Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 24, 2006

Hitguj » My Experience » संस्था, कार्यालये » सरकारी कचेरीतला सुखद अनुभव » Archive through March 24, 2006 « Previous Next »

Ajay
Monday, March 20, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरकारी कचेरीतही कामाचा सुखद अनुभव येऊ शकतो. अशा अनुभवांचं कौतुक करायलाच हवे. तुमचेही चांगले अनुभव इथे लिहू शकता.

४-५ वर्षांपुर्वी पुणे महानगरपालीकेच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयात जावं लागलं. कुठल्याही लाल फितिला तोंड न देता त्यांची रितसर प्रक्रिया पार पाडल्या काम झाले. (नक्की आठवत नाही पण कदाचित दुसर्‍या दिवशी प्रमाणपत्र ताब्यात घ्यायला जावे लागले. ) योग्य तेवढीच रकम भरली आणि त्याची पावतीही मिळाली. कुणीही जास्त पैसे मागितले नाहीत.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुणे, नागपूर आणि कराड या तीनही गावातून सारखाच सुखावह अनुभव आला.


Ruma
Tuesday, March 21, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा ही एक अनुभव.
passport काढताना मला सांगीतल्या प्रमाणे पोलीसांच्या चौकशी च्या वेळी ते पैसे मागतात. त्याप्रमाणे मी व माझे वडिल मार्केट यार्डच्या पोलीस स्टेशन ला गेलो होतो.. पण तीथल्या पोलीस अधिकार्‍याने एकही पैसा न घेता आमचे काम केले.. फ़ॉर्म भरुन आमची आवश्यक माहिती घेउन फ़ॉर्म पुढे पाठवला..
त्यानंतर बर्‍याच लोकांनी पैसे दिल्याचे सांगितले मला.


Savyasachi
Tuesday, March 21, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी कार चोरीला गेल्यावर पोलीस स्टेशनवर ३ ४ वेळा जावे लागले. प्रत्येक वेळेस अतिशय उत्तम अनुभव आला. कामही झटपट झाले. विनम्रपणा वाखाणण्याजोगा होता. कसल्याही गोष्टीसाठी पैसे द्यावे लागले नाहीत.
पण शेवटी united india insurance कंपनीने पैसे द्यायला हजारो पेपर्स द्यायला लावले. आणि मग दीड वर्षाने पैसे मिळाले.
माझा वरळीच्या आणि ठाण्याच्या पासपोर्ट कार्यालयाचा पण अनुभव खूप चांगला आहे. दोन्हीकडे अर्ध्या तासात काम झाले होते.


Zakki
Tuesday, March 21, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला न्यू यॉर्क मधल्या भारतीय कॉन्सुलेट मधे किमान दहा वेळा तरी जावे लागले आहे. कधी पासपोर्ट रिन्यू करायला, भारताचा व्हिसा घ्यायला, इ. कधीहि वाईट अनुभव आला नाही. नेहेमीच सांगितल्या वेळी बरोब्बर कामे झाली, चुका नाहीत. पैसे नाही, वागणूकीत नम्रता कमि असेल, अमेरिकेच्या मानाने, पण वाईट काहीच नाही. पण एकदा मात्र जरा विनोदी अनुभव आला.
मि माझे कागदपत्र नि फी (हो, आधी फी मागतात, ठीक आहे) देऊन मी आपला तिथल्या वाचनालयात जाऊन बसलो. बसल्या बसल्या छान झोप लागली. जरा वेळाने कुणितरी 'सार, सार' करत जवळ उभे आहे असे जाणवले, म्हणून डोळे उघडले. एक बाई मला म्हणाली, इथे तुम्ही झोपू शकत नाही. मी म्हंटले का बरे, चांगला सोफा आहे, शांतता आहे, अजून काय पाहिजे? ती म्हणाली, पण हे सरकारी ऑफिस आहे! मी म्हंटले म्हणून मी इतर कर्मचार्‍यात blend व्हायचा प्रयत्न करतो आहे. त्यावर फणकार्‍याने ती म्हणाली, पण इथे झोपायचे नाहि, नि तरा तरा निघून गेली. तोपर्यंत माझी पण झोप झाली असल्याने, मी आणखी कायदेभंग केला नाही.


Raja_of_net
Tuesday, March 21, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात पासपोर्ट साठी बरेच धक्के खाल्ले होते(आणि पैसे हि दिले होते) पण सीन्गापोर मधिल भारतिय हाय कमीशन मधे एकदा काहि कामासाठी गेलो होतो. काऊनटर वरुन नम्बर घेतल्यानन्तर फ़क्त ५ मिनिटे थान्बावे लागले. सगळे पेपर्स आणि फ़ी चे पैसे भरले. मला पावति देउन दुसर्या दिवशि कलेकशनच्या वेळात बोलवले.
दुसर्या दिवशि वेळेवर गेलो. काम झाल असेल ह्याचि शाश्वति नव्हति पण, कलेकशन काऊनटर गेलो, पावति दाखवलि आणि काय आश्चर्य माझे पेपर्स रेडि होते.
हा खरच एक सुखद अनुभव होता.


Milindaa
Tuesday, March 21, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयाचा सुखद अनुभव मला पण आला आहे. ४ तासांत दाखला हातात. एकही पैसा न देता. प्रत्येकाला साहेब म्हटलं की झालां :-)

Maitreyee
Tuesday, March 21, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मोठा सुखद धक्क घर खरेदीचे registration करताना गेल्या वर्षी मिळाला.
पुन्यात सात आठ वर्षापूर्वी जेव्हा पहिला फ़्लॅट घेतला होता तेव्हा हेच काम इतके कंटाळवाणे होते आणि सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन घराची कागदपत्रे हातात यायला काही महिने लागले होते. आणि आता या वेळी त्याच तयरीने गेलो तर काय नवल! ते ऑफ़िस अगदी जबरा कार्यक्षम झालेले! भरपूर उजेड, सौजन्याने बोलणारे लोक, वेळेत होणारे काम, computerized कामे(हो शाईने अंगठा उठवणे वगैरे बन्द,तिथे comp var Digital thumb impression ! नव्या घराच्या registration चे काम झटपट झाले आणि कागदपत्रे लगेच काही तासात हातातही आली! खरच कौतुक वटले. नक्की कसा काय एवढा बदल झाला असावा हा अजूनही विचार करतेय:-)


Seema_
Tuesday, March 21, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या , mt च्या अनुभवासारखाच सुखद अनुभव मलाही घर खरेदीच registration करताना आलाय. symbiosys च्या समोरच जे registration च office आहे . तीथल्या लोकानी अतिशय चांगली वागणुक, कामात तत्परता आणि मस्त चहा अस सर्वच दिल होत. ही साधारन ३ वर्षापुर्वीची गोष्ट आहे.

Ameyadeshpande
Tuesday, March 21, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी driving license काढायला गेलो होतो स्वत:, एजंट कडून न जाता... मला पहिल्या राऊंड मधेच पास केला :-)
आणि वर्षानी हा license हरवला म्हणून मग डुप्लिकेट काढायला गेलो तेव्हा म्हणाला आता license घ्यायला ५ दिवसांनी या...खरंतर त्याला नुसती सही घ्ययची होती साहेबाची आणि फोटो लावायचा होता त्यावर, मग मी जरा गुळ लावला "साहेब मी विद्यार्थी आहे, परिक्षा आलिये आणि लांब राहतो द्या की लवकर". त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो म्हणाला ठिक आहे तासाभरात या आणि मिळालाच तासाभरात! :-)
आणि हो, license हरवला म्हणून पोलीस रिपोर्ट न्यायला लागतो तर आमच्या कॉलेज समोरच एक पोलिस चौकी आहे तिथे गेलो होतो, त्यानी लिहून दिला रिपोर्ट आणि मी उठून जायला लागलो तर म्हणाला आहो त्याचे १० रुपय होतील... मी म्हणलं माझ्याकडे नाहियेत, बरं मग राहूदे म्हणाला... आणि पासपोर्ट घेताना पण १०० रुपये मागितलेले त्याला पण अशीच टांग दिली होती :-)


Mvdeshmukh
Tuesday, March 21, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नांदेडच्या विवाह नोंदणी कार्यालयात देखील आम्हाला इतक्यात असाच सुखद अनुभव आला. भावाच्या लग्नाची नोंदणी १० मिनीटात झाली. तिथे computersized systems , web camera ने फोटो आणि लगेचच चान्गल्या प्रतीच्या कागदावर त्या certificate ची प्रिन्ट याची सोय आहे. ह्या मुळे खरोखरच कार्यक्षमता व काम पार पाडायची प्रवृती जाणवली. त्या office ला भारत सरकारचा "राजीव गांधी पुरस्कार" ही मिळाला आहे.

Champak
Tuesday, March 21, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो शाईने अंगठा उठवणे वगैरे बन्द,तिथे comp var Digital thumb impression ! >>>>>>>>>

तिकडे लोकं संगणक शिकतेत पण हिकडे लोकांना प्राथमिक शिक्षण बी मिळत न्हाई :-)

ही विषमता कधी संपणार!


Maitreyee
Tuesday, March 21, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

registration ला अंगठाच लागतो रे, तुम्हाला लिहिता येवो न येवो :-)
विषमता कसली आलीय डोंबलाची


Psg
Wednesday, March 22, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पासपोर्ट, लायसेन्स, जन्माचा दाखला, रेशन कार्ड वर नवीन नाव घालणे ही सर्वच कामे आमची एकही पैसा न देता, तगादा न लावता आणि वेळेवर झाली आहेत. मला वाटते, तुम्ही पैसे द्यायच्या तयारीनी गेलात की कळते त्यांना आणि अडवणुक करतात. :-) एरवी कामं सुरळीत होतात

Storvi
Wednesday, March 22, 2006 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही जन्म म्रुत्यु नोंदनी कार्यालयात मलाही असाच अनुभव आला होता

Pinkikavi
Thursday, March 23, 2006 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही माझा पासपोर्ट काढताना चांगला अनुभव आलेला....

माझ्याकडे रेशनकार्डच न्हवते...... आधी form घेणार नाही म्हणाले....पण रेशनकर्ड सासरच्या गावी आहे मागवेपर्येन्त ३,४, दिवस जातील....तेव्हा please , असे म्हटले, तर चक्क घेतला की form साहेबाने...


Milindaa
Friday, March 24, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधी form घेणार नाही म्हणाले <<

साहेबाचे म्हणणे बरोबरच आहे की.. तुम्ही रेशनकार्ड असल्याशिवाय गेलात ही तुमचीच चूक आहे ना.. म्हणजे उद्या साहेबाने फॉर्म घेतला नसता तर त्याच्या नावाने खडे फोडायला किंवा भारतात असे वाईट अनुभव येतात म्हणायला मोकळे :-)

हे तुमच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असले तरी असे आपल्याकडे बर्‍याच वेळा होते, नियम न पाळण्याचीच पध्दत असते ही खेदाची गोष्ट आहे.

मॉडरेटर हे पोस्ट या ठिकाणी योग्य नसेल तर उडवा.


Lopamudraa
Friday, March 24, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिन्दा u r right!. मी अशाच पोस्ट ची वाट बघत होते,
सुशिक्षित लोकांना सुद्धा साध्यासध्या गोष्टी समजत नाही, कोणती कागदपत्रे लागतात हे स्वच्छ शब्दात सांगुनही आणि समोर सगळे लिहिलेले असुनही कळत नाही,
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात सरकारी off मध्ये रोज प्रत्येक officerlaa शेकडो लोकांना भेटावे लागते, हजारो कगद्पत्रे तपासावी लागतात, हजारो सह्या करव्या लागतात.. अणि तीथे जाणारे प्रत्येकाला घाइ(?) असते, आत्ताच्याआत्त काम व्हवे ही अपेक्षा असते..
स्वताला मात्र त्या कामाची वेळेवर जाग आली असते
माझे post चुकिच्या जगी असल्यस please delete


Moodi
Friday, March 24, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे खरे आहे की जी कागदपत्रे सांगीतली आहेत, ती क्रमवारे आपल्या फाईलमध्ये ठेवुन मग कार्यालयात गेल्यावर आपला अन त्या संबंधीत अधिकार्‍याचा बराचसा वेळ वाचु शकतो.

मला माझ्या पासपोर्ट बाबत खरच चांगला अनुभाव आलाय. एक जनरल रुटीनप्रमाणे चौकशी केली गेली, माझे कागदपत्र नंतर व्यवस्थीत हातात दिले गेले अन मुख्य म्हणजे पोलीसांचा सुद्धा चांगला अनुभव आला. खरच काही घटना आयुष्यात संस्मरणीय वाटतात.


Zelam
Friday, March 24, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही passport कार्यालयात आणि त्याला लागणारा police clearance घेण्यासाठी पोलिस कचेरीत अत्यंत चांअगला अनुभव आला आहे. दोन्ही ठिकाणी कामे वेळेवर झाली.

Pinkikavi
Friday, March 24, 2006 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलि.दा लोप,
एका अर्थी मुद्दा बरोबर आहे.......पण for ur kind information , तेव्हा माझ्या लग्नाला ८च दिवस झाले होते आणि माझे नावही त्यात add केलेले न्हवते......

असे असताना देखील form घेतला याचा आम्हाला सुखद धक्का बसला......
आनि म्हणुन मलाही माझा अनुभव सांगावासा वाटला.......

पण जेव्हा सगळे नियमाप्रमाने करुनहि काम होत नाही, तेव्हा काय करावे? मग चूक कुनाची असते तेव्हा?
बाकि नविन passport चे काम अलगद झाले आणि renewal साठी मी अगदी एकुन एक कागद्पत्रे नियमाप्रमाणे त्यांना देवुनही ४ महिने मला renewed passport मिळाला न्हवता.....वैतागुन परत आणला आनि us मधे renew केला.......... अग्दी चीड आणणारा अनुभव होता तो...

हे अगदि दोन विरुध्द अनुभव सरकारी कामाचेच आहेत.......


Abhijit
Friday, March 24, 2006 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साल १९९४, गाव कर्‍हाड

स्वत:च फाॅर्म भरून पासपोर्टसाठी अर्ज केला होता. २ महिन्यांनी "पासपोर्ट पोलीस एन्क्वायरी" चे पोलीस स्टेशन मधून पत्र आले. दुसर्‍या दिवशी गेलो. आमच्या घरून साधारण अर्धा कि.मी. असेल फार फार. एन्क्वायरी झाली, २-३ रूटीन प्रश्न. पासपोर्ट आॅफीसला रिझल्ट पाठवतो म्हणाले... ... ... ...


... ... ... सायकलवर टांग टाकली आणि घराकडे निघालो. घराजवळ येताच रोज येणारा पोस्टमन दिसला. मी आपले सहज विचारले, की काही पत्रे आहेत का आमची? तो म्हणाला, हो एक रजिस्टर आहे. मी घेतले ते सही करून. वर माझेच नाव होते. फोडून बघतो तर काय, चक्क पासपोर्ट!! आता बोला. मी उडालोच.. एकदा वळून पोलीस स्टेशनच्या दिशेने बघितले, एकदा साधारण मुंबई आहे तिकडे बघितले आणि शेवटी वर बघितले.. (देव ना तिकडे!) ग्रेट ते आमचे गाव, तिथले पोलिस आणि मुंबई पासपोर्ट आॅफिस!

अश्या
lightening fast सेवेचा अनुभव अजून तरी मला कुठल्याच सरकारी किंवा प्रायव्हेट खात्यात, भारतात किंवा अमेरिकेत, आलेला नाही!



Rangy
Friday, March 24, 2006 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा अभिजीत, नशीबवान आहेस खरा! धन्य ते passport office
माझा passport चा अनुभव अगदी उलट आहे, त्यामुळे तो या बी बीच्या नावाला suit नाही होणार


Pinkikavi
Saturday, March 25, 2006 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा आनि लोप, तुम्ही सुशिक्षित असालच,त्यामुळे तुम्हाला माहित असेलच की रेशनकार्ड नसले तर एक वर्षाचे liight billl or phone billl द्यावे लागते.....मी light bills घेवुन गेले होते......तरिही अडविन्याचा प्रयत्न झाला होता.... form घेनारे लोकही सुशिक्षित असतातच ना?......मग तिथल्या वरिष्ठ साहेबांशी बोलावे लागलेले...... आणि हेच मी माझ्या वरिल पोस्ट मधे नमुद केले न्हव्ते

बाकी अर्जन्ट passport साठी लगणारे सोपस्कारही पार पाडलेले होते, ३ weeks मध्दे मिळाला होता passport

पण तो renew करतानाचा अनुभव वाईट्ट होता..........मी योग्य BB वर त्याविषयी मागे लिहिलेच होते.........


Pendhya
Saturday, March 25, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवसभर कचेर्‍यांमधे, ( मग त्या कुठल्याही असोत, आयकर विभाग, मामलेदार कचेरी, विक्रिकर विभाग, किंवा आणखी कुठल्याही ) कामं करुन घेण्यासाठी, पायपिट केल्यावर, त्या त्या कचेर्‍यांमधुन निघतांना ( मग, काम झालं असो किंवा नसो ) आवारातल्या किंवा बाहेरच्या canteen किंवा अमॄततुल्य मधे, मस्त चहा घेतल्यावर, मला, दरवेळेस सुखद अनुभव आलेला आहे.

Limbutimbu
Saturday, March 25, 2006 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> ४ तासांत दाखला हातात. एकही पैसा न देता. प्रत्येकाला साहेब म्हटलं की झालां
बर साहेब, आता तसच म्हणतो साहेब! DDD

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators