|
प्रतिभा झालटेने महिला दिनानिमित्त लिहिलेल्या पोस्टला उत्तर. मुख्य पानावर पेस्ट होत नसल्याने इथे टाकले आहे खरे तर असे दिन साजरे करण्याची गरज आहे. कारण त्या दिवशी त्या निमित्ताने त्या त्या सेक्टरबाबत चर्चा होते. त्या क्षेत्राचे प्रश्न, महत्व, त्यातील कोणत्या बाबींकडे भविष्यात लक्ष द्यावे याबाबत मुद्दाम हून विचार मन्थन होते. आपणही रोजच्या धबडग्यात थोडे थाम्बून सिंहावलोकन करतो. अरेच्चा हे लक्षातही आले नव्हते हं असे नकळत म्हणतो. आता रोज बहीण भावाला अथवा उलट माझे तुझ्यावर प्रेम आहे बरं का असे सांगत बसत नाही. पण सणाच्या निमित्ताने याची नकळत एकमेकाना जाणीव होऊन जिव्हाळा वाढतोच. खरं तर recognition मिळावं ही प्रत्येक प्राणिमात्राची समूहाची आदिम प्रेरणा आहे असे मानसशास्त्रही मानते.त्यातून माणसाच्या जीवनाला अर्थ, आत्मविश्वास प्राप्त होतो. अरे, मला आपलं मानणारं जगात कुणीतरी आहे बरं का ही जाणीव सुखद तर आहेच पण तो जीवन रसही आहे. आयफेल टॉवरवर एक जण आत्महत्त्या करायला गेला. एका पोलीसाने त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणाला 'माझे कोणी नाही. माझ्यावर कुणी प्रेम करीत नाही. मी जगून काय करू?' पोलीस म्हणाला' ठीक आहे मरण्यापूर्वी माझ्याकडून एक सिगरेट ओढून जा!' तो खाली आला. सिगरेट ओढता ओढता त्याचे मतपरिवर्तन झाले आणि तो वाचला. ह्या गोष्टीचे तात्पर्य मोठे आहे.. (मला वाटते मायबोलीवरही ही गरज बर्यापैकी भागविली जाते) एखाद्या दु:खी माणसाला खोदून खोदून विचारल्यावर तो एकदम रडू लागतो... सौजन्य सप्ताहावरही ही टीका केली जाते पण या निमित्ताने अशी काही जीवन शैली आहे ह्याची संबंधिताना जाणीव होते. सर्व नसले तरी काहींच्या वागण्यात बदल होऊ शकतो. आणि तो संस्कारच केला नाही तर? तेवढा एक टक्का बदल देखील होणार नाही... एखाद्या लेखाने पुस्तकाने, भाषणाने आयुष्य बदलल्याची उदाहरणे आहेतच की!! डावखुर्या लोकांचा एक दिवस आहे! left handers' day म्हणून. त्या दिवशी डावखुर्याना निश्चीत आनन्द अथवा वेगळे वाटत नसेल का? अरे आज माझा दिवस आहे. त्या निमित्ताने ज्या चर्चा, लेख येतात त्यामुळे त्यांचे प्रश्न जगाच्या(उजव्यांच्या)लक्षात तरी येतात. उदा. बर्याच मशिनचे स्विच, पनेल्स हे उजव्यांचा सोयीचे असतात. ते चालविताना डाव्याना खूप अडचणी येतातच पण कार्यक्षमताही कमी होते. कधी कधी अपघातही होतात. बघा माऊसमध्ये याची काळजी घेतलीय. त्याच्या क्लिक्स तुम्ही लेफ्ट राईट अशा adjust करू शकता. रमजानच्या उपवासाचा अन्न व पाणी दिवसभर न घेण्याचा उद्देश असा आहे की अन्न न मिळाल्यावर अथवा बारा तास पाणी न मिळाल्यावर कसे वाटते त्याची जाणीव व्हावी, अनुभूती यावी व उरलेल्या वर्षभर अशी व्यक्ती भेटल्यास त्याला अन्न पाणी पुरविण्याची मदतीची इच्छा व्हावी हा उद्देश. हा संस्कारच आहे. अर्थात त्यातूनही काही नर्मदेतल्या गोट्याना तो होत नाही हे वेगळे. पण काहीना झाला तरी ती जमाच आहे ना.. मला देखील हे पूर्वी हे सर्व formality अथवा कृत्रिमता वाटत असे. शाळेत विद्यार्थी शिक्शक दिन साजरा केला जातो म्हनजे विद्यार्थ्यानी एक दिवस शिक्शक व्हायचे तेव्हाचे अनुभव आठवतात का? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे! हे त्याच्या त्याच्या 'वंशा' जाण्यासाठी हा सगळा ते ते दिन साजरा करण्याचा प्रपंच! असे मला वाटते... तुमचं काय मत्त हाय हेच्यावर?
|
Bee
| |
| Tuesday, March 13, 2007 - 2:52 am: |
| 
|
रॉबीन, इतकं छान लिहिलस हे तू की त्यावर आणखी काही लिहायची गरजच भासत नाही. त्यात आणखी कसलीच addition नको. वाचून मन उल्हासित झालय बघ..
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 13, 2007 - 3:32 am: |
| 
|
रॉबीन, छान लिहिलेस. पण सध्यातरी ही औपचारिकताच झाली आहे.
|
>>पण सध्यातरी ही औपचारिकताच झाली आहे. साला औपचारिकता माय फूट!! ;) सालं माणसाने एकवेळ उघडं-नागडं असावं, हलकट-पाजी असावं, कुणीही असावं, पण औपचारिक असू नये! असो! हे आपलं माझं एक अनौपचारिक मत बरं का! :D आपल्या तद्न्य मंडळींच्या चर्चेत मी मध्येच येऊन बडबड केली त्याबद्दल क्षमस्व! तात्या.
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:56 am: |
| 
|
अहो रॉबिनहूड तुम्ही मेन पेज वर तोन्डात बिगुल टाइप वाद्य धरलय. ते वाजवल्यानन्तर काहितरी कवायत वैगेरे चालु करतात. आता तुमच बिगुल वाजवुन झाल असेल तर काहितरी छान लिहा तिथे. ते रिकाम पहायला बरोबर वाटत नाहि
|
रॉबिन, महिला दिनाची चर्चा हे का????? अन जस महिलान्च राज्य जुन्या काळी परसात असायच, तस म्हणुन का परसदारात येवुन लिहितो हेस???? अरे बाबा तुझ्या दिवाणखान्यात हजेरी लाव की रे भो! DDD बाकी ती वरली पोस्ट छानच लिहिली हेस! गुड! 
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 13, 2007 - 6:32 pm: |
| 
|
तात्या, मलाहि असे औपचारिक वागणे पटत नाही. भारतात किमान ५० टक्के स्त्रिया आहेत. त्यापैकी किती महिलांपर्यंत हा दिवस पोहोचला आहे ?
|
>>भारतात किमान ५० टक्के स्त्रिया आहेत. त्यापैकी किती महिलांपर्यंत हा दिवस पोहोचला आहे ? म्हणे जागतिक महिला दिन! माय फूट.. अरे हे दिन वगैरे असण्याला तसा काही अर्थ नाही. या सगळ्या शिळोप्याच्या गप्पा आहेत झालं! आता बिचारी आमच्याकडे धुण्याभांड्याचं काम करणारी सीताबाई! तिचंच उदाहरण घ्या. पदरात चार मुलं आणि नवरा अत्यंत दारुडा! रोज संध्याकाळी दहा-वीस रुपयांकरता सीताबाईला मारझोड करतो. आपल्या भारतामध्ये सीताबाईसारख्या लाख्खो स्त्रीया आहेत. पाच पाच सहा सहा मुलांची आई होणं, मर मर कष्ट करणं, नवऱ्याचा मार खाणं, त्याला दारूला पैसे पुरवणं, रोज रात्री त्याची गलीच्छ वासना पुरवणं, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कंबर मोडेस्तोवर मोलमजुरी करणं एवढीच कामं भारतातल्या असंख्य अशिक्षित स्त्रीया करतात. आणि तुम्हीआम्ही चार पांढरपेशे महिला दिनाच्या गप्पा मारतो! आता बोला!! मी जर सीताबाईला महिला दिनाविषयी काही बोललो असतो तर मी नक्की काय बडबड करतो आहे हेही त्या बिचारीला कळलं नसतं! असो.. आपण सगळे मायबोलीवर महिला दिन, हा दिन, तो दिन असे फक्त दिन साजरे करत राहुया. घाबरायचं कारण नाही, कारण सीताबाई मायबोलीवर लॊगईन करत नाही!! :D तात्या अभ्यंकर.
|
Bee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 1:55 am: |
| 
|
तात्या, तुम्ही जे म्हणताहेत ते अगदी शतप्रतिशत खर आहे. पण वरती रॉबीनहूडनी एक वाक्य लिहिले आहे ते पुनश्य वाचा. कदाचित तुम्हालाही वाटेल की हो हा एक प्रतिशत बदल होत आहे. >>एखाद्या दु:खी माणसाला खोदून खोदून विचारल्यावर तो एकदम रडू लागतो... सौजन्य सप्ताहावरही ही टीका केली जाते पण या निमित्ताने अशी काही जीवन शैली आहे ह्याची संबंधिताना जाणीव होते. सर्व नसले तरी काहींच्या वागण्यात बदल होऊ शकतो. आणि तो संस्कारच केला नाही तर? तेवढा एक टक्का बदल देखील होणार नाही... भारतातील सगळ्याच सीताबाईंना, गीताबाईंना भेटून त्यांच्या प्रश्नांचे निवारण आपण करू शकत नाही. पण ज्या काही आयाबाया दारुण अवस्थेत आपल्याला भेटतात त्यांना उपदेश करुन किंवा एखादी गोष्ट त्यांना पटवून जर आपल्याला समाजप्रबोधन करता आले तर त्याचा त्यांना किंवा त्यांच्या मुलाबाळांना फ़ायदा जरूर होईल. 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' हा धडा तुम्हालाही शाळेत असावा. हे शिक्षण शालेय असो की जगाच्या विद्यापिठातील असो.. आवश्यक आहेच!
|
>>सौजन्य सप्ताहावरही ही टीका केली जाते पण या निमित्ताने अशी काही जीवन शैली आहे ह्याची संबंधिताना जाणीव होते. माफ करा बी साहेब, पण सौजन्य सप्ताह आदी भोळ्या आणि हास्यस्पद समजुतींवर माझा विश्वास नाही. हे सगळे तुम्हाआम्हा चार पांढरपेशा मंडळींचे पोट भरल्यानंतर चघळायचे विषय आहेत. बी साहेब, आपण किंवा हूड साहेबांनी किती दुनिया पाहिली आहे हे मला माहीत नाही, पण कुठल्या संबंधितांबद्दल बोलताय आपण? माझे मेहुणे (मावस बहिणीचे पती,) रेल्वे अपघातात वारले. आम्हाला कळल्यावर आम्ही ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याकरता कागदपत्रांचे आवश्यक ते सोपस्कार पार पाडले. रेल्वेची दोनचार चतुर्थश्रेणी कामगार मंडळी तिथेच घुटमळत होती. त्या मंडळींनी माझ्या मेहुण्यांना जखमी अवस्थेत तिथे आणले होते. साहजिकच त्यांना माझ्याकडून पैशांची अपेक्षा होती, आणि ती योग्यही होती. मी अत्यंत shocked मन:स्थितीत होतो. तरीही जगाचा व्यवहार सुरूच असतो. मी सहजच त्या मंडळींना म्हटलं, "किती रे पैसे द्यायचे आहेत तुमचे? तुम्ही सांगा, मी देईन!" मी कुठलीच घासाघीस वगैरे करण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. त्यातल्या एकाने अत्यंत निलाजरपणे हसत मला काय सांगावन? "द्या साहेब, काय तुमची खुशी असेल ती!" माझी खुशी?? माझी खुशी असायला ती काय दिवाळीची शुचिर्भूत पहाट होती?? माझे मेहुणे अत्यंत वाईट स्थितीत वारले होते आणि माझी खुशी?? मला सांगा बी साहेब, समजा तो तुम्ही काय म्हणता तो तुमचा so called सौजन्य सप्ताह असता तर मी काय करायला हवं होतं? त्या माणसाच्या कानाखाली आवाज काढायला हवा होता की सौजन्य सप्ताह म्हणून संध्याकाळच्या त्या भकास कातरवेळी त्या रुग्णालयाच्या शवागाराबाहेर त्या इसमाशी माझ्या खुशी(!)बद्दल "अहो साहेब, इथे मृत्यू झाला आहे ती माझी खुशी कशी असेल सांगा पाहू? असं म्हणू नये बरं का! आपले काय पैसे असतील ते मी देतो पण प्रथम "माझी खुशी" हे शब्द वापरल्याबद्दल सौजन्याने क्षमा मागा पाहू माझी!" हा प्रेमळ संवाद सौजन्याने साधायला हवा होता? बोला बी साहेब! अजूनही माझ्या आयुष्यात असे एकापेक्षा एक सौजन्यपूर्णे(!) अनुभव आहेत. सौजन्याने सांगेन केव्हातरी! ;) नोकरी-कामधंद्याच्या निमित्ताने फोरासरोडवरची मध्यरात्रीची मुंबई खूप पाहिली आहे मी. तिथे बोलावू आपण तुमच्या सौजन्य सप्ताहवाल्यांना सौजन्याचा प्रसार करायला! ;) >>सर्व नसले तरी काहींच्या वागण्यात बदल होऊ शकतो. आणि तो संस्कारच केला नाही तर? तेवढा एक टक्का बदल देखील होणार नाही... ठीक आहे! जाऊया एकदा आपण फोरास रोडवरील एका देशीदारूच्या बारमध्ये जिथे मी एकेकाळी हिशेब तपासनीसाचं काम करीत असे. तिथे मावश्यांच्या, आणि रांडांच्या दलालांमध्ये पाच दहा रुपायांकरता जी सौजन्यपूर्ण भांडणं आणि शिविगाळ चालते ती तुम्ही किंवा हूड साहेबांनी सौजन्यपूर्ण मध्यस्थी करून सोडवून दाखवावी. तर आपण मानलं तुम्हाला आणि तुमच्या सौजन्य सप्ताहाच्या पोरकट कल्पनेला!! >>पण ज्या काही आयाबाया दारुण अवस्थेत आपल्याला भेटतात त्यांना उपदेश करुन किंवा एखादी गोष्ट त्यांना पटवून जर आपल्याला समाजप्रबोधन करता आले तर त्याचा त्यांना किंवा त्यांच्या मुलाबाळांना फ़ायदा जरूर होईल. बी साहेब, उपदेश करून कामं होत नाहीत हो! ज्यांची रोजची हातातोंडाशी गाठ असते ना, त्यांना उपदेशाऐवजी दोन वेळची भूक मारण्याकरता गांधीबाबाचं चित्र असलेल्या नोटा लागतात! विश्वास ठेवा, हे माझे अनुभवाचे बोल आहेत! >>'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' हा धडा तुम्हालाही शाळेत असावा. हे शिक्षण शालेय असो की जगाच्या विद्यापिठातील असो.. आवश्यक आहेच! जगाच्या विद्यापीठात शिकूनच हे सर्व लिहितो आहे. आपण कुठल्या जगाच्या विद्यापीठात शिकलात हे मला माहीत नाही! असो, सध्या पुरे. पुन्हा केव्हातरी जगाच्या विद्यापीठात शिकलेले काही सौजन्यपूर्ण अनुभव लिहीन! आपला, (सौजन्यशील!) तात्या अभ्यंकर.
|
तात्यांचे म्हनणे नवीन नाही. पण फोरास रोडलाही सामाजिक कार्यकर्त्यानी केलेल्या कामाचा काहीच परिणाम झाला नाही असे म्हणायचे का तात्याना? सामाजिक बदल हे हळू हळूच होत असतात. त्यातल्यात्यात आपल्या सारख्या प्रचंड डायवर्सिटी असलेल्या देशात तर फारच कठीन काम. साधारणत: माणसे आधी आशावादी आणि नन्तर सिनिक होत जातात पण मी आधी सिनिक आणि नन्तर आशावादी होत चाललोय. वैयक्तीक दु:खाची उदाहरणे बरीच सांगता येतील. अगदी मोलकरणीबाबत म्हणायचे झाले तर exploitation चे प्रमाण पुष्कळ कमी झाले आहे. (पुढे चालू)
|
हूडसाहेब, तुमच्या आशावादाला माझा प्रणाम! आशा नेहमी अमर असते! चालू द्या! -- तात्या.
|
Bee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:35 am: |
| 
|
तात्या, तुमचा हा अनुभव नक्कीच खूप कटू आहे. जगात माणूसकी उरली नाही असे एखाद्याला वाटेल तुमच्या जागी. पण असे म्हणून आपण एकतर खूप स्वकेंद्रीय जीवन जगत आह्तो वा आपण डरपोक, शून्य will power असलेली माणसे आहोत असेही मन बोलते. देशातले हे चित्रण बदलले पाहिजे, असे घडले पाहिजे, हे योग्य आहे, ते अयोग्य आहे, हा अन्याय आहे, ह्याचा प्रतिक्रार व्हायलाच पाहिजे असे एक नाही अनेक स्फ़ोट मनातल्या मनात चालूच असतात. जर आपण माघार घेऊन फ़क्त आपल्याच आयुष्याकडे बघत बसलो तर आपण आपल्यापुरतेच जीवन जगलोत असे शेवटी म्हणायला होइल. आम्हाला ज्यांनी स्वातंत्र मिळवून दिले, ज्या जवानांनी आमच्यासाठी आहूती दिली त्यांचा आम्ही काहीच आदर्श बाळगू नये का? असो विषय सौजन्य सप्ताह साजरा करण्यावर आक्षेप घेण्याशी निगडीत होता. मला वाटतं मी वेगळेच काहीतरी बरळलो. अभियांत्रीला असताना college मधे ragging प्रकरणी जो कर्फ़ू लागला होता त्यात अमित बढे नावाचा एक मुलगा गोळीबारात गेला. तो दिन college मधे black day म्हणून 'पाळण्यात' येत असे. प्रथम वर्षाला असताना Electronics Devices and Circuits शिकविणारे lecturer आलेत आणि म्हणालेत lets CELEBRATE black day, no lecture will be conducted today! आम्ही सगळे विद्यार्थी त्यांच्या CELEBRATE शब्दावर सुन्न झालो. विनोदही वाटला तो! हे सर्व 'खुशी' ह्या शब्दावरुन आठवले. पण एक lecturer असे मिळाले म्हणून सगळ्याच lecturer & professor वर्गावर आम्ही राग धरला नाही.
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 14, 2007 - 6:54 am: |
| 
|
अरे बाबा तुझ्या दिवाणखान्यात हजेरी लाव की रे भो!>>>> १००१ मोदक बिगुल वाजवल आता लिवा कि कायतरी झ्याकपैकी आणि किती दिस अस मागच्या दाराला यायच आम्ही तुम्हास्नी हुडकत.
|
तात्या, जगाच्या पाठीवर कोट्यवधी माणसान्गणिक कोट्यवधी बर्यावाईट गोष्टी चालत असतात! मान्य हे! नेमके तुम्हाला त्याचे कटु अनुभव मिळाले, त्यामुळे तुमचा त्रागा मी केवळ समजु शकत नाही तर त्यातिल सत्यान्श मी मान्य करतो! (याचा अर्थ असा नव्हे की मी पण फोरास रोडवर "कसल तरी" काम केल हे किन्वा तिकडचा....! ) माझ म्हणण इतकच हे की माझा या अशा दिवस साजरे करण्यावर पुर्ण विश्वास हे! जर तो तसा नसता किन्वा नसेल तर येत्या सोमवारी गुढी उभारण्याची मला गरज नाही.... कोण कुठला राम, त्याचा कधीन्चा तरी विजयोत्सव, आज का म्हणुन करायचा जेव्हा आजुबाजुला बॉम्ब्स्फोट, खून, दरोडे, अत्याचार, (भाजप) कार्यकर्त्यान्चे हात तोडणे असले चालु असताना हे पुराणकालीन रामाच्या विजयोत्सवाचा दिवस गुढ्या तोरणे उभारुन आम्ही काय करतो?????? की हे आम्हा "मुठभर" पान्ढरपेशान्ची "प्वाट भरल्यानन्तरची" खुळ हेत??? की आम्ही पान्ढरपेशे आहोत हा आमचा गुन्हा असुन तुम्ही जी जी उदाहरण दिलीहेत फोरास रोड अन कुठ्कुअठची, त्यान्च्या पन्क्तित आम्ही जावुन बसाव अस तर तुम्हाला सुचवायच नाही हे ना???? सौजन्य सप्ताह त्यान्च्या करीता हे जे मुलातच सौजन्यशील हेत, पण बाह्य परिणामान्मुळे (जसे की तुम्ही) झ्यान्च्यातील सहनशक्तीला धक्का बसल्या मुळे सौजन्यशीलतेचा देखिल र्हास होवु शकतो अशान्ना व केवल अशाच सौजन्याची इच्छा अपेक्षा धरणार्या पण त्यान्नी तो दुसर्याकरता वसरू नये म्हणुन त्यान्च्या करता हा सौजन्य सप्ताह हे! दोन वेळची पोटाची आग भागविण्याकरीता कसलेही कृत्य करुन त्यामागे "भुकेचे" समर्थन सान्गणार्यान्चा समावेश या सौजन्य सप्ताहात मला नाही वाटत होत असेल.....! दोन वेळच्या भुका काय अन्गावर लक्तर लेवुन चौकाचौकात भीका मागत फिरणार्यान्नाच लागतात अन ते जे आम्ही लोक होतो ज्यान्च्यी घरदार जाळल्या नन्तर बेवारशा सारखी अन्ग चोरत भीत भीत पुण्यामुम्बईच्या आसर्याला आलो तेव्हा त्यान्ना भुका नव्हत्या??? पण ते पन्ढरपेशे होते ना! बुर्झ्वा लोक ती! ती घरात उपाशी बसतील पण भीक मागणार नाहीत, वाटेल ते पडेल ते काम करतील पण चोरी मारी करणार नाही, त्यान्ना नव्हती का कसली चाड वगैरे??? कधी श्यामची आई हे पुस्तक वाचलत का???? की ते पण पाण्ढरपेशे??? आणि मग कुणि कुणाचा आदर्श ठेवायचा???? आम्ही पान्ढरपेशान्नी त्या तुमच्या समोर "खुशीने चा पाणी" मागणार्याचा की फोरास रोअडवरच्या दोन पाच रुपयान्च्या दलालीच्या वरुन भान्डणार्यान्चा आदर्श ठेवावा अस म्हणायच का तुम्हाला??????? तस नसेल, तर मान्य हे, हे दिवस वगैरे आम्हा पान्ढरपेशान्चेत, पण ते आमच्या पुढच्या पिढीकरता आदर्श हेत, असलेल्या पिढ्यान्ना आठवण करुन देणारेत, अन ते असण ही एक गरजही हे, ते नसतील तर उद्या पान्ढरपेशे "त्या" लोकान्सारख, त्यान्च अनुकरण करुन, त्यान्चे कित्ते गिरवुन, त्यान्चे आदर्श ठेवुन जगु लागले अस होइल, ते तस होवु नये म्हणुन हे दिवस साजरे करणे भाग हे! वरली पोस्ट फारच विस्कळित झाली हे, दहादा उठायला लागल......! मजकुरातल कमी जास्त समजुन घ्या! 
|
Zakasrao
| |
| Thursday, March 15, 2007 - 8:10 am: |
| 
|
रॉबिन हूड तुम्ही चांगल लिहलय. अरे भौ इथे V & C करु नकारे.
|
Giriraj
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:53 pm: |
| 
|
ग्रेसच्या कवितेबद्दल आणि एकूणच लिखाणाबद्दल खूप सोप्या शब्दांत लिहिलेय तुम्ही तर! तुमच्याकडून असंच अजूनही वेगवेगळ्या विषयांवर लिखाण अपेक्षित आहे!
|
Asami
| |
| Thursday, March 22, 2007 - 3:20 pm: |
| 
|
खरच. बोवाजींबरोबर फ़लतू TP करण्यापेक्षा ह्याचाच विस्तार करावा.
|
Maitreyee
| |
| Thursday, March 22, 2007 - 3:36 pm: |
| 
|
रॉबिन हूड, सुरेख लिहिलयत! आज एकदम वेगळाच मूड लागलेला दिसतोय
|
Shonoo
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:16 pm: |
| 
|
रॉबीन हूड पानाला कशी शोभा आली आता! लगे रहो. त्या कविता संग्रहाबद्दल आणि चन्द्रमाधवीचे प्रदेश बद्दल अजून लिहाल अशी आशा (विनंती) .....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|