Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 24, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through May 24, 2006 « Previous Next »

Moodi
Wednesday, May 24, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिनाझ जो चिडवण्याने जास्त चिडतो त्याला आणखीन चिडवायला चिडवणार्‍याला मजा वाटते, त्यामुळे तू जेवढी पुणे शहराची बाजू घेऊन बोलशील तेवढ्या त्याच्याविरुद्ध जास्त पोस्ट येतील.
बाकी मुंबई अन नागपूरबद्दल काय महती सांगावी. वेगळा बीबी उघडुच नको.

कोण रे ती व्यक्ती मला झक्कींची भीती दाखवतेय?

झक्की एको एको..... आले आले झक्की आले.

ओ झक्की रीटायर नका होऊ इतक्यात.


Ameyadeshpande
Wednesday, May 24, 2006 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>जो चिडवण्याने जास्त चिडतो त्याला आणखीन चिडवायला चिडवणार्‍याला मजा वाटते


मला हे "च" च्या भाषेत काहीतरी लिहिलय असं वाटलं पहिल्यांदा :-)


Rachana_barve
Wednesday, May 24, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण कळत नाही त्याच त्याच पाट्या टाकायच्या आणि आपणच हसायचे. ह्या अशा घटना काय दुसरीकडे घडत नाहीत?

Ameyadeshpande
Wednesday, May 24, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरीकडच्या पाट्या पण टाका की त्या वाचून पण हसू :-)

Moodi
Wednesday, May 24, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घडत असतील की,फक्त सांगत नसतील एवढेच. झाकली मुठ सव्वा लाखाची..

Ameyadeshpande
Wednesday, May 24, 2006 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा कानफ़ाट्या नाव पडलं की काय करणार
अगदी नागपूर सोडा बीड परभणी च्या माणसानी सुद्धा जर दुकानात अशी पाटी लावली तर त्याला ही लोकं पुणेरीच म्हणतील :-) आता बोला.


Seema_
Wednesday, May 24, 2006 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरीकडच्या पाट्या पण टाका की त्या वाचून पण हसू >>>

Ninavi
Wednesday, May 24, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> दुसरीकडच्या पाट्या पण टाका की त्या वाचून पण हसू


Mrinmayee
Wednesday, May 24, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतर ठिकणचं तर माहीती नाही. पण नागपुरात कसल्या विनोदी पाट्या? फ़ारच विनोदी म्हणजे:
'दिगंबर वस्त्रालय, नंगा पुतळा चौक'
by the way ह्यात काही आचरट लिहायचं म्हणून लिहिलेलं नाही. नागपुरात खरंच ह्या नावाचा चौक आहे:-)
नाही तर काय लिहिणार? "इथे कशाला फुकट 'बसून राहिलात'? हा पानठेला आहे. नगर वाचनालय 'नाही आहे'" हे असलं काही? (खुलासा: नागपुरात हिंदीचं तंतोतंत भाषांतर केल्या जात असल्या मुळे अशी क्रियापदं येतात.) म्हणूनच कधी कधी "बाजारात वस्तु 'भेटते' " आणि "माणसं एकमेकांना रस्त्यात 'मिळतात' "! आता बघा, ह्यात काही गमतीचं नाही. तेव्हा सद्य bb चालू देत.


Ameyadeshpande
Wednesday, May 24, 2006 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे मृणमयी पुणेरी पाट्यांची सर नाही ह्याला :-) हे आपलं ४ वर्षाच्या पोरांना चांगलयं हसवायला(मला ही चालेल म्हणा)... पण इथे बरीच मोठी मंडळी आहेत त्यामुळे "पुणेरी नमुनेच" हवेत

Moodi
Wednesday, May 24, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यातील एक पाटी म्हणजे तर मुंबईकरांचीच देन. पाटीचा मसुदा काय तर पंगतीत इतर लोक जेवत असताना कृपया मागे जागा धरण्यासाठी उभे राहू नये. ही पाटी लावायचे कारण मुंबईकरच. कायम घाई लागलेली ह्यांना.

मी एकदा मुंबईला गेले मामीच्या नात्यातील भाच्याच्या लग्नाला. दुसर्‍या पंक्तीत जेवायला बसलो तर माझ्या मागे एक माणुस अन माझ्या आईच्या मागे एक बाई येऊन उभे. मला काही कळेचना, म्हटले काय हो काय हवे. तर " ह्या ह्या त्याचे काय आहे, आम्हाला आता जेवले की लगेच २ - १४ ची कल्याण लोकल पकडायची आहे ना, मग जेवण्यासाठी जागा पकडलेली बरी, तुमचे होऊ द्या हो सावकाश " अशी तोंडाची भली मोठी करंजी करुन समजावणी. काय सावकाश जेवा? हा अन ती बाई रुमालाने अंगापांगावर निथळणारा घाम पुसत आमच्या मागे आशाळभुतासारखे उभे. मग जेवण कसे जाणार?

आमचे पुणेकर बरे, निदान थोडी वाट तरी पहातील पण मुंबईकर? इच्चारु नगा वो. म्हणुन तर आमच्या पुण्यात अशा पाट्या लागतात, कारण हे मुंबईकर तिथे येऊन परत मागे उभे राहतातच. सवय कशी सुटायची हो?

मागे उभा बंबईया शेजारी उभा बंबईया.

बरे आता एवढे करुन शेवटी जागा पुण्यातच बघतात.


Rachana_barve
Wednesday, May 24, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरी मुडी.. :-O आवडलेल आहे मला अगदी .. नविन BB उघडायचा का? मुंबईचे भामटे? ~D

Moodi
Wednesday, May 24, 2006 - 9:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उघडुया की. बरेच जणांची गणती होईल मग. तसेही मुंबई म्हटले की आओ जाओ घर तुम्हारा, म्हणजे यात पार बांगलादेशींपासुन अस्सल मुंबईकरांचे किस्से मिळतील आपल्याला.

Arch
Wednesday, May 24, 2006 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी तोंडाची भली मोठी करंजी करुन समजावणी. >>


बरे आता एवढे करुन शेवटी जागा पुण्यातच बघतात.>>
अग, प्रत्येकजण शेवटी चांगल्याच्या शोधातच असतो न! म्हणून पुण्याचे मुंबईत जागा बघतपण नाहीत

Ameyadeshpande
Wednesday, May 24, 2006 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मुंबईत ताटामागे येऊन उभे रहातात तर पाटी पुण्यात का लावावी

Asami
Wednesday, May 24, 2006 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi तुझ भूगोल जरा कच्चाच ग बघ. (GK वाढव म्हणून त्या BB वर एवढे बोंबलले लोक, पण काही उपयोग आहे का पहा. ) कल्याण म्हणजे मुम्बई नाही , अस्सल मुम्बईकर असती तर ' थोडे सरकून घ्या ' अस म्हणून तुझ्या मांडीवरच अर्धवट बसली असती.

अरे हो , पुणेकर पण असू शकते हो ' कल्याणला जाऊन poona passenger पकडायची असेल तर


Moodi
Wednesday, May 24, 2006 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण मुंबईकरांचे बरेच नातेवाईक पुण्यात ना, मग ती सवय जाणार कशी. पुण्यात लग्न असले की हे लोक त्यांची सवय तिथे आले तरी सोडत नाहीत. म्हणुन लावाव्या लागल्या पाट्या.मला की नै बै फार फार वैट वाटते असे मुंबईकरांचे हाल बघुन.

Atul
Wednesday, May 24, 2006 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डहाणूकर कॉलनीतील एका छोट्या उपहार ग्रुहात वाचलेली पाटी
"क्रुपया राजकारणावर चर्चा करू नये"
:-)

Ameyadeshpande
Wednesday, May 24, 2006 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी मुंबईच्या घामाचं काय विचारता... सकाळी सकाळी स्वच्छ आंघोळ करून लोकल किंवा बस मधे घुसावं आणि मग जी आंघोळ होते घामानी त्याची तुलना फ़क्त मानससरोवरात केलेल्या स्नानाशीच होऊ शकेल दिवस सार्थ होऊन जातो मग :-)

Ameyadeshpande
Wednesday, May 24, 2006 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे पण मुंबई बद्दल काही ह्या bb वर शोभतच नाही... इथला मान फ़क्त पुणेरी नमुन्यांसाठीच :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators