचक्की झाली असती. यहुदा आणि यहुदी मध्ये खुप अंतर आहे. यहुदा अब्राहम च्या तिसर्या पिढीतल्या एकाचे नाव आहे. अधिक माहिती हवी असेल तर The new testament च्या हिंदी भाषांतरातील पान नं. तीन वाच. no offense please . पुन्हा अशी चुक होऊ नये म्हणुन सुचना समज.
|
Maetrin
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:57 pm: |
| 
|
charu, तूच लिहिलेस म्हणून ठिक,पण मी लिहिले अस्ते तर परत वाद घालत बसला अस्ता. intellect laaकुठल्याही गोष्टीचा ऐव्हदा राग का ते कळत नाही.. असो, ते मी यहूदी न लिहिता यहुदा वाले लिहिले अस्ते तर बरे झाले अस्ते. यहुदी हे इंग्लिश मधले डोक्यात होते. माझी चूक. विनोद बाजूलाच राहिला,फक्त वाद निर्माण झाला.:-(
|
Intellect
| |
| Thursday, January 19, 2006 - 9:25 pm: |
| 
|
मैत्रीनताई, आता हा इंग्लीश यहुदी कोण आहे? कुठल्या डिक्शनरीत शोधु? २२१० सालची डिक्शनरी माझ्याकडे नाहीये. encyclopedia मध्ये यहुदी चा अर्थ बघ जरा. मग तुला तुझी चुक समजेल. charu_ag , यात harsh वाटण्यासारख काय आहे?
|
Moodi
| |
| Thursday, January 19, 2006 - 9:40 pm: |
| 
|
इंटलेक्ट एखाद्याला आपण चार चौघात कारे तुला एवढ पण कळत नाही का असे म्हटल्यावर कसे वाटेल. कळणे म्हणजे जनसमान्याना जे माहित आहे ते तुला कसे नाही असे म्हणणे हार्श वाटले. जरी इतिहासात हे शब्द आलेले,वाचलेले असतील तरी त्यातली पूर्ण माहिती असेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही दोघेही आता ते मनाला लावुन घेऊ नका अन दिवा कशासाठी देताय ते पण बघा. जाऊदे हे बघा, तुमच्या बरोबर माझ्या पण ज्ञानात तेवढीच भर. http://www.hebrewisraelites.org/nationality.htm नेमस्तक ही लिंक गैर वाटली तर काढा, पण तुमच्यापैकी कुणाला यातील माहिती असेल तर दुसरी लिंक जरुर द्या.
|
Maetrin
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:19 pm: |
| 
|
intellect,haa shabd tulaa marlish dictionary madhe miLel. yahudiis = the branch of christianity that sarkhe pressurises us to call dev as "yahuda" arthart,haa shabd devnagrii madhe lihaaylaa nako hotaa,pharach gondhal zhaalaa. "nahi khel ai "maetrin" yaaro se keh do ke aatii hai "marlish" zubaaN aate aate
  moodi,thnx ga!
|
Zakki
| |
| Friday, January 20, 2006 - 2:19 am: |
| 
|
अरे खड्ड्यात गेले ते यहुदी नि ख्रिश्चन. करायचे काय? सगळेच जाम नालायक! असो. मागे, म्हणजे तुम्ही कुणि जन्मायच्या आधी, एकदा इंग्लंडचे प्रसिद्ध असे बीटल्स भारतात आले, त्यांच्या सन्मानार्थ काही लोकांनी त्यांची काही गाणी म्हंटली. ती ऐकून ते म्हणले, वा, तुम्ही आमची गाणी भारतीय भाषेत म्हंटली! तेंव्हा ते म्हणाले नाही, आम्ही इंग्रजीतच म्हंटली!
|
Meggi
| |
| Sunday, January 22, 2006 - 9:47 am: |
| 
|
आम्ही शाळेत असताना मज़्य मैत्रिणीने केलेले भाषांतर. Once upon a time there was a widow in village Rampur. She used to stay with her 2 daughters'. भाषांतर्: एके काळी रामपुर मध्ये विडो नावचा माणुस रहात होता. मग पुढच्या वाक्यात 'her daughters' असल्याने तिने ' विडो नावचा माणुस ' खोडुन ' विडो नावची बाई ' असा केल .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|