Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 03, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » भविष्यातील गोष्टिंची चाहुल » Archive through April 03, 2006 « Previous Next »

Psg
Friday, March 31, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अनपेक्षीत उत्तर नाही, उलट उत्तर अपेक्षितच मिळाले, पण अनपेक्षीतपणे तुला ते मिलिंदाकडून मिळाले आहे!

Anaani
Friday, March 31, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maalaa pan ase 1-2 anubhav aale aahet. Gujaraath dangalichyaa veli. maalaa raatree swapanaa padale hote ki lok ekmekanna jaaltaayet. aani maalaa tyayt ek maazi friend aani ticha navaraa disat hote. actually te tikade rahat naahit. mi sakali office madhye gelyaavar E-salkal vachala tevha dangalichi baatami vaachun kharach surprise zaale.such things happens........i don't know how.
Ajun ekda aasch mazya bahini baddal swapn padal hote ki...she is out for some party and one man did something wrong with her..... what i could not see. i was a bit worried whole night. and next day when i called her...she said she lost her money bag from the company.

Dineshvs
Friday, March 31, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असे अनुभव बर्‍याच वेळा येतात. स्वप्नात किंवा जागेपणीहि असा एखादा प्रसंग घडतोय असे वाटते. अगदी पुर्ण डिटेल्स सकट सगळे जाणवत राहते. त्यावेळी काहि रिलेवन्स लक्षात येत नाही. स्थळ व्यक्ती ओळखीच्या असतात असेहि नाही.
आणि मग कधीतरी ते सगळे प्रत्यक्षात घडते. जेंव्हा ते घडते त्यावेळी हे सगळे आधी आपण अनुभवले आहे हे जाणवते. पण त्या प्रसंगाचे महत्व तो घडुन गेल्यावरहि कळत नाही. एकदा ते लिहुन ठेवायचा प्रयत्न केला, पण मग ते सुटले. अनुभव मात्र अजुनहि येतात.
यात काहि धोक्याची सुचना असते असेहि नाही. किंवा आनंदाचा प्रसंग असतो असेहि नाही. फ़क्त आधी अनुभवले असते ईतकेच.



Megha16
Friday, March 31, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतके दिवस मला वाटत होत की मला अधुन मधुन होणारे भास ही मझी कल्पना असावी.
पण आता इथे वाचल्या वर जरा बर वाटल, माझ्या सारखे पण काही लोक आहेत ज्यांना असे भास होत आहेत. माझ्या नवरयाने तर मला वेड्यातच काढल होत.
बरयाचदा मला ही अस जाणवत की जे काही घडतय ते मी आधीच पाहिल आहे, म्हणजे मला अगदी प्रकर्शाने जाणवत की हे मी पाहिलेल आहे म्हणुन पण व्यवस्थित्त आठवत नाही.
आणी दक्षिणा तुला जस वाटत ना तस मला ही कधी कधी वाटत एखाद्या अनोळ्ख्या व्यक्तीला पाहिल्यावर असच वाटत आपण बहुतेक याला आधी पाहिलेल आहे.
हे का होत हे मला ही माहित नव्हत आता पर्यत.
अजुन एक आहे की बहुधा सगळ्यांना माहित असेल की ज्यांच्या जिभेचा शेंडा काळा असतो त्यांच बोललेल खर होत. माझ्या बाबतित अस होत थोडफार माझा जास्त नाही पण थोडा काळा आहे.
हे खर आहे का?


Ameyadeshpande
Friday, March 31, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा तुला लोकांनी मग लिहून द्यायला पाहिजे त्यांना हवं ते आणि तुझ्या कडून म्हणून घेतलं पाहिजे ... (गम्मत करतो आहे, तुझं म्हणणं खोट आहे अस अजिबात म्हणत नाहिये)

Moodi
Friday, March 31, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा तसा गैरसमज नको करुन घेऊस.

एक आहे बरेचसे सायन्स वाले म्हणतात हे खोटे आहे, म्हणजे भविष्य, नक्षत्र etc etc etc . अगदी माझा दीर सुद्धा वाद घालतो माझ्याबरोबर असा. तरी मी माझ्या परीने त्याला जी उत्तरे द्यायची ती देतेच.

एखाद्याचा दात दुखतोय, कळ मारतेय पण ती त्यालाच जाणवते ना?
की तो समोरच्याला दाखवु शकतो, अरे ही बघ ही कळ. आता ती गोरी का काळी हे कुणी पाहिलेय? किडलेला दात दिसतो डेंटीस्टला पण ती कळ दिसेल का? दिसत असेल तर दाखवा अन नसेल दिसत तर मग हे पण बोलु नका.

अनुभवांवर विश्वासच नसेल तर मग त्या बाबतीत न बोलणेच चांगले नाही का?

असामी तुमचा मुद्दा एकदम मान्य. पक्षांचे उदाहरण मी अशासाठी दिले की वातावरणातील बदल हे त्याना जेव्हा जाणवतात, तेव्हा ते बोलुन दाखवु शकत नाही, पण हालचालीद्वारे किंवा त्यांच्या भाषेत ओरडुन दुसर्‍या पशु पक्षाना जाणिव करुन देतातच अन स्वत पण सावध होतात.

मात्र माणसाला असे अनुभव वेगळ्या पद्धतीने आले तरी कुणी त्यावर विश्वास ठेवत नाही.
म्हणुनच बरेचसे लोक बोलायला घाबरतात.


Chinmayee
Friday, March 31, 2006 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कधी कधी काही गोष्टी एकदम मनात येउन जातात आणि नंतर त्या गोष्टी होउन गेल्या कि त्याची जाणीव होते कि आधि आपल्याला माहित होत फिकटस पण आपण लक्ष नाही दिल त्या गोष्टीकडे. पण नंतर विचार करुन काही उपयोग नसतो आश्या गोष्टींचा.... मला वाटते हे सगळ्यांसोबत होत आसव. आपले सगळ्यांचे काय मत आहे ...?:-)

Manuswini
Saturday, April 01, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर प्रत्येक वेळेला अशी स्वप्न बर्याच वेळा पडतं.
एकदा मला मी hospital च्या बाहेर उभी आहे आणी कोणी २ लहान मुले घेवुन बाहेर आले असे स्वप्न.
दुसर्या दिवशी गेले office ला तर माझ्या दुरच्या मैत्रिणीचा( I had no contacts or news that she was pregnant or so ) नवरा चक्क मला भेटला in lunch time in NY's restraurant मधे आणी मी म्हटले ईकडे कुठे तर आम्ही एथेच रहातो. आज निलुची delivery आहे. नंतर कळले की तिला जुळी झाली.

आणी कित्येक वेळा त्या स्वपनांचा अर्थ ही समजत नसतो त्या वेळेला.
घाबरुन उठते.
आणी असच काहीस नंतर एकायला येते जे स्वपनात पाहिले ते कोणा दुसर्या बाबत किंवा वाटते अरे हे मी एकलय

आणी काही वेळा काही लोक मला उगाच आधी पाहिल्यासारखी वाटतात.

कधी कधी तर बसल्या बसल्या असाच डोक्यात विचार येतो कशाही बद्दल आणी दुसर्या क्षणाला तसच होते

काहेसे intution हे सगळ्याना होत असावं थोड्याफार प्रमाणात असे मला वाटते.


Manuswini
Saturday, April 01, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे मूडी,
तु जरा details मधे त्या ग्रह,भविष्य bb वर नेपच्युन तिसर्या स्थानात असेल तर काय असु शकते या वर प्रकाश टाकशील का जमले तर?

आणे तो ही वृश्चिक राशीत असेल तर?

मला हे सारखे सारखे वाचुन खुपच ऊत्सकता झालीय.

तुझे knowledge बाकी या विषयात कमाल आहे बाई


Chafa
Saturday, April 01, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किडलेला दात दिसतो डेंटीस्टला पण ती कळ दिसेल का? दिसत असेल तर दाखवा अन नसेल दिसत तर मग हे पण बोलु नका.

>>>> एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर " हो " , ती कळ दिसू शकेल. शकेल कशाला दिसते! विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की स्त्रीयांना delivery आधी येणार्‍या कळाही ( contractions ) डाॅक्टरांना स्क्रीनवर स्पष्टपणे पहाता येतात. आणि या किंवा कुठल्याही कळा नुसत्या दिसतच नाहीत तर त्या मेंदूला त्या उत्पादान न करण्याची व / वा न ओळखण्याची " आज्ञा " विज्ञानाला देता येते.

राहीला ग्रहांचा, नक्षत्रांचा संबंध, तर यावर माझे मत मैत्रेयीसारखेच आहे हे नव्याने सांगायला नकोच. :-)

Deja Vu म्हणजे आधी हे असे कुठेतरी अनुभवल्यासारखे वाटणे हा आपल्या मेंदूचाच एक flaw आहे. जवळजवळ ७० टक्के लोकांना Deja vu चा कधीनाकधी अनुभव आलेला असतो. पण असे वाटणे हा केवळ एक भास असतो; तसे खरोखर घडलेले नसते. यावरची एक scientific documentary पूर्वी पाहील्याचे आठवते.


Moodi
Saturday, April 01, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही म्हणता ते जिथे ही सुविधा उपलब्ध आहे तिथेच ते दाखवु शकणार ना? विज्ञान पुढे गेले आहे हे ही मान्य. जसे चंद्राच्या मुळेच भरती ओहोटी येते हे ही दिसते. पण केवळ आपला विश्वास नाही या आधारावर दुसर्‍याचे म्हणणे, अन ते ग्रह नक्षत्र खोटे आहे हे म्हणणे हे मला चुकीचे वाटते. आयुर्वेद हे भारतात हजारो वर्षापासुन आहे अन त्याचा तेवढाच चांगला उपयोग होतो,पण भारताबाहेर कॅनडात वगैरे ते ही औषधे आणु देत नाहीत मग ते म्हणतात आयुर्वेद खोटे,तेव्हा आपण पण गोरे म्हणतात म्हणुन आयुर्वेद खोटे असेच मानायचे का?


To be very frank मी नेमस्तकाना ह्या गोष्टीसाठी वेगळा बीबी सुरु करा असे सांगीतले नव्हते, तो अनुभव मी जी एस यांच्या लिखाणात मांडला होता. जर असे अनुभव वेगळे मांडले तर लोक दुसर्‍याला मुर्खात काढतात याची पुर्ण जाणीव मला होती. मला इथे कुठल्याही प्रकारचा वाद वाढवायचा नाही.

आणी हो ग्रह तारे यांच्यावर माझा विश्वास नाही असे प्रत्यक्षात म्हणणारी कित्येक माणसे कुणाला न सांगता ज्योतिष्याकडेच लाईन लावुन उभी असतात हे मी स्वता पाहिलेय अन ते ही पुण्यातच. No V&c Please . कारण हा अनुभवांचा बीबी आहे v&c नाही.



Bsk
Saturday, April 01, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'One speculative explanation of Deja Vu is that it may occur as a result of the left and right hemispheres of the brain being slightly out of synchronisation.The slight delay in communication causes the two hemispheres to function,momentarily,as two separare consciousnesses.This may explain why deja vu is 'sometimes' associated with epilepsy and the aura(forewarning) that precedes migrane.'
- from "Making the most of your Brain" by Readers digest..

btw, just for information, 'Jamais vu is the converse of Deja vu. instead of something new feeling familier,something known feels strange.Like, you might be in your own home when suddenly the furniture and the layout strike you momentarily as utterly unfamilier.'

Yog
Saturday, April 01, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi,
well said... जसे जन्मभर अन्धार कोठडीत असलेल्या मनुष्याला सूर्यग्रहणाबद्दल काही उमजत नाही किव्वा तसे काही नसतेच या स्वताच्याच गैरसमजात तो असतो तसेच ज्या गोष्टि comprehend करू शकत नाही वा स्पष्टीकरण देवू शकत नाही त्यावर मग मनुष्य, असे काही नसतेच कीव्वा इतर दुसरीच कारणे देवून पळवाटा शोधून काढतो... कुणी मानल वा न मानल तरी घटना अन वस्तूस्थिती बदलत नाही. as u rightly said this is bb of my exp. and not v n c :-)

Rupali_rahul
Saturday, April 01, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला मला या गोष्टींबद्दल बोलयला एक स्वतंत्र व्यासपीठ मिळल्यासारख वाटत आहे. मी अश्या प्रकारचा बीबी उघडण्याचा विचारच करत होते.
मला पण अशीच स्व्प्न पडत असतात. बर फ़क्त अशी स्वप्न तर पडतात पण ते स्वप्न मला पडलेला हे मी माझ्या मैत्रिणिंना पण सांगताना दिसत आणि प्रत्यक्षात तसे फ़ार वेळ घडते. अजुन एक अनुभव म्हणजे दक्षिणा बोलते तसे समोरच माणुस कसा आहे आणि आपले त्याच्या बरोबर पटेल की नाही ह्याचे ही कधी कधी मला
intutions होतात. माझ्या आई, वडिलांना भले ते खर नको वाटु देत. मला घरात जर काही वाईट घडणार असेल तर त्याबद्दल अगोदरच कळते. पण कधी कधी याची फ़ार भीती वाटते.
मला कधी कधी असे वाटते की कोणितरी माझ्या बरोबर आहे, मी पाठी वळुन बघते तेव्हा तिथे कुणिच नसते असे का??? मुडी काही सांगशिल का याबद्दल???? फ़क्त मलाच असे अनुभव येतात की अजुन कुणाला येतात?


Moodi
Saturday, April 01, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु नेपच्युन विषयी मी ज्योतिष्याच्याच बीबीवर जरुर लिहीन.

Chafa
Saturday, April 01, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, आयुर्वेदावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याचा इथे का उल्लेख आला? किंवा 'गोरे म्हणतात म्हणून' याचाही संबंध कळला नाही.

Bsk , उत्तम माहीती. मी परवा एका कार्यक्रमात एका मुलीचे मेंदूचे operation होत असतानाही ती जागे राहून सर्जनशी बोलत असतानाचे चित्रीकरण पाहीले! विज्ञानाची झेप पाहून थक्क व्हायला होते खरे! आणि तिथे कुठल्याच 'पळवाटा' नसतात बरं!
~~D

विषय अपरिहार्यपणे My Experience पासून दूर चालला आहे खरे. तेव्हा येऊ द्यात अजून अनुभव. :-)

Intution हा प्रकार मात्र थोडा वेगळा असावा. त्यात मेंदूचा flaw नसून त्याची हुशारी असणार. :-) आणि अनिलभाईंना तसे अनुभव हवे होते असं मला वाटतंय.


Moodi
Saturday, April 01, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा साधारण एक वर्षापूर्वीच कॅनडा सरकार ने आयुर्वेदीक औषधांच्या बाबतीत अडवणूक केली होती. दुर्दैवाने बर्‍याच ठिकाणी हे गोरे लोक आपल्या डॉक्टर्स ना अन त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाला कमी लेखतात.

पण हेच लोक भारतात येऊन त्या पद्धतीने उपचार करुन घेतात, कारण ते त्याना डॉलर्सच्या मानाने स्वस्त पण पडते अन तेवढे तज्ञ आहेतच आपले लोक. पण परदेशात मलाच माझ्या इथे अनुभव आला की जेव्हा आमच्याच इथल्या काही भारतीय अन एका विदेशी मुलीला मी आयुर्वेदीक औषधांची माहिती दिली अन अनुभव सांगीतले तेव्हा त्यानी ते नाकारले अन हे इथे म्हणजे युरोपीय देशात चालत नाहीत असा वाद घातला.

ही वस्तुस्थिती आजही आहे की भारतीय लोक आपल्याच लोकांचे अनुभव अन ज्ञान खोटे ठरवतात पण तेच जर एखाद्या अमेरीकन किंवा ब्रिटिशाने सांगीतले की ते मान्य करतात. अगदी ते हळद अन कडुलिंबाचे पेटंट घेण्यापर्यंत का मग मजल जाईना. हळद अन कडुलिंबाचे औषधी गुण तर भारतात हजारो वर्षापासुन आहेत पण त्याकरता आपल्याच लोकाना ते पेटंट घायला झगडावे लागते अन त्यापासुनच पुढे हे गोरे किंवा इतर लोक औषधे बनवुन दामदुपटीने आपल्याला विकतात. पण जसे हे लोक एक होवु शकतात तर आपले का नाही?

नॉस्ट्रॅडॅमस म्हणतो ते खरे अन दाते पंचांग म्हणते ते खोटे, ही कुठली लोकांची समजूत हेच मला कळले नाही. मी व्यक्तीश हे बोलत नाही पण लोक भारतीय ज्योतिष्यापेक्षा परकीयांवर कसा विश्वास ठेवतात याचेच मला नवल वाटते.

अनुभव आला म्हणुन तर मी इथे तो मांडला. पत्रिका मला समजतात पण त्यातील काही उदाहरणे इतकी वाईट आहेत की तशी ती इथे दिली तर संबंधीत व्यक्तीला त्याचा कधी पण त्रास होवु शकतो, त्यामुळे अशा गोष्टी कधीच माझ्याकडुन उदाहरणे म्हणुन सुद्धा वापरली जाणार नाहीत. अपवाद फक्त मी एकच पत्रिका दिली होती मायबोलीवर पण ती पुर्ण दिली नव्हती.. त्यामुळे कृपया जर माहीत नसेल तर, नक्षत्र ग्रह हे खोटे आहेत हे बोलण्यात काहीच पॉइंट नाही.

आयुर्वेद हा या बीबीचा विषय नाही,पण एक उदाहरण म्हणुन मी ते दिले. जेव्हा लोकाना हे गुढ अनुभव येतात ते सगळेच मान्य करीत नाहीत तेव्हा ते त्याना कुणाला तरी सांगावेसे वाटते. जर मायबोलीवर प्रेम, दुख्ख, लग्न, लग्नाशिवाय रहाणे असे विषय चालतात तर मग हा का नाही एवढेच मला आश्चर्य वाटते. अंधश्रद्धा अन श्रद्धा यातील फरक माहीत आहे सगळ्याना.


Hawa_hawai
Sunday, April 02, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे अनुभव लिहा रे... चर्चा करायला V&C आहे ना?

हा माझा एक अनुभव.

काही वर्षांपूर्वी दिल्ली - जैसलमेर - जोधपूर अशी एक ट्रीप plan केली होती मित्र-मैत्रीणींबरोबर. आज दुपारी रेल्वेने आम्ही निघालो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी दिल्लीत पोहोचलो. हाॅटेलमधे सामान टाकून थोडा आराम, आंघोळ वगैरे केली आणि अचानक पोटात दुखायला लागले. ट्रेनमधले काल खाल्लेले अन्न बाधले की काय असा विचार करत, थांबेल थोड्यावेळानी म्हणून दुर्लक्ष केले आणि दिवसभराच्या दिल्ली दर्शन साठी सगळे बाहेर पडलो. दिवसभर दिल्ली संध्याकाळच्या ट्रेननी जैसलमेरला जायचे असा plan होता. थोड्यावेळाने पोट दुखण्याबरोबरच एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. आपले पोट दुखतेय, अस्वस्थ वाटतेय हा एकच विचार आणि हे दिल्ली दर्शन वगैरे बोर होतय हा दुसरा विचार. एका मेडिकल शाॅप मधे जाऊन औषध घेतले तरी पण काही बरे वाटेना. मग आणखी वेळ गेला तसं मला यापुढे आपण पुढची ट्रीप करू नये आणि लगेच घरी परत जावे असे वाटु लागले. एकटे असतांना आपल्यापूरता विचार करून निर्णय घेणे नेहमीच सोपे जाते पण इथे बरोबर सगळे होते. काय करावे काही सुचेना. मी पुढे येत नाही म्हटले तर सगळेच मला ओरडले असते. तरी शेवटी मनाचा हिय्या करत मी त्यांना सांगितलेच की मला बरे वाटत नाहीये तर मी काही पुढे येत नाही, मी परतीची ट्रेन, flight जे काय मिळेल ते घेईन पण मला परत जायचं आहे. सगळ्यांनी थोडावेळ समजावले की तुला homesick वाटत असेल, पोट दुखणे उद्या पर्यंत थांबेल ई. पण तरी मला अजिबात ती ट्रीप पुढे continue करायची इच्छा होईना.

शेवटी परत जायचा निर्णय पक्का केला आणि घरी आईला फोन लावला. तिला सांगितले की मला काही बरं वाटत नाहीये त्यामुळे मी परत येत आहे. यावर आईनी एकदा चौकशी केली काय होतय वगैरे आणि शेवटी म्हणाली की आम्ही विचारच करत होतो तुला फोन करायचा कारण आज सकाळ पासून आजोबांची तब्येत ठिक नाहीये. पण तू ट्रीप वर enjoy करायच्या मूड मधे असशील म्हणून कळत नव्हतं तुला कळवावं का नको. पण तू ठरवलच आहेस परत यायचं तर वापस ये.

फोन ठेवला आणि लगेच मी आणि माझा एक मित्र रेल्वे स्टेशन वर गेलो. नशिबाने तिकिट मिळाले. या सगळ्या मधे दुपार झाली होती एव्हाना माझे पोट दुखणे, अस्वस्थ वाटणे सगळे काही थांबले होते. उरलेला वेळ मग ईतर दिल्ली भटकण्यात घालवला. आणि संध्याकाळच्या ट्रेन नी मी परतीच्या मार्गाला. निघता निघता बाबांना फोन लावला आजोबांची चौकशी करायला तर ते म्हणाले की सकाळपेक्षा आता चांगले आहेत, आत्ताच त्यांनी थोडा दहीभात पण खाल्ला वगैरे. बाबांना सांगितले की ट्रेनमधे असतांना mobile नेटवर्क बहुदा नसेल तेव्हा आता उद्या सकाळीच बोलू. रात्री पुन्हा ट्रेनमधेच जेवण केले आणि ताणून दिली. दिवसभर भटकल्यामुळे दमल्याने का ती अस्वस्थता गेल्याने माहीत नाही रात्री गाढ झोप लागली. जाग आली ती एकदम सकाळी उशीरा. mobile काढला घरी फोन लावायला तर बाबांचा SMS येऊन पडलेला,
aajobaa expired

माझे आजोबा त्याच दिवशी रात्री गेले. मी सकाळी येणार म्हणून त्यांना बर्फाच्या लादीवर रात्रभर ठेवलेले. ते गेले तेव्हा सगळे त्यांच्या जवळ होते, मी सोडून. पण तरिही मला वाटले / वाटते की ती अस्वस्थता हा मला कुठूनतरी मिळालेला सिग्नल होता, "घरी परत जा" सांगणारा. त्या दिवशी घरी परत नं जाता ठरलेल्या plan प्रमाणे पुढे जैसलमेरची ट्रेन घेतली असती तर माझा mobile संपर्क घरच्यांशी राहीला नसता. आजोबांना तर कधीच पाहता आले नसते आणि आपल्या घरच्यांना आपली गरज होती तेव्हा तिथे नसल्याची बोच ती पण भरून निघाली नसती.


Moodi
Sunday, April 02, 2006 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह ह म्हणुन तर हे अनुभव मग काही वेळा मनाला चटका लावुन जातात.

फ्रेंच तत्ववेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याच्या बोलण्याचा त्याला अन त्याच्या मित्राना अनुभव यायला नुकतेच सुरुवात होती. ते ऐकुन एक दिवस राजानेच राजवाड्यावर एक पार्टी ठेवली अन शिकार करुन आणलेल्या पांढर्‍या अन काळ्या डुकराबद्दल माहिती दिली, अन नॉस्ट्रॅडॅमसला विचारले की आज रात्री पार्टीत कोणते डुक्कर असेल जेवणात, तर तो म्हणाला की काळेच असेल. राजा मनात हसला अन त्याचे आचार्‍याला सांगीतले की पांढरेच शिजवायचे अन याची फजिती करायची.

जेवणाच्या वेळेस सर्वांसमोर राजाने सांगीतले की नॉस तुझे भविष्य खोटे ठरलेय, जेवणात पांढरे डुक्कर आहे. तो म्हणाला महाराज मी खोटे बोलत नाही आचार्‍याला विचारा. आचार्‍याला बोलावले तर तो थरथरत म्हणाला की पांढरेच शिजवले होते, पण रात्रीच्या अंधारात स्वयंपाक घरात मागच्या दाराने लांडगा आला अन त्याने ते पळवले, जेवायला आयत्या वेळेस काय आणणार म्हणुन काळेच शिजवले, मला माफ करा. राजा काही बोलला नाही. पण त्या दिवसापासुन नॉस्ट्रॅडमसची बरीचशी भाकिते खरी ठरत गेली. अर्थात त्यातली काही अजीबात खरी ठरली नाही. पण वर्ल्ड टॉवर विषयी त्याने सुचना दिली होती. अर्थात ती भाषा जरा गुढच आहे.


Yog
Sunday, April 02, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HH अनुभव बोलका आहे. mobile out of range किव्वा पोटदुखी इत्यादी वैज्ञानिक बाबी(आता out of range ही विज्ञानाची बुडी पाहून कीव येते.. अन तुझ्या पोटदुखीच्या कळा दिल्लीच्या प्रदूषणामूळे झाल्या की त्यात तुझ्या मेन्दूचा flaw होता हा भाग वेगळा :-))सोडता तुला प्रकर्षाने परत जावेसे वाटत होते अन त्याच वेळी घरच्याना तुला फोन करून कदाचित बोलावून घ्यावेसे वाटत होते हाच तो " विलक्षण " अनुभव!

Moodi
Sunday, April 02, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग असे काही अनुभव उपासनेत / अध्यात्मात प्रगती झालेल्याना पण येतात, पण आजकाल देवावर कुणी विश्वास ठेवतात म्हटल्यावर हे काय मागासलेले काम म्हणुन त्याची हेटाळणी होते.





Karadkar
Monday, April 03, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला कुणाला स्वप्नात देवाच्या सुन्दर मुर्ती जसे गणपतीची पूर्ण सोन्याची मुर्ती, शंकराची पिंडी असे काही दिसलेय का?कोणीतरी मला त्याचा significance सांगु शकेल का?

कुणाची चेष्टा करण्याच्या उद्देशाने हे लिहीले नाहीये. माझा देव ह्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास आहे.


Seema_
Monday, April 03, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला स्वप्नांवर आहे विश्वास . बरेचवेळा काही स्वप्नांमुळ काहीतरी चांगल , किंवा वाईट भविष्यकाळात होईल अस माझ्या मनाला वाटत आणि तस झालही आहे . अर्थात यावर विश्वास ठेवण न ठेवण हा ज्याचा त्याचा प्रश्न .
आणि काही वेळा उगाचच मन उदास होण , हुरहुर वाटण अस होतच असत कि आपल्याला . ते का होत मग ?.

मिनोती आई कडे पुस्तक आहे याबद्दल . विचारते तीला .


Pinkikavi
Monday, April 03, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही देवांच्या मुर्ती दिसतात नेहमी स्वप्नात.खासकरुन वणीची देवी तर नेहमीच......माझ्या माहितीप्रमाणे देवाने जर असे स्वपनात दर्शन दिले तर ती देवता आपल्यावर प्रसन्न अस्ते आणि अशी स्वप्ने शुभसुचक असतात....

Maudee
Monday, April 03, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक स्वप्न नेहमी पडते....आगदी लहानपणापासून......सगळीकडे खूप खूप पाणी वाढत असते......आणि मी पळत असते....माझ्याबरोबर माझी एक मैत्रिण पण असते....पण माझ्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात ती वेगळी असते....शेवटी पाणी इतके वाढते मी कि घाबरून जागी होते...कोणी याचा अर्थ सान्गू शकेल का??

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators