Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 15, 2006

Hitguj » My Experience » मायबोली » माझे मायबोलीवरचे अनुभव » Archive through March 15, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Thursday, March 02, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> झक्की, लिम्बुटिम्बु, असामी, परागकण, सारख़े जुनी मन्डळी उत्तर देऊ शकतील ;-)
याऽऽर पुरु, माझ नाव काहुन घेतो रे त्या ज्येष्ठ वरिष्ठ अनुभवसम्पन्न माणसात? म्या नाय रे बसु शकत त्यान्च्या पन्गतीला! तुहा कायतरी गैरसमज झालेला दिस्तो हे! मला बी अजुन दोन वर्ष व्हायची हेत! :-)
तरीबी आता माह नाव घेतलसच तर सान्गतो ते ऐक
मला नाय वाटत इथे कम्पुशाही हे! हां बरेच कम्पु मात्र नक्कीच असतील!
त्यातले मला ठाव असलेला येकच योक कम्पु हे!
तो म्हन्जे माझ्या पोस्ट्स्चा वाचक वर्ग! केवढा मोठ्ठा कम्पु हे हा ते माहीत नाही!
आता प्रत्येक एका बाजुला दुसरी बाजू असतीच असती! तसच या एका कम्पुचे दोन उपप्रकार पडतात! येक दुधी भोपळा मधोमध कापल्यावर कस दोन तुकडे होतील तस्सा!
त्यातला येक कम्पु असतो तो माझ्या पोस्ट वाचतो नि माझा चाहता अस्तो, माझ कौतुक करतो
तर दुसरा कम्पु अस्तो ना, तो बी माझ्या पोस्ट वाचतो पर माह्या नावान शिमगा करतो! कधि मनातल्या मनात तर कधि उघडपणे
अन हां!
प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजुन्व्यतिरिक्त तिसरी कड असते! तो ती आणि तिसर ते पण जस अस्त तसच, भोपळ्याचे दोन तुकडे केले तरी आधी जर त्याची साल किसुन काढली तर जसा तिसरा प्रकार होतो, तस्सच अजुन येक उपप्रकार अस्तो या कम्पुत! पण त्या कम्पुत शामिल व्हायच तर अनुल्लेखाची दीक्षा घ्यावी लागती, काय समजले?
DDD

Vaishali_hinge
Wednesday, March 08, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कंपुशाही कि काय म्हणाले कोणितरी? असो पण इथल्या मैत्रीणि मात्र जितक्या धिट्पणे प्रतीक्रीया देतात तितक्या धीट नाहीत बर का!!!

Mrunmayi
Wednesday, March 08, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PSg agadi barobar. junya maaybolikaranipan liha ki tyanche anubhav.. :-)

Vaishali_hinge
Friday, March 10, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majhaa maaybolivarachaa ek anubhav mhanaje baryaach maitrini ithe liheetaat tula mail keliye g! aani ti mail kadhich yet nahee.

Ajjuka
Sunday, March 12, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता तू म्हणतेस आहेस तर लिहिते ग मृण्मयी,
जुन्या या गटात येण्यासाठी काहीही करावे लागत नाही फक्त खूप वर्ष टिकून रहावे लागते आणि ते अजिबात अवघड नाही म्हणून मी इथली जुनी सभासद. ऑक्टोबर १९९९ पासूनची. त्याकाळात इथे पासवर्ड हा प्रकार नव्हता. देवनागरी सोय उपलब्ध नव्हती. सभासद थोडेच होते. तेव्हा मजा यायची. आता येत नसेल असे नाही पण मी regularly येऊ शकत नाही म्हणून मला माहीत नाही.
आता खर्‍या अनुभवाकडे.. नवे - जुने या विषयाला साधारण वर्षातून एकदोनदा तरी तोंड फुटतं. पहिल्यांदा उत्तरे देण्यात रस होता पण नंतर वर्षातून दोनदा तेच काय म्हणायचं अस व्हायला लागलं आणि जुन्यांच्या बाजूने नव्याने जुने झालेले लोक बोलतच असतात की. जे लोक नवे असताना आम्ही नवे आहोत म्हणून आम्हाला त्रास होतो असा वाद घालायचे तेच लोक पुढच्या season ला इथे असं कोणी करत नाही मला आधी वाटायचे पण तसे ते नाही असेही म्हणताना दिसतात. त्यामुळे नवे - जुने हा वाद माझ्यासाठी तरी मायबोलिवरचे routine झाला आहे. काय जुन्यांनो? किंवा नव्यानेच जुन्यात आलेल्यांनो? खरेय ना?
तेव्हा या catagories बाजूला ठेवून मी अनुभव सांगायचा प्रयत्न करीन. बाहेर समाजात वावरताना जे आणि जसे अनुभव येऊ शकतात ते आणि तसेच अनुभव, चांगले आणि वाईटसुद्धा तुम्हाला इथे येऊ शकतात. काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं हा आपला आपला भाग आहे. आपण एक वाक्य इथे लिहिले की ते सार्वजनिक होते आणि त्यावर तुमच्या बाजूने आणि विरूद्ध अश्या दोन्ही comments होणारच. कुठली किती seriously घ्यायची ही आपल्याला समजणे महत्वाचे. समाजात वावरण्यासाठी इथले वागणे ही रंगीत तालीम असू शकते. मला माझे views आणि मतं पक्की व्हायला इथे मदत झाली. आपल्याला वाटत असतं की आपण जे बोलतो ते तसंच पोचतं. पण ते खरं नसतं. आपण normally ज्या पद्धतीने आजूबाजूच्या माणसांशी बोलतो त्यावेळेला शक्यता असते की त्यांना आपण माहीत असतो त्यामुळे ते आपल्याला समजून घेऊ शकतात. पण इथे आपला मुद्दा सांगताना केवळ शब्दच दिसत असतात, तुमचे jergon सगळ्यांना माहीत असतेच असे नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे सगळ्यांना पोचेल अश्या पद्धतीने व जास्तीतजास्त elaborate करून आपला मुद्दा सांगावा लागतो आणि याने गोंधळ, गैरसमजूती टळतातच पण आपण जे म्हणत असतो त्याची सत्यासत्यता आपली आपल्यालाच कळत जाते. अर्थात या सगळ्यासाठी आपण स्वतःशी अत्यंत प्रामाणिक असणे गरजेचे आहे. हे मी उपदेशपर सांगत नाहीये तर हा माझा अनुभव आहे.


Bee
Monday, March 13, 2006 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका विचार चांगले व्यक्त केलेस.

माझ्या बाबतीत मला मायबोलिवर विषय विविधता आढळली. इतके सगळे विषय इथे एकाच दमात वाचताना दमछाक होते. खूप काही वेगवेगळे विचार वाचून आपली विचार करण्याची शैली योग्य आहे का हे ठरवायला मला नेहमीच मदत झालेली आहे. आपण एक मत मांडतो त्यावर आणखी दहा निरनिराळी मते येतात. तेंव्हा त्याचा खूप फ़ायदा होतो. कधीकधी इथे घडणार्‍या वादांचा त्रासही होतो तर कधीकधी त्यातून ती व्यक्ती कशी आहे हेही लवकर कळते. काही जण वाद झाल्यानंतर आणखी मोकळीक ठेवूण वागतात. काहीजण आपला खरा स्वभाव प्रतीत करतात. इथे प्रत्येकाकडे unique talent आहे पण इथे भर असतो तो TP करण्यासाठी. इथे रुळता रुळता मला काही चांगले मित्र मैत्रीणी मिळालेत ज्यांना मी कधी भेटलो नाही, असे वाटते आपण जेंव्हा त्यांच्याशी भेटू तेंव्हा असेच आपले मत चांगले राहील का? होप सो.. काहीजण असेही आहेत ज्यांना आपण मुळीच पसंत नसतो.

जाता जाता हेच म्हणतो.. मायबोलि एक चांगली site आहे. तिचा विकास होवो..


Moodi
Monday, March 13, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmmm!! असे कुणी मायबोलीवर म्हटले की मला कायम हम्मा हम्मा हे रेमोचे गाणे आठवते.
मायबोलीचा माझा अनुभव आता मी मधुनच कधीतरी टाकणार. इथली मला आवडलेली गोष्ट म्हणजे संचालकानी मेसेंजरसारखी उपलब्ध करून दिलेली सोय. मी याहूवर अजीबात जातच नाही कारण मग बर्‍याच खिडक्या उघडुन बसावे लागते, जसे आठशे खिडक्या अन नवुशे दार..

इथे प्रत्येक व्यक्तीला गुलमोहरपासुन भविष्यापर्यंत सर्वत्र कलेचे दालन उपलब्ध आहे. आंतर्राष्ट्रीय स्तरावर हे पोचले जावे अन हजारो वाचकानी ते वाचावे यासारखा दुसरा आनंद नाही.

बरीच माहिती मिळते. वेळात वेळ काढुन जी एस सारखी माणसे गडाची इत्यंभुत माहिती देतात त्यावेळी खरच तो प्रवास अनुभवला सारखा वाटतो. विनय देसाई जेव्हा त्यांच्या परदेशवारीचे अनुभव लिहीतात तेव्हा मला सुद्धा जग डॉलरचाही खर्च न करता पाहिल्याचे समाधान मिळते.

MNC उर्फ मिलिंद वेळात वेळ काढुन आमच्यासारख्या नवशिक्याना मार्गदर्शन करुन शंका सोडवायला मदत करतात अन इतरांच्या पत्रिका पाहुन त्यांना मदत करतात तेव्हा खरच त्यांचे किती कौतुक करावे अन किती नाही हच प्रश्न पडतो.

दिनेशनी तर वेळोवेळी पाककृतीत मार्गदर्शन करुन त्यांचा हातभार लावलाय. अगदी अकाउंटसी सारखा कठिण विषय त्यानी सोपा करुन सांगीतलाय.

मायबोलीमुळेच मला चारू सारखी मार्गदर्शक मिळालीय. जेवढे गोड नाव तेवढीच गोड ही मुलगी आपल्या ज्ञानाचा कुठलाही गर्व न बाळगता सर्वांशी मैत्रीचे दालन उघडे ठेवते. तेवढाच गोड अन सौम्य आवाज आहे तिचा.

खटकते फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे इथे जेव्हा मी काही सदरात लिहीले तेव्हा माझी टिंगल करणार्‍या मुलीच जास्त असतात. आधी मला वाईट वाटायचे पण आता कळलय की या सारख्या मनोवृतींकडे लक्ष न देता आपली वाटचाल चालु ठेवायची. त्या दोघीना जे मानसीक समाधान मिळतेय त्यात मी का खोडा घालु?


Soultrip
Monday, March 13, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi, the scientific truth is there is always repulsion between like-poles so that explain why girls attack your views more than guys :-)



Jo_s
Tuesday, March 14, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी हा लेख अवीकुमार ने लिहीला होता. माझाही अगदी असाच अनूभव आहे.

/hitguj/messages/75/91016.html
मीही आधी फक्त वाचत असे. पण मग स्वत्: पोस्टही करु लागलो. आता रोज एकदातरी इथे आल्याशीवाय रहावत नाही.

तरी आधी देवनागरीत लिहायला प्रॉब्लेम होता. त्यामुळे सगळ्या पोस्ट किरण फ़ॉन्ट्मधे लिहून जेपीजी करुन टाकत असे. पण आता युनिकोड मुळे सोप झालं आहे.


Sampada_oke
Tuesday, March 14, 2006 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडे, अगदी मनातलं लिहिलंस. :-)
तुला चारू बद्दलच्या पोस्टवर १००% अनुमोदन.:-)


Mrunmayi
Tuesday, March 14, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka changala lihila aahes. Mala nave june asa vaad kadhaycha navata. Pan je lok jasta kal maaybolivar aahet tyancha ithala anubhav / mate hi nakkich titaki pragalbha kinva ghasun tayar zaleli asnar mhanun mazi varachi post hoti. Navyane yeun lagech mat mandnyat kay point asa mala vatata..? Arthat navya lokanchehi kahi nond karun thevanyasarkhi mata asu shaktat... :-)

Chioo
Wednesday, March 15, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi ghya 'Ajjuka' varachya lekhachi link. :-) Lekh chhan aahe.

http://www.esakal.com/static/maiVishesh1.html

Chioo
Wednesday, March 15, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arechcha, ya lekhachi charcha itehch zali hoti na aadhi? ki BB chukala maza?? :-(

Moodi
Wednesday, March 15, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणू मला खात्री आहेच की तुझा खुप मोठा गैरसमज झालाय. सहकार नगर बीबीवर मी जेव्हा तो मेसेज टाकला तेव्हा खुपच गंमतीत टाकला होता. त्या दिवशी मी खुप कंटाळले होते त्यामुळे मी सहकार नगरच काय अख्ख्या पुण्याच्या बीबीवर जाऊन गंमतीत काहीना काही लिहीले होते. मेघाने सुद्धा ते लाईटली घेतले होते कारण मी गंमत करतीय हे तिच्या पण लक्षात आले होते. पाहिजे तर सगळे बीबी एकदा वाचुन बघ.

नवीन आलेल्या लोकांची मी कधीच गंमत करीत नाही. तू या आधी जेव्हा जिथे जिथे जे विचारलेस त्याबद्दल मी तुला नीट अन प्रामाणीक पणाने उत्तरे दिलीत, ती जर तुझ्या लक्षात रहात नसतील तर सॉरी. माझ्या मनात एवढा मोकळेपणा तर निश्चित आहे की जर काही चुकले तर त्या व्यक्तीची मी माफी मागते, उलट उत्तरे शक्यतो देत नाहीच.

अन ज्यांच्याबद्दल मी बोलतेय त्या कोण आहेत हे माझ्या जवळच्या लोकाना चांगलेच माहीत आहे, ते तुला किंवा इतर कुणाला सांगायची मला गरज वाटत नाही. फक्त इथे लिहुन मी माझे मन मोकळे केले इतकेच. कारण दुसर्‍याशी बोलले तर मन शांत होते हा माझा स्वतचा चांगला अनुभव आहे. अन मायबोलीवर आल्याने माझा एकटेपणा खरच दूर झालाय.

तू जेव्हा मला मेल केलीस तेव्हा मी मेलद्वारे नाही जमले तरी सहकार नगर बीबीवर येऊन उत्तरे दिलीत, हे जर तुला जाणवत नसेल तर मला त्याचा राग नाही. दररोज मला जेव्हा मेल येतात तेव्हा वेळ होईल तसे मी उत्तरे देतेच. आणी मला नाही वाटत की तू त्या वेळेस नवीन होतीस, तुझी जॉइन होण्याची तारीख बघ अन माझे ते १६ फेबचे मेसेज बघ.

सहकार नगरचा बीबी मी सप्टेंबरमध्ये सुरु केला. तु आल्याने मी तिथुन गेले असा तुझा भलताच गैरसमज दिसतोय. मुळात मी तिथे जास्त नसतेच. अन ज्यांची मी गंमत करते त्यांच्या विषयी तितकेच मला प्रेम अन जिव्हाळा सुद्धा आहे. मग ते कुवैत बीबीवरचे अशोकदादा असो वा सातारा बीबीवरचे माझे लहान भावासारखे असणारे राकू, फदी, फ अन अजय असो.

तुला माझ्याविषयी राग असेल तर मग त्या पुर्वग्रहाविषयी मला काहीच स्पष्टीकरण द्यायची गरज भासत नाही. मला जे वाटते ते मी clear केलेय.


Megha16
Wednesday, March 15, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर माझे मायबोलीचे अनुभव खुप चांगले आहेत.
कधीही वाईट अनुभव आला नाही.
खर म्हणजे जे नविन आहेत त्यांना त्यांना बरयाच दा अस वाटत की बाकीचे आपल्या ignore करतात,किंवा टिंगल करतात. आणी तस असेल ही मी नाही म्हणत नाही. त्यात कोणी राग मानु अस मला वाटत कारण थोडी फार चेश्टा मस्करी ही चालणार त्याशिवाय मजा नाही. आपण त्यात सामील व्हायच. सावनी,रेणु मी समजु शकते. मैत्रीणी चेश्टा नाही करणार तर कोण करणार.
जस की अजुका ने लिहल आहे.मायबोलीवर खुप जुणी लोक आहेत.त्याची खुप आधी पासुन ओळ्ख असल्याने ते नेहमी गप्पा मारत असतात. त्यात एखाद्या वेळेस ते नविन लोकांना विसरतात.पण त्यात त्याची काही चुक नसते.
मुडी तु कोणा कडे लक्ष देउ नकोस. अग पण सहकार नगर वर येत जा ग



Moodi
Wednesday, March 15, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी आता मला तुझे पण आश्चर्य वाटतेय. मी वरच्या माझ्या पोस्टमध्ये ते सांगीतलय परत तेच सांगणार नाही. सावनी जेव्हा तू इथे नवीन होतीस तेव्हा मराठीतुन कसे लिहायचे ते मी सांगत होते, तेव्हा माझाही काही टिंगल करण्याचा उद्देश नव्हता. मायबोलीवर सुरुवातीला सगळेच अडखळतात, मी पाण तसेच केले होते. आधी minglish लिहीत होते, पण जसे जमले तसे प्रत्येक नवीन व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करते.

अन परत तेच म्हणेन की ज्यांच्याबद्दल मी इथे लिहीलय त्यानी वारंवार मला त्यांच्या खोडसाळ टिकेचे लक्ष बनवले, अन अजुनही तेच होते. त्यानी ती चेष्टा एकदा केलेली नाही, ती वारंवार झालीय.

मग सावनी अन रेणु तुम्ही सांगा, मी तुम्हाला कधी वाईट बोललेय? मी तर तिथे त्या सहकारनगर च्या बीबीवर येत सुद्धा नाही मग तुमची वाईट पद्धतीने टिंगल करण्याचा प्रश्न आला कुठे? संबंध काय? मला जिथे लिहावेसे वाटते तिथे मी लिहीते, त्यात तुम्ही रागवण्यासारखे काय झाले?

ठीक आहे, तुम्हाला माझा रागच आलाय त्यामुळे मी तिथे आता न येणेच चांगले सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने.


Jaaaswand
Wednesday, March 15, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मायबोलीकरांनो...

मी इथे खूपच नवीन आहे...पण जुना व्हायला अजून आवडेल..

इथल्या पाककृती पासून सुरू होणार्‍या BB पासून
ते लोकांचे रंगीबेरंगी सदरातील कलानावीन्य मी पाहिलेले आहे...

तसेच.. संता बंता च्या हलक्या-फ़ुलक्या PJ पासून ते V & C मधल्या अतिशय गहन चर्चाही वाचल्या....

थोडक्यात म्हणजे..एकही दिवस असा गेला नाही कि.. इथे हितगुज वर आलो नाही.. हीच सर्वात मोठी पोच पावती असावी.. नेमस्तक मंडळाला..


इथे खूप काही नवे शिकायला मिळाले.. ह्यात काहीच दुमत नाही... ह्याच thread वर काही मित्रांनी एवढेही सांगून ठेवले आहे कि परदेशात मायबोली सारखा मित्र नाही..

इथे काही जुन्या-नव्या मायबोलिकरांचे.. बरेवाईट अनुभव मलाही आले... संतापही आला.. :-)
पण..जे काही पदरात पडले..त्या समोर.. हे अगदीच नगण्य आहे... अगदी अनुल्लेखाने मारण्या इतपत..

मायबोलीने मानसिक, वैचारिक आणि सांस्कृतीक पोकळी भरून काढण्याचा.. अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.. असे मला तरी वाटते..
त्यामुळे.. काहीच तक्रार नाही.. असलेच तर कौतुक अन कृतज्ञताच आहे..

मधे कुठे तरी वाचले कि सद्ध्या ६००० का कितीतरी सभासद आहेत मायबोलीचे... नजीकच्या काळात ६०००० वर पोहोचोत हीच अपेक्षा..

जास्वन्द...


Moderator_4
Wednesday, March 15, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं मंडळी, आता पुरे करा! किरकोळ गोष्टींवरुन वाद नको!

Moderator_2
Wednesday, March 15, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला मंडळी. विषयाला धरुन बोला. मायबोली तुम्हा आम्हा सर्वांची आहे.
रुसवे,फ़ुगवे हे होतच रहाणार. तेव्हा एकमेकांना उद्धेशुन लिहिण्या ऐवजी आपापले चांगले वाईट अनुभव येथे येवुदेत.


Ekanath
Wednesday, March 15, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका सद्गृहस्थांनी दिलेल्या सल्ल्यावरून इथे लिहित आहे. कुणाविषयीही वैयक्तिक टिका नाही.

वर कुनीतरी म्हटले आहे की जगात जसे चांगले वाईट अनुभव येतात तसेच मायबोलीवर पण येतात. अगदी खरे आहे! विरोधी मते आपण स्वीकारत नाही पण ती सहनही होत नाहीत, असा एक सार्वत्रिक अनुभव येतो. तोच मायबोलीवरही आला! लोकशाही खर्‍या अर्थाने भारतीयांमधे रुजायची आहे, असे म्हणता येईल का?

पण मला प्रशासकांच्या निःपक्षपाती धोरणाचा चांगला अनुभव आला.

कृपया यावर वितंडवाद घालू नयेत.




Megha16
Wednesday, March 15, 2006 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर
तुम्ही जे म्हणताय ते अगदी योग्य आहे.
मायबोली ही सर्वाची आहे.
मायबोलीमुळे च आपण सगळे भेटलो.
छोट्याश्या कारणा वरुन भांडुन काय उपयोग.
मुडी सहकार नगर वर आम्ही तुझी वाट पाहतोय.


Moodi
Wednesday, March 15, 2006 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणू, सावनी वाईट वाटुन घेऊ नका, अन सावनी यात माफी मागुन मला लाजवु नकोस. हा वाद नाही गैरसमज आहे त्यामुळे हे विसरुन गेलेले बरे.
वाद हे होतात, व्यक्ती कुणीही वाईट नाही, मात्र प्रत्येकाची मते वेगळी असल्याने गोंधळ उडतो खरा.
धन्यवाद नेमस्तक.


Suniti_in
Wednesday, March 15, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर दिवसातन एकदा तरी मायबोलीवर चक्कर मारल्याशिवाय करमत नाही. आणि स. नगरातल्या सर्व मैत्रिणी तर फारच चांगल्या आहे. चेष्टा मस्करी शिवाय बोलण तर अळणी वाटेल. तेव्हा आंबट, गोड, तिखट, तुरट सर्व अनुभव येतातच. :-)
दिनेश, अश्विनी, बी, मुडी असे कितीतरी लोक बरेच मार्गदर्शान करताना दिसतात.
कथा, विडंबने, कविता वाचून तर पुस्तकांची परदेशातील उणीव अजिबात भासत नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators