तव नेत्र कमलपत्र .. मी जळबिंदू!
|
शरदाचा शहारा अंगांगी सरसर सोडवून आलिंगन चांदण्याचे क्षणभर पापणीआड लपली तुझी नजर बाकी आठवत नाही आधी अन् नंतर ...
|
आश्वासन स्वतःच स्वतःला देत आलो आश्वासन - ' चालत रहा. मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे.' चालत राहिलो याच आश्वासनावर विसंबून ... बरीच पायपीट झाली तेव्हा न रहावून वळलो मागे थबकून, पाहिले स्वतःच स्वतःला संधिप्रकाशात क्षितिजासह .. ढळताना .. स्वतःवरच क्षीणसे हसताना ....
|
तळ्याकाठी उन्ह तुला तिथे पाहुन .. हळदिवे! ----------------------------- रस्ता तसा नेहमीचाच पण आज त्याचा वेगळाच घाट ... पाहे कुणाची वाट?
|
म्हटलं BB चालू आहे की नाही ते पहावं जरा.
|
व्रण स्वतःशी फिरून जोडताना नाते थरारते पाते मुळापाशी कातरश्या वेळी बावरासा क्षण जपलेला व्रण नाळ जोडी डोळां भरे दंव मातीतली ओल कसे करु मोल मोतियात?
|
सगळ्या शुभचिंतकांना मनापासून धन्यवाद!! आणि सर्वात महत्त्वाचे ... 'मायबोली' ला धन्यवाद!
|
माझी PhD हा काही तसा 'लेखनविषय' होणार नाही. त्यामुळे थोडक्यात सांगितलेलं बरं. मला चंपक सारखं सर्वांना समजेल अशा भाषेत सांगायला जमेलच असं नाही पण प्रयत्न करतो. मी pharmacy (औषधनिर्माण शास्त्र) चा विद्यार्थी. PhD साठि specialization होतं Pharmaceutics . साध्या भाषेत सांगायचं तर औषधं गोळ्या ज्या बाजारात येतात त्या तयार करण्यामागचं शास्त्र. मागे चंपकने लिहिलं होतं ते सगळ्यांना आठवत असेलच. तो नवीन औषधं (drug molecules) तयार (synthesize) करतो. आमचं काम इथुन पुढे सुरु होतं. ते औषध लोकांपर्यंत योग्य त्या रुपात पोहोचवणं हे pharmaceuticist चं काम. खरं वाटणार नाही, पण हे सत्य आहे कि जगात वर्षाला असंख्य नवीन drug compounds तयार होतात. पण प्रत्यज़ बाजारात मात्र लाखातून एखादं पोहोचतं. Pharmaceutics हा तसा खूप व्यापक विषय आहे. पण अर्थातच त्यातला एक अत्यंत लहान मुद्दा घेऊन मी त्यावर काम केलं. Isothermal titration calorimetry नामक एक उपकरण आहे. ते काय करतं हे साध्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की कुठल्याही रासायनिक (chemical) किंवा biochemical / biophysical interaction मध्ये जी ऊष्णता निर्मां होते (evolve) किंवा शोषली जाते (absorb) , ती या उपकरणाणे एका स्थिर तापमानाला मोजता येते. या उपकरणाचा उपयोग protein-ligand binding चा अभ्यास करणासाठी बराच केला जातो. त्याचाच आधार घेऊन मी या उपकरणाचा वेगळा, म्हणजे protein stability अभ्यासण्यासाठी, उपयोग करता येतो का हे पाहण्याचा प्रयत्न केला. यश आलं असं साधारण म्हणता येईल.
|
तू माझ्यापासून दूर खूप दूर ... माझ्याहुनही
|
म्हणे उतरली होती माझ्या डोळ्यांमध्ये क्षणभर कविता ... एक वदंता ...
|
आठ अश्वांची बग्गी चालीत अवखळ लग्गी ... केहरवा! ******************* सांजसड्यावर चौदा अल्लद पावले गजगामिनीचीही चाल भुले ... दीपचंदी!
|
तुला पाहिली, ऐनवेळी सांजसड्यावर अभावितपणे उजव्या पायाचा अंगठा मुडपून माती कोरताना, अन् तश्शीच .... त्या अज्ञात वाटेवर भिरभिरत होती तुझी अधीरविव्हल नजर. आजही पुन्हा ऐनवेळी ती वाट सापडत नाहिये मला.
|