|
Psg
| |
| Wednesday, March 15, 2006 - 8:32 am: |
| 
|
cmon, a crush is a crush, celebrity चा का असेना.. आणि हा crush crash झाला तरी चालतो.. करण तो तेव्हद्यापुरताच असतो! जस एकेकाळी मला शाहरूख भयंकर आवडायचा, आता अभिषेक, उद्या अजून कोणी.. real life crush सारखच आहे हे!
|
Ajjuka
| |
| Wednesday, March 15, 2006 - 9:22 am: |
| 
|
बाकी crushes बद्दल म्हणायचे तर.. celebs मधे सध्यातरी अभिषेक ला पर्याय नाही. आणि एक कायमस्वरूपीचा crush नसीरुद्दीन शहावर आहेच त्याला तोडच नाहीच. " सुधा, माझी को माझी ना बनाया... " असे इज़ाजत मधे रेखाला सांगणारा किंवा " चलो बच्चा वापस करके आते है.. चलो नही तो मारूंगा एक " असे अनुराधा पटेल ला दटावणारा नसीर... लाजवाब.. नुसत्या आवाजाने 'तिच्या पोटातून चंद्र आडवाउभा सरकायचा' अस होत.. आणि हसणं... माशाल्ला...
|
Jaaaswand
| |
| Wednesday, March 15, 2006 - 9:51 am: |
| 
|
माझ सगळ्यात मोठ्ठा celeb crush Bollywood Queen : Lady with Million Doller Smile माधुरी दिक्षीत्: १) १-२-३ वर बेधुंद होऊन नाचणारी... मोहिनी..मोहिनी च तो गाण्यातला piece २) " सो गया ये जहां " गाण्यात, जीप मधे काळ्या ड्रेस मधे क्यूं प्यार का मौसम बीत गया क्यूं हमसे जमाना जीत गया म्हणताना..तिच्या चेहर्यावरची कशीश ३) धक धक आणि दम दमा दम मधले तिचे appeal , ४) HAHK मध्ये जांभळा ड्रेस घालून.. जीन्यावरून उतरतानची चाल ५) माये नी माये गाण्यातील रीमा लागूच्या मागे लपणारे तिचे मदहोष डोळे ६) DTPH मधला तिचा तो पहिला dance जिथे शाहरुख तिला show साठी identify करतो ७) HAHK मधला chocalate icecream हातात घेतलेल्या फोटोतील तिचे expressions ७) अंजाम आणि मृत्युदंड मधला तिचा लाजवाब अभिनय हे आत्ता जेवढे आठवलं ते लिहिले....बघु अजून काहि आठवलं तर लिहिन... माधुरी साठी काहि पण.. १५ May ला B'day आहे बरका तिचा
|
Moodi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:18 am: |
| 
|
जास्वंद १०० टक्के अनुमोदन. लिंब्या मस्त लिहीलेस रे. माझी एक मैत्रीण आहे, मृदुला नाव तिचे, पण घरातले सोनी म्हणतात. दिसायला सुंदरच. गोरी, उंच, कुरळ्या केसांचा शोल्डर कट वगैरे वगैरे, नुसती सुंदरच नव्हे तर स्कॉलर सुद्धा. आता वर्षभरापूर्वी लग्न झाले तिचे. तिला तिच्या वर्गातील एका मुलाने, जो मुळचा अमृतसरचा होता त्याने प्रपोज केले. ती बोलायला मात्र फारच स्पष्टवक्ती. त्याला अगदी शांतपणाने म्हणाली. मला माझा नवरा नुसता दिसायला सुंदर नकोय रे, माझ्या नवर्याचा मेंदू डोक्यात हवा, तो गुढघ्यात नसावा हीच माझी अपेक्षा. बापरे!! कसला हबकला तो. तिच्या घरच्याना हे कळले तर ते पण खुप हसले, एकदम मोकळे वातावरण घरचे. काही दिवस तिच्या छोट्या भावाने तिला चिडवुन तिचा चांगलाच मार खाल्ला.
|
Devdattag
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:32 am: |
| 
|
जास्वंदा.. माधुरी म्हणजे.. वेड अगदी अबोध पासून देवदासपर्यंत मध्ये तिचा एक कृष्णधवल वॉलपेपर होता गुलाबाचं फूल गालावर टेकलेलं.. हाय क्या बात हैं
|
Coldfire
| |
| Wednesday, March 15, 2006 - 12:12 pm: |
| 
|
नमस्कार मायबोलीकर,मी कधी काही पोस्त केल नाही,हे देवनगरी लिहीतना जे कसरत करावी लागते त्यामुले मुल मुद्दाच विसरुन जातो..कधी कधी तर अर्ध लिहुन बन्दच करतो.. आज मलाही अनेकापैकी एका अविस्मर्निय क्रश बद्दल लिह्यवस वातते.. माज़्या एन्जिनियरिन्ग ला असतानाची वेल... मी सेकोन्द यियर ल होतो... ती नुक्तच फ़र्स्त येअर ल आली होती.. दिसयला एक्दम छान...तजेलदार गोरापान चेहरा...लाम्ब्सदक केस......स्वप्नालु दोले.. नाजुक गुलाबी होथ..इत्यादि इत्यदि... मला तिला बघ्ताच वातल.. चल आपली तलाश आता सम्पलि.. हिच ती जी माजी लाइफ़ पार्तनेर होइल... मग मुलान्चे थरलेले उद्योग.. तिच्यामाघे जा..पहा..येद्यासारखा पहा...तिला इम्प्रेस्स करा... इत्यदि इत्यदि...पन हाती कहि येइना न राव.. नन्तर चमेलि कि शादी ताइप तिच्य मैत्रिनि सोबत मैत्री करु आनि हिला अप्प्रोअच करु...म्हनुन मी आनि माज़्हे मित्र शुभकमाला लागलो.. तिचि मैत्रिन मात्र खुपच लवकर दोस्त बनली..पन तिला माजा इरादा सान्गितला नाही...म्हनलो नन्तर सन्गावा..पन तुर्तास आपला काम फ़त्ते करुया.. आनि अपेक्शेप्रमाने तिही फ़्रेन्द ज़्हालहि...तिच्यशिहि चान्गली गत्ती जमली.... मग तिला इम्प्रेस करन्यासाथी दररोज येतान कधी च्वाकलेत्स तर कधी काय...कधी क्यान्तीन ला चहा...तर कधि निराला मधे स्वाफ़्ती...पन प्रत्येक वेलेस तिचि मैत्रिनही सोबत असायची..काय करनार व्यालेनताइन दे पर्यन्त तिला कलु द्यायचा नव्हता..तोपर्यन्त चान्गली मैत्री करायची आनि एक्दम ब्वाम्ब ताकयचा... अस मी थरवलो होतो... व्यालेन्ताइन दे ल मी पुर्न तयारीने गेलो..मस्त २५ रोज़ चा बन्च..खुप चोक्लतेस.. आनि प्रेमपत्र... क्वालेज माज़ी नजर तिला सर्वदुर शोधत होती..माज़्या सगल्या मित्राना माहित होत..तेही आधेमधे माज़ी मज़ाक करत होते..मलाही आतल्या आत गुदगुल्या होत होते..तेव्हद्यात तिच आली आनि म्हनाली... "मल तुज़्याशी बोलायचा आहे" मी ओम्प्लेते चात... काय बोलु कलेना.. काय हिच प्रपोज करनार कि काय.. "काय बोलायचा आहे"मी "चल ना क्यान्तीन ला"ती मी उदालोच... "चल" मल त्यावेलेस नाचावस वातत होता..पलावस वातत होत...काय करु..गप मुकात्याने स्याक घेउन निघालो तिच्यामागोमग.. क्यान्तीन मधे तिची मैत्रिनहि होती... आम्ही तिघे एका कोपर्यात बसलो.. "......" अरेच्य इतना सन्नाता कसा काय?? मनत सौन्शयाचि पाल चुक्चुकली.. "अरे यश आशु तुला काही सान्गनर आहे"ती "कय बोल ना बिन्धास्त"मी "हे घे"आशु अस म्हनत तिने मला एक कार्द आनि एक रोज़ दिल... आशु तशी थीक होती...पन तरिहि...मी आनलेले रोज़ आनि च्वाकलेत्स आनि 'ते तीला लिहिलेल प्रेम्पत्र' सगली माझिच चुक...तिला जलवन्यासाथी आशुशी जरा जास्तच सलगी ज़्हाली.. आत बोम्बला.. आतापर्यन्त तरी वीना चा कोनासोबत जमला नव्हत... मग मी लगेचच आशुला म्हनालो.. "स्वारी आशु तुज़ा गैरसमज ज़्हालय...माज़्हा तुज़्ह्यावर नाहि तर वीनावर प्रेम आहे..." वीना मला पहातच रहिली...खुप सन्गितल की आशुचच तुज़्ह्यावर प्रेम आहे..ती खुप छान आहे..इत्यदि... आनि सगल्यात शेवती.."मी अल्रेअद्य एन्गेज आहे आनि आम्ही लग्नही करनार आहोत".. तेव्हद्यात आशु निघुन गेली.... आनि पथोपाथ वीनाहि... खुप उशिरा कलाल की आपन मुर्खपना केला... आत तेलही गेले आनि तुपही... आता कुथल्या तोन्दाने आशु कदे जावुन तिचा प्रोपोज स्विकरर करु... उगिचच पचकलो अस ज़्हाल होत... ता.क.: या घतनेतिल मुलिन्चे नावे कल्पनिक आहेत.. लोभ असावा... यश
|
Jaaaswand
| |
| Wednesday, March 15, 2006 - 12:19 pm: |
| 
|
देवा मी फ़ोटो पाहिलाय..सही आहे तो.. माधुरी वर मी अजून एकदा फ़िदा झालो..ते २००२ मधे.. देवदास... मला अतिशय आवडलेला पिक्चर.... त्यातला एक सीन....ज्यात..माधुरी इतकी आवडली कि... ..इथे लिहिता नाही येणार... ते म्हणतात ना.. What else I would have required, if the words would have carried all the emotions from bottom of the heart to the tip of the tongue सीन... शाहरुख तिच्या कोठीवर येऊन पडलेला असतो.. आणि ती त्याची प्रणयारधना करत असते.. तेव्हा.. देवदास : चंद्रमुखी, ये देवदास नाम का प्याला पारो के नाम से भरा पडा हें... उसको और भरने कि कोशीश करोगी तो छलक जायेगा और तुम जमींपे गीर जाओगी चंद्रमुखी : गीरने दो... कम से कम इतना तो सुकूं रहेगा कि प्याले को छू के निकली... ह्या मधे... माधुरी जी मला वाटली आहे..त्याला तोड नाही...
|
Abhijat
| |
| Wednesday, March 15, 2006 - 12:57 pm: |
| 
|
प्रश्न ती बघते माझ्याकडे आणि बघून हसतेही ती येते, थाम्बते माझ्यापाशी, आणि थाम्बून बोलतेही पण ते बघणं, हसणं सारं असतं निर्हेतूक आणि बोलणंही एकदम निर्व्याज ती दिसल्यावर, भेटल्यावर मला सारं जगच नवीन वाटू लागतं ती निघून गेल्यावर, दिसेनाशी झाल्यावर, मला सतत तिच्या स्वप्नात रमावसं वाटतं वाटतं अनेकदा, जावं आणि बोलावं मनातलं चुटकीसरशी मी जातो तिच्या जवळ बोलायचं काय ते माहीत असतं पण बोलू जातो तेन्व्हा बोलतो काहितरी भलतंच कारण ती माझं पहिलं प्रेम आहे उत्तर ती बघत असेलही तुझ्याकडे, आणि हसत असेलही थाम्बत असेलही ती तुझ्यापाशी आणि बोलत असेलही असेलहि ते बघणं हसणं निर्हेतुक नि बोलणं निर्व्याज पण ती भेटल्यावर नवं वाटणारं जग खरं ती दिसत नसतानाही पडणारं तिचं स्वप्नही तितकच खरं नुसतं नको वाटणं नको नुसतं झुरणं जा आणि बोल मनातलं हो मनातल्या गोष्टीचा वक्ता आणि बनव तिला श्रोता नाही मनातली सदाफूली नसत्या शंकानी सुकू द्यायची कारण.... यातूनच मिळते सोबत व्यक्तीची किन्वा.... आठवणीची
|
Abhijat
| |
| Wednesday, March 15, 2006 - 1:02 pm: |
| 
|
Might it so that I posted the posting above, bit late, especially when the topic is diverted on discussing celebs, but, after reading the initial postings on this BB, I strongly felt posting it. Prashna is a poem I got from a friend of mine in a letter and Uttar is my poem in a reply to his letter. In 91, this was displayed on the creativity notice board of GPP and I heard from my friend that this display was a crush for many!
|
Ashwini
| |
| Wednesday, March 15, 2006 - 2:52 pm: |
| 
|
माझा लेटेस्ट celebrity crush डेरेक जीटर डेरेक जीटर डेरेक जीटर माझ्या desktop च्या वॉलपेपरवर त्याचा वॉर्म अप करतानाचा अतिशय देखणा क्लोझ अप होता. एक aaplication बंद करून दुसरं ओपन करायला डेस्कटॉपकडे गेलं की विसरायला व्हायचं आपण कशासाठी इथे आलो ते. काढून टाकला शेवटी. 
|
Asami
| |
| Wednesday, March 15, 2006 - 3:45 pm: |
| 
|
eng ला असताना कधी तरी नाराज नावाचा movie आला होता. सोनालीची त्यातली entry आठवते. संभाला है मैने बहूत अपने दिल को. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला अशी स्थिती असायची माझी. मित्रांच्या शिव्या खात किती वेळा तो movie पाहिला असेल देव जाणे. plaazaa nahitar bharatmata ला आम्ही 2-3 जण असयचो फ़क्त. पहिल्या week नंतर movie पडला आणि तिथून गेला. आम्ही माटुंगा ते विरारपर्यंत त्याचा पाठलाग करून, लागेल तिकडे जाऊन पाहिला होता. नाराजची DVD विकत घेणारा मी जगातला एकमेव मनूश्य असेन अजूनही घरात एका drawer मधे तळाला नाराजमधला photo पडलेला आहे.
|
माझ्या जुही ला सगळे विसरले वाटते? आणि मौसुमी चटर्जी
|
माणूस तुझी " करीस्मा " बरी होती पण तिनी अभिषेक बच्चनची फ़सवणूक केल्यापासून मनातून उतरली
|
Ninavi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:15 pm: |
| 
|
सागर, NJ च्या बीबी वर किती दिवस पोस्ट करणार नाहीयेस? 
|
Asami
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:16 pm: |
| 
|
MT नाराज, टक्कर, don , गद्दर, रक्शक, enlish babu, desi mem , दिल्जाले, तराजू, किमत, duplicate , majorsaab , अंगारे, जख्म, love you hamesha , दहेक, सरफ़रोश, हमारा दिल आपके पास है, लज्जा, अनाहत, कल हो ना हो हे सोड, अगदी हम साथ साथ है पासून जिस देश मेइन गंगा रहता है पर्यंत नि दिलहि दिल मे पासून ढाइ अक्शर प्रेम के पर्यंत सगळे सहन केलय हो लग्न झाले म्हणून नाहितर तमील, तेलगू बघीतले असतेस ( एति : राणी )
|
Storvi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:16 pm: |
| 
|
त्या archive मध्ये सगळ्यांनी बी चे नाव घेतले आहे तर तिथल्या google ads बघा 
|
Jaaaswand
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:18 pm: |
| 
|
येस्स मैत्रेयी बरोब्बर सोनाली ची बातच काही और आहे... असाम्या नाराज आम्ही पण पाहीला बरका.. आणि शेवटी आमच्या गावातल्या जमीनीला पाणी पण लागले सगळे जण..तिच्यावर bombay , सरफ़रोश, टक्कर, duplicate , दिलजले पाहून generally भाळतात.. मी गद्दार ( सुनील शेट्टी असूनही ) तिच्यासाठी कित्येक वेळा पाहिला असीन.. सगळ्यात सुंदर ती, माझ्या मते.. दिल ही दिल में ह्या रद्दड सिनेमात दिसली होती... ए.. नाझनीन सुनो ना चांद आय हें जमीं पे आठवतय का रे.. सोनालीच्या पंख्यांनो.. आमच्य उर्मिला बद्दल कोणी कसे बोलत नाही इथे...
|
मी जाते त्या मेहेन्दी parties मधे नेहेमीच सही crowd असते . अशाच एका पार्टी मधला crush ! Saratoga मधल्या एका Doctor family ने अगदी करण जोहर च्या movie मधे शोभेल अशी upscale wedding party ठेवली होती . मी मेहेन्दी साठी गेले होते ,car lock करून डिकी मधले Mehendi design charts, camera, album,mehndi and other stuff बाहेर काढून समोर गेले इतक्यात त्याच्याशी टक्कर झाली आणि camera सोडून इतर सर्व वस्तू खाली पडल्या . मग त्या वस्तू गोळा करताना पुन्हा एकदा डोक्याला डोके लागून टक्कर . अगदी supermodel शोभेल अस तो पंजाबी .. मस्त oange color चा short kurta, off white trouser घालून आला होता , गालावर दणकून खळ्या ... त्यानी एक cute smile देउन sorry म्हणत warm shake hand केल , तो दूल्हेका का खास दोस्त होता , कॅनडाला रहाणारा . त्याने मला माझं मेहेन्दी साठी बनवलेल्या stage पाशी नेल . संगीत रंगात आल होत आणि मेहेदी station पाशी पुढच्या दोन तासांची sign in list तयार झाली होती , इतक्यात तो अला , माझ्या पाशी येउन drinks विचारून गेला ( काम करायचं असल्यामुळे साधा सुधा रंगीत orange juice च घेतला ) त्याने मला juice आणून दिला आणि स्वत : साठी white wine मधे लिंबू आणि हिरवी मिरची टाकून घेउन अला ( बहुतेक माझी नजर लागु नये म्हणून असेल ) मला म्हणे ,'Can I watch you doing mehendi, I have never seen so much of intricate work b4.'.( यावर मी काय उत्तर दिले असेल सांगायची गरज नाही . ) तो शेजारी बसला , मी जबरी conscious झाले पण तस दाखवल तरी नाही त्यानी माझ्या dress ला , मला आणि माझ्या मेहेन्दीला compliments दिल्या , मग सरळ विचारले , Are u single Deepali? त्याचा हा प्रश्न ऐकून समोर मेहेन्दी काढून घेणासाठी बसलेल्या गर्दीतल्या पोरी आणि बायका लगेच खुसफ़ुस करु लागल्या . . ( मला ओळखणारे तिथे कोणीही नसले तरी मी अगदी प्रामाणिक उत्तर दिल हो ) पण त्यावर त्याचं instant answer, 'That's ok,Even I'm married , my wife is back in Canada and I hope your husbnd is not around:') जनाब के इरादे देखके म्हंटलं ,Well not around this table . ') तो जरा टरकला, ' U mean he'here in this party?' मी म्हंटलं , U never know....' मग पाच मिनिट जरा गप्प बसला . मग त्यानी dinner साठी विचारलं , पण मला खरच पाच मिनिट सुध्दा break घ्यायला वेळ नव्हता , मग त्याने मस्त Hot coffee आणली माझ्या साठी . मग अगदी मध्य रात्री पर्यंत मेहेन्दी पार्टी संपे पर्यंत माझ्याच शेजारी बसून राहिला , सगळ्या पोरी - बाया संपल्यवर तो एक cute से smile देउन माझ्या समोर बसला आणि दंडावर एक खंडा काढून घेतला . जाता जाता त्यानी दुसर्या दिवशीच्या lunch साठी विचारलं , काही तरी सांगायचं म्हणून पटकन सांगून टाकलं , I'm not in town tomorrow. तरी त्यानी त्याचं card दिल म्हणे ,Call me if you change your mind .
|
मलाइका अरोरा-खान किट्टु गिडवाणी (स्वाभिमान serial ) मनिषा कोइराला सलमा हायेक पण all time celebrity crush.. राणी
|
Ashwini
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:18 pm: |
| 
|
माने गुरूजी, काय करणार? त्याला शत्रू मानायला मन तयारच होत नाही. यांकीजविरूद्ध गेम असला की अक्षरशः मारामारी असते आमच्या घरात. मी सोडून सगळे अर्थातच Redsox fans. मलाही आधी कुणीही हरलं तरी वाईट वाटायचं. कुणाशी निष्टा ठेवावी पश्न पडायचा, Redsox की डेरेक जीटर? पण आख्ख्या Redsox पेक्षा Jeter चे पारडे जड झाले आणि आता मी सगळ्यांचा विरोध पत्करून एकटी Yankees ना cheer करते. 
|
Arch
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:37 pm: |
| 
|
crush वेळेत खतम झाला तर ठिक. नाहितर माझया नवर्याचा आणि मला वाटत त्याचा सगळ्या मित्रांचा ह्या एका मुलिवर crush होता college मध्ये असताना. मग पुढे तिच लग्न झाल असेल. आम्हाला जेंव्हा मुलगी झाली तेंव्हा माझ्या नवर्याला तिच नाव त्या crush वालिच ठेवायच होत. काहिच्या काहिच.. 
|
Amrutabh
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:27 pm: |
| 
|
माझा एकदम brand new crush.... ROGER FREDRER ROGER FREDRER ROGER FREDRER
|
Tulip
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:56 pm: |
| 
|
वरचे सगळे क्रश वाचल्यावर माझ्या पहिल्या क्रश बद्दल आठवताना आता अस वाटतय की मी त्याला आता इतक अगदी सहज क्रश अस म्हणू शकतेय खरी पण त्यावेळी अगदी पहिल प्रेम वगैरेच वाटल होत. तो माझ्या मोठ्या भावाचा मित्र. माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा. आमच्या समोरच्या बंगल्यात तो paying guest म्हणून नुकताच रहायला आला होता. मला ते माहीत नव्हते. मी तेव्हा दहावीत होते. नुकतीच प्रीलिम झाली होती. मी आणि माझी एक मैत्रीण अभ्यास करायला आमच्या गच्चीजवळच्या एका खोलीत रात्री बसायचो. आळीपाळीने जागून आणि झोपून, मधे गप्पा, चहा असा आरामात अभ्यास चालायचा आमचा. एकदा रात्री दोन वाजता मी रुम मधून बाहेर जरा थंड हवा खायला आले तेव्हा माझं लक्ष समोरच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरच्या एका उजेड असणार्या खोलीकडे गेले. खिडकी जवळच्या टेबलवर कोणीतरी डोक टेकून झोपलं होत. बाजूला अभ्यासाची जाड पुस्तके वगैरे. छान दिसत होता तो मुलगा तसा झोपला असताना. हातावर डोक टेकलेल आणि केस पसरलेले. मी बराच वेळ तिथे उभी राहिले. मैत्रीण जागी होऊन मागे आली आणि तिने त्या मुलाची माहिती सांगितली डिटेल मधे. थोड्यावेळाने तो उठला आणि परत अभ्यासाला लागला. आमचा अभ्यास मात्र त्या रात्री तिथेच संपला. उगीच त्याचे लक्ष जाऊ नये म्हणून आम्ही अगदी गपचुप आत वगैरे येऊन बसलो. दुसर्या दिवशी सकाळी मी झोपून उठल्यावर बाहेर आले तर हा भावा बरोबर चहा पित गप्पा मारत बसलेला. त्याची आर्किटेक्चरची exam की assignments तेव्हा चालू होते. त्याचे आई वडील मुंबईत नव्हते. बराच वेळ बसला होता. माझी चौकशी केली काय म्हणतोय अभ्यास etc. कसल देखण प्रकरण दिसत होत ते तस सकाळी सकाळी. मी अगदी धाडकन प्रेमातच पडले होते. त्याचे डोळे काहीच्याकाहीच देखणे होते ( आता के.के.मेनन चे डोळे बघीतले की मला तेच आठवतात :-P ) बाकी तो माझ्याशी फ़ारसा अजिबातच बोलत नसे. कदाचित काय ही शाळकरी मुलगी असे वाटत असणार त्याला बहुतेक. माझ्या SSC रिझल्ट नंतर मात्र त्याने मला खास घरी येऊन सुरेख earings दिले होते आणि एक अभिनंदनाच कार्ड. मी कॉलेजला जायला लागल्यावर तो अधूनमधून भेटायचा, दिसायचा, बोलायचाही. खुप छान handsome दिसायचा आणि मैत्रीणी अगदी तो दिसला आणि माझ्याशी बोलायला आला की J व्हायच्या म्हणून मी जास्तच खुश व्हायचे. कॉलेजात इतरही क्रश झाले पण हा कायमच मनात होताच. तो नक्की काय बोलला, त्याला माझ्या बद्दल काही खास वाटतय की नाही हे विचार करण्यात मी अगदी रमून जाई पण त्याला काही विचारावे वगैरे चुकूनही वाटले नाही. मी कॉलेज संपवून झेवियर्स ला PG साठी प्रवेश घेतला आणि मग मात्र आमच्या भेटी रोज व्हायला लागल्या. कारण त्याची आर्की. ची फ़र्म मेट्रोच्या बाजूला होती आणि माझे रात्री आठ ला लेक्चर्स संपले की आम्ही दोघ बरोबर येत असू. आई बाबांना पण बरे वाटत असेकी इतक्या रात्री त्या एरिआ मधून येताना ओळखीची सोबत मिळतेय. आता गंमत म्हणजे इतका रोज सहवास असूनही तो पठ्ठा कधी काहीही खास, पर्सनल असं बोलायलाच तयार नाही. मला कळेचना की काय आहे ह्याच्या मनात. मला तो आधीपासूनच आवडत होता आणि आता तर मी जास्त जास्त गुंतत चालले. पण मग मी जॉब करायला सुरुवात केली आणि आमचा रोजचा contact कमी झाला. नसेलच त्याच्या काही मनात म्हणून मी पण हजारदा मनात येऊनही त्याला कधी स्वत : हून contact केला नाही आणि त्याने पण नाही. काही महिन्यांनी ऑफ़िसतर्फ़े माझी जर्मनीला training साठी निवड झाली आणि ही बातमी त्याला समजली तेव्हा मात्र तो घरी आला तेव्हा म्हणाला की बोलली नाहीस कधी की तुला परदेशात जायच मनात होत ते. मी म्हंटल त्यालाकी अरे, अचानक मलाही अनपेक्षित असताना ठरल हे. त्यावेळी खुप वाटल की त्याने म्हणाव की जाऊ नकोस. वगैरे पण काही बोललाच नाही ( हे म्हणजे सल्लू HDDCS मधे ऍश ला म्हणतो ना 'एन्ड तक नही बोला उसको' त्याची आठवण झाली मलाच ) आणि आम्ही दिलेल्या party ला आला नाही ते अगदी मी जाई पर्यन्तही भेटला नाही. माझ्या वाढदिवसाला मेल तेव्हढी येते. भाऊ नेहमी मला चिडवायचा त्याच्यावरुन कारण त्याला माहीत होते मला तो किती आवडतो ते. खुप नंतर एकदा बोलता बोलता म्हणाला तो की त्याला पण आवडत होतीस की तु. पण तुम्ही दोघही काही बोललाच नाहीत म्हणून मी पण विषय काढला नाही. मला वाटल झालच असेल काही न काही बोलण तुमच्यात. हे राम!! तसं झाल असत तर काय पाहिजे? खंत वाटते कधी कधी अजुनही आणि मनापासून वाईट वाटत रहातं ... वाटतं की जर मी इकडे यायचा निर्णय घेतला नसता तर कदाचित ... अगदी कदाचित काही वेगळं घडूही शकलं असतं. थोडा वेळ दिला असता तर काही नातं आकाराला येऊ शकल असतं. क्रश मात्र अगदी जीवतोड होता माझा हा. बाकी celebrity crushes बद्दल बोलायच तर पहिला अर्थातच शम्मी. मग नासीर, अतुल कुलकर्णी, केके मेनन, आणि अर्थातच MS and JA . आणि हो ... ग्रेगरी पेक, रसेल क्रो, क्लुनी असे कितीतरी रहातातच आहेत
|
Firaki
| |
| Wednesday, March 15, 2006 - 7:13 pm: |
| 
|
तसा तो आणि मी येकाच कॉलेजात होतो. तो MSC पर्यावरनला तेर मि BCS ल. पन वर्ग चेन्ज करताना मला त्याच्या वर्गावरुन जावे लागत. त्यावेळी हे आपले कसले तरी प्रयोग करत असायचे अणि मी आणि मेइत्रिणी कुतुहलाने बघत असायचो. नन्तर लक्ष्यात आले की 'हा' त्यावेळी वाट पहात उभा असायचा आणि चुकुन नसलाच तर त्याचे मित्र बोलाऊन आणायचे. असे ४ येक महीने चालले आणि येक दिवस मी क्लास वरुन येतना त्याने मला सायकल वर पाहीले अन त्याने माज़्ह्या दिशेने पळायला सुरुवात केली. मी घाबरले आणि जवळच्या ग्रिटीन्ग़च्या दुकानात शीरले. तो ही आला धाप टाकत. आता वाटले की हा काहीतरी बोलाणार पन तो शान्तच बसला माज़्ह्याकडे पाहत. continue...
|
हमम कधी कधी क्रश नसताना पण एखाद्याचा क्रश आपल्यावर आहे / होता समजल्यावर हळहळ वाटत रहाते. मी BE मध्ये असताना माझ्या आईच्या मैत्रीणीचा मुलगा अचानक आमच्या घरी स्वत : च्या आईला घेऊन आला. दुपारी ते आमच्याकडेच जेवले. तो मुलगा तसा शाय वगैरे असल्याने त्याच्याशी मी फ़ार बोलायचे नाही. जेवणं आटपून मी सरळ आत निघून गेले. मग त्या तिघांच बाहेरच्या खोलीत बरच खुसुर फ़ुसुर चालू होत. मी सरळ दुर्लक्ष करून माझ्या नविन pc वर गेम खेळत राहिले. मग ते दोघ जायला निघाले मी बाहेर येउन बाय वगैरे केले. तर तो मुलग परत थोड्यावेळाने घरी. आता आई पण बाहेर गेली होती. तो परत का आला अशा अचंब्यात मी दार उघडले. तर तो नुसता उभाच राहिला. मला पण कळेना हा का गप्प बोलत का नाही. मी मग जर घसा खाकरून काही काम आहे का विचारल. त्याने मग उम्म नाही काम नाही पण जरा तुझ्या आईकडे काम होत. म्हंटल आई नाही आहे घरात.. तरी हा पट्ठ्या परत जायच नाव घेईना. मी तसच दरवाज्यात चुळबुळत उभी. मग मी विचारल आत येतोस का? काही हव आहे का? मग एकदम नको नको म्हणत घाईत निघून गेला. मी मग ही गोष्ट विसरूनही गेले. माझी परिक्षा संपल्यावर आईने मला त्याच्याबद्दल विचारले तुला तो आवडतो का? त्या दिवशी तो आईला घेउन विचारायला आला होता लग्नाच. मला धक्काच बसला. अत्तपर्यंत शेकडो वेळा त्याच्या घरी गेले असेन. मला तो खूप शिष्ट वाटायचा आणि उगीच त्याचा राग यायचा शिवाय तो खुप हुषार असल्याने मी जरा २ हात लांबच असायचे. त्याच्या घरी इतक्यांदा पडीक असुनही तो माझ्याशी फ़ार कधी बोलला पण नव्हता. नंतर तो पवईला गेला त्यामुळे संबंध पण उरला नव्हता आणि हे अस अचानक. मी आईला उडवून लावल. अग लहान आहे मी अजून इतक्यात काय लग्न वगैरे. well he wasn't really bad दिसायला क्युट होता परत खूप हुषार होता. पण मग अडल कुठे. आणि त्याला मी इतकी आवडले ऐकल्यावर पण मग उगीचच त्याच्याबद्दल एक softcorner तयार झाला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|