Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 05, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through May 05, 2006 « Previous Next »

Moderator_5
Tuesday, April 11, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं आता बस करा! bb च्या विषयाला धरून लिहा आणि व्यक्तिगत बोलणे टाळा..

Kandapohe
Wednesday, April 12, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल इकडे येणे झालेच नाही! माझे पोष्ट पण गायब आहे. उडवले की काय? कुठलेही नाव, पर्सनल काही नसताना.

Lokhitwadi
Thursday, May 04, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी स्वत्: पुण्यनगरीतला (अगदी सदशिव पेठ) आहे. पण तरीसुद्धा हा तिथलाच अनुभव सांगीतल्यशिवाय राहवत नाही. ज़वळपास दहा वर्षानी पुण्यातील पेठेतल्या दुकनात जाण्याचा योग आला. मला भारतातल्या भारतात एक पार्सल पाठवायचे होते. भारतातल्या पोस्टात साधी चान्गली पुठ्याची धडधाकट पाकीटेसुद्धा मिळु नयेत हा दैवदुर्विलास आहे. असो. तर पाकिटासाठी शनिपाराजवळच्या एका दुकानात जाण्याचा योग आला. पेठेतला पोर असल्याने पेठ मला चान्गली माहिती होती. पण दहा वर्षान्च्या अमेरिका-वास्तव्याने फरक पडला. वेळ होती सकाळी १०:३० ची. खालीलप्रमाणे संवाद झाला.

मी: मला हि वस्तु पोष्टाने पार्सल करायचीय. चान्गले पुठ्याच्या पाकीटात पकीन्ग करुन हवे आहे.

दुकानदार्: sorry . करु शकनार नाही. पुर्वी आम्ही हे करुन द्यायचो. पण एक अनुभव असा आला. पॅकींग करताना १५ ते २० मिनिटे लागतात. एकदा एका मानसाचे पॅकींग करताना दुसरे गिर्‍हाइक आले. त्यांना फक्त ५ मिनिटांचेच काम होते. ते करायला गेलो तर पहिल्या गिर्‍हाइकाचे पित्त खवळले. त्याने वाद घातला की तो पहिला आला असल्याने त्याचेच काम प्रथम व्हायला हवे. (मी मनात म्ह्टले गिर्‍हाइकसुद्धा कोनीतरी पेठीच असनार). तेंव्हापासुन दुकानाचा नियम केला. पॅकींग करायचे नाही, तेंव्हा sorry .

मी: अहो मला जरा गडबड आहे. कृपया आत्ता द्या. समजा कुणी दुसरे आलेच तर त्याचे काम आधी करा. माझी हरकत नाही. (मनात म्हटले ह्याच्या कडे कोन येणार आत्ता. दिवसातुन मोजुन दहा लोक येणार).

दुकानदार्: जमणार नाही. पॅकींग करायचे नाही ही आता दुकानाची policy आहे. दहा पंधरारुपयांसाठी कटकट नको.

मी: अहो इथे अजून कोणी करुन देईल का

दुकानदार्: कामाशिवाय अजूनकाही सांगायचे नाही ही अजून एक policy .

कर्म बडवून थोडा पुढे एका दुसर्‍या दुकानात गेलो. त्यानेही काम तर केले नाहीच पण तुळशीबागेत त्याच्या बहीणीचे दुकान अहे आणि ते छोटे असल्याने ती हे निश्चित करुन देइल ही मौलिक माहिती पुरवली.

मग एक युक्ती सुचली. सदाशिवपेठेत एका मारवाड्याचे xerox चे दुकान आहे. अपेक्षेप्रमाने त्याने पॅकिंग करुन दिले आणि २० रु. उकळले. वरील तीनहि दुकानात मी सोडुन अजून कोणिही दुसरे गिर्‍हाइक नव्ह्ते.


how to write policy and sorry in devNagari ?

Mrinmayee
Thursday, May 04, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर तुमचं स्वागत उदय! पहिलच पोस्ट, आणि तेही आपल्या गावाचं उणं सांगणार.! आता सगळे पुणेकर तुमची सालं काढतील बघा:-)


Maudee
Thursday, May 04, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrinmayee
अगदी बरोबर.....:-)

lokhitwadi ,
policy बनवतातच यासाठी की ति मोडू नये....मोडली तर त्याला policy कशाला म्हणायच??
तुम्हाला घाई आहे...आणि दुसरे कुठलेही गिर्‍हाईक नाही त्यात त्याचा काय दोष??
दिवे घ्या







Milindaa
Thursday, May 04, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉलिसी = \dev2{pOlisee}
सॉरी = \dev2{sOree}

Psg
Thursday, May 04, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पुणेरी नमुना नाही म्हणता येणार, पण पुण्याच वैशिष्ट्य.. हे इतक मोठ शहर आहे, प्रचंड develop झालय, One of the the most upcoming cities of India म्हणून याच उल्लेख करतात, पण पुण्याची दुकानं काही सकाळी १० शिवाय उघडत नाहीत!! अरे ही काय दुकान उघडायची वेळ आहे! बरं दुकान उघडल्यावर मालक निवांतपणे दुकानातल्या फोटोंची पूजा करणार, मगच गिर्‍हाईकाकडे बघणार!!! अगदी औषधाचे दुकानही अपवाद नाही याला. त्यापेक्षा गिर्‍हाईकाला हवी ती वस्तू पटकन दिली तर जास्त पुण्य लाभेल! आणि आपण घाई केली तरी यांच्या चेहर्‍यावरची माशीही हलत नाही यांची दुकानं कशी चालतात कोण जाणे!!

Limbutimbu
Thursday, May 04, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> यांची दुकानं कशी चालतात कोण जाणे!!
तुला अस तर म्हणायच नाही ना की पुणेकर उशिरा उठतात आणि उशिरा उठणार्‍या पुणेकरान्मुळे यान्ची दुकाने चालतात?
बाकी हे सगळीकडेच हे की मराठी माणसान्ची दुकाने उशिरा उघडतात तर मारवाडी, भैय्यान्ची दुकाने वेळेला सकाळी सहा पासुन उघडलेली असतात... अपवाद केवळ अमृततुल्ल्यान्चा!


Milya
Thursday, May 04, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चितळ्यांविषयी वाचलेला एक जोक.. कदाचित आधीही कुणी इथे टाकला असेल पण रहावत नाही म्हणुन टाकतो

एकदा चितळ्यांच्या दुकानाला आग लागते. अग्निशामक दल धावत पळत तिथे येउन पोचते... तर चितळे त्यांना म्हणतात बारा वाजले दुकान बंद झाले आता चार वाजता या


Amitpen
Friday, May 05, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरिही आमची पुण्यातली दुकाने चांगलीच. इथली दुकाने ५ वाजता बंद होणार. मग काय वाट्टेल ते होवो दुसर्‍या दिवशी उघडल्याशिवाय काहीही मिळणार नाही. औषध हवंय का संध्याकाळी ७ वाजता? अशक्य! उद्या या नाहीतर जा धडपडत ८-१० किलोमिटर कुठे मिळतंय का ते शोधत...त्यातून सण असला तर अजून आनंद... मग दोन दिवस सगळंच ठप्प.

Aparnas
Friday, May 05, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त अ-पुणेकरांच्या माहितीसाठी सांगते, चितळ्यांचे दुकान ४ ल नाहीतर ३.३० ला उघडते.

Limbutimbu
Friday, May 05, 2006 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>> चितळ्यांचे दुकान ४ ल नाहीतर ३.३० ला उघडते.
पुर्वी तर चारला उघडायचे! हल्ली अर्ध्या तासाने सुधारले का? ("अर्ध्या हळकुन्डाने पिवळे झाले का" च्या चालीवर) DDD

Aparnas
Friday, May 05, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो लिम्बू ते पूर्वीपासूनच ३.३० ला उघडते... आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यच्या बाब्तीत म्हणाल तर ते चितळे आहेत, ते पाव हळकुंडाने पण पिवळे होतील.:-):-) पुणेकर मंडळी दिवे घ्या.
बाकी मंडळी मी पण अस्सल सदाशिव पेठी कोब्रा आहे..... हा पूर्ण वाचला मी आणि मला खूपच मजा वाटली पुणेकरांविषयी लोकांचे गैरसमज वाचून. म्हणजे काही देशांमध्ये भारतात अजून रस्त्यावरून हत्तीने प्रवास करतात अशी समजूत आहे म्हणे. त्याची आठवण झाली हे वाचून.


Limbutimbu
Friday, May 05, 2006 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा, अहो त्यान्च्या दुकानाचे शटर किती वाजता उघडते ते नको हे आपल्याला! "शिन्च्या गिर्‍हाईकान्ना" ते आत कधी येवु देतात ती वेळ हवी हे!
तुमच "पूर्वी" कोणत्या सालातल? तुमच पुर्वी "शायनिग इन्डिया" किन्वा "बाबरी" किन्वा "इन्दिरा गान्धी" अस अलिकडच असेल तर उपयोग नाही...
आमच पुर्वीच त्याहुनही पुर्वीच म्हन्जे "अणिबाणी" "बहातरचा दुष्काळ" "चायना वॉर" "लाल बहादुर शास्त्री" "पानशेतचा पूर" अस जुन हे! DDD
बाकी हत्तीची गोष्ट भारीच हां!
:-)

Aparnas
Friday, May 05, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो लिम्बू, आधी एकतर तुम्ही मला 'तुम्ही' वगैरे म्हणू नक. 'तू' च ठीक आहे. पूर्वी म्हणजे पानशेतचा पूर वगैरे सांगणं मला शक्य नही. त्यामुळे तुमची पूर्वी ची अट मी बापडी पूर्ण करु शकत नाही. चितळ्यांचं दुकान मात्र, सध्या म्हणूया आता "शिन्च्या गिर् ०दहाईकान्ना" च ३.३० ला उघडतात. :-) :-)

Limbutimbu
Friday, May 05, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपर्णा, साडेतीन तर साडेतीन! आत तरी घेतातच ना?
तू आपला विषय चालू ठेव.. माझी कलटी मारायची वेळ झाली आता!
हॅव अ नाईस एव्हिनिन्ग!


Shonoo
Friday, May 05, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२००२ साली मी चितळ्यांच्या दुकानात credit card चालेल का असा प्रश्न भीत भीत विचारला होता. ( रोख पैसे सगळे पुस्तकांच्या दुकानात उडवले ना). होकारार्थी उत्तर आल्यावर मला काय वाटले ते शब्दातीत आहे. आंनंद, आश्चर्य, विस्मय अभिमान आणि थोडेसे दु:ख असे काहिसे.
पण नंतर ते credit card वापरताना ज्या दिव्यातून जावे लागले त्यावरून वाटले की त्यांनी अजून आपला बाणा सोडला नाही.
दोन सशस्त्र पहारेकरांच्या मधून एका छोट्या अन्धार्‍या खोलीत जाउन कार्ड दाखवा, ओळखपत्र दाखवा अमेरिकन लायसंस दाखवल्या वरती पुण्यातला पत्ता आणि फोन सांगा अशी सर्व उलटतपासणी झाल्यावर बाहेर येताना त्या दोन बन्दुकधार्‍यांनी माझी पर्स आणि बॅक्पॅक पूर्ण उचकून उलटी सुलटी करून तपासली आणि मगच मला काउंटर कडे माझे सामान घ्यायला जाऊ दिले.


Maitreyee
Friday, May 05, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन बन्दुकधार्‍यांनी माझी पर्स आणि बॅक्पॅक पूर्ण उचकून उलटी सुलटी करून तपासली >>हे कशाला म्हणे! नक्की कुठल्या रूम मधे नेले होते, जिथून कोणी चोरून काही आणेल!!

Dakshina
Friday, May 05, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नुकताच आलेला अनुभव...

कुशन आणि त्यासाठी कव्हर्स घ्यायची होती म्हणून पेठेतल्या एका दुकानात शिरले, वेळ ऐन संध्याकाळची होती.. मला आत येताना पाहूनंच त्या दुकानदारचा चेहरा त्रस्त झाला....(जणू काही मनात म्हणत होता की ही बाई कशाला आली आता?) कारण तो निवांत बसला होता..मी म्हणलं कुशन दाखवता का?

दाखवण्या आगोदर दुकानदाराने मला अगदी Specific प्रश्नं विचारले, साईझ, लांबी, रुंदी, रंग, रेंज... इत्यादी...मी सांगितल्यावर म्हणाला आमच्याकडे नाहीए... मी आवाक झाले.... इतके सगळे नमुने दिसत होते... पण त्याने मला एकही काढून दाखवला नाही. शेवटी मीच त्याला म्हणलं की तो जो दिसतोय ना साधारण तसा प्रकार हवाय जरा काढून दाखवता का please ... तर हा पठ्ठ्या वर चढला आणि ती उशी फ़ेकली वरून माझ्याकडे... मी चाचपून पाहीली आणि सहज विचारलं की Washable आहे का? त्याने ती खसकन काढून घेतली आणि म्हणाला की... उशी कधी कुणी धुतात का? जा तुमच्या आईला विचारून या....


Junnu
Friday, May 05, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जा तुमच्या आईला विचारून या >>

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators