Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
sashal
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » sashal « Previous Next »

|| श्री गणेशाय् नमः ||

सर्वप्रथम Admin ना धन्यवाद .. माझी हक्काची जागा दिल्याबद्दल ..

सगळ्यांना सप्रेम नमस्कार .. हितगुज वरच्या माझ्या घरी तुमचं हार्दिक स्वागत ..
काल कसल्यातरी context मध्ये एक विचार डोक्यात आला,

निसर्ग foolproof आहे का?

मला असं वाटतंय की नाहि, तुमचं काय मत?
निसर्ग foolproof नाहि असं मला वाटतं त्याला बरीच कारणं आहेत .. त्यातलं एक आज लिहायचा प्रयत्न करते ..

Natural calamities .. दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, भूकंप, tornados, typhoons, tsunamis etc., का घडतात? मी बर्‍याच वेळा ऐकलं आहे की ही निसर्गाची स्वतःचा balance राखण्याची तर्‍हा आहे .. माणसाने ज्या प्रकारे निसर्ग exploit केलाय आणि ह्यामुळे जो imbalance निर्माण झालाय तो control करण्यासाठी ह्या calamities घडतात .. पण मग ह्यात प्राण मात्र किती निष्पाप लोकांचेही जातात ना? त्यात बळी जाणार्‍या सर्वांनीच निसर्गाचा अवमान केलेला नसतो .. ओल्याबरोबर सुकंही जळतं, असंच काहितरी होतं .. पण जर निसर्ग किंवा पर्यायाने देव almighty आहे, just आहे, foolproof आहे, तर ज्यांच्या हातून चूक घडलीये त्यांनाच आणि फ़क्त त्यांनाच शिक्षा व्हायला हवी .. निसर्गाचा असा न्याय चुकीचा नाहि का?
काहि दिवसांपुर्वी पार्ले बी बी वर टाकलेलं चाफ़्याचं पोस्ट .. ह्यातली शब्द संपदा एकदम 'जबरी' आहे म्हणून जपून ठेवावसं वाटलं ..

अरेरेरेरे काय ही दुरावस्था! पार्ले बीबीच्या थोर, उज्ज्वल व दैदिप्यमान अशा परंपरेचा हा होत चाललेला र्‍हास! मन ढवळून निघाले ही विन्मुख विनामेन्यू भुकेली पोस्टस पाहून. च् च् च्.

कार्याध्यक्षा श्रीमती सशल, खाद्यमंडळाच्या एक आद्य संस्थापिका म्हणून तुम्हाला वाटत असलेला विषाद तुम्ही न सांगताच तुमच्या अल्पाक्षरी पोस्टमधून भरभरुन व्यक्त होतो आहे. मोठ्या धडाडीचे नवीन सदस्य श्रीयुत अमेय यांनीही काहीच खाऊ नये? दोनच दिवसांपूर्वी दुसर्‍या आद्य संस्थापिका समि यांनी सेक्रेटरी नसल्याची सबब सांगून इथे मेन्यू लिहिण्याचा कंटाळा येतो हे सांगितले. ते ऐकून झालेल्या यातना वर्णनातीत अशाच आहेत. तत्पूर्वी काही आठवडे श्रीमती लालू यांनी इथे काय खाणार आहे ते न लिहिता काय खाल्ले तेच लिहावे असा उपप्रस्ताव मांडल्याने इथे येणार्‍या नवीन उत्सुक मेन्यूकरांच्या उत्साहावर थोडे विरजण पडले असण्याची कुणकुण मंडळाला होतीच. त्यात सन्माननीय सदस्या ट्युलिप यांनी काय खाल्ले किंवा काय खाणार आहे हे न लिहिता तिसरेच (तिसरे हा प्राणी नव्हे, संख्या या अर्थाने) म्हणजे काय खावेसे वाटत आहे हे लिहायची नवी कल्पना सुरु केली. पार्ल्याच्या खाद्यसंस्कृतीला या सर्व खाण्याच्या 'पोट'शाखांचा आनंदच आहे. पण मेन्यू न सांगताच इथे पोस्ट टाकणे म्हणजे अगदीच शो. ना. हो.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या निमित्ताने या विषयावर त्रिस्तरीय खाद्य कार्यकारी मंडळ नेमून परिसंवादात्मक चर्चासत्र आयोजित केले जावे ही आमची मागणी अनाठायी वाटू नये. मी कार्याध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी 'जातीने' पुढाकार घेऊन 'भरपूर' खाण्यापिण्यावरच्या चर्चेसाठी हा परिसंवाद आयोजित करुन सर्व सभासदांना कळवावे. आणि त्या चर्चासत्रात मिळणार्‍या जेवणाचा मेन्यू निमंत्रणपत्रिकेत जरुर कळवावा.

मला सहसा लेखन करायला जमत नाहि .. नव्हे अजिबात येतच नाहि .. * शाळेत निबंध मी बरेचदा कॉपी करायचे .. मग कॉलेज मध्ये दुसरी language सोडायचा चांस मिळाला आणि मी खुष झाले .. म्हंटलं एका भाषेच्या कचाट्यातून तरी सुटले .. पण कसं कोणास ठाऊक, चाफ़्याच्या या पोस्ट मुळे कधी नव्हे ते मला काहितरी लिहायला सुचलं आणि मी लिहीलं सुध्दा ..

|| श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न ||

स. न. वि. वि.

बृहन् पार्ले खाद्यमंडाळाच्या माननीय खाद्यजनहो आनि इतर खद्येच्छूक जनहो, आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की लवकरच एक अखिल हितगुज खाद्य सम्मेलन आयोजित करण्याचे योजिले आहे.

आपल्या मंडळाचे शुध्दखाद्यपान प्रमुख चाफ़ा ह्यांनी 'जातीने' केलेल्या परिसंवादात्मक चर्चासत्राच्या मागणीतूनच आम्हाला या अखिल हितगुज खाद्य सम्मेलनाची कल्पना सुचली. या संम्मेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगीबेअर ह्यांनी हे आमंत्रण स्वीकारावे अशी मी त्यांना विनंतीवजा धमकी देते.

तर अशा या खाद्यपरंपेच्या समृध्द भरभराटीस खाद्य ठरू शकेल अशा या संम्मेलनाची रुपरेषा खाली देत आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून योगीबेअर उद्घाटना च्या हेतूपुर्तीसाठी breakfast चा मेनू जाहिर करतील. त्यानंतर सशल " खाणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " हा चमचमीत 'एकपात्री' प्रयोग सादर करतील. ह्या कार्यक्रमामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी एक छोटा snack break ठेवून मग त्यानंतर हितगुज वरच्या आद्य खाद्यपरंपरेचा इतिहास आणि आजच्या हितगुज मध्ये करायचे खाद्यबदल ह्याबद्दल चाफ़ा एक खमंग व्याख्यान देतील. हे व्याख्यान आणि त्यानंअतर होणारा प्रश्नोत्तरांचा V&C ह्यांनी वातावरण बरेच तप्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन अधून मधून थंड किंवा शीत आणि अगदीच कुणाचा आग्रह असल्यास रंगीत पेये पुरवली जातील. त्यानंतर अर्थातच जेवणाचा चविष्ट आणि खुमासदार कार्यक्रम होईल. जेवणानंतरचा थोडा वेळ शक्तीवर्धक डुलकी साठी राखून ठेवण्यात आला आहे. पुढच्या कार्यक्रमांचा अस्वाद घेण्याची शक्ती आमंत्रितांना मिळाली की लगेच समि ह्यांचा " खाऊन आणि टाईपून मीही दमले, सेक्रेटरी कधी रे येशील तू " ह्या मधूर आणि रसाळ आळवणीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर वेळ असेल चहापानाची. पुढचा कार्यक्रमाचा भार सांभाळतील ट्युलिप आणि अमेय, अनुक्रमे " रूचिरा नंतर काय? " आणि " सख्खे खाद्यशेजारी " सादर करून. सगळ्यांत शेवटी लालु ह्यांचे झणझणीत भाषण आणि स्वाती ह्यांचे चटपटीत काव्यवाचन होऊन सम्मेलनाचा समारोप होईल.

तर अशा या समाधानाचा / ची तृप्त ढेकर द्यायला लावणार्‍या बहारदार संम्मेलनाला आपण सर्वांनी 'जातीने' अगत्य खाण्याचे नव्हे येण्याचे करावे ही विनंती.

आपलेच,
पार्ले खाद्यमंडळ.

वि. सू. : प्रत्येकाला इच्छाभोजन करता यावे यासाठी मुद्दामच कसलाही मेनू ठरवलेला नाहि. प्रत्येकाने स्वतःला हवे ते, खाल्ले असेल ते, खावेसे वाटणारे ते सर्व खावे.

ता. क. वरील रुपरेषेत एका महत्वाच्या कार्यक्रमाची नोंद राहून गेली त्याबद्दल मंडळ आपली सखेद माफ़ी मागत आहे. वर नमूद केलेल्या पूर्वनियोजीत कार्यक्रमांच्या अधून मधून उपास ह्यांचे " करंजी असो वा सूतरफ़ेणी, तूच माझी राणी " हा सुमधूर गीतगायनाचा कार्यक्रम होईल.


हल्ली HG ची दुरावस्था काय सांगावी .. आजूबाजूला जसा निष्पर्ण, चेतनाहिन आणि थंडगार winter चालू आहे तसाच हितगुज वरही सध्या winter चालू आहे असं वाटतं .. प्रत्येक सेकंदागणिक नवनविन पोस्ट नी डवरलेला हितगुज वृक्ष एकेका बी बी च्या बंद पडण्याने हळू हळू " निष्पोस्ट " होत चाललाय ..

हल्ली हितगुज वर जिकडे तिकडे 'politically correct' असण्याचे वारे वाहू लागले आहेत .. आपण एखादं पोस्ट केलं तर ते पोस्ट कोणावर खाजगी शब्दहल्ला करणारं, कोणाला खिजवणारं, कोणाला अनुल्लेखाने मारणारं, आपल्या हितगुज वरच्या इतर व्यक्तिमत्वांची ओळख पटवून देणारं, कोण्या एका धर्म, जात, वर्ण, वाद ( 'ism' ), देश, प्रांत याचा अपमान करणारं आहे असं कोणाला दुसर्‍याला वाटलं की झालं .. मग त्या पोस्ट च्या प्रत्येक अक्षराचा किस पाडून ते नैतिकतेला कसं धरून नाहि, किती अविचारी आहे, ईतर hg करांसाठी कसं क्लेशकारक आहे हे दाखवून देण्याची चढाओढ लागते ..

हल्ली काहिजण नुसतेच पाठलाग करत असतात .. हा अविष्कार मी पहिल्यांदा हितगुज वरच्या एका दिवळि अंकातच बघितला .. तुमचा mouse जसा फ़िरवाल तशी ती screen वरची इमेज पाठलाग करुन बरोब्बर तुम्हाला पकडते तसंच हल्ली हितगुज वर होतं .. पहिल्याने कुठे काहि पोस्ट टाकलं की लगेच दुसरा पोस्ट करणार मग ते पहिलं किंवा दुसरं किंवा दोन्ही पोस्ट विषयाला धरून असोत वा नसोत .. अर्थात 'विषयाला धरून' ही एक popular phrase आहे सध्या HG वर .. आपल्या convenience प्रमाणे ह्याचा वापर केला की लोकं मग एकदम सावध होतात आणि आपल्या प्रत्येक पोस्ट नंतर disclaimer टाकतात .. " विषयाला धरून नसेल तर उडवून टाका .."

कधी काहि लोकं अनुकरणवाद करतात .. कधी खुले आम आपली पोस्टस् दुसर्‍यांच्या स्टाईल चे मोड आणून किंवा कधी मांजर डोळे मिटून दुध पितं तसं .. बारीच जणं सगळीकडे तत्वज्ञानाचं खत पेरत फ़िरत असतात .. तर इतर काहि शद्बरुपी किटकंनाशकांची फ़वारणी करत असतात .. पण एव्हढं असूनही काहि अहितगुजकारक parasites कसे काय जन्म घेतात हे एक मोठं कोडंच आहे ..

हल्ली आपाल्या व्यथा शेअर करायला उत्सुक असणार्‍या लोकांची संख्या मात्र बेमुदत वाढत चालली आहे .. तेव्हढी एकच फ़ांदी काय ती अजूनही हिरवीगार आहे ..


कुठे बरं लुप्त झालंय ते पुर्वीचं निखळ हितगुज? एकमेकांची खेळकर चेष्टामस्करी, हलक्या फ़ुलक्या कोपर खळ्या आणि अखंड वहाणारे TP चे बी बी? अतिशय रुक्ष आणि कोरडा वाटणारा हा हितगुज वरचा winter लवकर संपो आणि उत्साहाची नवी पालवी फ़ुटणारा spring लवकर येवो हीच त्या हितगुजकरांच्या चरणी प्रार्थना .. परत एकदा GTP नामक नदिला भरपूर पाणी येवो आणि त्यावर धरण बांधल्यामुळे आम्हाला धरणं धरण्याची वेळ येवो ..
प्रमाणिकपणा .. Is honesty still the best virtue?



परवा एक मैत्रीणीकडे गेले होते तेव्हा तिच्या नवर्‍यामधला आणि तिचा संवाद ऐकला ..

ती : indian grossary store मधून फ़ोन येऊन गेला .. काबुल एक्सप्रेस ची DVD परत द्यायची राहुनच गेली .. माझी मैत्रीण घेऊन गेली आहे तिच्याकडून उद्या परत घेते ..

नवरा : (थोड्या बेफ़िकीर tone मध्ये) त्या grossary store वाल्या माणसाला सांग की त्यात दोन dvds होत्या म्हणून वेळ लागला ..

मी हा प्रकार माझ्या बर्‍याच मैत्रीणींकडे पाहिला आहे .. indian store मधल्या, blockbuster मधल्या DVDs आणतात, किमान दोघीजणी तरी एकाच rental fee मध्ये बघून घेतात आणि मग परत देतात .. मझ्या तरी समजूतीप्रमाणे ह्या families well-off आहेत, आर्थिक दृष्ट्या, मग ह्या असल्या बाबतीत थोड्या अप्रामाणिकपणे पैसे वाचवणं हे योग्य आहे का? शक्य असेल तेव्हढ्या सगळ्या बाबतीत प्रामाणिक असणं अस्तित्वातच नाहि का आता?

हल्ली आमच्या 101 highway वर metering केलंय प्रत्येक merge ला .. चांगली system आहे ती .. peak hours ला प्रचंड गर्दी असते पण feeders वर metering बसवल्यामुळे highway flowing रहातो .. congestions कमी व्हायला मदत होते .. आणि मी तरी ह्याचा effect अगदी लगेच बघितला .. पण लोकांना त्यातही नियम मोडावेसे वाटतात .. मग मला नेहमी वाटतं, लोकं प्रामाणिकपणा विसरली का?

कितीतरी लोकांना खरं बोलण्याची allergy असते .. खोटेपणाने वागल्याचा फ़टका ह्या लोकांना कधीच बसलेला नसतो का? इकडे तर मी काहि लोकं अशी पाहिली आहेत जी घरचा फोनच उचलत नाहित आणि वर धादांत खोटं बोलतात .. माझी एक मैत्रीण कायम मुलाचा diaper बदलत असल्याचं निमित्त सांगते .. मुलगा सव्वा दोन वर्षांचा आहे आता .. आणि वर माझ्या हातून कधी फोन उचलला गेला नाहि तर छान ऐकवून दाखवते की मी फोन केला होता पण तू उचलला नाहिस .. आपण स्वतः कायम हेच करतो हे लक्षात कसं येत नाहि कधीच?

इथे हितगुज वर पण कितीतरी लोकं अशी आहेत जी चक्क खोटेपणा करतात .. बर्‍याच वेळेला त्यांचा खोटेपणा उघडा पडतो .. पण मूळात असं irrelevant, incoherent लिहीताना आपण करत असलेल्या अप्रामाणिकपणाचा त्रास होत नाहि का कोणाला?

जर प्रत्येकाने ठरवलं खरेपणाने, सच्चाईने, प्रामाणिकपणे वागायचं, आपल्या सद्सद्विवेकबुध्दीला पटेल तसंच वागायचं तर हे सगळं जग किती सुंदर होईल ना?

so, come on, let's make it a better place, for you and for me and the entire human race! .. Let's be honest, always!
एक आठवण

काल बरेच दिवसांनी आशा भोसलेंचं 'चांदण्यात फ़िरताना .. ' ऐकलं .. माझ्या आजीला हे गाणं अजिबात आवडत नाही .. तीच्यासमोर लावलं की म्हणते, " मग गेलीसच कशाला चांदण्यात त्याच्याबरोबर फ़िरायला .."
मन उधाण वार्‍याचे ..

गेले काहि दिवस जाम कंटाळा आलाय .. सगळं सोडून कुठेतरी छान vacation ला जावंसं वाटतंय .. पण उगीच अशीतशी vacation नाही .. इकडे अमेरिकेत असते तशी तर मुळीच नाही .. म्हणजे expedia वरून flight आणि car book करून आणी google वरच्या diections घेऊन सगळ्या त्याच त्या ठराविक, standardized पध्दतीने नाही .. गाडी आणि छान रस्ते असावेत पण मध्येच कुठेतरी चहाची टपरी लागावी, एखादा ढाबा लागावा जिकडे गाडी थांबवून गरम गरम पराठा, दहि आणि लोणच्याबरोबर खाता येईल .. छानपैकी पाऊस भुरभुरत असावा .. घाटातला रस्ता .. सगळीकडे तो fresh हिरवा, पोपटी रंग दिसावा .. आणि मग मध्येच जिथे वाटेल तिथे थांबून एखाद्या खडकावर बसून रहावं .. पावसाची भुरभुर झेलत, थोडंसं शहारत प्रसन्न मनाने ते सौंदर्य भरून घ्यावं मनात .. त्या देखाव्याने मन तृप्त झालं की मग एखाद्या ढगाळलेल्या डोंगरमाथ्यावर जावं .. वरून दिसणारा, दरीतला नागमोडी वळणाचा काळाभोर रस्ता निरखावा .. तिखट मीठ लावलेली रसरशीत काकडी खावी .. मनात मातीचा मनोहर सुगंध दरवळत रहावा .. अजिबात कसली चिंता नको, विवंचना नको .. कुठे परतायची घाई नको नी कसलंच वेळापत्रक नको .. सगळा परिसरच स्वच्छंदी असावा .. पाऊस आणि शहारणारी थंडी अनावर झाली कि घरी परतावं .. ते घर मात्र समुद्रकिनारी असावं .. घराला छानसा झोपाळा असावा ज्याच्यात बसलं की अनंतापर्यंत फ़क्त नीळंशार, मध्येच हिरव्या छटा असणारं समुद्राचं पाणी दिसावं .. फ़ोटोतल्यासारखं, मोठ्ठं केशरी दिसणारं आणि भरपूर वेळ रेंगाळणारं सूर्यबिंब दिसावं .. जुन्या आठवणी काढाव्या, त्यांच्याशी relate होऊ शकणारं कोणीतरी असावं आणि मग भरपूर गप्पा माराव्यात ..

कधी बरं मिळेल अशी vacation?


एक बोचलेला किस्सा!

काल आमच्या Foster City च्या India Cash 'n Carry तून खोबर्‍याची चटणी आणली, Shasta brand ची .. आतापर्यंत इडली, डोसा ह्यांचं तयार batter , तयार चटणी ह्यांचा अनुभव चांगला होता त्याप्रमाणे कालही आणली चटणी .. थंडगार खाण्यापेक्षा room temperature ला बरी लागते म्हणून fridge मधून बाहेर काढून ठेवली होती, साधारणतः एक तासभर, म्हणजे तासभर बाहेर राहिली होती .. खाण्यापुर्वी सहज म्हणून टेस्ट केली आणि disappointment .. चव पार उतरली होती आणि वास घेउन बघितला तर खवट येत होता ..

मी लगेच ती चटणी परत घेऊन गेले आणि म्हंटलं खराब झालीये तर Cash 'n Carry तला दुकानदार म्हणतो, दुसरी घेउन जा .. चेहेर्‍यावर कुठेही दिलगिरी नाहि .. दुसरा डबा बघावा म्हणून त्यांच्या refrigerator मधून काढून मुद्दम वास घेतला तर त्यालासुध्दा slight खवट वास येतच होता .. आणि ह्या सगळ्या डब्यांवर sell by डेट होती, २२ सप्टेंबर .. सांगायचा मुद्दा हा की, एक तास बाहेर राहिल्यामुळेच ती खराब झाली ह्याची शक्यता मला वाटत नाहि .. एकतर जो नारळ वापरला तो तरी खराब असावा किंवा मग त्याची (चटणीची) हाताळणी तरी नीट झाली नसावी ..

मला अशा प्रकारचा अनुभव ह्याच दुकानात दीप किंवा तत्सम frozen भाजीच्या बाबतीत एकदा आणि दुधाच्या बाबतीत एकदा आलाय .. मागे एकदा दीप ची frozen भाजी आणली ह्या दुकानातून तेव्हासुध्दा ती सगळी भाजी त्यातल्या tray च्या एका बाजूला गेलेली दिसत होती .. ह्याचा अर्थ बहुदा ती एकदा(?) thaw होऊन कदाचित तो pack तिरका वगैरे हून परत freez झाली असावी .. कधीतरी एकदा तिकडचं दूध sell by डेट च्या आधीच चहासाठी गरम करताना नासलं (फ़ाटलं) होतं ..

माझ्या अंदाजाप्रमाणे Cash 'n Carry चं primary outfit sunnyvale ला आहे .. आमचा Foster City तला दुकानदार बहुधा दररोज (किंवा जी काहि frequency असेल त्याची, भाज्या आणि refrigerated/ frozen products restock करण्याची त्याप्रमाणे तो माल Sunnyvale हून त्याच्या Odyssey मध्ये घालून इकडे Foster City त घेऊन येतो आणि मग त्याचा assistant तो माल दुकानात stock up करतो .. म्हणजे हे जर खरं असेल तर ही शक्यता नाकारता येत नाहि की refrigerated/frozen माल हा किमान एक तासभर तरी बाहेरच रहातो .. मग त्यात Shasta Foods कडून थोड्या जरी substandard quality चं खोबरं वापरलं गेलं असेल तर मग चटणी अशी खराब झाली ह्यात आश्चर्य काहिच नाहि ..

बरं दुकानात जाऊन हे सांगितलं तर ह्यांच्या चेहेर्‍यावर दिलगिरी ची एक बारीकशी रेषही उमटत नाहि .. refund देण्याची भाषा दूरच! जणू ह्या प्रकारात ते पुर्णपणे नामानिराळे असल्याचा भाव .. हे असं का?

आमचं Foster City म्हणजे छोटं town आहे .. हा दुकानदार त्याच्या बायको - मुलांसकट माझ्या apt. जवळच रहातो .. चांगली ओळख आहे माझी त्याच्या बायकोशी .. हिंदी सिनेमे ह्याच्याचकडून rent करतो आम्ही .. बाकी जी काहि Indian grossary लागते ती सुध्दा ह्याच्याचकडून घेतो आम्ही .. तर चटणी प्रकारात उपाय म्हणून वर लिहीलेलं सगळं समजाऊन सांगायचा प्रयत्न केला किंवा त्या दुकानदाराला जाब विचारला तर मला खात्री आहे की त्याची परिणती एक चांगलं relation बिनसण्यात होणार .. म्हणजे हा प्रकार अगदी 'पाण्यात राहून माशाशी वैर' इतका severe नसला तरी unpleasant नक्कीच आहे .. पण मग ह्यावर उपाय काय? मनात आणलं तर त्या दुकानदाराला sue करता येईल पण ह्यातून निष्पन्न काय होणार? ह्या प्रकारातून fine म्हणून पैसे वसूल करणं हे तर आमचं उद्देष्ट नाहिये .. पण consumer म्हणून मी जे पैसे मोजतेय त्याच्या बदल्यात चांगल्या quality चा माल मिळावा अशी माफ़क अपेक्षा आहे .. पण हे साध्य कसं होणार? आवाज केला तर relation बिघडणार .. तत्वाला चिकटून रहायचं तर, Indian grossary store मधून माल विकत घेण्यातले जे 'ईतर' फ़ायदे आहेत त्यांना मुकायला हवं मग .. अगदी स्पष्ट सांगायचं तर, कमी किमतीतलं organic दूध, भाज्या (गवार, पापडी, तोंडली ई. सोडून) मीठ, साखर इ. गोष्टी (ज्या Safeway मध्ये थोडे जास्त पैसे देऊन घ्याव्या लागतात) .. त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे हिंदी सिनेमाच्या DVD's हे सगळं मग बंद करावं लागेल .. आणि परत ह्याचा त्या दुकानदारावर काहिही परिणाम होणार नाहि कारण एक गिर्‍हाईक गेलं तर त्याला काय फ़रक पडतोय .. नुसतंच गप्प बसणं पण सहन होत नाहि ..

का बरं अशी उदासीनता असावी? Indian grossary stores, restaurants असल्या ठिकाणी consumer welfare बद्दल जी उदासीनता, indifference आणि बर्‍याच अंशी मग्रुरी असते ह्याचं अंशतः कारण आपण Indian consumers च तर नाहि ना? कदाचित आपली स्वस्त, substandard मालाची easy acceptability , आवाज न उठवण्याचा स्वभाव, pirated DVDs बघण्याची हौस ही कारणं असू शकतील का ह्यामागे?

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner sashal Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators