Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 09, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » ajjuka » Feedback » Archive through October 09, 2007 « Previous Next »

Prady
Thursday, August 09, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरजा वाचायला खूपच छान वाटतय. मुलुंडमधे एका संस्थेने कालीदास नाट्यगृहात "श्वास" चा खेळ आयोजीत केला होता तेव्हा पाहीला. मनाला हात घालणारी कलाकृती. पर्वाच झी मराठी वर पाहीला परत. आणी आता हे मेकिंग ऑफ श्वास ची पण उत्सुकता आहे. लिखते रहो.

Amruta
Thursday, August 09, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, छान लिहीत्येस ग.

Zelam
Wednesday, August 15, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरजा छान लिहिते आहेसच. पुढचा भाग जमेल तेव्हा लिही, वाट बघतेय.
आज ही बातमी वाचली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2279028.cms
त्याबद्दलही अभिनंदन

Marhatmoli
Thursday, August 16, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

simply great ,

मी 'श्वास' बघितला नाहिये (बघायचि खुप इछ्छा आहे, इथे त्याचि DVD मिळवण्याच्या प्रयत्नात अजुनहि आहे) म्हणुन इथे प्रतिक्रिया दिलि नव्हति. पण आत्ता झेलम नि सांगितलेलि बातमि वाचलि आणि रहावल नाहि. I guess we all share Nilu Phule's feeling although I wont be able to express it that aptly .

Way to go Ajjuka!


Ajjuka
Saturday, August 18, 2007 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रॅडी, अमृता, झेलम आणि मराठमोळी,
तुमचे आभार.
शक्य होईल तेवढा लवकर पुढचा लेख टाकते.


Mepunekar
Sunday, August 19, 2007 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुका, 'श्वास' मला खूप जास्त आवडलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक.
मधे आम्ही देशात गेलो होतो तेव्हा,श्वास बद्दल श्वास च्या कथा लिहिणार्‍या माधवी घारपुरे यांच्याशी झालेल्या गप्पा माझ्या नवर्‍याने सांगितल्या.
तेव्हा माझा नवरा गोव्याहुन पुण्याला माझ्या नंतर आला आणी वाटेत सावंतवाडीला त्याच्या मावशीकडे २ तास थांबलेला तेव्हा माधवी ताईंची तिथे अनपेक्शीत गाठ पडली, त्या म्हणजे मावशींची खास मैत्रिण. मी पुण्याला आधीच आले होते गोव्याहुन आणी माझा माधवीताईना भेटायचा आणी श्वास बद्दल अजुन माहीती टीम पैकी कोणाकडुन ऐकण्याचा योग हुकला.
पण आता तु ईथे फ़ार सुंदर लिहित असल्याने माझी ती इछा पुर्ण होतिये,
तुला खूप धन्स!


Pramoddeo
Saturday, August 25, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रदर्शी वर्णन!
श्वास हा चित्रपट खासच आहे हे मी नव्याने काय सांगू पण त्यामागची कथा देखिल तितकीच चित्तथरारक आहे. आशा-निराशेचा हा खेळ शब्दात मांडणे वाटते तितके सोपे नसते.आपण मात्र अतिशय सुयोग्य शब्दात त्या कथेमागच्या कथेला न्याय देत आहात! येऊ द्या! पुढचाही भाग येऊ द्या!
वाचनोत्सुक

Ajjuka
Sunday, October 07, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसांचा break झाला. नवीन भाग टाकलाय. यापुढचे भाग यापेक्षा लवकर येतील याचा प्रयत्न मी नक्की करीन.

Supriyaj
Sunday, October 07, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नी........ there you go babe , खुप मस्त वाटलं परत तुझ्याकडून नवीन भाग लिहिला गेला हे बघुन..
we are really lucky की इतक्या अप्रतिम कलाकृतीचा हा प्रवास आम्ही तुझ्याबरोबर शेअर करु शकतोय....
Hats off to you guys.



Gs1
Monday, October 08, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सध्या सोप्या वाटणार्‍या गोष्टींमगे किती जीव ओतून केलेले कष्ट असतात ते अशा पडद्यामागच्या गोष्टींवरूनच लक्षात येत. प्रवास छानच मांडला आहे.

अज्जुका, तुझ्या मानाने हे फास्टच असलं तरी जरा अजून नियमित लिही की. एक दोन आठवड्यातून एकदा तरी.


Ajjuka
Monday, October 08, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स गं सुपे!!
आणि धन्स रे जी एस...
प्रयत्न करणार यापेक्षा लवकर लवकर लिहायचा..


Manjud
Monday, October 08, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, मंडळ आपलं आभारी आहे. तुझ्या अत्यंत व्यस्त अश्या वेळापत्रकातून वेळात वेळ काढून ही लेखमाला लिहून तू माझ्यासारख्या वाचकाला किती आनंद देत्येस याची तुला कल्पना नसेल कदाचित.

Ajjuka
Monday, October 08, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजू.. इथलंही मंडळ आभारी आहे... :-)
व्यस्त वेळापत्रक वगैरे... बरं चाललंय.. लिहिते गं बाई लवकर लवकर!!


Dineshvs
Monday, October 08, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, चि. अश्विनच्या आईबाबांबद्दल थोडेसे, प्लीज.

Mrinmayee
Monday, October 08, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, फार सुरेख लिहिलंय! बालकलाकारांकडून इतक्या उत्तम दर्जाचं काम करवून घेणं नक्कीच सोपं नाही. त्यातही 'परश्याचा' रोल करताना अश्विनच्या मनावर 'तसे' ओरखडे उमटु नयेत म्हणुन तुम्ही घेतलेली काळजी खरंच कौतुकास्पद!
हा भाग वाचताना शेखर कपूरच्या एका इंटरव्युचा एक भाग आठवला. जुगल हंसराजकडून (मासुमसाठी) काम करवून घेताना, त्याच्याशी मैत्री व्हावी म्हणून (शेखर कपूर)त्याच्याशी क्रिकेट खेळायला सुध्दा वेळात वेळ काढून जायचा.


Ajjuka
Monday, October 08, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा,
श्वास बरोबरच्या माझ्या प्रवासाच्या संदर्भात जे आणि जेवढे असेल ते आणि तेवढेच इथे येणार आहे. अश्विनच्या आईबाबांबद्दल वेगळे लिहिणे योग्य होणार नाही.

मृण्मयी,
धन्स गं!!


Chinnu
Monday, October 08, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान वाटलं गं नी.
लहान मुलाच्या भाव विश्वाला धक्का न पोहोचु देता काम काढणे, तेही उत्तम दर्जाचं म्हणजे साधी बाब नक्कीच नाही. तुला आणि टीमला अनेक शुभेच्छा पुढच्या उपक्रमांसाठी!


Manjud
Tuesday, October 09, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए अज्जुका, मी काही ट्मणा नव्हता मारला तुला.......... खरंच अगदी मनापासून लिहिलं होतं..... सावकाश लिहिलस तरी चालेल.

Ajjuka
Tuesday, October 09, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मी गंमत करतेय ना पण.. मलाच जाणवतंय खूप वेळ जातोय मधे ते!!

Jo_s
Tuesday, October 09, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा, अज्जुका
छानच लिअहीलय सारं, पण त्यातही कथा इतक्या लहान मुलापर्यंत पोहोचवण्याचा भाग जास्त आवडला. ते पाहीजे तसं होईपर्यंत किती पेशन्स लागले असतील, खरच वाखाणण्याजोगं आहे हे.
सुधीर


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators