|
योगायोग तुमच्या माहित नाही पण माझ्या जिवनात बय्राच गोश्टी योगायोगाने झाल्या. पहिले प्रेम जुळणे, तुटणे इन्जिनीरिन्ग, बायकोशी भेट आणि पहिला जोब हि तुमच्या कडेहि असेच काही विलक्शण अनुभव असतीलच की, मग करा शेअर. मी हि जमेल तसे लिहिलच...
|
काय लिहू.. माझ्याकडे योगागोग.. योगायोगानेच आला
|
Divya
| |
| Friday, March 17, 2006 - 5:15 pm: |
| 
|
मी माझ्या एका वहिनीबरोबर बाजारात गेले होते. बाजार झाल्यावर नेहेमीप्रमाणे आम्ही भेळ, पाणिपुरी चटकमटक खायला आमच्या नेहेमीच्या गाडीवर आलो. नेमक भावाला तिथेच जवळपास कामासाठी याव लागल, तिथे त्याला कोणी जुना शाळेतला मित्र भेटल त्या मित्रा बरोबर त्या गाडीवर खाण्यासाथी तो पण तिथे आला. आम्ही खायला घेतल होत आणि जरा लाम्ब उभे होतो त्याच्या कडे पाठ होति. त्याने त्याच्या मित्राला म्हणले त्या बाईची जी साडी आहे ना तशीच साडी माझ्या बायको कडे पण आहे, आणि माझ्या बायकोचे केस पण असेच लाम्ब आहेत अगदी तिच वाटते. मित्र म्हणे काय योगा योग आहे तुझ्या बायकोशी ओळख नाही झाली तरी अन्दाज तरी आला वहिनी कशा असतील याचा. आणि तेवढ्यात वहिनी नवीन ऑर्डर सान्गायला वळल्या, तर भाउ ओरडलाच अरे हि माझीच बायको आहे.... मित्र म्हणाला काय योगायोग आहे पण आजच्या भेटीचा योग वहिनीसह होता म्हणायच. 
|
mi ekda, sakali kamavar janyakarta nighalo, mala churchgate stn.var ek vyaki bhetali, mhanaje tya vyaktichi ani majhi anayaspane takkar jhali. mi tya vyakticha chehara baghitala hota. nantar mi dupari bandra la office chya kama nimitta nighalo hoto, tar tevha hi tich vyakti mala disali hoti. sandhyakali jevha ghari janyakarta nighalo tar dadar stn. var tech vyaktimatva mala samore disale. ha ek prakare yogayogach mhanayala hawa. hoy ki nahi?
|
Akashvede
| |
| Saturday, September 09, 2006 - 3:26 pm: |
| 
|
काका साठी लग्नाच्या मुली बघणे नुकते सुरु केले होते, त्याला आलेली पहिली मुलगी अजुन सुरुवात आहे, म्हणुन नकार दीला. ८ वर्शे गेली. खुप मुली बघीतल्या. १हि मुलगी पसन्त पडेना, एका दीवशी कोणच्या तरी लग्नात एक मुलगी खुप आवड्ली, चौकशी केली तर ती पहिली मुलगीच होती ती. योगायोगानीच त्यान्ची परत भेट आणि लग्न ज़ाले.
|
Prutha
| |
| Thursday, September 14, 2006 - 1:59 am: |
| 
|
Mi college madhye asalyapasun sarasbaget ganapatila pradakshana ghalayala adhun madhun jate, ata US la asalyamule Indiat gele ki jane hote. Yogayog mhanaje agadi dar vela konatyahi veli ja nehami ek madhyam vayache gruhasta pan pradakshina ghalayala yayache. Ya velachya india tripla matra devalat gurujinna tyanche naav vicharale tar ase kalale ki te roj 121 pradakshina ghalatat. Pan mala khup gammat vatate ki etkya varshat ekahi divas asa gela nahi ki mi devalat aahe ani te gruhasta disale nahit mag sakali ja nahitar dupari 
|
Mrudultai
| |
| Tuesday, December 19, 2006 - 10:28 am: |
| 
|
yogayog ghadatat ka aayushyat ? maza tar vishvasch nahiye karan aatta paryant yogayog kadhi ghadalech nahit
|
योगायोग घडतात ना! विशेषतः एखादी खूप आधीपासून आखलेली योजना यशस्वी होणार नसेल, तर सगळे योगायोग हिरीरीने घडून येतात. :-)
|
Itgirl
| |
| Tuesday, December 18, 2007 - 10:14 am: |
| 
|
...खूप आधीपासून आखलेली योजना यशस्वी होणार नसेल, तर सगळे योगायोग हिरीरीने घडून येतात.... जीडी..
|
Nyati
| |
| Thursday, December 20, 2007 - 7:28 am: |
| 
|
१९८६ मध्ये एका लग्नातील फोटो...एक मुलगा, वय वर्ष ७. एक मुलगी वय वर्ष ४, मध्यन्तरी काही सम्पर्क नाही... आणि १८ वर्षानी दोघान्चे लग्न ठरले.. हो, आम्हीच दोघे.. अजूनही आम्ही सगळ्यान्ना सान्गतो..सगळे जुने फोटो काढुन पहा.. न जाणो त्यातल्या कोणाशी तुमची गाठ बान्धलेली आहे
|
Ajjuka
| |
| Thursday, December 20, 2007 - 11:01 am: |
| 
|
मी नीरजा पटवर्धन व ती निलिमा पटवर्धन. दोघींची जन्मतारीख व जन्मसाल एकच. जन्म पुण्यातलाच. कॉलेजमधे एकाच वर्गात आणि विषयही बॉटनी. पण हा आणि एवढाच योगायोग. साम्य इथेच संपले. नंतर ती तिच्या वाटेने गेली मी माझ्या वाटेने. ती सालस, गुणी, गुडगर्ल होती आणि मी अर्थातच दुसरं टोक. कॉलेज संपल्यानंतर गेल्या १३ वर्षात काही संपर्कही नाही. बाकी जीडी... अगदी अगदी!!
|
अज्जुका माझ्या बरोबर ह्या पेक्षा जबरी गोष्ट घडलेली आहे. आता महाराष्ट्रात शंतनू हे नाव अगदी फार कॉमन नाही (म्हणजे अमित, रवि वगैरे नावासारखे) आणि बेडेकर आडणाव पण फार कॉमन नाही (जोशी, कुलकर्णी वगैरे टाइप). पण माझ्या बरोबर बालवाडी लहान गटापासून आणखी एक शंतनू बेडेकर होता. तो आणि मी, बालवाडी ते इयत्ता आठवी पर्यंत एका शाळेत, एका वर्गात. तो शंतनू शरद बेडेकर, मी शंतनू अनंत बेडेकर. मी आठवी ते दहावी दुसर्या शाळेत गेलो. तो दहावी नंतर डिप्लोमाला गेला. मी इंजिनीअरींग दुसर्या वर्षाला असताना, हा डिप्लोमा करुन परत माझ्याच वर्गात ते थेट फायनल इयर पर्यंत. हा आणि मी एकाच गल्लीत राहायचो. गोरे मंगल कार्यालयाच्या उजव्या बाजुच्या वाड्यात तो आणि डाव्या बाजुच्या वाड्यात मी. हाइट म्हणजे त्याचा आणि माझा वाढदिवस एकाच महिन्यातला आहे. तो असल्याने एकच वाइट झाले म्हणजे तो अगदी कोकणस्थी गोरा आणि घारा आहे. त्यामानाने मी सर्वसामान्यांपेक्षा उजळ असुन देखील कायम काळा बेडेकर म्हणुन ओळखला गेलो. पुढे मी जेव्हा एमबीए करायला गेलो तेव्हा त्या ठिकाणी माझ्या बॅच मधले कोणीही नव्हते. हे साहेब नोकरीच्या निमित्ताने त्याच ठिकाणी. तो एकदा मला भेटायला माझ्या इन्स्टि. मध्ये आला. मी हॉस्टेल वर नव्हतो. माझ्या रूममेटने त्याला विचारले, "आपका नाम? शंतनू आयेगा तो मै उसको बता दुंगा की आप मिलने आये थे." तर हा म्हणाला "शंतनू बेडेकर." माझा रूममेट त्याला परत विचारले, "नही आपका नाम." हा परत "शंतनू बेडेकर". बराच वेळ गोंधळ चाललेला. सुदैवाने मी वेळेवर पोचलो तिथे.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, December 20, 2007 - 2:48 pm: |
| 
|
तान्या, मी पण त्याच अनुभवातून गेलोय.. तुझ्या मानानं फारच जनरल नाव आहे रे माझं. वॉक इन इंटरव्ह्यू ला गेल्यावर नुसतंच "देशपांडेऽऽऽ" अशी हाक मारायचे मग कोणता देशपांडे हवाय? महेश देशपांडेच ना? अगदी पूर्ण नाव सांगून खात्री करावी लागायची की मलाच बोलावताय ना म्हणून. अगदी कालपरवाच.. माझ्या कंपनीत एक mutual fund agent आला. त्याला मी mutual funds ची माहिती विचारली आणि त्याने सांगितली.. मी पण म्हणालो मला investment करायची आहे. आपण एकदा निवांत बोलू.. तो हो म्हणाला.. शेवटी त्याने माझं नाव विचारलं मी सांगितलं "महेश देशपांडे" त्यावर तो लगेच "ओऽऽऽहोऽऽ..." (इथे माझा चेहरा प्रश्नार्थक.. ओहो करण्यासारखं काय आहे त्यात? वगैरे..).. ते ओहो संपल्यावर मग म्हणाला.. मी पण महेश देशपांडेच!!! दोन दिवसांनी त्याला फोन केला.. त्याच्या मुलाने घेतला.. तो विचारायला लागला तुमचं नाव काय म्हणजे बाबांना मी सांगतो.. मी म्हटलं "बाबांना सांग महेश देशपांडेंचा फोन होता". ते कार्टं गंडलं.. "क्काय?? ते तर माझ्या बाबांचं नाव आहे.. तुम्ही कोण??" "तुझ्या बाबांना सांग, परवा तुम्हाला भेटलेल्या देशपांडेंचा फोन होता.." मी फोन ठेवला (कट केला ).. परत ऑफिस मध्ये आल्यावर.. मी (मुद्दाम): हॅलो महेश देशपांडे? मी महेश देशपांडे बोलतोय. शेजारी बसलेल्या कलीगचा "हा काय प्रकार आहे?" असा चेहरा.... (त्याला सगळा इतिहास भूगोल सांगावा लागला..)
|
Gsumit
| |
| Friday, December 21, 2007 - 5:09 pm: |
| 
|
सहीच महेश, मस्त किस्सा आहे... आपल्या मायबोलीवर पण काही दिवसांपुर्वी चाफा नावाची साथ आली होती, अन 'तो चाफा मी नव्हेच, तो चाफा मी नव्हेच' असा खेळ चालू होता... बहुतेक माझा वेंधळेपणा b.b. वर
|
माझ्या वर्गात एक मुलगी होती तीचे नाव वडीलांचे नाव आणि माझे एकच, फ़क्त मी उंच म्हणुन उंच वैशाली आणि ती बुटकी असे ओळखले जाउ लागलो. आणि तीचे वडील पण पप्पांच्याच कोलेजला त्यांच्याच सोबत नोकरीला लागले होते. पण खरा योगायोगाचा एक किस्सा आत्ता घडलेला आहे ज्यामुळे आमच्या गावात, office मध्ये, सगळीकडेच गोंधळ झाला. खुप धमाल आली. एकदा मी अशीच मीटिंगला गेले. गणेश उत्स्वाचे नियोजन कराय्चे होते त्यामुळे रेवेन्यु आणि पोलिस दोघेही हजर होते. मीटींग चे अध्यक्ष स्थनी श्री. विश्वास नांगरे हे तेव्हा आमच्या जिल्ह्यचे S.P होते.( पुण्यातील कुठली ती पोरांची पार्टी पकडणारे famous ते हेच .) मी जेव्हा त्यांच्याकडे बघितले एकदम धक्काच बसला. ते अगदी माझ्या दाजींसारखे दिसायला.., जसे जुळे भाउच..( लहान बहिणीचे मिस्टर.) घरी जाउन तीला सांगितले... दाजींचे एक भाउ वकील त्यांनी पण ह्यांना फोन करुन" अरे नविन ( s.P. ) अगदी तुझ्यासारखे दिस्तात." आणि अजुन योगायोग म्हण्जे दोघांचा "न्हावी " एकच होता. त्याने दोघांना एकमेकांबद्दल सांगायला सुरवात केली. नांगरे साहेबांना सांगितले की नगरमधले एक Doctor अगदी तुमच्या सारखेच दिस्तात. त्यांची अशी style aahe अस आहे ई..ई.. आणि दोघांचे वडील एकाच field मधले निघाले आणि वर म्हणजे दोघांच्या बायकांचे नाव सुध्दा सारखे... आणखी गम्मत तर पुढे आली.. दाजी ब-याच्दा बाईक वापरत एकदा clinik ला निघाले तर रस्त्यात ट्राफ़ीक पोलिस मध्ये उभा राहिला. यांना वाटले काहीतरी चेज्किंग चालले आहे. लायसन्स वगैरे. तर पोलिसाने यांआ S.P. स्मजुन खाडकान salute ठोकला. यांनी तीथुन धुम ठोकली. अस एकदा दोन दा नाही तर खुप पोलिसांनी केले. एकदा एका पार्टीत तर भुषण गगराणी ( IAS सीनीअर माणुस आहे.) यांनी दोनदोनदा चौकशी केली. इतर सोबतचे doctor यांआ विचरु लागले . " तुझी चौकशी का करताहेत इथे बरेच जण ?" शेवटी दाजींनी ठरवले एकदा विश्वास नांगरेंना भेटायचे त्यांनी त्यांच्या नव्या क्लिनिक चे उद्द्घाटनच त्यांच्या हस्ते ठरवले पण निमंत्रण द्यायला जायला आणि भेटायला त्यांना वेळच मिळाला नाही. शेवटी थेट उद्घाटनाच्या दिवशीच दोघे समोरासमोर आले. आणि एकमेकांकडे "मेलेमे बिछडे हुये भाई" सारखे बघत भेटले. आम्ही कोण कोण फ़सले त्याच्या गमती सांगत अजुनही खुप हसतो. माझ्या बघण्यातला हा सगळ्यात मोटआ योगायोग
|
Hkumar
| |
| Saturday, December 22, 2007 - 7:19 am: |
| 
|
२००३ साली मी खुशवंतसिंगांचे the sights & sounds of the world हे पुस्तक वाचले. त्यातील 'मस्कत' या प्रकरणात ते म्हणतात, '' मरण्यापूर्वी एकदातरी मस्कत पहाच!'' थोडी उत्सुकता वाटली होती एवढेच. नंतर २००४ साली अजिबात ध्यानीमनी नसताना मस्कतला नोकरीचा योग आला. आता मस्कत पाहिले आहे तेव्हा मरायला हरकत नाही!
|
Lopamudraa
| |
| Saturday, December 22, 2007 - 11:04 am: |
| 
|
त्यांनी पकडलेल्या पार्टीचे नाव आठवले. पुण्यातील "रेव्ह पार्टी"... सिहगडावरील
|
Arc
| |
| Tuesday, January 15, 2008 - 10:55 am: |
| 
|
लोपमुद्रा तु modern मधे होतिस का PES girls high school
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|