|
Zakki
| |
| Saturday, May 06, 2006 - 6:02 pm: |
| 
|
मी ऐकले होते की इकडे '(company's name)' sucks अश्या नावाचे BB निघाले आहेत. काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राला एका furniture store बद्दल तक्रार करूनहि उपयोग झाला नाही म्हणून त्याने त्या BB वर लिहिले. लग्गेच त्याला प्रतिसाद मिळाला. निदान वरची काही posts छापून चितळ्यांकडे नेऊन द्यायला हरकत नाही. मी पुण्यात असतो तर आपणहून आठवणीने तसे केले असते!
|
दिनेशदा मी वाडीला गेलो होतो तेव्हा एकानी तर मला घरी नेऊन ताजे वळलेले गरम गरम खमंग पेढे खाऊ घातले होते... सुरुवातीला मला तर चितळ्यांच्या पेढ्यांचा रंग बघूनच भिती वाटायची!
|
Yog
| |
| Saturday, May 06, 2006 - 7:28 pm: |
| 
|
आता पुणेकरान्ची थोरवी काय वर्णावी? मला सर्वात गम्मत वाटायची ते एखाद्या ठिकाणच्या directions विचारताना. एक असाच किस्सा, कुठलिही अतीशयोक्ती नाही (कुणाच्या दृष्टीकोनातून?) : आता पुढून उजव्या अन्गाला गेलात की खाली जा अन तिथून पुढच्या चौकातून वर जा अन मग शिवाजी पुतळ्याला लागून उजवीकडे गल्ली जाते ती " सोडून " त्याच्या बरोबर समोर मागच्या बाजूला बस स्टॉप आहे तिथून जरा पुढ रस्त्याच्या उलट्या बाजूला यात्री हॉटेल आहे तिथे विचारा. इतक्या Detail मधे directions देवूनही "वर","खाली","मागे", अन "पुढे" याचे नक्की reference न कळल्याने आणि सर्वात गम्मत म्हणजे शिवाजी पुतळ्याशी तीन चार रस्ते एकत्र येत असल्याने नेमकी कुठली गल्ली " सोडावी " हे न उमजल्याने फ़क्त black ticket चा धन्दा करणार्यागत hotel yaatri, yaatri करत, विचारत निदान तिथवर तरी पोचलो. तिथून मग : या पाठच्या गल्लीतून कचरापेटीला लागून दोन पायर्या उतरून जा अन मग कुम्पण असलेली " एकच बाग " आहे तीच्या गेट समोर तुम्ही शोधत असलेली सोसायटी आहे असे मला hotel च्या जिन्यातच वेटर ने सान्गितले. पुण्यात हॉटेल ची पायरी म्हणजे लक्षुमण रेषाच जणू. ती ओलान्डली तर निदान एक कप चहा तरी प्यावाच (फ़क्त मेनू कार्ड वगैरे बघून इथे खायचे की नाही हे ठरवायच स्वातन्त्र्य नसत गिर्हाईकाला)अन्यथा जर बाहेर वळलात तर गल्य्यावरील मालक, इतर वेटर अन अगदी दारात थाम्बलेला गावठी कुत्राही खुन्नस देवून बघत असल्यागत वाटत. पुण्यनगरी महान हेच खरे. असे पत्ते विचारत नेमक्या ठिकाणि पोचण म्हणजे treasure hunt खेळात जिन्कल्यागत परमोच्च आनन्द वगैरे मिळायचा. एक आहे तसा आनन्द मुम्बईत नाही. अगदी up/bihar मधून आलेल्या taxi वाल्याना देखील बरेच वेळा सर्व गलि मुहल्ले, अतली ठिकाणे चान्गले माहित असते, आणि नसले तरी अगदी कुठल्याही hardware वा showroom मधे विचारल तर नोकराला विचारून बस नम्बर, किव्वा taxi भाड्यापासून सर्व माहिती मिळते. 
|
Dakshina
| |
| Monday, May 08, 2006 - 5:26 am: |
| 
|
योग..... पत्ता मिळाला की नाही शेवटी?
|
योग्या माझा पत्ता विचारत होतास की काय? मी ह्याच पत्त्यावर राहतो की....
|
Aparnas
| |
| Tuesday, May 09, 2006 - 8:38 am: |
| 
|
मायबोलीकरांनो, इतके का हात धुवून आमच्या चितळ्यांच्या मागे लागला आहात?  
|
Moodi
| |
| Tuesday, May 09, 2006 - 8:49 am: |
| 
|
कोण कसले हात धुणार अपर्णा? बाकरवडी खायला आधी पळतात चितळ्यांकडे, पुण्यात आल्यावर... ते म्हणतात ना तुझे माझे जमेना अन तुझ्यावाचुन करमेना.. 
|
खीखीखीखी मुडी उर्दुत म्हणे या अर्थाचा एक शेर हे! परवाच लोकसत्तत कुठ तरी महाजनान्च्याच सन्दर्भात वाचला... आशय असा... उसके दुष्मन है बहोतही... आदमी जरुर अच्छाही होगा! हाच आशय चितळ्यान्च्या बाबतीत लागु पडत नाही का? काय हे ना की रस्त्यान जाणार लन्गड गाढव बगितल तर कुनाला काही फारस वाटणार नाही... तस तर गाढवान्च्या एकाबाजुच्या दोन पायान्ना दोरी बान्धतात म्हणजे ते पळु शकत नाही... तर मुद्दा काय? की असेच एखादे उमदे घोडे लन्गडताना दिसल तर लोकान्च्या नजरा थोडावेळ तरी तिकड जातिल, पण अत्यन्त सुन्दर आकर्षक पण पायात अधु असलेली तरुणी दिसली तर? लोकान्च्या तिच्याबद्दलच्या सहानुभुतीला, कळवळ्याला पूर येइल.... ..... ... .. . अन तीच सर्वान्गाने सुन्दर, सुलक्षणी तरुणी, उत्तानपणे, उन्मत्तपणे आपल्याच तोर्यात अन नादात जात असेल तर?..... कुणाकुणाच्या नजरा कशा असुया मिश्रीत, हेव्या दाव्याने भरलेल्या, कुत्सित वाचाळपणा करण्यास अशा उत्सुक असतील हे सान्गायला नकोच ना? तर तसच हे! टाकाऊ गोष्टीन्ना कोणी टिकाकार नसतो... टिका करण्यायेवढी देखिल चाहत नसते... पण जे जे उत्तम उदात्त उन्नत असते, ते ते शिखरावर असते, अन त्याला बघायला मान वर करावी लागते म्हणुन दुखावलेल्या मानेचे अन मनाचे लोक काय हसुन खेळुन प्रतिक्रिया देतिल अस वाटल का तुला? DDD
|
Aparnas
| |
| Tuesday, May 09, 2006 - 10:14 am: |
| 
|
अरे वा, मूडी आणि लिम्बू, दोघानांही माझे पूर्ण अनुमोदन आहे. बाकी पुण्याला नावं ठेवणार्या लोकांनी आता जरा नवीन मुद्दे शोधून काढावेत ही नम्र विनंती. तेच तेच दुकानदारांचे आणि कंजूसपणाचे किस्से वाचून कंटाळा आला :D:D
|
Himscool
| |
| Tuesday, May 09, 2006 - 10:25 am: |
| 
|
इतके दिवस हा बीबी कुठे होता.. मी आज पहिल्यान्दाच इथे पोस्ट करतो आहे.. [बाकरवडी खायला आधी पळतात चितळ्यांकडे, पुण्यात आल्यावर... हा हा हा]सध्या चितळ्यांच्या बाकरवडीची अवस्था गंभीर आहे(जळक्या बाकरवड्या मिळतात). आणि कंदी पेढे तर चितळे पेक्षा बर्याच ठिकणी चांगले मिळतात.
|
Himscool
| |
| Tuesday, May 09, 2006 - 10:37 am: |
| 
|
अपर्णा तू म्हणतेस त्याला पूर्ण अनुमोदन... पण त्याला आपण पुणेकर काय करणार... बाकीच्यांना पुण्याबद्दल अजून काही माहीत असेल तर लिहितील ना! )
|
बरे दुकानदारांचे आणि कुंजूषपणाचे सोडून: काही महिन्यांपूर्वी माझ्या भावाला पुण्यातून एका कंपनीचा interview call आला होता. फ़्रेशर असल्यामुळे आधी ऍप्टी वगैरे होती. वेळ सकाळी सातची की अशीच एकदम लवकर ठेवलेली. त्यामुळे पुण्यात माझ्या वडलांच्या मित्राकडे मुक्कामाला जावे का असे ठरत होते. त्या काकांना पण कळवले होते. पण त्या दिवशी भावाला ऑफिसमधून यायला उशिर झाला. त्यामुळे मुक्कामाला जाणे जमले नाही. त्याला आम्ही पहाटेच्या गाडीत बसवला आणि काकांना कळवले. हा तिथे जाऊन उतरतोय तर समोर काका उभे! एवढ्या सकाळी याच्यासाठी गरमागरम नाश्ता आणि चहा वगैरे घेऊन आलेले. ( Believe it. It's true!!! ) हे कळल्यावर मी वडलांना म्हटले, 'बघा, काका किती काळजीने आले. नाहीतर आपण पुणेकरांच्या नावावर उगीच काहीही खपवत असतो.' यावर ते म्हणाले 'तसा पुणेकरांवर माझाही काही आकस नाही, पण तुझ्या माहितीकरता सांगतो की तो पुण्यात नंतर गेला. त्याचं संस्कारक्षम वय माझ्याबरोबर इथेच फोर्टमध्ये गेलंय!' तो interview त्या दिवशी झालाच नाही कारण अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार (अख्ख्या भारतातले) आल्यामुळे गोंधळ झाला आणि रद्द करावा लागला!
|
>>>>> त्याचं संस्कारक्षम वय माझ्याबरोबर इथेच फोर्टमध्ये गेलंय! गजाभावु, तेवढ ते "सन्स्कारक्षम वय" किती ते किती वर्षान्पर्यन्त असत तेही विचारुन घ्या ना! (एक पुणेरी सुचना बर का भाऊ)
|
तेवढ ते "सन्स्कारक्षम वय" किती ते किती वर्षान्पर्यन्त असत तेही विचारुन घ्या ना! (एक पुणेरी सुचना बर का भाऊ) <<< LT, हेच आपलं... जी नॉर्मल रेंज असते ती. का बरं? पुण्यात ही अशी काही रेंज नसते का? 
|
Moodi
| |
| Tuesday, May 09, 2006 - 11:34 am: |
| 
|
आत्ता ग बया!!! म्हंजी शेहरानुसार सन्स्कारक्षम मानसीक वय बी ठरत व्हय? 
|
Storvi
| |
| Tuesday, May 09, 2006 - 6:40 pm: |
| 
|
>>सन्स्कारक्षम मानसीक वय >>मूडी मानसिक हे स्पष्ट केलेस ते बरे केलेस 
|
Moodi
| |
| Tuesday, May 09, 2006 - 7:41 pm: |
| 
|
मानसीक, शारीरीक, अध्यात्मिक, अधीभौतीक जे काय वय असेल ते.... लोकहो या बीबीवर जे काय चालले आहे ते सर्वांनी लाईटली घ्यावे ही नम्र विनंती. ह्या गंमती जंमती चालूच रहाणार. मात्र पूणेकरांना जे दिवे घ्या हं असे म्हणतात ते दिवे अज्जीबात घेत नाहीत असे ध्यानात आलेय तेव्हा त्या दिवे देणार्या मुंबईकरांनी व नागपूरकरांनी पण दिवे लावावेत घ्यावेत म्हणजे ज्योतसे ज्योत जगाते चलो हा संदेश कायम टिकेल. 
|
सर्वाना नमस्कार. मी १ पाटी वाचली आहे. ' येथे चहा कॉफ़ी व झुरळे पकडण्यासाठी चिकट कागद मिळेल'
|
Psg
| |
| Tuesday, May 16, 2006 - 4:47 am: |
| 
|
अजून एक, काल पेपर मधे वाचलं हे: पुण्यात सध्या वसंत व्याख्यानमाला सुरु आहे. इथे आत जाण्यासाठी पास असतो. तर गेट वर रखवालदारानी व्याख्यानाच्या वक्त्यालाच पास मागीतला वक्ता म्हणाला की अरे बाबा मीच भाषण देणार आहे आत्ता, तर रखवालदार उत्तरला की "असं सांगून ५-६ जणं आत गेलेत!!!!!" हे फ़क्त पुण्यातच होऊ शकतं...
|
मित्रांनो अजून एक पुणेरी पाटी अशा पाट्या फ़क्त पुण्यातच बघायला मिळू शकतात म्हणून मला पुण्याचा सार्थ अभिमान आहे 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|