Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members A-N » lalitas » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 11, 200410-11-04  7:58 pm
Archive through October 13, 200410-13-04  8:04 am
Archive through October 13, 200410-14-04  3:55 am
Archive through October 18, 200410-18-04  9:30 am
Archive through October 22, 200410-22-04  2:27 pm
Archive through July 22, 200507-22-05  5:10 am
Archive through February 01, 200612 02-02-06  4:46 am
Archive through February 17, 200620 02-17-06  2:08 pm
Archive through September 04, 200620 09-04-06  5:41 am

Bee
Monday, September 04, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई, कसा झाला कार्यक्रम?

Moodi
Monday, September 04, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई खरच कसा झाला कार्यक्रम? काही नाट्यगीते वगैरे सादर केली का प्रशांत दामलेंनी? जरुर लिहा.

Lalitas
Monday, September 04, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडील कार्यक्रम चांगला झाला असेच म्हणावं लागेल.... आम्ही फार अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या म्हणुनही कार्यक्रम आवडला असण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांचा सहभाग व प्रतिसाद कार्यक्रमांत ठेवल्यामुळे आमच्यायेथील प्रेक्षक खूप खुष झाला.

तुम्ही दोघांनी लिहिल्याप्रमाणे जाहिरातबाजी होती यांत दुमत नाही. आमच्याकडे मराठी कलाकार पहिल्यांदाच आल्यामुळे सर्वांना अपुर्वाई वाटत होती, तेव्हा जाहिरात होते आहे याची कुणालाच जाणिव झालेली दिसली नाही. मी इथे लिहिण्यापुर्वी प्रेक्षकांचा अभिप्राय विचारुन घेतलेला आहे. विचारताना मी आडून आडून जाहिरात वाटली का वगैरे विचारलं... पण तशी भावना दिसून आली नाही. पहिलाच असा मोठा कार्यक्रम आमच्याकडे आयोजित झाला होता, तो आमच्या लोकांनी उचलून धरला!

मूडी, प्रशांत दामलेंनी नाट्यसंगीत गायलं, लेकुरें उदंड झालीमधलं "पण शहाणीसुरती माणसं पण लग्नच का करतात" म्हणुन दाखवलं शिवाय गझलही म्हटली.


Raina
Tuesday, September 05, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई Wow. great! तुमच्याकडे सर्वांना आवडला तर
गझल- ते नेहमी "रंजिश ही सही" म्हणतात.


Lalitas
Tuesday, September 05, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रैना, तीच गझल म्हटली होती ग!

Bee
Tuesday, September 05, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताई, तुम्हा सर्वांना हा कार्यक्रम आवडला म्हणजे छानच झाले. तुमच्याकडे साधारणतः किती मराठी लोक आहेत? उपस्थिती किती होती ह्या कार्यक्रमाला.. आमच्याकडे २५० लोक आली होती. तशी इथे खूप सारी मराठी जनता आहे. कदाचित २००० हजार असतील...

Lalitas
Tuesday, September 05, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे मराठी जनता अगदी कमी आहे... १२० पूजेसाठी होते आणि सुमारे ८० कार्यक्रमाला म्हणजे तुला कल्पना येईलच किती कमी मराठी लोकं आहेत याची! आमच्याकडे ३०० मराठी असायला हरकत नसावी.

Bee
Tuesday, September 05, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंगापूर स्विसच्या तुलनेने खूप छोटा देश आहे तरीही इतका फ़रक म्हणजे खूप झाला. स्विस मध्ये IT क्षेत्रातील कंपन्या नोकर्या फ़ार नाहीत का? की भारतीयांसाठी काही खास नियम आहेत म्हणून?

Lalitas
Tuesday, September 05, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मुख्य प्रश्न भाषेचा आहे, त्यामुळे भारतीय इथे येण्याचं टाळतात. आधी किती लोकांना या देशाची माहिती होती? बॉलीवूडमुळे भारतीय जनता स्वीसला जास्त परिचित झालीय.

IT मुळेच तर आता इतके मराठी लोक दिसताहेत. आधी आलेले मराठी प्रोफ़ेशनल आहेत, जसे इंजीनियर्स, केमिस्टस वगैरे. जिनिवात युनोमुळे काही मराठी कुटुंबं आहेत. जिनिवाला फ्रेंच बोलतात. हल्ली MBA व पोस्टग्रजुएट्सना नोकरी मिळतेय, त्यांत मराठी कमीच.

ITचे लोक बहुतेक थोड्या काळासाठी आणले जातात, म्हणजे सॉफ्टवेर प्रोजेक्ट झाला की त्यांचे वर्क परमिट वाढवून मिळत नाही. त्याला अपवाद आहेत, काही सॉफ्टवेरमधले इथे कायम वास्तव्य करून आहेत, अर्थात् त्यांचं कार्यक्षेत्र फक्त एखाद्या प्रोजेक्टपुरतं मर्यादित नाही.

बॅंका किंवा विमा कंपन्या सॉफ्टवेरशिवाय भारतीय आणत नाहीत. या क्षेत्रांत स्वीसना प्राधान्य देतात. नोकर्‍यांची कमी नाही... स्वीस सरकारने प्रत्येक कंपनीला वर्षाचा कोटा ठरवून दिलेला असतो, तितक्याच परकिय उमेदवारांना दर वर्षी स्वीस सरकार परमीट देते. कंपनीला असंही दाखवून द्यावं लागतं की या नोकरीसाठी स्वीस मार्केटमध्ये एकही लायक उमेदवार मिळत नाहीय. जवळच्या युरोपीय देशातील लोकांना प्रेफरन्स द्यावा लागतो... अशियाई सर्वांत शेवटी येतात, कारण संस्कृती वेगळी असते. त्यांना इथल्या समाजात रुळायला त्रास होतो व पर्यायाने सरकारी यंत्रणेवर भार पडतो. ब्रिटिश आणि अमेरिकन एकदम पसंत!
आता तुला समजून येईल... भारतीय या देशांत का कमी आहेत ते!


Bee
Wednesday, September 06, 2006 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप छान माहिती दिलीस ताई.. मला अजून अजून विचारावसं वाटत आहे त्यामुळे.. पण तू दमशील तेंव्हा काही दिवसांनी विचारीन :-)

Lalitas
Wednesday, September 06, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दमायचं काय त्याच्यांत? मला माहिती आहे त्याप्रमणे मी उत्तर देत जाईन, विचार तू बेशक!

Bee
Wednesday, September 06, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरचं विचारू..

मी बालपणापासून स्विसच्या निसर्गसौंदर्याविषयी ऐकून आहे. तिथल्या निसर्गाच जरा वर्णन कर जमत असेल तर.. तिथले ऋतु कोणकोणते असतात? त्या त्या ऋतुत वेगळा भाजीपाला पिकतो का? तिथल्या भाज्या तुला पसंत पडल्यात की नाही इतक्यात? अस खूप काही जाणून घ्यायची माझी ईच्छा आहे.. शिवाय तिथे तू इतक्या वर्षात कुठेकुठे फ़िरलीस.. सगळा युरप फ़िरून झाला की नाही.. जमेल तेवढ लिही.. शिवाय आता भारतात गेल्यानंतर तुझ्या माहेरी कोण कोण असतं.. तुला तिथे कसं वाटतं.. तुझ्या संसार तू परक्या देशात पुर्ण केलास.. तुझे एकेक अनुभव.. मला वाटतं हे इतक विस्तृत होईल की त्यात तुझ एक आत्मचरित्रच तयार होईल असे वाटते. पण खरचं मनापासून विचारतोय चेष्टा वगैरे नाही करत..


Itgirl
Wednesday, October 10, 2007 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता ताई माका खबर नाशिल्ले, हांगा फ़ीडबॅक बरवच्या जाता म्हण :-), हावें वाचिल्ले हे, आणि खूप आवडील्ले माका :-) आजच कळले हांगा कशे येवचे ते, म्हण सांगया म्हळे तुका :-) सुंदरच बरयला गो, आणि बरय नी :-) बी म्हणता तशे :-)

Lalitas
Friday, October 19, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलजा, बर्‍या दिसांत हांगा पळेलेच ना... तू म्हणता तशे पळोया, वेळ मेळलो की अनि मुकार बरेचो प्रयत्न करता

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators