|
मी काही मोठी लेखिका नही पण तरीहि एक प्रवासवर्णन लिहिण्याच प्रयत्न करत आहे. पहिलाच प्रयत्न असल्याने संभाळुन घ्या.
|
मी काही मोठी लेखिका नही पण तरीहि एक प्रवासवर्णन लिहिण्याच प्रयत्न करत आहे. पहिलाच प्रयत्न असल्याने संभाळुन घ्या. अलिबाग मी पाहिलेले दिनांक :- २५ फ़ेब्रुवारी, २००६ स्थळ :- बागमळा, चौल गाव, अलिबाग निवासस्थान :- श्री सिद्धिविनायक प्रसाद कित्येक महिन्यांनी म्हणजे मे २००५ नंतर मी प्रथमच पिकनिकला जात होते आणि तेसुद्धा माझ्या स्वताच्या कुटुंबियांसमवेत. माझ्या पुर्ण कुटुंबाने म्हणजे तावडे फ़ॅमिलिने एकत्र पिकनिकला जायची ही पहिलिच वेळ. तस आम्ही एकत्र गावाल दोन - तीन वेळा गेलेलो होतो पण पिकनिकला जायची ही पहीलिच वेळ असल्याने मनात प्रचंड उत्साह, आनंद, उत्सुकता लागुन राहिली होती. आद्ल्या दिवशी मी आॅफ़िसमधल्या ट्रेनिंगच्या व्यापाने आणि सर्दीने प्रचंड हैराण झाले होते. त्यात भरिस भर म्हणुन रात्रभर झोपच लागली नाही. तस पाहिल तर ही पहिलिच वेळ नव्हती मला झोप न येण्याची.. पिकनिकच्या आदल्या र्रात्री सारखे मनात विचार घोळत रहातात, उद्या काय करायचे आहे आणि काय नाही याचे. सकाळी पप्पांनी मला ५.१०ला उठविलेतर माझे डोळे अगदी जडावलेले आणि रात्री झोप यावी म्हणुन एरंडेल घातले असल्यामुळे चिकटलेले. कसेतरी मनाची समजावणी करत उठले आणि स्वताचे आटपले. घड्याळात बघितले तर ६.०० वाजलेले. आजुन गाडी आली नव्हती म्हणुन मनात धाकधुक तो गाडीवाला कधी येईल याची. भावला खाली जाउन गाडीवाल्याला बघुन यायला संगितले आणि बाकिची पॅकिंग बघत होते. ६.१० झाले गाडी अजुन कशी आली नाहि म्हणुन मी खाली कंपाउंडमधे गेले तर बाहेर मिट्ट काळोख होता. वातावरण अगदी थंड होते आणि आकाशात तारे चमकत होते जणु काही देवाने निळ्याशार दुलईत अगणित हिरे जडवुन ठेवावेत. दुसर्याच क्षणी मी एवढ्या पहाटे अंधारात यायचे धैर्य कसे केले याचे मला स्वतालाच आश्चर्य वाटले(कारण अंधाराची मला फ़ार भीती वाटते) आणि या विचारतच गेटमधुन मागे फ़िरत असताना हाॅर्नचा आवाज आला.. मागेवळुन बघितले तर भाउ गाडीवाल्याबरोबर आलेला. खालुन पप्पंना हाक मारण्यात अर्थ नव्हता अर्धी बिल्डिंग जागी झाली असती. ग़्हारी जाउन आई, पप्पांना संगितली आणि दोन बॅगा घेउन खाली आले.मी आणी भावाने मिळुन सगळ्या बॅगा गाडीच्या डिकीत आणुन ठेवल्या. आई, मी पप्पा, भाउ गाडीत येउन बसलो आणी सुरु झाला आमचा अलीबागचा प्रवास.... पहाटे पहाटे लागणारी बोचरी थंड हवा यामुळे मी खिडकी जरा बंद केली आणि मनाशीच विचार करत बसले. विचार करता करता बोरिवली कधी आले ते कळलेच नाही. नंतर गाडी बोरिवलीला साईधामला थांबवुन बहिणिला आणि तिच्या मुलीला(सिद्धिला) घेतले आणि गाडी लिंकरोडमार्गे पुढे आंधेरीला घेतली. अंधेरी चारबंगल्याला पोहोचेपर्यंत ७ वाजले होते. खाली कंपाउंडम्धे दादा आमची वाटच पहात होता. गाडिचा हाॅर्न वाजवुन आम्ही तिथे पोहोचल्याची वर्दी दिली.. मी आणि ताईने घरी जाउन चहाचे आधण ठेवायला संगितले, मागोमाग आई, पप्पा आणि भाउदेखिल आले.सगळ्यांनी चहा घेतला आणि सर्वा सामान घेउन आम्ही खाली आलो. सामानची बांधाबांध करेपर्यंत मी आणि ताई पेपरवाला शोधत होतो. पण एकही पेपरवाला दिसेना(आमच्या घरात सगळ्यांना चहाबरोबर प्रथम पेपर वाचायला लागतो). मग गपचुपपणे गाडित जाउन बसलो आणि गाडी सुरु केल्यावर " गणपती बाप्पा मोरयाच्या " गजराने आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
|
Chinnu
| |
| Friday, March 03, 2006 - 2:43 pm: |
| 
|
रुपा, अग चल चल, उशीर होतोय अलिबागला जायला! मी बघ कधीचीच गाडीत येवुन बसलेय सिद्दीला घेवुन! छान लिहितेस, येवु द्या पुढच.
|
चिन्नु आणि धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
|
इन्ट्रोडक्शन समाप्त.. अंधेरि गेले.. पुढे.. सुरवात चांगलि..
|
योगी आत्ता कुढे प्रवास सुरू झालाय... जरा धीर धर... आधी गाडी पेट्रोल पंपवर जाईल ( इंधन भरल्याचा तपशील दिला नाही म्हणुन ) ... तिकडे ७.३० ला गरम गरम वडे किंवा भजी हादण्याचा कार्यक्रम पार पडेल... मग पुढे जकात नाका... हे नाके नाकात दम आणतात... अलिबागच्या रस्त्यावर तिनदा टोल भरावा लागतो मग वडखळ नाका येईल... तिथले सफ़ेद कांद्यांची खरेदी होईल... ( सर्दी वर चांगले असतात म्हणुन घेतले ) असा कंसातला खुलासा वाचायला मिळेल... मग कुठे दुपारच्या वेळेस अलिबाग... म्हणुन सांगीतले तूला धिर धरा धैर्यधरा...
|
इंद्रा हा हा.. रुप, वाईट मानुन घेउ नकोस पण थोडस सक्षिप्त स्वरुपात लिहि म्हणजे इंद्रासारख्या बिजलेल्या लोकांना वाचायला मिळेल.. नि छान वाटेल..
|
योगी, इंद्रा सही अशाच जर चुका दुरुस्त झाल्या तर काहितरी चांगले लिखाण घडेल. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
|
धन्यावाद देऊन आभार मानायचे... आणि पुढल्या चुका करायला मोकळे व्हायचे... बरोबर ना रुपा
|
इंद्रा माझे नाव रुपालि आहे किंवा माल तु रुप्स बोलवु शकतोस नो रुपा प्लिझ......
|
Tanya
| |
| Sunday, March 05, 2006 - 2:26 pm: |
| 
|
रुपाली... चांगल लिहितेस. पुढचे वर्णन येऊ दे.
|
Champak
| |
| Sunday, March 05, 2006 - 4:28 pm: |
| 
|
chaan chaalu he prawaas.. 
|
एव्हाना गाडीत बरिचसा कोलाहल, गोंधळ सुरु झाला होता. कोणि कोणि काय काय करायचे आणि काय काय बघायचे याची माहिती देत घेत होते. थोडक्यात काय तर उत्साहला अगदी पुओर आला होता. आम्ही अंताक्षरीला सुरुवात केली, पहिल्यांदा मी आणि वहिनी असा गत आणि दुसरा दादा, ताई आणि आईचा गट पडला. पण मी आणि वहिनिने त्यांच्या गटावर भेंडी चढविल्यावर सगळे त्यांच्या पक्षात झाले तरीही त्याचा निकाल आमच्याच बाजुने लागल. शेवटी त्या सर्वांनी " यशस्वी माघार " घेतली. एव्हाना आम्ही अलिबागजवळ आलो होतो. तिथे एका रस्त्याच्या कडेला असलेल्या देवळात पैसे टाकले आणि पुढे सरळ बाजारमार्गे अलिबागच्या बीचवरच गाडी नेली. गाडीतुन उतरल्यावरच छान थंड, आल्हाददायक हवेने मनाल सुखद स्पर्श केला. मागे मी एकदा जी झुळुकवर लिहिले होते त्याची प्रचिती मला झाली.... " हलकिच एक झुळुक हलकाच एक स्पर्श आठवणींने भरलेले संपुर्ण जीवनवर्ष... " आणि मनोमन हसत विचार केला की हे कधीतरी चुकुन आपल्या मनात आलेले विचार आज खरे होत आहेत. कदाचित या सुखद क्षणच्या अनुभुतीसाठिच देवाने तेव्हा मला ते सुचविले असेल.
|
हुश्श... आले एकदाचे अलिबाग.. part 2 बरा वाटला.. गुड गोईंग..
|
>>>>>> तिथे एका रस्त्याच्या कडेला असलेल्या देवळात पैसे टाकले   रुप तुला दर्शन घेउन टाकले असे म्हणायचे होते का ? मुंबईला रत्याच्या कडेला बसलेल्या भिकार्याला लोक पैसे टाकतात... बाकी वर्णन अगदी तंतोतंत येतयं...
|
इंद्रा तिथे एक रस्त्याच्याकडेला देउळ आहे त्यात दर्शनासाठी जास्त जागा नाही आहे. तिथे जितक्या पण गाड्या येतात त्यातिल लोक न उतरता गाडितुनच पैसे टाकतात - अशी तिथली रितच आहे रे. नाहि तर दर्शनाला न उतरण्याचा मुर्खपणा आम्ही कधिही केला नसता रे.
|
ते दुपारचे उन झेलत आम्ही सगळेजण पाण्यात उतरलो. आई, पप्पा आणि काका, काकी यांनी पाण्यात पैसे टाकुन त्याची पुजा केली आणि फ़क्त नावापुरते पाय भिजवुन वाळुत येउन बसले. आम्ही सगळेजण मस्तपैकी इथे पाण्यात ख़ेळत होतो आणि दादा, वहिनी, काका आळीपाळीने आमचे फोटो काढत होते. दुपारच्या उन्हात ते पाणी मस्त चमचमत होते. त्या वेळेळा मला येसुदासच्या एका गाण्याची आठवण झाली. " चमक चम चम चमके है सितारों मैं तुही चमक चम चम " ते निखळत, निळशार पाणी आणि त्यावर पडणारे सुर्याचे ते किरण त्यामुळे त्या पाण्याला एक वेगळिच झळाळी प्राप्त होत होती. आम्ही सगळे एकमेकांशी मस्ती करत होतो; ते पाणी एकमेकांवर उडवत होतो. अचानक माझे मन भुतकाळात रमले, ५ - ६ वषापुर्वी आम्ही नेहमी सातबंग़ला(अंधेरिच्या) समुद्रावर जात असु आणि अशीच मज्जा करत असु. अचानक चेहर्यावर पाणि उडाल्याने मी भानावर आले आणि पुन्हा पाण्यात सगळ्यांबरोबर ख़ेळु लागले. थोड्या वेळाने आई आणि काकीच्या हाकांमुळे मी, ताई आणि वहीनी गाडीच्या दिशिने गेलो. तिथे मला एक वेगळाच सुखद धक्का मिळाला. आई, काकी, मी, ताई आणि वहीनी सगळेजण एका गोळेवाल्याकडे गेलो. त्याला वेगवेगळे गोळे बनवायला संगितले आणि तो कोला आणि आंब्याचा गोळा खाउन मन कसे अगदी तृप्त झाले. एकिकडे गोळा खात असताना ह्याची जाणिव होती की अगोदरच मला सर्दी झाली आहे पण who cares yaarrr...... मी मस्तपैकी तो गोळा खात होते आणि मनात शाळेच्या आथवणिंचे चक्र सुरु झाले. शाळेत असताना गोळेवाला, चिंच - बोरेवाला, आवळेवाला सगळे कसे मनपटलावरुन तरळुन गेले. काय सुंदर होते ते दिवस..... त्यानंतर आम्ही परत पाण्यात गेलो पण यावेळि मी आणि ताई पाण्यात फ़क्त चालत होतो. अशा मस्त थंडगार पाण्यात चालायची एक वेगळिच मज्जा असते(कधीतरी अनुभवुन बघा). तिकडे सगळ्यांच्या पोटात एव्हाना कावळे कोकलु लागले होते म्हणुन आम्ही अलिबागच्या समुद्रकिनार्याला अच्छा म्हणुन निरोप घेतला. " फ़ुलोरामधे " जेवण घेउन मग आम्ही आराम करायला म्हणुन घरी गेलो.
|
Neelu_n
| |
| Wednesday, March 08, 2006 - 11:35 am: |
| 
|
अच्चाअ रुपाली तर तुला एवढी सर्दी का झाले ते आता कळले आणि ते कुर्ल्या खाल्यास ते नाही लिहलस.
|
ते पुढच्या पार्टमध्ये येईल.. हम्म्मम गोळे खाताय... चांगल आहे हा
|
प्रथम दर्शनी मला ती वास्तू फ़ारच आवडली, गाडीतुन न उतरताच तेथिल शांतपणा आणि सोज्वळ सौंदर्य मला भावलं. सगळ्यात पहिल्यांदा मला रातराणीच्या वासाने मोहुन टाकले. जरी ती फुले कोमेजली होती तरिही त्यांचा तो सुवास काही केल्या कमी झाला नव्हता. तिची ती फुले मला नववधुच्या हातावरिल अजुनही न गेलेल्या मेंदिच्या वासाप्रमाणेच जाणवली. मनसोक्त सुगंध घेतल्यावर मी तिथे अंगणातच असलेल्या नळावर हातपाय धुवुन मगच आत शिरले. जरा पाणि वैगरे पिउन, मी आणि ताईने बंगला बघायला सुरुवात केली. बंगल्यातील सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचे पाठीमागचे छोटेसे(लहान मुलांचे) स्विमिंगपुल, लहान मुलांच झोपाळा, सि - साॅ, घसरगुंडि. सगळ्यात पहिले मी जाउन त्या घसरगुंडीवरुन घसरुन आले आणि ती झोपाळ्यावर बसली. मग मी तिला सांगितले चल आपण सी - साॅवर बसुया आणि भरपुर मज्जा केली. नंतर आम्ही संपुर्णा बंगला बघुन घेतला. दोन्ही टेरेस फ़ारच आवडले. मग पाठच्या परसात गेलो तिथे सुपरीची आणि नारळाची खुप झाड होती आणि मधेच एक षटकोनी स्टेज बांधुन त्याला वर जाळिदार छत बांधले होते. ज्यातुन उन लागत नव्हत पण छान बारिकसे कवडसे येत होते. त्या जाळिदार छतातुन सुर्याकडे पहाण्यात मज्जा आली. एका वेगळ्याच सुर्याची झलक दिसली त्यातुन.... कधी नव्हे ते मला दुपारचे ते रणरणते उनही हवेहवेसे वाटु लागले.
|
Mavla
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:48 pm: |
| 
|
रुपालि जी, तुमचा प्रवास, आनि लिखान खरच छान चालु आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा हक्कच आहे आपल्य सर्वांचा. असो. लिहीत जा. आपोआप प्रगती जाणवेल तुम्हाला.
|
Moodi
| |
| Tuesday, March 14, 2006 - 3:56 pm: |
| 
|
मस्त लिहीतीयस, पण मुक्काम किती दिवस आहे अजुन अलीबागला? आलीस परतुन की मग लिही. 
|
मग थोडी वामकुक्षी घेउन परत संध्याकाळि आम्ही आमचा मोर्चा नेगाव बिचवर वळविला. थोडसा नाश्ता करुन आम्ही खेळायला सुरुवात केली. पाण्यात खेळतान सुर्यास्त बघितला. आगदी दाही दिशा त्या सुंदर सोनेरी मग केशरी आणि सरतेशेवटी लाल रंगाने उजळुन निघल्या होत्या. जगात कधीही काहीही झाले तरी निसर्गचक्र काही थांबत नाही, ते चालुच असते. त्या मावळ्त्या सुर्याबरोबर दुरवर कुठेतरी दोन गलबत जात होती अगदी एखाद्या चित्रपटातल्या दृष्यासारखी. मग सुर्या मावळल्यावर आम्ही सगळ्यांनी घराकडे प्रयाण केले. घरी आल्यावर गप्पा गोष्टी करत असतानाच जेवण आल्याची वर्दी लागली होती. गरम गरम कुर्ल्यांचा रस्सा प्रथम मला सर्दी झाली असल्यामुळे दिला अगदी फ़क्कड झाला होता आणि जेवताना मस्त फ़्राय पापलेट, तांदळाची भाकरी, हातसडिचा भात, कुर्ल्या वा मज्जाच आली. जेवणानंतर फ़िल्मफ़ेअर बघत मला झोप कधी लागली ते कळलेच नही. सकाळि १० वाजता निघायचे असल्यामुळे अम्ही पटापट उठुन आवरले आणि १० वाजता सगळे तयार झालो. तरी घरुन बिर्ला मंदिरला निघेपर्यंत १०.३० झाले होतेच. गाडी अगदी वेगाने पळवत बिर्ला मंदिरात नेली आणि दर्शन घेतले.मी आणि मझा एक चुलत भाउ आम्ही त्या बागेत फ़िरायल गेलो होतो. फ़ार सुरेख आहे बिर्लामंदिर आणि तिथला परीसर. तेवढ्यात आरती सुरु झाली म्हणुन परत आलो. प्रसाद वैगरे घेउन परत आम्ही शेवटचा म्हणजे काशिद किंवा कीहिम बीचवर गेलो. तिथे पाण्यात भरपुर खेळुन झाल्यावर मग बीचवर फ़राळ वैगरे केला आणि मस्त तिथल्या झोपाळ्यांवर बसुन फ़ोटोसेशन आणी रेकाॅर्डिंग केले. मग घरी परतताना सोमेश्वराच्या देवळात पाया पडुन आलो.घरी येउन मस्त सॅंडविच आणि पुलाववर आडवा हात मारुन परत जरा वेळ आडवे होवुन दुपारी ५.०० ला मुंबईसाठी प्रयाण केले.
|
मुडीताई खि खि खि आणि धन्यवाद...
|
Neelu_n
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:53 am: |
| 
|
रुपाली मी कधीपासुन वाट बघत होते... पुढच्या भागची.... आणि कुर्ल्यांची चांगले लिहलयस. पण एक सुचना आहे. आधीच्या पॅरॅग्राफनंतर क्रमश्: लिहलस असते तर मग कळेल असते कि अजुन लिहयाचे आहे म्हणुन. बरं मग आता फोटो कधी टाकणार???? पुलावावर आडवा हात मारुन आडवे होवुन. 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|