Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 03, 2006

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » QLC » Archive through March 03, 2006 « Previous Next »

Manuswini
Thursday, March 02, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागेच मी हा लेख वाचला QLC वर,
एक post ही केली पण delete केली.
हेतु हाच आहे की एथे कोणी लोक अश्या QLC मधून गेली आहेत का? का थोडफार असे वाटले का 20-30 age grup मधे म्हणजे QLC symptoms
just trying to know if this really happnes in so called normal peoples life or just a another big name ? would like to know peoples opinion here, how to handle or faced anything like it?

चेष्टा किंवा उप्रोधित बोलणे अपेक्षित नाही आहे एथे.
QLC - Quarter Life Crisis

उदाहरण द्यायचे झाले तर सगळे ठिक्ठाक असताना कधी कधी मला उगच कंटाळल्यासारखे होते रोजचे routine सोडून काहिच करावेसे वाटात नाही तुमाला असे होते का हे normla आहे?


Jaideep
Thursday, March 02, 2006 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manuswini,

pahilyaprtham sorry mala dev madhe lihita yet naahi. mi amchya syst. madhla set up badlu shakat naahi.

anyway. mala ya QLC baddal mahit navhta pan tujhi post baghitli aani shanka yayla lagali ki mi sadhya QLC madhun jatoy ki kaay?

ya QLC cha vay 20-30 asach aahe ki tishi chya pudhe pan te jau shakta? karan tu je udaharn dila aahes tasa anubhav mala aata yetoy aani khara sangto mi gele kityek divas asa ka hotay yacha vichar kartoy. kadachit tyacha uttar ya QLC madhe asel.

jasta mahiti asel tar please post kar.


Manuswini
Friday, March 03, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा मैत्रेयीने दिलेला लेख
http://www.loksatta.com/daily/20060219/cravlkh.htm
वाच आणि बघ

Saanjya
Friday, March 03, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु..
या अनुभवातुन गेलेले अनेकजण सापडतिल.. मागे क्वचित कधीतरी हे असले विचार यायचे माझ्या मनात पण 'उगाच खाजवुन खरुज काढतो आहे'.. 'आयुष्य जगायचे सोडुन उगाच आयुष्याबद्दल फ़ालतु प्रश्न विचारतोय' असे म्हणुन ते विचार मी झट्कून टाकायचॊ.. आणि भोवती मित्रांचा घॊळका, trekking, beer पार्ट्या etc या मध्ये हे विचार कुठल्या कुठ नाहिसे व्हायचे..

पण आता इकडे US ला आल्यावर हे सगळे कधी कधी जास्तीच जाणवते..

Manuswini
Friday, March 03, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले कित्येक महिने तर मी ज्यास्तिच वैतगले कामाच्या deadlines ने.. ईतकं routine life , कुठेतरी जावस वाटत
अतिऊत्साही म्हणून ओळख आहे माझी जेव्हा parties, trekking, whatsoever येते तेव्हा

आणि आता काय ते friends शी बोलणे सुद्धा bore वाटते
घरी यायच जेवायच झोपी जायच साधे gym पण बोर वाटते एकुण उगाच कारण नसताना bore असते :-)

हां पण मायबोलि हा एकच छंद आहे तो आताशा जरा ज्यास्त वाढला आहे. आणि याचा तरी अजून कंटाळा यायचा बाकी आहे :-)

is it winter blooms or what i guess


Saanjya
Friday, March 03, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हॊ, अस general bore व्हायला होत कधी कधी.. मैत्रितील intensity उगाचच कमी झाल्यासारखी वाटते.. छंद etc गोष्टितर उगाच ओढूण ताणून काहितरी केल्या सारख्या वाटतात..

मला तर.. कधी कधी वाटते की.. चूपचाप गावाकड जाव.. आणि मस्तपैकी सरपंच व्हाव.. शेतात शाळा काढावी आणि हायवे वर ढाबा.. डोक्याला ताप नाही.. :D

winter बद्द्ल तु म्हणते ते बाकि खर आहे.. सगळच अगदि गारठून जाते.. अगदि आमच्या company चा stock पण.. :P

Juili
Friday, March 03, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,
मला वाटते की असा कधी कधी विनाकारण कन्टाळा सर्वानाच येत असावा. पण माझा या बाबतीत असा अनुभव आहे की, जेव्हा मला सारखा सारखा असा कन्टाळा येतो, तेव्हा most of the times if I think, I understand that there is something at back of my mind, bothering me.. So मला नक्की कन्टळा का येतोय, हे शोधले, तर मला तरी खुप फ़ायदा होतो. तू सुद्धा try करून बघ...


Jaaaswand
Friday, March 03, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संज्या तुझे दोन्ही मुद्दे हात वर करून्) मान्य....

दुसर्‍या देशात आले कि हे जास्त जाणवते..
आणि दुसरे म्हणजे....
एखादे होटेल काढून धंदा करावा.... म्हणजे डोक्याला ताप नाही

मला कधी इथल्या routine life च भयंकर कंटाळा येतो..
तस india मधे कधी आला नाही.. कारण..करमणुकीची अनेक साधने होती..
मला थोडेफ़ार QLC type होत असावे कारण..मैत्रेयी ने दिलेल्या लेखात जी symptoms सांगितली आहेत..त्यातील २-३ मला लागू होतात...

सांगायचा मुद्दा असा कि... QLC व्हायला सभोवतालची परिस्थिती जास्त कारणीभूत असते.. असे वाटते..
अर्थातच.. अजून प्रकाश टाकायला..तज्ज्ञ लोक आहेतच....

जास्वन्द...


Shyamli
Friday, March 03, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा कंटाळा आला की काय करायच.....
for a change
रोजची काम अजीबात करायची नाहीत...
ऊशीरापर्यत झोप नाही आली तरी लोळत पडायच...
नाहीच बर वाटल तर मस्त ढिंगच्याक type गाणी जोरात लावायची
उदा:
" मेरा चैन वैन सब ऊजडा..... "
तेवढ्यापुरता तरी कंटाळा जातो


Jaideep
Friday, March 03, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वन्दच म्हणण बरोबर आहे. या कण्टाळ्याला आजुबाजुची परिस्थिती जास्त कारणीभुत आहे असच वाटतय लेख वाचुन.

त्यात आपल माणुस जवळ नसेल तर आणखीच.

याला उपाय एकच - हितगुज!!


Ameyadeshpande
Friday, March 03, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे असलं होत असेल तेव्हा दुसर्‍या एखाद्या माणसाचा दिवस आजचा स्पेशल जाईल अस काहीतरी करायचं...एखाद्या मित्राला उगाच सरप्राईज गिफ़्ट द्यावी, किंवा अगदी पोस्टमन ला ही काहीतरी छानसं द्यावं ज्यानी दुसर्‍याच्या चेहरा एकदम आनंदी होईल...

Ninavi
Friday, March 03, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाब्बास, अमेय!!
इथल्या ' सूख दुखण्या' बद्दलच्या तक्रारी वाचून वैतागले होते. तुझी पोस्ट वाचून आनंद झाला.


Jaaaswand
Friday, March 03, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि..
मला नाही वाटत इथे कुणी कसल्या " सुख्- दु:खाच्या " तक्रारी करत आहेत..
तुला असे का वाटले..सांगू शकलीस तर बरे होईल

ज्याला त्याला QLC related जे अनुभव आले आहेत...त्याचेच वर्णन आहे..

अमेयनी सांगितलेला उपाय नक्किच उत्तम आहे..पण इतरांच्या posts मुळे " वैतागायचे " काही कारण नाहिये


जास्वन्द...


Arch
Friday, March 03, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय झाल मरगळायला? चांगल young age आहे. job आहे, मित्रमैत्रिणी आहेत. उगाचच सुख बोचत ते हेच. वाटल अस कंटाळल्यासारख तर jogging करून या बाहेर जाऊन.

म्हणतात न उगाचच नवी नवी नाव शोधायची आणि उसासे देत बसायच.


Champak
Friday, March 03, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च तु च बघ भो आता काहीतरी :-)

Seema_
Friday, March 03, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि खर सांगु का सुख दुखण्याच्या तुझ्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे .
मला खरच वाटत कि हल्ली जरा लवकरच मिळतात सगळी सुखं . मग aimless झाल्यामुळ निराशा ही लवकर येते . सुख बोचण्याचाच प्रकार आहे हा .


Jaaaswand
Friday, March 03, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च...
मला माहित नाही.. ह्या thread वरच्या किती लोकांना जवळून तुम्ही ओळखता..मात्र आपली नक्किच ओळख नाही
म्हणून एवढेच म्हणावेसे वाटते..कि
एखाद्या गोष्टिबद्दल / एखाद्याबद्दल पुरेशी माहिती नसताना उगाच सल्ले
देणे कितपत योग्य आहे...

job आहे, मित्रमैत्रिणी आहेत. उगाचच सुख बोचत ते हेच.
... हे वाक्य डोक्यात गेलं म्हणून बोललो...

अहो असे jogging track वर सगळे problems सुटले असते तर अजून काय हवे होते



Ninavi
Friday, March 03, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद, तशी म्हणण्यासारखी ओळख आपलीपण नाही. पण तुझे फोटो, चारोळ्या पाहिलंय मी. आणि विशेषतः तुला असं वाटलं म्हणून नवल वाटलं मला. ज्याला जगातल्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेता येतो आणि वाईट नाहीसं करण्यासाठी आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न करावा ही उर्मी असते, त्याला हे प्रश्न का पडावेत हे मला खरंच कळत नाही. हा उपरोध नाही. आणि म्हणूनच अमेयची पोस्ट आवडली मला.

Moodi
Friday, March 03, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद रागवु नकोस परदेशात गेल्यावर असे अनुभव येतात एकटेपणाचे, कंटाळण्याचे. पण आर्च आपल्यात सिनीयर आहे, त्यामुळे तिचे सल्ले तू चुकीचे मानु नकोस. निनावीला पण तू एकदम असे बोलु नकोस, मी नवी असताना ती चुक केलीय अन अजुनही मला त्याचे वाईट वाटतय.

फक्त कविता हे सदर सोडुन ती सर्व मायबोली एकदा निवांत वाचुन बघ म्हणजे मी काय म्हणतेय ते तुला कळेल. माझ्या कामतुन वेळ मिळाला की मी तेच करते. बरेच नवीन अनुभव वाचायला मिळतात, त्यातुन बरेच नवीन उमजते देखील. आता उलट मायबोलीमुळे तुला बरेच नवीन मित्र मिळाल्याने अन तुझा छंद आमच्या सारख्यांपर्यंत पोचल्याने तुझा कंटाळा दूर व्हायला हवा.

जा मस्तपैकी एक थंडगार फोटो टाक बर्फाचा, नाहीतर मग पॅरीसला जाण्यासाठी तयारीला लाग, नशीबवान आहेस, मी ३ वर्षापासुन इथे आहे पण नाही जमले तू जमव बर अन लवकर वर्णन पण टाक. म्हणजे मी तिथे लवकर पोचेन.


Ameyadeshpande
Friday, March 03, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पहिले कळेना हा क्यू. एल. सी. काय प्रकार आहे ते! मग वाचल्यावर कळालं हात्तीच्या हे होय...
जास्वन्दा, तू जे म्हणतोस मग ते कदाचीत वेगळं असेल...काहीतरी नाहिये ह्या भावनेतून आलेलं असेल पण रुटीन चा उगाच कंटाळा येणे ही काही फ़ार मोठी गोष्ट नाहिये त्याला क्यू. एल. सी. वगैरे नाव द्यायला... आणि बहुतेक वेळेला मोकळा वेळ आहे आणि करमणुकीला काही नाहीये म्हणुन हे असलं वाटतं त्याला झटकून टाकायचं पटकन, जितकं कवटाळू तितकं चिकटतं.


Seema_
Friday, March 03, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण आर्च आपल्यात सिनीयर आहे
>>>>
मूडी arch तुला आता मारणार आहे बघ तीथ येवुन
DDDDD

Jaaaswand
Friday, March 03, 2006 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय,

अगदी तुझ्या प्रमाणेच मलाही हे QLC प्रकरण काय आहे हे माहित नव्हते..
त्या PDA सारखे... :-)

असो, मी कधीच म्हटले नव्हते..कि मी QLC ने पछाडलेलो आहे.... मी फ़क्त शक्यता वर्तवली होती..त्या article वरून..
आणि अगदी बरोबर आहे..उगाच मोट्ठी english नावे देऊन बागुलबुवा करण्याचा उपयोग नाहिये..... लिम्फ़ो-सर्कोमा type

तुझा उपाय...उत्तम आहे..
आणि हो मूडी... मला कोणालाही दुखवायचा अजिबात हेतू नव्हता..
मी फ़क्त इतरांच्या सल्ल्यांबद्दल ( ज्याचा अर्थ मला जसा लागला तसा ) प्रतिक्रिया नोंदविली...

माझ्या समजण्यात काही चूक झाली असेल तर कृपया दिवे घ्यावेत..

बाकि..तु म्हणतीयेस तर एक बर्फ़ाचा फ़ोटो टाकतो..सर्वांनी थंड घ्या बरका :-)

जास्वन्द...


Moodi
Friday, March 03, 2006 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गपे सीमा, सिनीयर म्हणजे वयाने सिनीयर नाही झक्कींसारखी, तर आमच्या आधी २ ते ३ वर्षे मायबोली जॉइन केलेली म्हणुन सिनीयर म्हटले मी.

आर्च दिवा घे.



Ameyadeshpande
Friday, March 03, 2006 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे गोडी गुलाबी नी रहा रे :-)
बाकी जास्वन्द मला एक गोष्ट तुला सांगायची होती बरेच दिवस...तुझं नाव पाहिलं की मला पुलंच्या एका व्यक्तिरेखेमधलं एक पात्र
"जास्वंदाबाई जयसिंगपुरकर " आठवते :-)
आता तू दिवा घे म्हणजे झालं!


Hawa_hawai
Friday, March 03, 2006 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं TP नको मुळ विषयावर बोलुयात. मी जरा गोंधळात पडले आहे वरचे सुरूवातीचे काही पोस्ट वाचून. मनस्विनी म्हणते की रूटिन सोडून बाकी सगळे कंटाळवाणे वाटते आणि जास्वन्द म्हणतो की रुटीनचाच कन्टाळा येतो तर मग नक्की कशाचा कन्टाळा आला म्हणजे QLC चा attack आला समजायचे?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators