Bee
| |
| Wednesday, December 21, 2005 - 3:03 am: |
| 
|
एकदा मी वेगवेगळ्या रंगाच्या lipsticks घरी नेल्यात. माझ्या ३ वर्षाच्या भाचीला त्या इतक्या आवडल्यात की तिला वाटले त्या सर्व तिलाच मिळाव्यात. तिला हे खूप चांगल्या प्रकारे माहिती होते की आपला हा हट्ट कुणीच पूर्ण करणार नाही. गुपचुप जाऊन तिने आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. तिच्या आईने तिला सहज उत्तर दिले, ' रात्री सगळे जण झोपले ना.. की आपण हळूच त्या काढून घेऊ'. तिच्या डोक्यात हे वाक्य कायमचे fit झाले. सबंध दिवसभर ती मग घराच्या बाहेर पडली नाही. आम्ही किल्ल्या कुठे ठेवतो, त्या कपाटाला लावून फ़िरवायच्या कशा, कपाटाचे दार हळूच कसे उघडायचे हे सगळे काही ती ह्या एका दिवसात आपणहून शिकली. त्या रात्री आम्ही जेंव्हा सगळे उशिरा झोपलो तेंव्हा ती आमच्यासोबत जागीच होती. मग सगळे घारघूर झोपल्यानंतर ही बया हळूच उठली, कपाटाच्या किल्ल्या घेतल्या, कपाटाचे दार हळूच उघडले, सगळ्या lipsticks ओच्यात भरल्यात. रात्रीच्या ३ वाजता जेंव्हा बहिणीला जाग आली तेंव्हा तिची लेक तिच्या बाजूला नव्हती. आम्ही सगळे उठून पाहतो तर घराच्या सगळ्या भिंतीवर lipsticks च्या रेघोट्या. आमच्या आवाजाने ती store room मधे लपून बसली. तिला बाहेर काढले तर तिने आपले थोबाड रंगवून ठेवले होते. सगळ्या lipsticks चा रात्रीतून निक्काल लावला होता. वर तिच्या आईला म्हणत होती, तुच नाहीस का म्हणालीस रात्री गुपचुप घेऊ म्हणून
|
Storvi
| |
| Wednesday, December 21, 2005 - 6:56 pm: |
| 
|
त्या मुलीच्या उचापात्यांपेक्षा मला तुझ्या उचापत्यांमध्ये ईन्टरेस्ट आहे. तुला वेगवेगळ्या रंगांच्या लिपस्टिक्स कशाला रे लागतात? दिवा घे रे...
|
Manish2703
| |
| Wednesday, December 21, 2005 - 11:55 pm: |
| 
|
lol स्टो .. ..
|
Bee
| |
| Thursday, December 22, 2005 - 2:01 am: |
| 
|
शिल्पा आरोही मोठी झाल्यानंतर कळेलच तुला आता.. फ़क्त बिलवर भरून काम भागणार नाही लेकीचे
|
Dakshina
| |
| Thursday, December 22, 2005 - 5:01 am: |
| 
|
लहान मुलं करंच खूप उचापती करतात. माझ्या मैत्रिणीची मुलगी एकदा घरी आली तेव्हा मी पोळ्या करत होते, माझ्या मागेच लागली की मला कणिक हवी. तिलाही माझ्याबरोबर पोळ्या करायच्या होत्या. मी तिला थोडी कणिक दिली आणि परत पोळ्या करायला लागले. ती माझं निरिक्षण करत होती, मग तिने पीठ मागितलं मी म्हणलं कशाला हवय तुला पीठ.. ती म्हणे वा! तू लावतेस पोळीला मला का नाही देत? मग मी तिला छोट्या वाटीत पीठ दिलं. मनात म्हणलं चला... हिचं मन रमलं पण काय ५ मिनिटांनी मागे वळून पाहिलं तर.. हिने घरभर पीठच पीठ करून ठेवलं होतं, कारण विचारलं तर म्हणे... केव्हढीशी वाटी त्यातून घेता पण येत नाही म्हणून मी सगळं पीठ जमिनीवर ओतलं माझ्या पोळ्या होईपर्यंत मी तिच्याकडे दुर्लक्षं केलं. त्यानंतर तिने मला समोर बसवून त्याच कणकेच्या भुवया, चिकटवल्या. गोळा करून नाकावर चिकटवला, मिशी केली. आणि काय काय. सगळं झाल्यावर म्हणे.. ''छान दिसतेस'' पुन्हा तीच कणिक काढून तिने त्याची नाव म्हणजे नावेसारखा आकार्) केली आणि Bathroom च्या दरवाजावर चिकटवली.. मला म्हणे की तू अंघोळीला रोज नावेत बसून जायचं
|
Kandapohe
| |
| Thursday, December 22, 2005 - 6:25 am: |
| 
|
आपले थोबाड रंगवून ठेवले होते. बी तू असा राग बाहेर काढायला नको होतास. थोबाड? शो. ना. शिल्पा ह. ह. पु. वा. 
|
Bee
| |
| Thursday, December 22, 2005 - 6:45 am: |
| 
|
कांद्या अरे राग नाही तो.. प्रेमानीच लिहिले तसे.. आता ह्या वेळी भारतात जाईन तेंव्हा खास तिच्यासाठी Baby make up kit कुठे मिळतो का तो शोधून घेऊन जाईन
|
Storvi
| |
| Thursday, December 22, 2005 - 9:54 pm: |
| 
|
lol Bee sorry hM.. pNa tuJao Jaalao ka ibalavar Ba$na 
|
Supermom
| |
| Thursday, December 22, 2005 - 11:14 pm: |
| 
|
मुले खरेच फ़ार उचापती करतात. माझी चार वर्षाची मुलगी कार्टून्स पहात माझ्याबरोबरच बसली होती. तिच्या जुळ्या भावाने कुकीज मागितल्या म्हणून उठले. त्याला असा किती वेळ लागतो? दोन मिनिटात मागे वळले तर प्लॅस्टिकचा तुकडा नाकात वरपर्यन्त. आई मला श्वास घेता येत नाही हे ऐकले अन काळजाने ठाव सोडणे म्हणजे काय हे पुरेपूर कळले. मग ९११ डायल करणे, मुलाला शेजारी ठेवून पाच मिनिटात अम्ब्युलन्स मधे बसणे हे सारे सोपस्कार आलेच. आठवडाभर धास्तावलेलीच होते.
|
Sherpa
| |
| Friday, December 23, 2005 - 7:08 am: |
| 
|
मागच्या ३१ डीसे चि आठवण ज़ली. मज़्या एका मित्रा कडे आम्ही पार्टीला जणार होतो जाणच्या आधी मुलाचे जेवण करु आणी मग जावु असा प्लान होता त्याचे जेवण ज़ाले अनी त्याला सन्त्र खायला दिले आम्ही दोघे खात असतना एकदम त्याने वास बघतो करत बी नाकात घातली. त्याला घेऊन दीनानथ होस्पितल मधे पळलो तिकडे doctor नव्हते मग सन्जीवन मधे गेलो तिकडे पन doc नव्हते पन १५-२० मी नी येतिल असे समजले म्हणून थामबलो होतो इकडे आमचे चिरन्जीव मस्त पेन्गले होते त्यामुळे त्याला मान्डिवर आडवे केले होते आणी थोड्याच वेळत बी बाहेर आली आणि अमचा श्वास सुटला
|
माझा भाचा आजकाल टीव्ही बघून die वगैरे शब्द बरेचदा वापरत असतो. तर मी विचारले की what is die ? त्याचे उत्तर. when u get hurt ambulance comes and takes u to the hospital. and u stay there for 15 days and come back
|
Bee
| |
| Thursday, December 29, 2005 - 2:14 am: |
| 
|
एकदा मी mobile charge करायला ठेवला आणि त्यावर माझ्या भाचीची नजर गेली. एक दोन मिनिटे मी तिला दिला पण ती काही केल्या परत देईना आणि हिसकावून टेबलावर ठेवला तर माघारी परत उचलून घेई. मग मी तो थोडा उंचावर ठेवला जिथे तिचा हात पोचणार नाही. असे करून झाल्यानंतर मी तिला म्हंटले आत्ता कसे घेशील तू, मी ठेवून दिला उंचावर. तर तिने छानपैकी दोन्ही हात कमरेवर ठेवून मला उत्तर दिले. तू फ़क्त बाहेर जा मग मी काय करायचे ते करेल. अगदी मोठ्या माणसांचे वाक्य आणि म्हणण्याचा थाटमाट देखील मोठ्यांसारखाच बघून मी चकीत झालो. मी तिच्या आईला हे सांगितले काय पण तुझी मुलगी अगदी हुबेहुब मोठ्यांची नक्कल करते तर ती म्हणाली तिच्यासमोर कुठलीच नविन गोष्ट करू नये, ती लगेच जिंकते.
|
माझ्या २ वर्षाच्या भाच्याने केलेला प्रताप त्याला खोकला झाला होता. माझ्या बहिणीनी त्याला cough syrup पाजले. it seems त्याला त्या cough syrup ची चव आवडली असावी. त्यानी आमच्या सगळ्यांची नजर चुकवून एक दिवस अख्खी cough syrup ची बाटली .... दुसर्या दिवशी सकाळी साहेब झोपेतून उठायलाच तयार नव्हते. सगळे जण जाम घाबरले, त्याला उठवण्याचे सर्व प्रयत्न करून झाले. मग आम्हाला cough syrup ची रिकामी बाटली सापडली, तेव्हा सगळा उलगडा झाला. तब्बल ३ दिवस झोपला होता तो. जाम टरकली होती सगळ्यांची
|
Bee
| |
| Saturday, December 31, 2005 - 2:43 am: |
| 
|
अरे बापरे.. हा तर भयाणकच प्रकार घडला म्हणायचा.. काहीतरी शिकायला पाहिजे ह्यापासून कारण औषधांच्या बाटल्या सहसा मुलांसमोरच असतात आमच्या घरी. आजकाल औषधी पूर्वीसारख्या कडूजार लागत नाही. मुले एका दमात पितात नाक न दाबता
|
Supermom
| |
| Thursday, January 12, 2006 - 11:28 pm: |
| 
|
लहान मुलांच्या उचापती वाचून मला माझ्याच लहानपणची मोठ्ठी उचापत आठवली. मी चक्क कुत्र्याला चावले होते. हो मी बरोबर लिहिलेय.वाक्यात चूक काहीच नाही.
|
Supermom
| |
| Thursday, January 12, 2006 - 11:32 pm: |
| 
|
आणि त्यानन्तर तो कुत्रा मेला असे लोकाना सांगून अजूनही माझ्या बहिणी मला जाम चिडवतात.
|
Sayonara
| |
| Friday, January 13, 2006 - 12:41 am: |
| 
|
baIÊ Aijabaat nao} nakÜsa makeup kit . %yaacaI kaya vaaT laagato AaiNa Garatlyaa vastUMcaI kaya vaaT laagato ho maI AnauBavalaMya.
|
Bhagya
| |
| Friday, January 13, 2006 - 1:01 am: |
| 
|
सुपरमाॅम! खी खी खी!! अजूनहि त्या गोष्टिने तितकच हसू येतय! आणि अजूनही त्या कुत्र्याबद्दल तितकच वाईट वाटतय!त्याला १४ इंजेक्क्षन्स घ्यावे लागले बहुधा! आणी मी बाबांच्या client ला पाठीत चप्पल फ़ेकुन मारली होती! वय लहान होतं म्हणुनच या गोष्टी माफ़ झाल्या! आपल्या मुलांत आपलेच गुण उतरले तर नवल काय?
|
Supermom
| |
| Friday, January 13, 2006 - 1:05 am: |
| 
|
भाग्य आॅस्ट्रेलियाच्या बी बी वर ये ना
|
Zakki
| |
| Friday, January 13, 2006 - 2:59 pm: |
| 
|
kaÆ pazIt caPpla maa$na GyaayacaI hÝsa Aaho kaÆ ~D
|
Moodi
| |
| Friday, January 13, 2006 - 3:10 pm: |
| 
|
अहो झक्की ही सुपरमॉम अन भाग्या दोघी बहिणी आहेत हो!
|
Bee
| |
| Friday, January 13, 2006 - 3:12 pm: |
| 
|
Supermom lol, agadi HHPV 
|
Supermom
| |
| Friday, January 13, 2006 - 4:12 pm: |
| 
|
अन कुत्र्याला चावून झाल्यावर मीच गळा काढला. माझी आई स्वैपाक टाकून धावत आली अन मला जवळ घेऊन माझे कान फ़ुंकू लागली. नागपूरकडे लहान मुलांची भीती घालवायला असे करतात. का ते माहीत नाही. तिला बिचारीला वाटले की मी कुत्र्याला घाबरले. एवढा वेळ सारा प्रकार बघणार्या कुत्र्याच्या मालकिणबाई त्यांच्या अंगणातून हसून म्हणाल्या की अहो तुमच्या लेकीचे नाही माझ्या कुत्र्याचे कान फ़ुंका.
|
supermom सही... आम्ही डोम्बिवलीला चाळीत रहात होतो. पावसात आमच्या घराच्या ३ पायर्या पाण्यात असत. माझी आई तेव्हा घरी शिवणाचे वर्ग चालवत असे. एक मशीन २ ३ बायका share करत असत. एका बाईनी full-shirt च्या बाह्या आणि cuffs तयार करुन ठेवले होते. मशीन busy होते म्हणुन ती आपल्या वहीत काहि उतरुन घेत होती. थोड्या वेळने ती बाई गोन्धळुन सगळीकडे शोधाशोध करु लगली. कुणी cuffs घेतले का विचारू लागली. शेवटी कपडा अर्धवट रहाणार म्हणून अगदी रडकुन्डीला आली. माझी आई पण बुचकळ्यात पडली कि आता कुठे शोधावे cuffs . इतक्यात मझा भाऊ तिथे आला. तो आईला म्हणाला, ' माझी होडी पाण्यात बुडते आहे दुसरी चान्गली होडी बनवून दे ना' क्षणात सगळा उलगडा झाला !!
|
Chiku
| |
| Saturday, January 14, 2006 - 1:37 am: |
| 
|
माझा मुलगा दोन वर्षाचा असताना त्याने करुन ठेवलेला उद्योग एका रात्री मी, माझा नवरा आणि मुलगा बाहेरुन घरी आलो. आमच्या दारासमोर छोटे सापाचे पिल्लु पडले ले दिसले. माझा नवरा ख़ात्री करतो म्हणाला आणि हातातले सामान, किल्ल्या इ. घरात ठेउन आम्ही दोघे बाहेर आलो. मुलगा आत एकटा नको म्हणुन मी लगेच आत जायला आणी त्याने आतुन लॉक लावायला, एका सेकादाचा अवकाश. मग काय, आमची पळापळ अपार्ट्मेन्ट्च्या इमरजन्सि नम्बरवर फोन केला तर, तिथे कोणी यायला तयार नव्हते. मग शेवटी ९११ ला फोन केला. २ मिनिटात पोलिस हजर. त्याने अपार्ट्मेन्ट ऑफ़िस, लॉकस्मिथ इथे फोन केले. अपार्ट्मेन्ट चा माणुस तरीपण येताना हात हलवतच आला, तेव्हा मात्र त्या पोलिसाने त्याला दम भरला. तेव्हा कुठे तो किल्ल्या घेउन आला. या सगळया प्रकारात, जवळ जवळ दिड तास माझा मुलग सतत रडत होता. आमच्या जीवात जीव नव्हता! आश्चर्य म्हणजे, शेजार्च्या एकाहि माणसला रात्री ११.३० वाजता याचा, पत्ता नव्ह्ता. तात्पर्य, इमर्जन्सि साठि घरच्या किल्ल्यान्चा एक सेट, महत्वाचे फोन नम्बर जवळ्च्या लोकाकडे ठेउन देणे त्याहुन कळस, ते सापाचे पिल्लु खेळणे होते
|