|
Anilbhai
| |
| Wednesday, March 29, 2006 - 4:09 pm: |
| 
|
पुष्कळ्दा अपल्याला पुढे कधी तरी घडण्यार्या गोष्टींची चाहुल लागते. कधी स्वप्नाद्वारे तर कधी भास होवुन. तर असे अनुभव तुम्हाला आले असतील तर ते इथे लिहा
|
Moodi
| |
| Wednesday, March 29, 2006 - 12:29 pm: |
| 
|
एक घटना सांगते. इकडे आल्यावर सकाळी अलार्म व्हावा म्हणुन घड्याळ कम रेडीओ सेट केला. मागे सुनामी झाली त्याच दिवशी रविवार असल्याने आम्ही उशिरा उठलो पण रेडीओ वर बातम्या चालू असल्याने मला स्वप्न पडले अन चहू बाजुला पाण्याने वेढलेले, पांढर्या संगमरवरातले अन खुप मोठे आवार असलेले मंदीर दिसले, बरीच लोक होती, मंदिराचा गाभारा अगदीच छोटा असल्याने आत फक्त पुजारी अन बाकी सर्व बाहेर आवारात असे दिसले अन मी पण तिथे आहे असे दिसले. सकाळी उठुन मग नेट लावले, टीव्ही लावला तेव्हा सुनामीचे कळले, अन मी जाम हबकले. नेमके वर्षभराने तामिळनाडू येथे त्या लोकाना श्रद्धांजली म्हणून जे मंदिर उभारले आहे ते अगदी मला स्वप्नात दिसले तसेच आहे. हा योगायोग मी कधीच विसरु शकत नाही. मी तो मंदिराचा फोटो जेव्हा लोकसत्ता की सकाळ मध्ये आला तेव्हा सेव्ह केला. मला माहीत आहे की हे वाचल्यावर खुप लोक मला मुर्खात काढतील, काढू दे मी पर्वा करीत नाही, पण premonition वर मी किरो याच्या पुस्तकात सुद्धा वाचलय. गुढ गोष्टींची आधीच जाणीव होणे, अकल्पीत कळणे हे बर्याच जणांच्या बाबतीत घडते.
|
Shyamli
| |
| Wednesday, March 29, 2006 - 12:36 pm: |
| 
|
>>>>>>गुढ गोष्टींची आधीच जाणीव होणे, अकल्पीत कळणे हे बर्याच जणांच्या बाबतीत घडते. येस मुडे मला पण अश्या गोष्टी होतात.... अगदि घरातल जर कोणि सन्कटात असेल तर.... जवळचे कोणि गेले तर....मला त्याची जाणिव होते आधिच आणि घाबरायला होते.....मग.... अंधश्रद्धा म्हणेल कुणी याला... असो....... " bb change करणार का mod "
|
Ldhule
| |
| Wednesday, March 29, 2006 - 3:40 pm: |
| 
|
यावर 100 Days नावाचा हिन्दी सिनेमा आला होता. माधुरीचा.
|
Gurudasb
| |
| Wednesday, March 29, 2006 - 5:34 pm: |
| 
|
मुडी , ह्या स्वप्नातील अगर जागृतावस्थेत सुचना कर्क लग्नी चंद्र , नेपच्यून किंवा अष्टमात नेपच्यून असताना प्रकर्षाने होतात का ग ? बर्याच पत्रिकात हे आढळते .
|
Moodi
| |
| Wednesday, March 29, 2006 - 5:43 pm: |
| 
|
हो गुरुकाका. मी लिहीते उद्या किंवा जमल्यास आजच यावर सविस्तर. 
|
Dakshina
| |
| Thursday, March 30, 2006 - 4:33 am: |
| 
|
मी याला Sixth Sense म्हणेन, माझ्य मते बहुतेक वेळा आपल्याला आजुबाजुला घडणार्या गोष्टींमुळे पुढे काय होणार याचा आडाखा म्हणा किंवा आंदाज असतो. अर्थात मूडीचे स्वप्नं हा एक योगायोग आहे म्हणा. माझा ही या गोष्टीवर विश्वास आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात मला तसा अनुभव आलेला नाही. प्रथमच पाहीलेल्या एखाद्या माणसाबद्दल काहीतरी वेगळं Feeling येणं किंवा त्या माणसाशी आपली मैत्री वाढेल किंवा कधीच पटणार नाही अशा प्रकारचे Senses मला बर्याच वेळेला आलेले आहेत, आणि ते खरेही ठरलेत. याला जर काही शास्त्रीय base असेल तर मला वाचायला आणि माहीती घ्यायला नक्कीच आवडेल.
|
khali bagha lagech nostradamus online chi ad. ali ahe baki dakshina tu lokanbaddal je mhantes te kharay pan te mostly anubhavatun vaatta asa maza mat ahe...body langauge varun hi kalta eka kshanaat...
|
Tanya
| |
| Thursday, March 30, 2006 - 6:07 am: |
| 
|
मी आतापर्यंत या विषयावर कधीच कोणाशी बोलले नव्हते. आपल्याला मुर्खात काढतील या जाणिवेने. पण मला भास / स्वप्न नक्की ठाऊक नाही, पण कधीतरी काही घटना घडत असतात, आणि मला वाटते की मी हे आधी अनुभवल आहे. या विषयावर नक्कीच इतरांची मतं ऐकायला आवडतील.
|
Bsk
| |
| Thursday, March 30, 2006 - 6:40 am: |
| 
|
tanya,mala pan asa anubhav yeto..tyala 'deja vu' mhantat.. hello all,am new here..itake diwas read only mode madhe hote..
|
Chioo
| |
| Thursday, March 30, 2006 - 7:55 am: |
| 
|
Dakshina aani Tanya, malapan tumachyasarakhech anubhav yetat. mala kadhi kadhi ekhadi ghatana ghadat asatana khoop prakarshane janavate ki, he mi aadhi baghitale aahe. anai yanantar pudhe kay honar aahe hepan mala aathavate. aani te sagale tase hote. baryachada mala hehi aathavate ki, mi hi ghatana aadhi abghitali hoti, tevha vatale hote ki, chhe.. ase ghadane kase shaky aahe. pan aata tech ghadat asate. yache ek udaharan mhanun.. mi aani maza navara doghehi ekach institutemadhe hoto. aamacha motha friend circle hota aani tithe shikat asatana aamhi fakt friends hoto. nantar ek-ek karun sagale dusarikade jobsathi gele aani aamhi doghech rahilyavar haluhalu vatu lagala ki, hach to anai hich to. aani jevha aamhi he bakichyana sangitale tevha mala janavale ki, he asa sangana mi aadhich anubhavale aahe. aani tevha mi asapan vichar kela hota ki, ha mulaga maza fakt mitr aahe, mi yachyashi lagnabaddal bakichyana kay sangate aahe. kahitarich. mi aadhi kase sangitale hote aani tyaavr bakichyanchya reactions kay hotya he sagale tantotant ghadat hote. ase khoop kisse aahet. ekhadi vyakti bhetali kinva nusata photo baghitala tari mala janavate, ti vyakti kashi asel. agadi kwachit maze andaj chukatat pan poornpane kadhich nahi.
|
Moodi
| |
| Thursday, March 30, 2006 - 1:43 pm: |
| 
|
खरे तर हा ज्योतिष्य चा बीबी नाही पण काही जणांच्या अन विशेषता गुरुकाकांच्या माहितीकरता लिहीते. आपल्या पत्रिकेत जर ३, ५, ९ अन ११ या स्थानात नेपच्युन किंवा चंद्र असतील किंवा यांची युती म्हणजे हे एकत्र असतील तर पुढे घडणार्या गोष्टींची आधी जाणीव होवु शकते. गुरु अन नेपच्युनचा युतीयोग सुद्धा असे अनुभव देतो. माझ्या शेजारी एक तामिळ मुलगी आहे. अतिशय देखणी, हुशार आहे. हिला असे अनुभव वयाच्या १२ व्या वर्षापासुन येत आहेत. मध्ये जरा कमी झाले होते पण ते परत सुरु झाले. हिच्या आईची सोन्याची अंगठी एकदा हरवली. आई मुंबईत होती अन ही त्या वेळी युके मध्ये. हिला स्वप्न पडले की आईची अंगठी हरवलीय अन ती घरात पाण्याच्या पिपाजवळ आहे. हिने सकाळी फोन करुन लगेच विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की हो अंगठी २ दिवसापूर्वी हरवलीय. मग हिने आईला सांगीतले की पाण्याजवळ शोध. अन ती नेमकी बाथरुमध्येच पाण्याच्या पिपाजवळ मिळाली. तिला बरेच अनुभव आले. ज्या मैत्रीणीशी वाद झाला ती पण फोन करत आहे असे दिसले अन नेमका तोच अनुभव आला. छान योग आहेत हिच्या पत्रिकेत तसे. खरे तर पशु पक्षांना ही जाणीव आधीच असते. सुनामीच्या वेळी श्रीलंकेच्या प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी तेथील उंच टेकडीसारख्या भागावर आधीच जाऊन बसले. त्यातील एकाही प्राणी अथवा पक्षाला त्रास झाला नाही, पण माणसे या सुचना न मिळाल्याने दुर्दैवाने जीव गमावुन बसली. बरेच शास्त्रज्ञ जे हवामान, भुकंप, पूर यासारख्या भौगोलीक गोष्टींचा अभ्यास करतात, त्यांच्या सुद्धा ही बाब लक्षात आलीय अन त्यावरही संशोधन चालू आहे.
|
Milindaa
| |
| Thursday, March 30, 2006 - 3:20 pm: |
| 
|
म्हणजे सगळ्या पशु पक्षांच्या कुंडलीत हे ग्रह असेच असतात का ? हा जोक नाही, देशाला पण कुंडली असते तर पक्षांना का नसावी हा माझा विचार..
|
Dha
| |
| Thursday, March 30, 2006 - 3:37 pm: |
| 
|
चिऊ,तन्या, मलाही तुमच्यासारखे अनुभव खूपवेळेस आले आहेत. अगदी छोटे छोटे प्रसंग आधी घडले आहेत असे मलाही वाटत. पण आत्तापर्यन्त मी दुर्लक्षच करत आले.मला वाटलं फ़क्त मलाच असे वाटतं.
|
Moodi
| |
| Thursday, March 30, 2006 - 4:12 pm: |
| 
|
मिलिंदा पशु पक्षाना 6th sence पण असतो असे म्हणतात. मात्र तुझा हा प्रश्न तू ज्योतिष्य बीबीवर MNC ना विचारुन बघ. ते अगदी समर्पक उत्तर देतील. अन अनुभव हे माणुस फक्त सांगु शकतो, दाखवु शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ह्या गोष्टी खोट्या आहेत. जे जाणवते ते विचित्र असते हे खरे. जर नीट अभ्यास असेल तरच यात पुढे जाता येते. बरे झाले हा विषय अनिलभाईनी V&C मध्ये नाही टाकला. Thanks अनिलभाई. 
|
Asami
| |
| Thursday, March 30, 2006 - 5:03 pm: |
| 
|
CBDG पण मला वाटते, काही पशू पक्ष्यांचे sensory perception चांगले असते त्यामूळे त्यांना ह्या गोष्टींची चाहूल लागते
|
Maitreyee
| |
| Thursday, March 30, 2006 - 5:13 pm: |
| 
|
agree with asami , पशु पक्ष्यांची श्रवण तसेच घ्राणेन्द्रिये आपल्याहून तीक्ष्ण असतात म्हणून त्यांना लवकर समजते. उदा. एक आंधळा - बहिरा आणि एक नॉर्मल माणूस रस्त्याच्या मधे उभे असतील तर समोरून येत असलेला ट्रक नॉर्मल माणसाला लवकर कळेल ना!! तसेच झाले हे, यात नेपच्युन, हर्शल इ. चे काही काम नसावे असे मला वाटते 
|
Bee
| |
| Friday, March 31, 2006 - 5:44 am: |
| 
|
मग ते अनुभव कुठले जे आपल्याला हे असे आधी घडले आहे असे वाटत राहते? काय बर म्हणतात त्याला. मी विसरलो तो शब्द. पण बर्याचदा असे होते की एखादी गोष्ट करताना ही गोष्ट आपण पूर्वी केली आहे असे वाटत राहते.
|
Giriraj
| |
| Friday, March 31, 2006 - 5:53 am: |
| 
|
होना!वटवाघळाला श्राव्यातित ध्वनी ऐकू येतात. सापाला बाजूच्या परीस्थितिचा धोका किंवा अंदाज येतो तो हवेत झालेल्या दाबाच्या बदलाने. वैद्यक खूप पुढे गेले असले तरी आजही मेंदूच्या क्लिष्ट रचनेत काय काय शिजत असतं ते कुठे सांगू शकलं आहे? अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आजही अर्धशीशी का व कशी होते याचे अचूक उत्तर नाही सापडलेले. अशी काही अदृश्य अवयवे असू शकतिल की जी या घटनांची पूर्वसूचना काही parameters तपासून देउ शकत असतिल.
|
Maudee
| |
| Friday, March 31, 2006 - 7:09 am: |
| 
|
ashya goshti ghadtat.......mala kityek welela jar mothi sankate yenar astil tar aadhi swapnantun messages milale aahet..... arthat tyache artha teva nahi kalale.....nantar kalale....mhanje aadhi jari kalale ki sankate yenar aahet tari ti aapan thambavu nahi shakat pan tyawar already swatahachi yojana ready thevu shkato jenekarun sankatanchi tiwrata kami hote.....
|
Milindaa
| |
| Friday, March 31, 2006 - 9:14 am: |
| 
|
बी, पूर्ण बीबी वाचायला काय घेशील ? तुझ्या प्रश्नाचं उत्तर वर आहे आधीच.
|
Bee
| |
| Friday, March 31, 2006 - 9:18 am: |
| 
|
वाचला रे मी पूर्ण बीबी.. डोळ्याखालून गेला एकदाचा माझा केंव्हाच. पण आता मलाच आठवला तो शब्द. देजावू बद्दल मी म्हणत आहे. वर देजावू हा शब्द आलेला नाही. परत एकदा वाचू का?
|
Milindaa
| |
| Friday, March 31, 2006 - 10:23 am: |
| 
|
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=772299#POST772299 इथे बघ
|
Deemdu
| |
| Friday, March 31, 2006 - 10:40 am: |
| 
|
मंडळी ही अर्थात ऐकीव माहीती, त्यामुळे कितपत authentic माहीत नाही पण अस म्हणतात की आपल्या आयुष्याशी अगदी Simultaneous आयुष्य चालु असत. वेळेच्या फरकामुळे ते आयुष्य आपाल्या पेक्षा थोड पुढे असत म्हणे. ज्या गोष्टी आपल्याला घडून गेल्या सारख्या वाटतात त्या in fact त्या Simultaneous life मध्ये घडलेल्या असतात. त्याची तिव्रता जेव्हढी जास्त तेव्हढी त्याची जाणीव प्रकर्षाने होते. खर खोट देव जाणे पेशवाईतला तोतया पण असाच Simultaneous आयुष्यातुन आला होता म्हणे
|
Bee
| |
| Friday, March 31, 2006 - 11:11 am: |
| 
|
धन्यवाद मिलिंदा. तुझ्याकडून आज अनपेक्षित उत्तर मिळाले
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|