Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 20, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dwidhamedha » Feedback » Archive through December 20, 2006 « Previous Next »

Shonoo
Saturday, October 07, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो तेच. तिथला सुरमै फ़्राय आणि मंगळूरी पद्धतीची माशाची कालवणं एकदम घरगुती चवीची असतात. कोरी रोट्टी नावाचा त्यांचा एक प्रकार असतो तो पण खासच असतो. पूर्वी सुक्या माशांचे पण प्रकार मिळत असत म्हणे. पण मी कधी खाल्ले नाहीत.

Bhagya
Saturday, October 28, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मातृभाषा आपली असते...
मी कुठेसं वाचलं होतं की पुरुषांना बायको साडीत, अंग झाकलेलीच आवडते पण मैत्रिण किंवा सेक्रेटरीने कितीही मॉड कपडे घातले तरी ओके वाटतात.
तशीच काहीशी आपली धारणा असावी. आपली जी मायमाऊली मराठी आहे ना, तिचा सोज्वळपणाचा वारसा ज्ञानेश्वर, बहिणाबाई, दुर्गा भागवत आणि इतर अनेक लोकांनपासून चालत आला आहे. पण आपल्याला माहित आहे की इंग्लिश भाषेत तसा काही प्रकार नाही. खूपशी चांगली पुस्तकं असतात, पण लेखनस्वातंत्र्य फ़ारच असते.
अज़ुनही मराठी आपली आहे, पण इंग्लिश आपली नाही.
आणि मराठी भाषेत म्हणूनच आपल्याला असलं काही आवडत नसणार.

तुला जर ऐतिहासिक पुस्तके आवडत असतील वाचायला, तर
फिलिपा ग्रेगोरी हीचं The other boleyn girl जरुर वाच.
सगळ्या जगावर सत्ता गाजवून सगळ्या जगाला maaners and ettiquetes शिकवणारे इंग्रज आठव्या हेन्रीच्या काळापासूनच प्रत्यक्षात किती सत्तालोलुप, विषयलोलुप आणी किळसवाणे होते ते कळतं.


Bee
Monday, October 30, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, वर ही प्रतिक्रिया तू नेमकी शोनूच्या कुठल्या पोष्टबद्दल देते आहेस? ती कुठेच मराठी भाषेबद्दल वा इतिहासाबद्दल बोलली नाही. मला तुझी ही प्रतिक्रिया इथे संदर्भहीन वाटली पण लिहिली खूप छान म्हणून शोनूच त्याबद्दल निगडीत पोष्ट विचाराव अस वाटलं...

शोनू, मस्तच आहे ही कविता. अनुवाद का?


Shonoo
Monday, October 30, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bill Martin Jr आणि John Archambault यांचं एक मुलांकरता पुस्तक आहे chicka chicka boom boom नावाचं. त्यात सर्व अक्षरं एका नारळाच्या झाडावर चढतात अणि पडतात याचं मस्त वर्णन आहे. त्या पुस्तकाची एक सी डी ऐकत होते Ray Charles ने ती कविता वाचलीय. ते ऐकता ऐकता हे सुचलं.

Zelam
Monday, October 30, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू सध्या हेच गाणं मी माझ्या ४ वर्षांच्या मुलीकडून शिकतेय.

Bhagya
Monday, October 30, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, मी शोनूच्या ४ ऑक्टो. च्या रन्गिबेरंगी पानावर तीने जे मत प्रदर्शीत केले आहे, की मराठीतुन स्त्री पुरुष संबंधाबद्दल वाचायला कसंसंच वाटतं, त्याबद्दल लिहिले आहे. मी घाईत त्याखालचे वाचले नाही, आणि माझी प्रतिक्रिया उशिरा आल्याने संदर्भहीन झाली अहे.

आणि पुस्तक तर मी तिला सहजच सुचवले, कारण तिला पुस्तकांची खूप आवड आहे.


Bee
Tuesday, October 31, 2006 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस होय भाग्य. बरीच उशिरा उगवलीस म्हणजे तू..

शोनू, प्लीज तेरुओ जमवून दे ना मला.. कुणीच मदत करत नाही त्यावर इथे..


Arati_halbe
Tuesday, October 31, 2006 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, १० दिवसांपुर्वी मुम्बई च्या strand मध्ये गेले होते प्रथमच. त्या आधी बंगलोर ला असताना तिथे गेले होते. एकदा strand मध्ये जाऊन आले की बाकी सर्व so called मोठे book stalls अगदी bore होतात. Strand has just amazing book collection and of course very helping and knowledgeable attendants

अरे हो, strand मधुन बाहेर पडल्यावर मला प्रचण्ड भूक लागली होती पण मुम्बई मधे नवीन असल्याने काहीच माहित नव्हते. त्यामुळे मुकट्याने CST station ला आले आणि Deccan Queen मध्ये हादडायच्या आधी एक टुकार sandwich आणि amul milk घेउन Deccan Queen ची वाट बघत बसले. तुझा ह BB जरा अधी वाचला असता तर तुला जायच्या आधी विचारले तरी असते कुठे snacks घेऊ ते
!


Shonoo
Tuesday, October 31, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरती
CST च्या जवळ विट्ठल्स आहे. तिथे काहीही चापता आले असते. महेश आणि आयडीयल कॅफ़े ही जेवणाची ठिकाणे. जरा जास्त वेळ असेल तर जहांगीर आर्ट गॅलरी मधे समोवार आहे. तिथे बसून चहा आणि समोसे खावेत. अगदीच वेळ कमी असेल तर एस्प्लनेड बिल्डिंग्च्या मागे बटाटेवडे मिळतात. त्यांची सर जगातल्या कुठल्या ही बटाटेवड्यांना नाही!
परत मुम्बै ला जाणार असलीस तर दोन चार लोकांना विचारून जा :-)

strand मधले सर्व लोक पुस्तकप्रेमी आहेत. एकदा पहिल्यांदा Deckle Edge असलेले पुस्तक पाहून मी नाक मुरडले होते. ते बघून खाशी कान उघडणी केली होती शानभागांनी. book binding 101 वर त्यांनी इतक्या तपशीलात जाऊन माहिती दिली होती. एखाद्या पुस्तकाच्या अनेक प्रती असतात, अनेकांनी केलेली भाषांतरे असतात, त्याबद्दल्ल strand मधे मौलिक माहिती मिळू शकते. बाकी ठिकाणी ते नाही. अगदी landmark मधले अतिशय तत्परतेने मदत करणारे सुद्धा नुस्ते salesman आहेत. book lovers नाहीत. फार पुर्वी bandraa book club BBC नावाचं दुकान होतं. तिथे जाणकार मंडळी होती. आता तिथे एक बारिस्टा आलंय!


Prashantkhapane
Tuesday, October 31, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Some nice posts. LIked your rangiberangi.

Asami
Tuesday, October 31, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार पुर्वी bandraa book club BBC नावाचं दुकान होतं. तिथे जाणकार मंडळी होती. आता तिथे एक बारिस्टा आलंय!
अगदी अगदी :-(

Arati_halbe
Thursday, November 02, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मौलिक माहितीबद्दल धन्यवाद. ही trip फ़ारच अचानक ठरली! मला strand fort मध्ये आहे हे सोडुन काहीच माहित नव्हते. मात्र Deccan Queen पकडायच्या आधी १ तास आहे म्हटल्यावर फक्त strand असा एकच option सुचला!

Manya2804
Wednesday, December 13, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू,

तुला पुस्तकांची फारच आवड आहे म्हणून विचारतो, तू Mitch Albom चं Tuesdays with Morrie हे पुस्तक वाचलं आहेस का? मी हे पुस्तक परवाच Strand मधुन आणल. फार पूर्वी शन्ना नवरे लोकसत्तेत एक सदर लिहायचे. त्यात त्यानी ह्या पुस्तका बद्दल लिहिलं होत. खुप छान पुस्तक आहे. मिळाल्यास जरूर वाचणे!


Shonoo
Wednesday, December 13, 2006 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्या

हो मी बर्‍याच वर्षांपूर्वी वाचलंय ते पुस्तक. त्यावर एक पिक्चर पण आलाय्- तो नाही पाहिला अजून. अतिशय सुरेख आणि विचार करायला लावणारं पुस्तक आहे.


Manya2804
Friday, December 15, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेधाताई,
काही पुस्तकांची नावे देत आहे. कदाचित तुम्ही ती सर्व वाचली असतील. पण पुस्तकांची list टाकायला मला ह्या BB इतका योग्य BB सापडला नाही.

James Redfield
- The Celstine Prophecy

Bill Bryson
- A Short History of Nearly Everything
- Neither Here Nor There
- Notes From a Small Island
- I'm Stranger Here Myself

Malcolm Gladwell
- Blink: The Power of Thinking Without Thinking

Eckhart Tolle
- The New Earth

Tim Hartford
- The Undercover Economist

Simon Singh
- The Code Book
- The Cracking Code Book

Marcus du Sutoy
- The Music of the Primes

David Chilton
- The Wealthy Barber

Robert Wolke
- What Einstein Told His Barber

Richard Feynman
- Surely You are Joking, Mr. Feynman!
- The Pleasure of Finding Things Out

शन्ना नवरे
- सर्वोत्कृष्ट शन्ना

श्रीनिवास ठाणेदार
- ही श्रीची ईच्छा

प्रवीण दवणे
- थेंबातलं आभाळ (भाग १, २)

जयवंत दळवी
- परम मित्र

सुनीता देशपांडे
- सोयरे सकळ

राम कोलारकर (संपादक)
- सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा (खंड १- २०)

तूर्त पुरे. बाकीची list नंतर केव्हातरी टाकीन! आगावूपणा बद्द्ल क्षमस्व!



Shonoo
Saturday, December 16, 2006 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्या:

धन्यवाद. कोलारकरांच्या पुस्तकाबद्दल ऐकले होते. अजुन वाचायचा योग आला नाही. wish list मधे ही पुस्तकं टाकली. श न्नांचं आणि सुनिताबाईंचं पुस्तक वाचलंय. दवणे यांची पुस्तके पण विश लिस्ट वर होती. अजूनपर्यंत त्यांचं लेखन दिवाळी अंकात आणि वर्तमान पत्रात वाचलंय तेव्हढच.

बिल ब्रायसन ची दोन पुस्तक चाळली आहेत्- पूर्ण वाचली नाहीत.
बाकीची पुस्तकं आता लायब्ररीतून आणायच्या पुस्तकांच्या लिस्ट मधे टाकून ठेवीन.

अजूनही नव्या मराठी पुस्तकांबद्दल ऐकायलावाचायला आवडेल.


Pooh
Saturday, December 16, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

the funniest book by Bill Bryson is "a Walk in the woods". It is about his completing the appalachian trail.

there is another book about his australian travels which is something like "in a sunburned country". not 100% sure.

both are good. but A walk in the woods is a must read.

Tulip
Saturday, December 16, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू छान आहे तुझा बीबी. सगळा वाचून काढला आत्ताच.

तुझी पुस्तकांची यादीही वाचली. वीणा गवाणकरांच 'भगीरथाचे वारस' नीरजा चे 'ओल हरवलेली माती' आणि भानू काळेंच 'बदलता भारत' सुद्धा जरुर घे. दुर्गाबाईंच एक 'निसर्गोत्सव' म्हणून छोटेखानी पण अतीशय सुंदर पुस्तक आहे. तेही मिळाल तर घे. मी पॉप्युलर प्रकाशनाच 'प्रिय रसिक' जमेल तेव्हा मागवते इथे. त्यांच्या गेल्या महिन्याच्या अंकात आगामी पुस्तकांच्या यादीत सुप्रसिद्ध शल्यविशारद डॉ. वि. ना. श्रीखंडे यांच्या 'आणि दोन हात' ह्या आत्मचरित्राचा उल्लेख केलेला आहे. ते जर आलेले असेल तर ते ही बघ. ग्रेस चे 'सांजभयाच्या साजणी' पण आलेले आहे.


Manya2804
Wednesday, December 20, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी काही पुस्तक :

डाॅ. रवी बापट
- वाॅर्ड नं. पाच, के.ई.एम.

मिलिंद बोकिल
- शाळा

शन्ना नवरे
- ओली-सुकी

रत्नाकर मतकरी
- ऐक टोले पडताहेत
- एक दिवा विझताना

शिरिष कणेकर
- पुन्हा यादोंकी बारात

ग. दी. माडागूळकर
- वाटेवरल्या सावल्या
- आकाशाची फळे

William Poundstone
- How Would You Move Mount Fuji?

Eckhart Tolle
- The Power of Now

Avinash Dixit & Barry Nalebuff
- Thinking Strategically

Naseem Nicholas Taleb
- Fooled by Randomness

Robert M Pirsig
- Zen and the Art of Motorcycle Maintenance


Shonoo
Wednesday, December 20, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्या

ते Zen and the Art of Motorcycle Maintenance पुस्तक अगदी मानगुटीला बसणारे पुस्तक आहे. एकदा मनापासून वाचले की जन्म भर ते पुस्तक पाठ सोडत नाही. मी ते जवळ जवल वीसेक वर्षांपूर्वी वाचले होते. पण अजूनही त्यातलं क्वालिटी वरचं लिखाण मला अस्वस्थ करतं.

बाकी मराठी पुस्तकं आता मॅजेस्टीक मधे शोधेन.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators