Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » gajanandesai » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 01, 200625 03-01-06  3:43 pm
Archive through April 14, 200620 04-14-06  6:22 am
Archive through June 16, 200620 06-16-06  12:27 pm

Dineshvs
Saturday, June 17, 2006 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक गावची तर्‍हा वेगळी, ईथे गोव्यात या दिवसात काजुच्या कोवळ्या रोपाची भाजी करतात.

Bhramar_vihar
Wednesday, July 05, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजा,आधी साडी सोडून break घेतलास, आता पावटा सोडून.. पुढे काय सोडतोयस आणि कधी?

Kedarjoshi
Sunday, July 09, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन,
पमूच्या आईचे बोलने वाचताना पण फिल होते. साला आपला देशच गरिब. पर फिरभी दिल है हिंदुस्थानी.
थोड्याफार फरकाने ह्याच कथा सगळ्या गावात.
माझ्या लहानपणी शांताबाई नावाच्या एक बाई चने,फुटाने विकायला गल्लीत यायच्या त्या देखील आमच्या घराजवळ राहायच्या. सर्व आयुष्य लाह्या करने, चने विकने यात गेले. कधीही त्यांनी तक्रार केलेली आठवत नाही. माझ्या मोठ्या काकुं बरोबर त्यांची मैत्री आहे. आजही देशात गेलो की आवर्जुन माझ्या मुलीसाठी फुटाने आनुन देतात. त्याचे पैसे ही घेत नाहीत, खुप मोठा हो असे दर वेळेस म्हनतात. म्हातार्‍या झाल्यात आता. त्यांचा व्यवसाय त्यांचे मुल चालवतात.
तुझा लेख वाचुन त्यांची आठवन आली.



Moodi
Sunday, July 09, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरयं गजानन. त्यांना आवर्जुन भेटण्यासारखे तुझे मन पण तेवढेच मोठे आहे रे. वाचतानां वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीत आई वडिलांची म्हातारपणात सेवा ते करतायत यापेक्षा आणखीन काय हवे त्या साध्यासुध्या माणसांना!

Dineshvs
Sunday, July 09, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलाने आईची शुश्रुषा करावी आणि परिचीताने आवर्जुन भेटायला जावे, यानेच आजारी माणसाच्या वेदना हलक्या होतात.
मी पण आजच ईचलकरंजीला गेलो होतो. पण वेगळ्या कारणासाठी.


Bee
Monday, July 10, 2006 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन छान लिहिलस रे.. कळवळून आलय. ज्यांच वय झाल त्यांच्यासाठी आपण फ़ार असे करू शकत नाही. त्यांचीही काही अपेक्षा नसते आपल्याकडून. जग बदललेलं असतं त्यांच. आपल जग नविन असतं. करातच जर झाल तर नविन पिढीसाठी अवश्य काहीतरी कराव जेणेकरून त्यांच्यावर ही वेळ येणार नाही. इतर कुणा परक्यासाठी आपले काळीज तितकेसे उदार नसेल मात्र आपल्याच अवतीभोवतीचे आणि आपल्या परिचयाचे प्रियजन, ह्यांच्यासाठी आपण नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयास करावा. तेंव्हा, तू वनुताईला काय देऊ शकतो तर मला वाटत हे दुःख परत कुणाच्या डोळ्यात आपल्याला किंवा इतर कुणाला बघता येऊ नये म्हणून आपण थोडा इतरांच्या भल्याचा विचार करावा. अशा व्यक्तींकडून नकळतपणे ह्याच प्रेरणा आपल्याला मिळतात. कधीकधी दुःख काहीतरी करायला शिकवत हे त्यातच एक उदाहरण आहे.

तुझ्या career साठी माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा आणि उदंड आशिर्वाद! वनुताईंच्या प्रकृतीसाठी देवाचरणी प्रार्थना...


Bhramar_vihar
Monday, July 10, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजा, वनुताई खरच भाग्यवान की त्यांची मुलं त्यांची एवढी काळही घेताहेत. नाहीतर हल्ली आपण जे पहातो, ऐकतो ते फारच भयानक! वनुताई लवकर बर्‍या होवोत हीच सदिच्छा!

तुझी लिहीण्याची शैली खरच भावली, keep it up !


Lopamudraa
Monday, July 10, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलय..!!!आज वृध्द व्यक्तिंना मायेचिच जास्त गरज आहे.

Arun
Tuesday, July 11, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन : खूप छान लिहिलं आहेस.

Jayavi
Tuesday, July 11, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानना, अरे किती सुरेख लिहिलंस रे! अगदी गहिवरुन आलं! असेच तुला भरभरुन आशीर्वाद मिळोत! म्हातार्‍या माणसांना फ़क्त विचारपूस हवी असते रे, थोडा आपला वेळ हवा असतो. तो तू दिलास.....त्यांना सगळं पावलं. खूप छान शैली आहे तुझी. लिहित रहा.

Rupali_rahul
Tuesday, July 11, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीडी खरच खुप सुंदर लेख लिहिले आहेत आणि त्यात प्रत्येक उल्लेख एकदम सचित्र डोळ्यापुढे उभा राहिला. खासकरुन तो शेवटचा लेख...


Limbutimbu
Tuesday, July 11, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, गजाभाऊचा बीबी आजच पहिल्यान्दा पुर्ण वाचला!
छान ओघवत सहज सुन्दर मनाला भिडणार लिहिल हेस
:-)

Seema_
Wednesday, July 12, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन किती सुरेख लिहिल आहे !
अतिशय आवडल . वनुबाई अगदी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या .


Raina
Wednesday, July 12, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन,
खूप सुरेख लिहीले आहे तुम्ही.


Gajanandesai
Thursday, July 13, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी खूप धन्यवाद. ...

Ninavi
Thursday, July 13, 2006 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीलं आहेस रे.

Puru
Friday, July 21, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाला अगदी भिडलं बघ!

Nandita
Friday, July 21, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीडी छान लिहलस रे एकदम touching!!

Arun
Friday, January 05, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GD: मस्तच आहे रे फोटो .......... :-)

Bee
Friday, January 05, 2007 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, छायाचित्र खूप सुंदर आहे पण वा. रा. कांतांच्या ह्या ओळींशी सुसंगत नाही वाटतं.. कारण तिन्हीसांजेपेक्षा ही संध्याकाळची वेळ वाटते आहे.

लिहित रहा..


Dineshvs
Friday, January 05, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, फोटो दोन मिनिटे आधी घ्यायला हवा होता, म्हणजे यापेक्षा सुंदर रंग दिसले असते.
अर्थात आहे तसाही छान आहे.


Bhramar_vihar
Saturday, January 20, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गड्या, फोटो छान आहेच! मला सांन्ग की तु लिहिण का बरं बंद केलस?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators