Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
supriyaj
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » supriyaj « Previous Next »

brihanmahaaraashTra adhiveshan 2007 - vruttant
दिनांक २८ जुन २००७ :
एप्रिलमध्ये BMM साठी रजिस्ट्रेशन केलं तेव्हापासुनच seattle ल जायचे वेध लागले होते. आज अखेर तो दिवस उजाडला. पहिल्यांदाच कन्व्हेन्शन ला जात होते त्यामुळे खुपच उत्सुकता होते आणि आधी जाऊन आलेल्या लोकांचे चांगले - वाईट अनुभवही ऐकून होते. 'खुपच गर्दी असते सगळीकडे त्यामुळे एकही कार्यक्रम नीट बघता येत नाही..', ' food package मुळीच घेउ नका, धड जेवायला मिळत नाही'.'या वर्षीचे कार्यक्रम तसे ग्रेट नाहियेत, आधीच्या कन्वेंशन्ला कित्ती छान प्रोग्रॅम होते नाही!!!' इथपासून ते 'पहिल्यांदाच जाताय ना मग नक्कीच enjoy कराल,''कन्वेंशन हा एक सुंदर अनुभव असतो' असं सांगणारी पण बरीच लोकं भेटली.
finally with the all the excitement मी आणि समीर (svsameer) L.A हुन संध्याकाळी seattle ला जायला निघालो. तिथे पोचेतोवर १२:३० वाजले होते. सकाळी लवकर उठून कन्वेंशन सेंटरला (जे आमच्या हाॅटेल पासून ३ मिनिटाच्या अंतरावर होते) रजिस्ट्रेशन साठी पोचायचे होते. We were targeting to reach there by 7 am since the registration time was 7 to 9 am . मी सकाळी ५ ला उठुन तय्यार.. आणि ६:३० झाले तरी समीर झोपलेलाच.. मग नेहेमीचीच भांडा-भांडी करून फायनली तो तयार झाला.




दिनांक २९ जुन २००७ :
downtown मध्ये असलेल्या seattle कन्वेंशन सेंटर ला पोचत असतानाच दिसल्या त्या आजुबाजुच्या hotels मधून बाहेर पडणार्‍या ठेवणीतल्या जरीच्या साड्या, सोन्याचे दागिने, सलवार्-कुर्ते, धोतर्-झब्बे आणि अगदी पगड्या सुद्धा आणि आपली मराठी भाषा. खुपच मस्त वातावरण तयार झालं होतं. एखाद्या खानदानी घरच्या लग्नसमारंभाला जावं ना तसच काहीसं.
रजिस्ट्रेशन counter ला पोचलो तेव्हा तिथे अजिबातच गर्दी नव्हती, त्यामुळे 'तु नेहेमी उगीचच घाई करत असतेस मी अजून थोडा वेळ झोपलो असतो की' असा शेरा मला ऐकून घ्यावाच लागला. as expected आमच्या नावाची entry list मध्ये मिळाली पण आम्च्या Food package ची entry काही मिळेना. food package regaistration चा printout सुदैवाने अमच्या जवळ होता पण नेमका तो hotel वर राहिलेला. so Sameer had to go back to get that. तो निघाला आणि त्या counter वरच्या बाई मला म्हणाल्या की मिळालयं तुमच नाव, माझ्याकडे updated list नव्हती ना.. sorry हं.. त्यात सुद्धा गोंधळच. समीरचं नाव होतं पण माझं नाहीच. finally i told them that my last name is 'Joshi' and not 'Sarvate' .. तेव्हा हा नवराच ना तुमचा मग नाव नाही का बदललं असा एक शेलका remark ऐकून घेत आम्ही breakfast रूमच्या दिशेने निघालो.
कन्वेंशन ची बिल्डिंग ६ मजली होती. चौथ्या मजल्यावर main stage आणि exhibition stalls चा हाॅल होता. सहाव्या मजल्यावर parallel stage rooms आणि ब्रेकफास्ट व जेवणाचा हाॅल अशी व्यवस्था होती. breakfast ला कांदेपोहे,गोडाचा शीरा आणि केशरी पेढ्याचा आस्वाद घेउन खाली म्हणजे मेन स्टेज च्या दिशेने निघालो. वाटेत मायबोलिकर anudon and Ashchig म्हणजेच अनु व आशिष महाबळ भेटले. बरेच L.A वासी सुद्धा भेटत होतेच. ९ ला मुख्य कार्यक्रम सुरु होणार होता. auditorium बरेच भरलेले होते.. जाऊन बसलो आणि काय आश्चर्य!!! बरोब्बर ९ वाजता (कदाचीत २ मिनिटे आधीच) पडदा उघडला. वा!! फारच छान असं कौतुक करत BMM च्या पुढील कार्यक्रमासाठी सज्ज झालो. पडदा तर उघडला पण पुढे कसला पत्ताच नाही. मग थोड्याच वेळात अमेरिकेचे, कॅनडाचे आणि भारताचे राष्ट्रगीत म्हणण्यात आले. कौतुक एका गोष्टीचे आवर्जून करावसं वाटतयं की अमेरिकेचं राष्ट्रगीत एका छोट्या मुलीने अत्यंत स्पष्ट आणि सुंदर आवाजात सादर केलं.

या वेळच्या कन्वेंशन्ची Theme होती 'हे विश्वची माझे घर सेतू बांधा रे!!' त्यामुळे थोडासा वेळ मधे मिळाला की या ओळी मोट्ठ्यांदा वाजवल्या जायच्या आणि स्क्रीन वर सारखा तो लोगो दाखवायचे :-) पुढे पुढे तर स्क्रीनवर या ओळी आणि त्यानंतर मराठी मॅट्रिमोनी ची जाहिरात हे एक न समजणारं समिकरण झालं होतं. असोर्आष्त्रगीतांचे सोपस्कार पार पडले, तेव्हा वाटलं की आता काहितरी छान दीप-प्रज्वलन वगैरे करून कन्वेंशन्चा शुभारंभ होइल.. पण परत एका शांततेनंतर स्टेज वर डाॅ.जब्बार पटेल (-प्रमुख पाहुणे), डाॅ. नरेंद्र जाधव - keynote speaker , विलासराव देशमुख आणि जगदीश वासुदेव - BMM president अवतीर्ण झाले. विलासरावानी 'अधिवेशनाचा शुभारंभ झाला' असं जाहीर केलं मग त्यानंतर एक कमानीसारखं दिसणारं काहितरी घेउन २ मुली आणि त्यापाठोपाठ दोर्‍यांनी बांधलेल्या ४-५ लाकडी काठ्या घेउन काही मुलं-मुली ह्या मंडळींच्या समोर येउन उभे राहीले. :-) It was really a funny moment to see vilasrao's facial expressions .. थोड्याच वेळात BMM opening ceremony ला सुरुवात झाली. Seattle, San jose and Chicago अश्या ३ मंडळानी हा कार्यक्रम बसवला होता.. म्हणजे अगदी 'साफ बसवलाच' होता. जेमतेम २० मिनिटं ते सहन करुन आम्ही सगळे बाहेर पडलो. बाहेर आलो तर आधीच तिथे उभी असलेली माणसं कार्यक्रमाला नावं ठेवत उभी होती :-) तिथेच आम्हाला अजुन एक मायबोलिकरीण 'सानुली' आणि तिचा नवरा भेटले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारुन मग बराच वेळ शेजारिच असलेल्या प्रदर्शनातले stall बघण्यात घालवला. almost २ तास तरी auditorium मधे उरलेल्या प्रेक्षकांचा अंत बघितल्यावरच तो opening ceremony एकदाचा संपला. आणि आम्ही सर्व ज्याची आतुरतेने वाट पहात होतो त्या भाषणांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवात BMM चे अध्यक्ष श्री.जगदीश वासुदेव यांच्या भाषणाने झाली. त्यांनी व्यासपीठावरच्या मंडळींची ओळख करून दिल्यावर महाराष्ट्राचे औद्यगिक व सांस्कृतिक मंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी छोटसं भाषण केलं. अशोक चव्हाण हे बरेचसे विलासरावांसारखेच दिसतात.. (कदाचीत नेहेमीच एकत्र फिरल्याने 'वाण नाही पण गुण लागला' असावा असं सर्वांचं मत झालं) .. मग आपले माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख (ही अशी सगळीकडे रावजी म्हणायची पद्धत का आहे बरं?? असं कुणी रावजी वगैरे म्हटलं की मला ती 'या रावजी तुम्ही बसा भावजी ' ही लावणीच आठवते. ) बोलायला उभे राहिले.. अतिशय politically correct शब्दात त्यांनी भाषण केलं बर का!!! पुण्याचं डेट्राॅइट (बहुधा आत्ताच्या काळातलं GM ची बर्‍यापैकी वाट लागल्यानंतरचं) करण्याचा मानस, महाराष्ट्र सरकारकडे पैसा ओसंडून जातोय अश्या थाटात BMM ला ५० लाख देण्याची घोषणा असे बरेच पतंग उडवून झाल्यावरच हे भाषण संपलं. मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांना महत्वाची appointment असल्याने अध्यक्शांच्या भाषणाच्या आधीच आपली मुक्ताफळं उधळून ते बाहेर पडले. Finally ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ते डाॅ. जब्बार पटेल बोलायला उभे राहिले. वक्ता असावा तर असा.. विषयाचा पूर्ण अभ्यास, बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही.., डाॅ. पटेलांनी त्यांच्या कारकीर्दीचा overall परामर्श घेताना त्यांनी आणि त्यांच्या पत्नी डाॅ. मणी यांनी समाजाच्या विविध स्तरावर केलेले काम आणि त्यातुन जब्बारना सुचलेले वेगवेगळे विषय आणि या सर्वांतुन निर्माण झालेल्या सामना, मुक्ता, उंबरठा यासारख्या अप्रतिम कलाकृती याबद्दल थोडक्यात सांगितलं. भाषण संपूच नये असं वाटत होतं. पण पुढच्या कार्यक्रमाना उशीर होऊ नये म्हणुन जब्बारनी भाषण आवरतं घेतलं. एव्हाना parellel stage वरचे कार्यक्रम सुरु झाले होते. आम्ही सगळे (मी, आशिष, अनु, समीर) महाराष्ट्र फाउंडेशन च्या 'आयुष्याच्या या वळणावर' असं शीर्षक असणार्‍या प्रोग्रॅम ला जाउन बसलो. हा प्रोग्रॅम विद्या बाळ, दीपा श्रीराम आणि सोनाली कुळकर्णी यांनी conduct केला. The concept was to form different groups representing the words 'passion','cooperation','peace','strength','love' etc. आणि त्या त्या group मधुन एकेकाने येउन अपल्या आयुष्याच्या ह्या वळणावर आपल्याला काय वाटाय, आपण इथे पोचेस्तोवर प्रवास कसा केला याबद्दल बोलायचं. concept छान होता पण वेळेअभावी आणि थोडासा दीपा लागूंच्या रटाळ होत गेलेल्या गोष्टीमुळे नीट जमला नाही.
apart from thought sharing by sonali and deepatai , तिथे असणार्‍या आणि अमेरिकेत बरेच वर्ष राहिलेल्या काही जणींनी मात्र फारच छान अनुभव सांगितले. एका बाईंनी तर त्यांचा मुलगा ड्रग्स घेत होता तेव्हाचा त्यांचा अनुभवही शेअर केला हे तसं विशेष नमूद करण्यासारखं. एकीने तर मुलगा अमेरिकेत आहे आणि बरेच वर्षं भेट झाली नाही म्हणून त्याला भेटण्यासाठी मनातली सगळी भिती सोडून एकटीने 'हिरकणी' सारखा इथवर प्रवास कसा केला ते सांगितलं. २ जण अमेरिकेत आलेल्या discrimination च्या अनुभवाबद्दल बोलले. नंतर मग मी आणि अनुने थांबुन सोनाली, दीपाताई आणि विद्याताईंशी गप्पा मारल्या. असे अनेक छोटे कार्यक्रम बकीच्या rooms मधे पण सुरू होतेच.
आणि हो, एक विसरलेच की.. सर्वात महत्वाचा म्हणजे जेवणाचा कार्यक्रम :-) ३ ते ४ हजार लोकांना बसण्याची उत्तम व्यवस्था केलेला जेवणाचा हाॅल. आणि तितकच उत्कृष्ठ अस्सल मराठी जेवण. ३ दिवस नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण आणि मधल्या वेळचा चहाकाॅफीफराळ याची सर्व व्यवस्था L.A मधल्या 'मदर इंडिया' catering services , न्युजर्सी चे सुमा फूड्स यांनी केली होती.
सुधीर गाडगीळ घेणार असलेली मधुर भांडारकरची मुलाखत हे त्या दिवशीच्या संध्याकाळचं मुख्य आकर्षण होतं. तसं सकाळपासून त्याल येता-जाता बरेचदा बघुन झालं होतच. फारच स्मार्ट आहे तो, छान height आणि स्वीट चेहेरा..
दुपारचा चहा पिऊन मग अनु आणि समीर छोट्या स्टेजवरती चालु असलेल्या 'कला'च्या ग्रूपने सादर केलेलं 'सावर रे' (अज्जुकाच्या भाषेत 'आवर रे ')बघायला गेले. The play is originally acted by Swati chitnis and Dr.Mohan agashe . ह्या नाटकाचं मोहन आगाशेंनी केलेलं नाट्यवाचन मी आधिच ऐकलं होतं आणि मला एक classical ची concert attend करायची होती सो मी दुसर्‍या रूममधे जाउन बसले. आशिष जो ३ दिवसांमध्ये बराच वेळ गायबच होता.. seven stars of hinduism ह्या प्रोग्रॅमला गेला्ए सगळं संपेस्तोवर मेन स्टेजवरती मधुरची मुलाखत सुरु झाली होती. मी ती बरीचशी मिस केली. संदेश शांडिल्य, सचिन यार्दी, कोन्कोना सेन, उपेंद्र लिमये, अतुल कुलकर्णी यांनी clippings through तर जबार पटेल आणि मदुरचा भाउ नितिन भांडारकर यांनी प्रत्यक्ष स्टेजवर येऊन मधुरबद्दल सांगितलं. मधुरने आपल्या 'हिंदाळलेल्या' मराठीमधे बरेच अनुभव शेअर केले.
दिवसाचा शेवट झाला..एका सुंदर प्रोग्रॅमने... 'मम आत्मा गमला'. पुर्ण कर्यक्रमाचं सुत्रसंचालन केलं होतं अजित भुरे आणि मधुरा गोखले यानी. पहिला भाग होता नाट्यसंगीताचा. आशा खाडिलकर, निलाक्षी पेंढारकर( भालचंद्र पेंढारकरांची सून) आणि सुरेश बापट (पं. प्रभाकर कारेकरांचे शिष्य) यांनी नेहेमीच्याच सुरेलपणे नाट्यगीतं सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात नांदीने झाली 'पंचतुंड नर रुंडमालधर':-).. तेवढ्यात मागे बसलेली 'हेम्स' धावतच आमच्या जवळ आली. आम्हाला सगळ्यांनाच 'दाद'च्या गोष्टीची आठवण झाली होती हे सांगायला नकोच:-)

दुसरा भाग हा mainly seattle मधल्या कलाकारांनी सादर केलेला मराठी orchestra होता. अतिशय सुंदर संगीत संयोजन आणि तेवढेच छान गाणारे लोक असा हा orchestra सगळ्यांनीच मस्त एंजाॅय केला. त्यात मध्येच सचीनने 'हा माझा मार्ग एकला' आणि 'ही नवरी असली' अशी दोन गाणी म्हटली (???). प्रश्नचिन्ह अश्यासाठी की स्टेजवरती ही गाणी सचिनने प्रत्यक्ष न म्हणता ती recorded CD वापरून lip sync केली होती असं आम्हाला एका खात्रिलायक सुत्राकडून समजलं..म्हणजे music live आणि हा नुस्ताच ओठ हलवतोय. ते एक झालच आणि सगळ्यात गमतीचि गोष्ट म्हणजे ह्या पुर्ण कार्यक्रमाचं सुत्रसंचालन सचिन सुप्रिया करणार अशी पब्लिसिटी केली होती तिथे प्रत्यक्षात सुप्रिया मोजुन ३ मिनिटं स्टेजवर होती आणि सचिन व तिने 'ढगाला लागली कळ' वर छोटासा एक डान्स केला आणि मग ते गायबलेच... अशी ही सर्व so called famous artists ची कथा. पण ह्या असल्या फालतु लोकांच्या गोष्टी वगळता गाण्यांची मात्र धम्माल होती. लावणी वर किरण जोगळेकरची ढोलकी आणि एका मुलीने तितकच तोडीस तोड केलेलं नृत्य अगदी बघण्यासारखं होतं.
रात्री १२:३० ला एक दिवस संपवून आम्ही परत हाॅटेलवर आलो तेव्हा एकमेकांशी अगदी एकही शब्द न बोलता पण आठवणीने घड्याळाचा गजर पहाटे ५:१५ ला set करून झोपून गेलो...
पहिल्या दिवशीच्या main highlights: खास पार्लेकरांच्या आग्रहाला मान देऊन दिवसभराचा जेवणातला मेनु:
सकाळी नाश्ता गोडाचा शीरा (भरपूर तूपातला), केशरी पेढा, कांदेपोहे, मसाला चहा,वेलचीयुक्त काॅफी, पाणी cream cheese, bagel, orange juice, fruits
दुपारचं जेवण्: पोळ्या, भात, फ़्लाॅवर बटाट्याची अप्रतीम रस्सा भाजी, हिरवी चटणी, amazing छुंदा, पंचामृत, अळूचे फतपदे आणि मेथी चिकन, पुलाव, फ्रुट सलाड
संध्याकाळचा नाश्ता: मसाला चहा,वेलचीयुक्त काॅफी, चकलीचे पाकिट (२ चकल्या), ग्लुकोज बिस्किटं आणी कोकम सरबत
रात्रिचं जेवण्:वरण, भात,मसाले भात,बटाटा सुकी भाजी,चवळीची उसळ,काकडीची कोशिंबीर,पुरण पोळी, पोळी

मधूरचा interview संपला आणि आम्ही सगळ्यात पुढच्या रांगेमधे जाउन बसलो ते आपली मायबोलिकर 'हेम्स' आणि तिचा नवरा मनोज यांची 'साठेचं काय करायचं' ही राजीव नाईक लिखित पारितोषीक विजेती एकांकिका पहायला. विषयाची मांडणी तर सुंदर होतीच पण हेम्स आणि मनोजचा रंगमंचावरचा सहज वावर, दोघांचं ट्युनींग (हे प्रत्यक्ष जीवनात नवरा-बायको असल्याने आणि नाटकात पण तेच नातं असल्याने जास्त सहज झालं असावं:-)) आणि भुमिकेची अप्रतीम समज हेही तेवढचं देखणं... नाटक संपल्यावर मग त्यांचीही प्रत्यक्ष भेट झाली.


बाकिची विशेष टिप्पणी: प्रदर्शनात बरेच चांगले स्टाॅल्स होते आणि इतकच नाही तर सर्व स्टाॅल्सवरती 'मराठी' बाण्याला न साजेलश्या गोड शब्दातलं स्वागत पण केलं जात होतं.:-) पुस्तकांसाठी मौज,मॅजेस्टिक, आयडियल ग्रंथाली या प्रकाशकांनी, CDs व VCD/DVDs साठी दादरचे प्रसिद्ध महाराष्ट्र कंपनी, दागिन्यांचा लागूबन्धू आणि पु. ना.गाडगीळ, MTDC चा एक स्टाॅल, भारतातील काही बिल्डर्स, बॅंक्स आणि बेडेकर मसाले-लोणची हे काही महत्वाचे स्टाॅल्स सुद्धा होते.

काही लोकं सुधारतच नाहीत.. तसा त्यांनी बहुतेक पणच केलेला असतो.. त्यातच एक संजय मोने नामक इसम.लाल रंगाचा टी-शर्ट, मळकी जीन्स, अर्धवट वाढलेली दाढी, (बहुदा १०-१२ दिवस तरी आंघोळ केकेली नसावी असं ध्यान), आणि चेहेर्‍यावर एक विचित्र बेदरकार भाव असा तो मधे मधे फिरताना दिसला...:-) मधूर भांडारकर निदान छान ब्लेझर तरी घालून आला होता. असो.
दिनांक ३० जुन २००७: अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आणि आपल्या सर्व मायबोलीकरांसाठीचा एक आनंदाचा दिवस...
सकाळी ५:१५ ला उठून मी पटापट म्हणजे सुमारे दीड तासांत तय्यार झाले. आज हाॅलवर पोचायची तशी घाई नव्हती (असं समीरचं म्हणणं असल्याने) समीर नेहेमीप्रमाणेच ७ ला उठला आणि २० मिनिटात तयार झाला. आज award function आहे हे माहीत होतं पण मायबोलीला अवार्ड मिळणारे की नाही ह्याची खात्री नव्हती. समीरने आजच्यासाठी खास मायबोलीचा टी-शर्ट घातला.
सकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात डाॅ. नरेंद्र जाधवांच्या भाषणाने झाली. डाॅ. जाधव हे आपल्यापैकी बर्‍याच लोकांना त्यांने लिहिलेल्या प्रसिद्ध 'आमचा बाप आणि आम्ही' या पुस्तकामुळे माहीत असतीलच. पण त्याच्याही आधी एक नावजलेले अर्थतज्ञ, पंत्प्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर तसच world bank and RBI साठी सल्लागार म्हणुन केलेलं काम, मनमोहन सिंग आणि माॅन्टेकसिंग अहलुवालिया यांना गुरुस्थानी मानणारे आणि सगळ्यात अलिकडची ओळख म्हणजे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू... जागतिकीकरण,त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारे चांगले आणि वाईट परिणाम आणि ह्या सर्वांसठी भारताच्या शिक्षण क्षेत्रात आवश्यक असलेल बदल याबद्दल त्यानी फारच सुंदर विचार करायला लावणारे मुद्दे मांडले.
त्यांची अजुनही बोलायची आणि सर्व लोकांची त्यांचे विचार ऐकायची खूप इcछा होती. पण पुढचा कार्यक्रम अजुन उशिरा सुरु होईल ह्या कटकटीमुळे डाॅ. जाधवांना भाषण आवरतं घ्यायला लागलं.

अधिवेशनात एक महत्वाचा गोंधळ होता तो कार्यक्रम वेळेवर सुरु होत नव्हते आणि वेळेत संपत देखील नव्हते. भरगच्च कार्यक्रम असल्याने बरेचदा वेळेच्या घोळामुळे overlapping होत होतं आणि त्या नादात अनेक चांगले प्रोग्रॅम miss करावे लागले.
सकाळी नाश्ता सुरु असताना एका 'शिल्पा' नावाच्या ROM मधे असणार्‍या मायबोलिकरणीने समीरचा मायबोली लोगो वाला टी-शर्ट पाहून स्वतः येउन गप्पा मारल्या.. खुप छान वाटलं.

मुख्य भाषण स.म्पलं आणि मग आम्ही ज्याची वाट पहात होतो तो BMM 2007 award ceremony सुरु झाला. व्यासपीठावरून मायबोलीचं नाव 'मराठी माणसांचं लाडकं मराठी पोर्टल' असं जाहीर केलं... समीरने जाऊन डाॅ. जाधवांच्या हस्ते award घेतलं.. आणि सगळ्यात पहिले 'अजय' (Admin) ला फोन केला.. it was an overwhelming moment in our life for sure .. हेम्स आणि तिच्या नवर्‍याने येउन अभिनंदन केलं बाकी पण तिथे असलेल्या बर्‍याच लोकांनी अभिनंदन केलं, शुभेcछा दिल्या..
मायबोलीला हा सन्मान मिळणं हे जसं आपल्या सगळ्यानाच अभिमानास्पद आहे तसच कदाचित त्याहुन जास्त मला आणि समीरला ते जवळचं वाटतं. आमची एकमेकांशी मायबोलिवर ओळख झालि आणि आम्ही लग्न केलं.. (त्यामुळे आमच्या भांडणात बरेचदा मायबोलीचा उद्धार पण होतोच :-)).. आणि हा मायबोलिचा सन्मान सोहळा आम्हाला दोघांना प्रत्यक्ष अनुभवता आला हे भाग्यच म्हणायला पाहिजे.







अजुन एक आनंदाची बातमी म्हणजे आपली 'हेम्स' आणि तिचा नवरा मनोज यांनी अभिनीत केलेल्या 'साठेचं काय करायचं' या एकांकिकेला BMM आयोजित एकांकिका स्पर्धेतलं दुसरं पारितोषीक मिळालं. पहिलं बक्षिस न्यु जर्सीच्या 'मनोमीलन' ला तर तिसरं बक्षिस 'नवरा विकणे आहे' या एकंकिकेला मिळालं.
ऍवार्ड सोहोळा संपल्यावर आम्ही मस्त जेवण केलं आणि परत प्रदर्शनात थोड फेरफटका मारून आलो. त्या दिवशी वटसावित्री असल्याने दागिन्यांच्या स्टाॅलवरती विशेष गर्दी दिसत होती.. :-) तोवर main stage वरती न्यु जर्सी theatrics ने सादर केलेला 'ऐलतीर ते पैलतीर' हा कार्यक्रम सुरु झाला होता.सुमारे १:३० तासाच हा अतिशय नेटका प्रोग्रॅम झाला. मी खरेदीमधे busy असल्याने सगळा कार्यक्रम नाही बघु शकले. माझी मैत्रीण प्राची दलाल हिने त्या कार्यक्रमाची choreography केली होती आणि आपली मायबोलिकर 'जयावी' हिच्या बहिणीने त्या कार्यक्रमात participate केले होते. तिच्याशीही नंतर ओळख झाली. ५४ जणांच्या संचाने हे musical सादर केलं. गाण्यांचं संगीत हृषिकेष कामेरकरने दिलं होतं.
नंतरचा खास कार्यक्रम होता 'स्त्री-रंग'. ही संकल्पनाच इतकी अभिनव होती.. आणि त्यात सहभागी झालेल्या तीन जणींबद्दल मी काय लिहु!! शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम गायिका 'डाॅ अश्विनी भिडे-देशपांडे', ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे, आणि प्रसिद्ध लेखिका विजया राजाध्यक्ष. विजयाताईंनी सुत्रसंचालन केलं आणि काही कविता वाचून दाखवल्या. काही कविता अश्विनी भिडेंनी गाण्यातून सादर केल्या व त्यावर झेलम परांजपेंनी नृत्य केलं.
विशेष लक्षात रहिलं ते बहिणाबाई चौधरींच्या 'माणसा माणसा' ह्या कवितेवरचा झेलम परांजपेंचा अविष्कार.....भावमुद्रा आणि ओडिसीसारख्या शास्त्रीय नृत्यातून इतका गहन अर्थ असणार्‍या कवितेचं सादरीकरण, त्या काव्याच्या ताकदीला पुरेपूर न्याय देणं.
दुसर्‍या दिवशी झेलम परांजपेंशी प्रत्यक्ष बोलताना त्यांनी सांगितलं की ती कविताच इतकी भिडणारी आहे की आत्ताही माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय..
यापुढचा प्रोग्रॅम पं. जिते.द्र अभिषेकींचा शिष्य महेश काळे याचा होता. त्याचं गाणं बरेचदा ऐकलं असल्याने थोडा वेळ मी माझ्या friends बरोबर बाहेर फिरून आले. समीर BMM committee meeting मध्ये व्यस्त होता. अनु विद्युल्लेखा अकलूजकरांच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला गेली होती.
अखेरीस ६ वाजता BMM चे मुख्या आकर्षण असलेल्या उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबलावादनाला सुरुवात झाली. मुख्य सभागृह खचाखच भरले होते हे सांगायला नकोच.... झाकीरनी मराठी मधून बोलायला सुरुवात केली.. आणि नुस्ता टाळ्यांचा कडकडाट.. अतिशय अनपेक्षित होतं हे.. त्यांच्या साथीला व्हायोलीन वर कला रामनाथ व US मधील प्रसिद्ध तबलावादक शाम काणे हे दोघं होते. कला रामनाथांच्या अप्रतिम वादनाने सुरुवात झाली. झाकीरची तबल्यावर पहिली थाप पडली...... टाळ्या वाजवायचंसुद्धा भान राहिलं नाही. निव्वळ passion, passion and passion .. असे अनुभव लिहिता येत नाहीत ते फक्त प्रत्यक्ष अनुभवायचे असतात. पेशकारी, थोडी पढत आणि मग थोडी entertainment अश्या वळणाने गेलेली ही मेहफील संपूच नये असं वाटत होतं..
रात्री अशोक सराफ, निवेदिता संजय मोने, राजन भिसे,विनय येडेकर यांनी सादर केलेलं 'काय छातीत दुखताय' किंवा 'हे राम कार्डीयोग्राम' यापैकी एक काहितरी नाव असणारं एक नाटक झालं.. same to same हीच कथा असणारं विश्राम बेडेकरांचं 'वाजे पाऊल आपले' पुर्वी झालेलं आहे, तसच कुणाला आठवत असेल तर अमोल पालेकर आणि रंजीता अभिनीत 'मेरी बिवि की शादी' नावचा एक प्रसिद्ध चित्रपट पण आहे. ह्या नव्या नाटकातले so called विनोद समजायची माझी कुवत नसल्याने किन्वा संपल्याने २० मिनिटातच मी हाॅटेलवर परतले आणि परत एकदा ६:१५ चा गजर लावून झोपून गेले.

दुसर्‍या दिवशीच्या main highlights: परत एकदा खास पार्लेकरांच्या आग्रहाला मान देऊन दिवसभराचा जेवणातला मेनु:
सकाळी नाश्ता : वटसावित्रीनिमित्ताने साबुदाण्याची खिचडी, उपमा, मसाला चहा,वेलचीयुक्त काॅफी, पाणी, cream cheese, bagel, orange juice, fruits
दुपारचं जेवण : पोळ्या, भात, मसूर आमटी, कोल्हापुरी चिकन, श्रीखंड, हिरवी चटणी, amazing छुंदा, गाजर कोशिंबीर आणि सोलकढी
संध्याकाळचा नाश्ता : माहीत नाही रात्रीचं जेवण : झुणका, भाकरी (tortillas) , भात, भरली वांगी, वाटली डाळ, आमटी,टोमॅटोची कोशिंबीर, sweet dish आठवत नाहिये..




१ जुलै २००७ अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस. सुर्वात डाॅ. प्रकाश आमटे व मंदा आमटे यांच्या मुलाखतीने झाला. मुलाखत सुधीर गाडगीळांनी घेतली होती. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निशा मिरचंदानी हिने बाबा आमटेंवर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन डाॅ नरेंद्र जाधव ह्यांच्या हस्ते केलं गेलं.
आज शेवटचा दिवस असल्याने आणि आम्ही सगळे L.A ला परत याय्ला त्याच दिवशी निघणार होतो त्यामुळे बराचसा वेळ पुस्तकांच्या स्टाॅलवरती आणि बाकिच्या ओळखीच्या लोकांना भेटण्यात, बोलण्यातच गेला. त्यामुळे डाॅ. आमटेंची मुलाखत फारच थोडा वेळ ऐकली आणि closing ceremony 'Sur Pashcimeche' presented various artists in US and organized by Shree.Mohan Ranade बराचसा miss झाला. मी फक्त रवी दातार नावच्या एका लहान मुलाने जबरदस्त गायलेलं 'घेई छंद मकरंद' हे पद ऐकलं..
अनु, मी, समीर आणि आशिष आम्ही सगळेच पुस्तक खरेदीत busy होतो.. स्वतसाठी आणि मराठी मंडळाच्या लायब्ररी साठी बरीच पुस्तकं आम्ही विकत घेतली.
शेवटी संध्याकाळी हाॅटेलवर परत येऊन जरा वेळ हेम्सबरोबर गप्पा मारून, seattle मधल्या pike place इथं US मधील सगळ्यात पहिल्या १९७२ मध्ये सुरु झालेल्या starbucks मधे काॅफी पिऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिवेशनाच्या इतक्या सुंदर सोहोळ्याच्या आठवणी सोबत घेऊन येणार्‍या सोमवारला परत उत्साहाने सामोरे जायला घरी परत आलो.
Main highlights जेवणासाठी lunch box दिल होता, ज्यात पाव्-भाजी, २ बटाटेवडे, लसणाची चटणी, नारळाची करंजी असा मस्त lunch होता.:-)




एवढा मोट्ठा समारंभ आयोजीत करायचा म्हणजे त्यात कुठेतरी कमी-जास्त हे व्ह्यायचच.. पण apart from very few missed things हे तीन दिवस आणि सगळ्या कार्यक्रमाचं केलेलं संयोजन हे अगदी मनापासून दाद देण्याजोगच होतं यात अजिबात शंका नाही.
online registration system , वेब साईटवरची माहीती, prompt e-mail communincation , hotel booking , अधिवेशनाच्या ठिकाणी असलेला information desk , जेवणाच्या हाॅलमधली उत्तम व्यवस्था हे सगळं फारच नेटकं, मदत करणारं..
आणि या सर्वांमागे असणारी seattle मधली लोकं, तिथल्या महाराष्ट्र मंडळात काम करणारी माणसं, आणि BMM commiittee यांनी घेतलेले अपार परिश्रम प्रत्येक ठिकाणी दिसून आले.

पुढील अधिवेशन २००९ साली फिलाडेल्फिया ला आहे.

मी या अधिवेशनातून एक महत्वाचं शिकले. ती म्हणजे जगण्यासठी आवश्यक एकच गोष्ट असते.. 'Passion' बास सर्व कलाकारांच्या, वक्त्यांच्या, कार्यकर्त्यांच्या passion शिवाय हे BMM च्या १३ व्या अधिवेशनाचं एवढं देखणं शिल्प उभच राहु शकलं नसतं नाही का??





tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner supriyaj Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators