Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » rar » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 15, 200509-16-05  1:41 am
Archive through September 16, 200509-16-05  10:08 am
Archive through September 18, 200509-19-05  12:38 am
Archive through January 23, 200627 01-23-06  12:59 pm
Archive through June 26, 200620 06-27-06  3:02 am
Archive through March 20, 200720 03-20-07  5:39 pm

Sayonara
Tuesday, March 20, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, thanks मधुरा. बघते तिकडे सर्च करुन.

Sakheepriya
Monday, April 02, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीत आहेस रार! माचिस पहायचा राहून गेलाय... आता या वीकेंडला....

आणि सुरेश वाडकरांबद्दल... अगदी, अगदी! मलाही "तुमसे मिलके ऐसा लगा..." किंवा "हुजूर इस कदर भी न इतरा के चलिये..." किंवा "सीने में जलन, आंखों में तुफान सा क्यों है..." नंतर आता 'तुज नमो' येणार की काय असं नेहमी वाटतं ऐकताना!


Bee
Tuesday, April 03, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छान लिहिलस माचिसबद्दल.. चांगली depth घेतलीस ह्यावेळी..

Zakasrao
Tuesday, April 03, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे लेख मग तो कोणत्याही विषयावर असो आवडतात. अगदी puzzle पासुन films पर्यंत. खुप छान शैली आहे लिहिण्याची.

Arati_halbe
Tuesday, April 03, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, मस्त लिहित आहेस ग. माचिस चा प्रभाव खूप आहे मझ्यावर. तुझे लिखाण वाचुन पाणी आले डोळ्यात. तू म्हटल्याप्रमाणे, त्या काळातील इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असलेला हा चित्रपट. निदान मझ्यासाठी तरी दहशतवाद आणि त्याचे परिणाम याचा विचार करायला नुकतीच सुरुवात असतानाचे वय, त्यात गुलज़ार ची मान्डणी अणि हताळणी अणि विशाल भारद्वाज चे सन्गीत! मनावर कायमचा कोरला गेला आहे हा movie
दहशतवादच्या परिणमांची इतक्या intensity नि जाणीव याच movie मुळे झाली. Also, I think Gulzar himself has suffered through the partition, hence the presentation happens so intense and subtle. It's like a person expressing his own pain in some form


Gs1
Tuesday, April 03, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रार, काय छान लिहिल आहेस, माचीस मलाही खूप भावला होता ...

Mandard
Tuesday, April 03, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माचिस मला पण आवडला होता. पण आमच्या शेजारच्या सरदार कुटुम्बाच्या मते तो पाहिल्यावर जखमेवरची खपली काढल्यासारखे वाटते त्यांना.

Psg
Tuesday, April 03, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, मस्त लिहत आहेस.

Farend
Wednesday, April 04, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rar सॉलिड! आता हा चित्रपट पुन्हा ही माहिती डोक्यात ठेऊन बघितला पाहिजे.

Dineshvs
Wednesday, April 04, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदरच लिहिलय रार. त्यावेळी गुलजारने या विषयाला का हात घातला, असे सगळेच म्हणत होते.
पण शेवटी गुलजार तो गुलजारच ना.
त्यावेळी चप्पा चप्पाच जास्त प्रमोट झाले होते, त्या मानाने बाकिची गाणी वाजवत नसत. त्यातल्या शब्दांची ताकद मग जाणवु लागली.

आता गुलजारच्याच हु तु तु बद्दल लिहिणार ना ?


Arati_halbe
Thursday, April 05, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rar,

the more you write, the more we have started expecting :-)
अनाहत पाहिलास? आवडला होता? आवडला असेल तर कधी त्याविषयी पण लिही ना


Ruchita
Wednesday, September 05, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुरेख लिहिले आहे...मी अगदि मनापासुन तुमचे आभार मानते....माझ्या प्रोफ़ेशन मध्ये मला या लेखाचा खुप उपयोग होइल...मला तुमचा ओन्तcत नम्बर मिळेल का?....ऋचिता..Zऍऍ ट्V

Prajaktad
Wednesday, September 05, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माचिस एक सुंदर आणी विलक्षण अनुभव आहे... माझा हा चित्रपट बघण्याचा योग असाच अचानक आलेला...पडेल आर्ट म्हूवी म्हणून संभावना झालेला पिक्चर लागला, तोही एका एकदम डंपर थिएटर ला..( tax free ना)...आम्ही ४ डोकि मिळुन १५ टाळकी असतिल..पिक्चर सुरु व्हायच्या आधी मी मैत्रीणीला जाम पिडले होते जिच्या डोक्यातुन ही टुम निघाली....
रार तुला जुना चित्रपट ही इतका लक्ख आठवतोय..तुझ्या शब्दात वर्णन वाचुन मजा आली...परत एकदा बघायला पाहिजे..


Tanyabedekar
Monday, September 10, 2007 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, निशांत, अंकुर (आणि अर्धसत्य, जरी बेनेगलचा नसला तरी) बद्दल देखील लिहा ना. मंडीप्रमाणेच अर्धसत्यदेखील सूर्य नावाच्या एका १५-२० पानी लघुकथेवरुन बनवलेला चित्रपट आहे. श्रीदा पानवलकरांची लघुकथा आणि विजय तेंडुलकरांची पटकथा आहे.

Bee
Monday, September 10, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यामधील 'अर्धसत्य' ही कविता दिलिप चित्रेंची आहे. ह्या चित्रपटातील काही भाग छान आहे. खास करून समाजात आपले नैतिक कृत्य काय आहे हे सांगायचे म्हणून कुठल्या तरी चळवळीत एका महिलेचे भाषण दाखविले आहे आणि स्मिता पाटिल हे भाषण ऐकत असते. मग त्यातील एकेक शब्द ती कसे लक्षात घेते.. तो भाग मला खूप आवडला होता. पण एक पोलिस ऑफ़ीसर म्हणून ओम पुरी कुठेतरी चुकतो. तो कायद्याचे उल्लंघन करतो आणि स्मिता पाटिल त्याला काहीतरी समजवून सांगते. तो गुन्हेगार व्यक्तीवर गोळी घालतो.

माझ्या मते तुमची philosophy कितीही चांगली असेना पण प्रामाणिक मनुष्याचा तोल जाऊ शकतो हे खरे नाही का.. ओम पुरी एक प्रामाणिक ऑफ़ीसर असतो. तो शेवटी बंदूक चालवितो. कायद्याच्या दृष्टीने जरी ही चूक असली तरी त्यामागची त्या व्यक्तीची मानसिकता इथे लक्षात घेतली गेली नाही. मात्र, समाजात राहताना, आपली भूमिका कशी असावी ह्यावर काही भाष्य देणारे चित्रपट मी तरी अद्याप पाहिलेले नाही. हा एकमेवच बघितला आहे.. किंवा लक्षात राहिला असावा.. कारण अभिनय!!!!!!

असो..

ओम पुरीचे खूप चित्रपट बघून काही भाग कळत नाही पण खूप भिडतात.. त्याचा अभिनय जिवंत असतो म्हणून.


Sandeep_chitre
Tuesday, October 23, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, माचिसबद्दल खूपच छान लिहिलं आहेस. मी खूप वर्षानंतर मायबोली परत पहायला लागलो आहे. लिहीत रहा.
संदीप
--
www.atakmatak.blogspot.com

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators