Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 07, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्यात दडलेलं लहान मूल » Archive through March 07, 2006 « Previous Next »

Tanya
Monday, March 06, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येकात एक लहान मुल दडलेल असत. म्हणजे आपल्याला अजुनही काही गोष्टींचा अगदी लहान मुलाप्रमाणे आनंद घ्यावासा वाटतो. लहान मुलांप्रमाणे काही टिवल्या-बावल्या कराव्याश्या वाटतात, आणि अचानक आपल्याला साक्षात्कार होतो की आपण मोठे झालोत. पण तरी, कधीही संधी मिळेल तेव्हा आपण आपली ही हौस पुरी करतोच.
मला स्वतःला लहान मुलांच्या playground मध्ये असलेल्या झोपाळ्यावर झोके घ्यायला, घसरगुंडीवर बसायला miky,Donald, Tom & Jerry चे cartoons show पहायला किंवा बर्फ़ाचा रंगीत गोळा आवाज करत खायला आवडतं.

तुमच्यातल्या दडलेल्या लहानमुलाला काय काय करावसं वाटत?
( mod... काही हरकत नाही ना?)


Gurudasb
Monday, March 06, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर मला कुणी असा वर देईल तर मी माझं वय २ वर्षे ते दहा वर्षे हे बालपण परत दे म्हणून सांगेन . ते निरागस बालपण अतुलनीय असते . खेळ , बालहट्ट , छोट्या सवंगड्यांबरोबरचे ते दिवस अजून आठवतात . बालमनाला पडणारे काही अनुत्तरीत प्रश्न अजूनही आठवतात व हसू येते .

Jaaaswand
Monday, March 06, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो...

मला पण असेच वाटते... :-)
Genius is no more than childhood recaptured at will.
.... Charles Baudelaire


Kmayuresh2002
Monday, March 06, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिकी डोनाल्ड,टॉम ऍंड जेरीची कार्टून्स अजुनही तितकीच आवडतात पहायला..
फ़ास्टर फ़ेणेसारखी पुस्तके किंवा पाडगावकरांची बडबडगीते अजुनही विरंगुळा म्हणुन वाचली जातात.
घरात लहान मूल असेल तर त्याच्याशी त्याचा छोटा मित्र बनुन खेळण्यात,बोबडे बोल बोलण्यात दंगा मस्ती करण्यात अशी कही मजा असते कि मनावरचा सगळा ताण दूर होतो टेन्शन्स विसरली जातात.
लहानपणी ज्या गोष्टी खायला आवडायच्या ती आवड अजुनही टिकुन आहे:-)
अशी बरीच मोठी यादी आहे इथे लिहीणे शक्य नाही.. ते अनुभवणे जास्त छान नाही का?पण प्रत्येकात असे लहान मूल दडलेले असतेच आणि आता वयाने मोठा झालो म्हणुन त्याला बाहेर येऊ न देता मनातच दडपु नये..
त्याला मुक्तपणे विहार करू द्यावा आणि आपणही निरागस आनंद लुटावा:-)



Rupali_rahul
Monday, March 06, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तनया, तुझे मनापासुन आभार हा बीबी उघडल्याबद्दल....
मला वाटले मीच एक आहे जी अजुनही रोज
caartoons बघते. रोज सकाळि मी न चुकता tom & jerry, bayblade हे तितक्याच आवडीने बघते आणि रोज माझी आई मला त्याबद्दल ओरडते की एवढी मोठी झाली तरी अजुन cartoons बघत असते. काही ना काहि करुन रोज आईला त्रास देणे, पप्पांबरोबर मस्ती करणे हे तर नेहमिचेच आहे. पण ज्यावेळि ती लग्नाचा विषय काढते तेव्हा वाटते की आपण का मोठे होतो? का फ़क्त मुलिंनाच जावे लागते? जौ दे हे प्रश्न अजुनही अनुत्तरित आहेत. पण " येणारा प्रत्येक क्षण हसुन जगणे ह्यातच खरा आनंद आहे " हे मनाला समजावुन सोडुन देते. माझ्या एक एक उचापती ऐकायला तुला माझ्या आईकडे आणि पप्पांकडे यावे लागेल.

Milindaa
Monday, March 06, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का फ़क्त मुलिंनाच जावे लागते? <<<

नको, नको, त्या विषयाकडे चुकूनही जाउ नका :-)

Champak
Monday, March 06, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी ज्या गोष्टी खायला आवडायच्या ती आवड अजुनही टिकुन आहे >>>>>>>><<

तशी टेस्टी माती हल्ली मिळत नाही रे :-)


Manuswini
Monday, March 06, 2006 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर मोगली खुप आवडायचे
आणि काही लहान मुलाचे pictures like finding nemo vagaire


Moodi
Monday, March 06, 2006 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे काय फक्त आपल्याला काय वाटते तेच लिहायचे का? काही केलेले लिहिले तर नाही का चालणार? ~D

Supermom
Monday, March 06, 2006 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालेल की. अगदी धावेल.

मला अजूनही हिरवळ दिसली सुरेख की लोळायची इच्छा होते.
अन पावसात भिजायला तर अजूनही आवडतं.


Moodi
Monday, March 06, 2006 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण ५ ते ६ वर्षापूर्वीची गोष्ट. मी आमच्या घनिष्ठ संबंध असलेल्या एका कुटुंबातील ताईकडे गेले. आम्ही सर्व मग दुपारी २ वाजता ठरवुन तिथल्या पार्कमध्ये गेलो. ताईचे नाव लता. तर तिथे एक छोटी एका मुलाला / मुलीला बसता येईल अश्या प्रकारची गाडी होती. तिचा मुलगा त्या गाडीत बसायचा हट्ट करु लागला, पण तो एकटा बसायला तयार होईना. मग ताई म्हणाली तू चांगली बारीक आहेस, बस त्या गाडीत, कोण बघतय?

माझ्या मनातील छोटे मुल वर उड्या मारून येऊ पहात होते, कसे बसे मी हो म्हटले. धमाल म्हणजे ती गाडी अगदी सुरवंटाचा आकार असलेली होती. अन सुरवंट कसा चालतो तशीच उड्या मारत पळायची ट्रॅकवरुन. मग काय आम्ही दोघे त्यात बसलो अन ती गाडी उड्या मारत भन्नाट पळायला लागली. आमची दोघांची मात्र हसुन हसुन पुरेवाट झाली, कारण गाडी टणाटण उडत होती. गाडी सुरु करणारा माणुस पण कसे बसे हसु दाबत होता, कारण त्या गाडीत फक्त लहान मुलेच बसायची, मोठे कोणी आधी बसलेच नव्हते. पण मी मात्र वाहत्या गंगेत हात धुवुन माझी ईच्छा पूर्ण केली.
नंतर बागेत घसरगुंडी, झोका पण खेळले.

अजुनही मी इथे दिवसभर कार्टुन चॅनेलच बघते, अगदी सकाळी टॉम आणी जेरी, पिंक पॅंथर, स्कुबी डू, ल्युनी ट्युन्स आनी इन्स्पेक्टर गॅजेट अन फ्लिनस्टोन पण बघते.

काल प्लॅनेट अर्थ म्हणुन प्रोग्राम होता त्यात आर्टीकवरचे पांढरे अस्वल अन त्याची २ गुबगुबीत पांढरी पिल्ले बघुन त्या पिल्लाना कडेवर घ्यावेसे वाटते.

खारीचे फोटो काढुन तिला पकडावेसे वाटते. मांजरामागे तर मी नेहेमीच पळते, पण वाघ अन सिंहाची गुरगुरणारी अन फिस्कारणारी बछडी कडेवर घेऊन फिरावेसे वाटते. कधी जमेल हे?


Milindaa
Monday, March 06, 2006 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

San Francisco ला जा. तिथल्या खारी, नको म्हटलं तरी धरुन ठेवतील तुला :-)

Manuswini
Monday, March 06, 2006 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला झोपळ्यावर बसायला खुप आवडते पाण्यात डुबक्या मार

आणि लगोरी,साखळी खेळायला बरेच दिवस झाले हे खेळ खेळून पाण्यात डुबक्या मारून
लहानपणी मला उगाच कोणाची तरी खोडी काढायची आवड होती.,, मुद्दाम कोणाचे तरी book लपव, अंगावर पाणी ओत झोपले असताना,चिमटे काढ


Limbutimbu
Tuesday, March 07, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> लहानपणी मला उगाच कोणाची तरी खोडी काढायची आवड होती.,, मुद्दाम कोणाचे तरी book लपव, अंगावर पाणी ओत झोपले असताना,चिमटे काढ
हे इब्लिसपणाच्या बीबी वर लिहा,
हिथ फक्त तुमच्यात दडलेल ल्हान निरागस (?) वगैरे मुल असेल, आत्ताही, ते लिहा!
DDD

Psg
Tuesday, March 07, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान मुल जशी नाच करतात तस नाचायल मला आवडता! :-) ठराविक steps नाहीत, मुक्त छंद! माझ्या मुलाबरोबर मी नाचते तशी, अर्थात घरी कोणी नसताना! :-) तसच आरडा-ओरडा करणे, पळापळी करणे हे सुद्धा करते मुलाबरोबर :-).. कोणत्याही गोष्टीची फिकिर नाही हे लहान मुलांच वैशिष्ट्य मला खूप भावत!

Manuswini
Tuesday, March 07, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूटिंबू

लहान्पनी खोड्या नाही काढत मग काय तुम्ही मोठेपणी खोड्या काढता

एथे लहान मुलांसारखे काय आवडते तेच expected आहे ना?

मस्तिखोरपणा हे पण लहान असल्याचे symbol आहे ना:-)


Puru
Tuesday, March 07, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I'm not sure about the child in me, but the teenager in me is still there:~)

At the same time, looking at the freakin' out, cool, hip generation of today, I also feel like I was born a bit early (i.e. a decade early folks:-)

Gajanandesai
Tuesday, March 07, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नको, नको, त्या विषयाकडे चुकूनही जाउ नका

मिलिंदा

Puru
Tuesday, March 07, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Was the pun intended ?:-)

Rupali_rahul
Tuesday, March 07, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केले खोड्या काढ्ण्याचे किस्से तर फ़ार आहेत.
माझी आई तिला पालीची जाम भिती वाटते. अगदी पाल या खोलीत असेल तर ती पळुन दुसर्‍या खोलीत जाउन बसते. एकदा मी तिची गंम्मत करायचे ठरविले. माझ्या मैत्रिणीला एक खोटी प्लास्टीकची पाल आणायला सांगितले. तिने दुसर्‍या दिवशी ती ठरल्याप्रमाणे आणली. घरात फ़क्त मी, माझा भाउ, माझी मैत्रिण आणि आईच होतो. आम्ही सगळे टी.व्ही. बघत बसलो होतो. मी पाणि प्यायच्या बहाण्याने आत जाउन पाल किचनच्या प्लाटफ़ाॅर्मवर ठेवली आणि त्याच्याच शेजारी पाण्याची बाटली ठेवलि. नंतर भावाल सांगितले की तु आईकडे पाणि माग म्हणुन. त्याने पाणी मागितल्यावर आई किचनमधे गेली. जसे तिने पाणि घ्यायला म्हणुन ग्लास घेउन पाण्याच्या बाटलीकडे गेली आणि जोरात किंचाळली.
आई : " रुपु, तिथे किचनमधे ओट्यावर पाल आहे "
हे ऐकल्यावर आम्ही तिघेही पोट धरुन हसु लागलो. नंतर तिला घडलेला सगळा प्रकार लक्षात आल्यावर मला जी काही बोलणी खावी लागली आहे. पण अजुनही त्याची आठवण काढ्ली की तिही खळखळुन हसते.


Rupali_rahul
Tuesday, March 07, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

not at all puru..

Moodi
Tuesday, March 07, 2006 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पुतण्या वरद आता २ वर्षाचा आहे, आम्ही आता दिवाळीत गेलो तेव्हा तो हातात प्लॅष्टीकची बॅट घेऊन सर्वांच्या मागे धावायचा अन एखादा फटका द्यायचा. आधी घरातले सगळे त्याच्या हातातुन ते हिसकावुन घ्यायचे, पण तो माझ्या मागे आला तेव्हा लागेल म्हणुन मी आधी पलंगावर मग त्यावरुन सोफ्यावर मग दुसर्‍या खोलीत पळापळी केली. त्याला मजा वाटायची अन मला भिती. तो नुकताच बोलायला शिकलाय. मला त्याने मग action करुन सांगीतले की काकु तू पळ, मी येतो अन मग तु भॉक कर मला. तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या घाबरुन पळण्याला तो खेळ समजतोय कारण बाकी कुणी तसे पळत वगैरे नव्हते. मग मी त्याच्याशी भरपूर खेळले. लहान मुलांना पळापळीच जास्त आवडते. त्यातच त्यांचा व्यायामही होतो. अन आपणही मुलात मूल होवुन आपले बालपण परत आणु शकतो जसे वर पुनमने सांगीतलय तसे. मात्र आता तो बॅटने कुणाला फटकावत नाही कारण समज आलीय थोडी.

Savyasachi
Tuesday, March 07, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, तुझ्या २ पोस्ट्स वरून विचारात पडलो की खरच तुझ्या बाबतीत मोठ्या मुलीत लहान मूल दडण वगैरे भानगड आहे की साध सोप गणीत आहे :-)

पूनम, मुक्त छंद.. ? ! :-)


Moodi
Tuesday, March 07, 2006 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोठ चावट्ट कार्ट आहे हे.. ~DDD

एकदा तू खेळुन बघ लहान मुलांबरोबर, तु पण अजुन तसा लहानच आहेस ~DDD .


Storvi
Tuesday, March 07, 2006 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>एकदा तू खेळुन बघ लहान मुलांबरोबर,>>उगाच का तो इकडे येतो? :-O

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators