|
Jayavi
| |
| Tuesday, October 09, 2007 - 9:15 am: |
| 
|
बापरे..अज्जुका....अगं किती अभ्यास केला गं तुम्ही इतक्या छॊट्या छोट्या गोष्टींचा !! मानावंच लागेल तुम्हा लोकांना ! अश्विनच्या निवडीपासून तर त्याच्यावर श्वासचे संस्कार घडवण्यापर्यंतचं कसब..... वा !! आम्ही तर या गोष्टीचा विचारही करु शकत नाही. तुला सांगू.... मी अजूनही तुझा "श्वास" बघितला नाहीये म्हणजे तसा योगच येत नाहीये.... पण आता मात्र ठरवलंय की तुझी लेखमाला वाचून मग बघितला तर जास्त मज्जा येईल बघायला.... 
|
Manuswini
| |
| Tuesday, October 09, 2007 - 7:38 pm: |
| 
|
मला इथे लिहायला विचित्र वाटत होतं पण खरे सांगु कीती दिवसापासून मला श्वास पाहयचा आहे आता नक्की ठरवले की कुठनही dvd मिळवून पाहेन हे सर्व वाचल्यावर cant stop seeing that movie
|
Itgirl
| |
| Wednesday, October 10, 2007 - 2:21 am: |
| 
|
मला आतापर्यंत माहितच नव्हते इथे फ़ीडबॅक देता येतो ते. अज्जुका, खूप छान लिहीते आहेस ग टाक पटपट वेळ मिळेल तस, बाकी, विचारपुशीवर प्रतिक्रिया नोंदवली होतीच
|
Ajjuka
| |
| Wednesday, October 10, 2007 - 11:08 am: |
| 
|
सुधीर, जयू, मनुस्विनी आणि आयटी.. धन्स हो सगळ्यांचे!! अभ्यासाशिवाय का कुठली गोष्ट सिद्ध होते!!
|
अ प्र ति म अज्जुका तुलाच धन्स असं मस्त मस्त शेअर करतियेस आमच्यासोबत म्हणून..
|
Daad
| |
| Friday, October 12, 2007 - 4:43 am: |
| 
|
अज्जुका, बहोत खूब! लकी आहेस, असला अनुभव गाठिशी बांधलास... पण खरे लकी आम्ही.... लिहूनही काढतेयस, तेही अतिशय साध्या, सोप्प्या शब्दात. मान्या! पुढल्या भागांची आतुरतेने वाट पहातोय! पण तब्येतीत लिही.... तुझा पुन्हा प्रवास आहे हा, तुझ्या श्वासातून!
|
Arch
| |
| Friday, October 12, 2007 - 2:32 pm: |
| 
|
अज्जुका, तुझ्यामुळे आम्हाला सिनेमा निमात्याचे, दिग्दर्शकाचे, आणि costume designers चे कष्ट, अणि अनुभव वाचायला मिळत आहेत. तू लिहितेस तर सुंदरच. अगदी गप्पा मारल्यासारख वाटत आहे तुमच्याशी. श्वास मी चारदा पाहिला. पण दर खेपेला एक नवीन गोष्ट माझ्या लक्षात येते आणि तुम्हा सर्वांबद्दल अजूनच अभिमान वाटतो. असच भरघोस यश तुम्हाला मिळत राहो.
|
Mepunekar
| |
| Friday, October 12, 2007 - 5:53 pm: |
| 
|
अज्जुका, खरच अप्रतीम! अश्विन कडुन अतिशय सुंदर काम करुन घेतलय 'श्वास' मधे. या मागची मेहनत,लहान सहान गोष्टींची सुधा घेतली गेलेली काळजी, तुझ्या या लेखामुळे खुप जास्त कळतीये. तुझ्या लिखाणाच्या शैली मुळे खुप interesting वाटतय वाचायला. मनापासुन धन्यवाद!
|
Ajjuka
| |
| Saturday, October 13, 2007 - 12:58 am: |
| 
|
सगळेजण... खूप खूप धन्स!!
|
गुड, पण अजुन पुढच देखिल यायला पाहिजे! बायदिवे, हा अश्विन माझ्या मेहुणीच्या नात्यातला हे! काय नात हे काय की पण आहे! म्हन्जे अस सान्गता येइल बघ की माझ्या बायकोच्या धाकट्या बहिणीच्या नणन्देच्या जावेचा मुलगा! (प्रसिद्ध माणसान्शी आपल नात जोडण्याचा प्रयत्न माणस किती सहजगत्या करतात ना???? )
|
Amruta
| |
| Monday, October 15, 2007 - 4:42 pm: |
| 
|
अज्जुके मस्त लिहित्येस!!! (जर भर भर लिहि कि ग पण )
|
Diptisb
| |
| Tuesday, October 16, 2007 - 9:00 pm: |
| 
|
अज्जुका, श्वास तर मला फ़ारच आवड्ला होता. परश्या म्हणजे आपला एखादा छोटा मित्र आहे, असेच वाटत होते, आणि त्याच्या कोवळे, निरागस विश्व खूच छान दाखवले आहे तुम्ही. आता तुमचे प्रत्यक्ष अनुभव वाचताना खूप छान वाटते. तेव्हा आणखी लेख पटपट लिही. I know u must be busy... but आमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. So keep going... All the Best !!!
|
Bee
| |
| Wednesday, October 17, 2007 - 2:08 am: |
| 
|
अज्जुका, श्वासचा रीमेक येतो आहे असे ऐकले ह्यात कितपत तथ्य आहे सांगतेस का? आणि जर आलाच तर तुमची समंती पण आहे का ह्याला..
|
Itgirl
| |
| Wednesday, October 17, 2007 - 2:30 am: |
| 
|
...श्वासचा रीमेक येतो आहे ... खर की काय!! काय करतील आणि काय नाही!! खर की काय ग अज्जुके? इतकी सुंदर कलाकृती नका ग बिघडवायला देऊ..
|
Vinaydesai
| |
| Wednesday, October 17, 2007 - 12:45 pm: |
| 
|
अरे Bee विनोद पण कळत नाही का रे? रामगोपाल वर्मा 'श्वास' चा Remake करणार आहे... कळलं? मस्त लेख चाललाय. लिहीत रहा...
|
Ajjuka
| |
| Wednesday, October 17, 2007 - 5:05 pm: |
| 
|
रिमेक बद्दल मला काही माहीत नाही. हिंदीमधे करण्यासाठी संदीपला निदान २५ तरी ऑफर्स होत्या पण त्याने नाकारल्या. आणि रिमेक करायचे राइटस(पटकथा व चित्रपटाचे नाव) तरी कुणालाही विकल्याचे मला माहीत नाही. कथेचे राइटस त्या बाईंनी विकले असतील तर माहित नाही. पण अर्थातच त्यात आसावरीची व्यक्तिरेखा असणार नाही आणि इतर बरेच काही कारण ते सगळे पटकथेतले आहे. असो... सगळ्यांचे आभार. ४-५ दिवस संगणकापासून दूर होते.. आता आलेय परत... दिवाळी अंकासाठीचे लिहून झाले की लिहीन पुढचे.
|
Runi
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:01 pm: |
| 
|
अज्जुका, छान चालली आहे लेखमाला. जरा नियमीत येवु दे ना. रीमेकवरुन एक प्रश्न विचारावासा वाटला, श्वास ईतर भाषांमध्ये डब करुन प्रदर्शित केला गेलाय का? केला नसेल तर तसे काही करण्याचा विचार आहे का?
|
Disha013
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:15 pm: |
| 
|
मस्त अज्जुका! असे अनुभव वाचायला किती छान वाटतयं. तुम्हा सर्वांची मेहनत जाणवतेय. सगळं कसं perfect!
|
Ajjuka
| |
| Thursday, October 18, 2007 - 9:55 am: |
| 
|
dubbing चे rights अजून विकले नाहीयेत त्यामुळे ते झालेलं नाहीये. पण होईलसुद्ध लवकरच. अर्थातच आम्ही नाही करणार. जे rights विकत घेतील ते करतील.
|
अज्जुका, मस्त वाटतंय वाचायला पण तुम्ही खूपच कष्टं उपसलेत. लवकरच लिहित रहा. पुढचे वाचायची उत्सुकता आहे. -- संदीप www.atakmatak.blogspot.com
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|