|
दादरहून शेवटच्या लोकलने कसार्याला उतरलो... मागोमाग पटनाला जाणारी मेल आली आणि घाईघाईत तिच्यात इगतपुरीला उतण्यासाठी शिरलो... इगतपुरी येता येता समोरुन TTE येताना दिसला कल्याण तर मागेच राहिल होतं... तरी आमच मात्र कल्याण होणार होतं... तेवढ्यात एक मित्र पुढे सरसावला आणि इगतपुरी स्टेशन कधी येणार याची विचारपुस करण्यासाठी तडक TTE कडे गेला... " गाडी स्टेशन के बाहर सिग्नल पे खडी है... " TC चे उत्तर ऐकून पटापट खाली उड्या मारल्या आणि कल्याणच्या प्रसंगावर पडदा पाडला... रात्री ३ वाजता रेल्वे ट्रॅक्समधुन Bankers च्या उजेडातून १० मिनिटात इगतपुरी गाठले सकाळी ५.४५ला महामंडळाच्या गाडीने निरगुडपाड्याला vai नाशिक via त्रंबक असा प्रवास करत ८.१५ ला पोहोचलो... हरिहरला जाणारे दोन मार्ग आहेत पैकी एक कसुर्ली - हर्षे वरून जातो. गाडीतुन हरिहर आणि त्याच्या बरोबर डाविकडे बसगड दिसतो. गावातल्या विहरीवर आंघोळ करण्याचा विचार होता पण सकाळच्या गारव्यामुळे तो अविचार सोडून सरळ गडाकडे मार्गक्रमण केले. हरिहरला जाणारी पक्की पायवाट असली तरी नाचणिच्या शेतातुन उड्या मारत पुढे ती वाट शोधावि लागते... बसगड आणि हरिहरच्या मधेच एक आंगठा ( ठेंगा ) दाखवणारा डोंगर लक्ष वेधुन घेतो... गडाची चढण सरळ सोपी आहे. (मातीची पायवाट असल्याने पावसाळ्यात न जाणेच योग्य्) गडचा पसारा एका प्रचंड कातळावर वसलेला आहे... कातळावर चढाई करण्या पुर्वी थोडसं पठार आहे. पठारावरून आडवातिडवाऐसपैस पसरलेल्या वैतरणाचे दृष्य मनाला भुरळ पाडते... गडावर चढण्यासाठी कातळात अंदाजे १५० ते २०० पायर्या शिडीप्रमाणे उभ्या खोदलेल्या आहेत. प्रत्येक पायरीवर खोबणं असल्याने चढण्यास फ़ार श्रम पडले नाहीत... १०० एक पायर्या चढुन गेल्यावर जीर्ण अवस्थेतला दरवाजा दिसतो... मागे वळुन पाहिल्यावर परतीची धास्ती मनात डोकावून गेली... तरी एक बरयं सगळ्या पायर्या कातळात खोदलेल्या असल्यामुळे दोन्ही बाजुन कपारी आहे. दरवाजातून पुढे गेल्यावर छातीपर्यंत कोरलेल्या वाटेवरून १० - १५ पाउले कमरेतून वाकत पुढे जावे लागते. गडावर फ़िरण्यासारख फ़क्त पठार आहे. तटबंदी नाहीच. फ़क्त पहार्यासाठी उपयोग होत असावा... महाराजांच्या कारकिर्दीत या गडाचा उल्लेख सापडत नाही. वर पठारावर एक टेंगुळ आल्यासारखा भाग आहे त्यावर भगवा दौलाने फ़डकत होता. पाण्याची छोटी मोठी ७ - ८ टाकी आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सुकत आलेल्या तलावाकडे धाव घ्यावी लागते. हनुमानाचे मंदीर आणि शंकराची पिंडी या व्यतिरिक्त एक १० जण राहू शकतील येवढी छोटी खोली आहे. तलावाजवळ आदल्याच रात्री कोणीतरी camp fire केले होते. ते क्षण अनुभवल्याबद्दल त्यांचा हेवा वाटला. जवळच एका झाडाच्या पसरलेल्या फ़ांद्यावर बसुन न्याहरी केली, तेव्हा बजरंगबलीच्या खांद्यावर बसलेल्या राम लक्ष्मण जोडीची आठवण झाली. इंधन भरल्यावर अवजड वाहानं गड उतरू लागली. तळव्याला येणार्या घामामुळे फ़्लोटर्स हातात घेऊन अनवाणी चालणे भाग पडले... उतरताना कातळातला उतार आता मात्र डोकेदुखी ठरू लागला. एखाद लहान मूल शिडीवरून सावकाश खाली उतरावं तसं आम्ही तिघ गोगलगाईच्या गतीने खाली उतरू लागलो. हा येवढा rock patch सोडला तर संपुर्ण ट्रेक एकदम सोपा होता. खाली पठारावरुन गडाचा भाग आयताकृती भासत होता. गडाकडे पाठकरुन उभे राहीले की उजविकडे कर्सुली - हर्षे कडुन येणारी सोपी पायवाट दिसते.. तर डावीकडे निरगुडपाड्याची छोटीशी वस्ती आहे. गावात एकमेव दुकान असुन फ़क्त पार्ले जी आणि मारी बिस्किट शिवाय काही मिळत नाही. उतरताना उन्हामुळे चांगलीच दमछाक झाली होती... परत त्याच विहिरीवर येऊन ताजेतवाने झालो आणि वाड्याकडे जाणारी यस्टी पकडून भिवंडी मार्गे ठाण्यपर्यंतचा खडतर प्रवास पार पाडला. छायाचित्रे
|
Aj_onnet
| |
| Monday, February 06, 2006 - 11:56 am: |
| 
|
इंद्र, छान वर्णन केलयस. photo पाहून तर लवकरच ही मोहीम आखायचा मोह होतोय.
|
इन्द्रा, मस्त रे भो! खासच! कातळ तापला होता का?
|
Chandya
| |
| Monday, February 06, 2006 - 9:34 pm: |
| 
|
द्रज, चांगले वर्णन लिहिले आहेस. संभाजी नगर सहलीचे देखिल. फोटो सगळे नाही पाहिले पण झकास आलेत.
|
अजय वाड्यावरुन थेट गडाच्या पायथ्यापर्यंत सुटणारी बस सेवा आहे.. नाशिकवरून नाही चंदया धन्यवाद LT सकाळच्या पारी कातळ अगदी थंड असतो रे भो... म्हणुन तर अनवाणी उतरता आलं
|
Very nice. You are lucky.-
|
Girivihar
| |
| Wednesday, February 15, 2006 - 6:32 am: |
| 
|
पतना मेल नह्वती रे, महानगरी एक्ष्प्रेस्स होती वारानसी ला जानारी
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|