Rar
| |
| Monday, June 26, 2006 - 11:00 pm: |
| 
|
अमोल, सहीच! आता तुझ्याकडून क्रिकेटबद्दल आणि movies and songs बद्दल वाचायला मिळणार म्हणून खूप आनंद झालाय ( I am sure अजून पण वेगवेगळ्या विषयांवर तू लिहीत असणार. मला सध्या इतकच माहीत आहे!) so आता लवकर (आणि regularly ) लिहायला चालू कर. .... about farend by Farend
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 2:37 pm: |
| 
|
वा जागा मिळाल्याबद्दल अभिनंदन. सुरुवात पण एकदम झकास. अन हो अमिताभला माझ्या किशोरकुमारशिवाय दुसर्या कुणाचा आवाज सुट होत नाही असे मला निदान 95 % तरी वाटते. एकदम मर्दानी ना! बाकी अजून येऊ दे, आमच्यासारखाच अमिताभप्रेमी दिसतोयस.
|
अरे वा! अमिताभ बच्चन जिंदाबाद का तू पण मला लहानपणीच कुणी मोठ्यानी सांगून टाकलेलं की "अरे हे हिरो लोकं फ़क्त तोंडाच्या हालचाली करतात... गाणारा वेगळाच असतो". पण त्यामुळे जेव्हा किशोर कुमार चे जुने चित्रपट लागायचे मधुबाला बरोबरचे तेव्हा खूप कौतुक वाटायचं किशोर कुमारचं
|
Chinnu
| |
| Thursday, July 13, 2006 - 6:43 pm: |
| 
|
वा वा वा मज्जा आली!
|
Yog
| |
| Thursday, July 13, 2006 - 8:32 pm: |
| 
|
लेखन चान्गले आहे. "ये दोस्ती" हे शोले चित्रपटा मधिल गाणे किशोरदा अन मन्नाडे या दोघानी गायलेले आहे कधी कधी रफ़ीचा आवाज अमिताभला चक्क सूट करत असे. ex: अभिमान मधिल "तेरी बिन्दीया रे" हे गाण किव्वा "जॉन जॉनी जनार्दन" हे गाणे. मला वाटत या "सूट" होण्यामागे अमिताभ ते गाणे ज्या पध्धतीने पडद्यावर "साकारत" असे त्याचे श्रेय अधिक आहे.
|
स्वाभिमान मधिल >> योग, अरे अभिमान आहे रे ते.
|
छानच लिहीले अहेस. किशोरदा स्वर्गवासी झाल्यावर, सुदेश भोसले जेव्हा आला तेव्हा सगळे त्याला प्रती किशोर म्हणू लागले. पण किशोर तो किशोर. तरीही सुदेश भोसलेने ईंडस्ट्री मधे आपले एक स्थान कायम केले ते अमिताभला आवाज देवूनच. त्याने गायलेली `जुम्मा चुम्मा दे दे`, `सोना सोना`, `मेरी मखना` ही अमिताभनेच गायल्या सारखी वाटतात. म्हणूनच त्याला `Voice of Bacchan` म्हणले जाते. सुदेशच्या अवाजाची कमाल म्हणजे `तेजाब` मधे अनिल कपूरचा ७०% अवाज सुदेश भोसलेचा आहे. असो. पण अमिताभ ग्रेट म्हणून सुदेश ग्रेट.
|
Badbadi
| |
| Friday, July 14, 2006 - 3:21 am: |
| 
|
`तेजाब` मधे अनिल कपूरचा ७०% अवाज सुदेश भोसलेचा आहे. >> केपी, हे खरंय.. पण ते फ़क्त सुरुवातीच्या 25-30 prints पुरतंच मर्यादित आहे.. नंतर च्या सगळ्या prints मध्ये अनिल कपूर चा आवाज आहे..
|
Rajkumar
| |
| Friday, July 14, 2006 - 6:22 am: |
| 
|
सहीच रे. खुप मोठ्या विषयाला हात घातलायंस. keep it up!
|
चला आणख़ी एक अमिताभ किशोर फ़्यान मिळाला.
|
Bhagya
| |
| Tuesday, October 31, 2006 - 9:07 pm: |
| 
|
खतरनाक! चला आता माझ्या आवडीच्या कलाकारांबद्दल अजुन वाचायला मिळेल.
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:31 am: |
| 
|
ह्या बीबीवरील पोष्ट टिपिकल पुणेरी आहेत.
|
Raina
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:48 am: |
| 
|
Roger and Mooreबद्दल ची माहिती खूप interesting आहे. BTW तुम्ही म्हणत होता ते तेलावरचे पुस्तक आता मिळाले आहे. Thanks for mentioning it. वाचून झाले की सांगते.
|
Bee : ह्या बीबीवरील पोष्ट टिपिकल पुणेरी आहेत. का रे बाबा बी, असे काय झाले येथे?
|
Manya2804
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:56 am: |
| 
|
धन्यवाद Far End , खुपच छान लिहीलं आहेस. 'एक नज़र' मधे रफीने गायलेल आणि अमिताभ वर चित्रीत झालेलं "ऐ गम-ए-यार बता कैसे जिया करते है" हे पण एक मस्त गाणं होत.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 02, 2006 - 5:18 pm: |
| 
|
त्याला टर्नटेबल म्हणतात का ? पुर्वी लोअर परेल ला होते तसे एक. पुण्याला कुठलिही गाडी वीस मिनिटांपेक्षा जास्त थांबत नाही, पण तेवढ्या काळात तिथे बरेच काहि घडते, याबद्दल अनिल अवचटानी एक छान लेख लिहिला होता. पुर्वी कांजुरमार्गला एक स्टेशनचा सेट आणि एक गाडी ठेवली होती. बर्याच सिनेमाचे शुटिंग तिथे झालेय.
|
अरे सही अमोल. मला ही डेक्कन च फार attraction आहे. माझे शेजारी रोज डेक्कन नी जायचे तेव्हा अनेक किस्से सांगायचे. ज़ागा पकडुन ठेवने, सणाचा दिवशी डेक्कन ला सजवने वैगरे. मी ही खुपदा डेक्कन ने गेलो आहे. एक वेगळीच गाडी. अगदी तसेच आकर्षण मला तपोवन चे पण आहे. ( ही मुंबई नांदेड असते).
|
Milindaa
| |
| Monday, November 06, 2006 - 2:26 pm: |
| 
|
अमोल, चालक निवृत्त होताना त्याला डेक्कन क़्वीन चालवायला मिळणे असे प्रत्यक्षात होते (आणि आहे), आणि तो एक मान समजला जातो. त्या दिवशी डेक्कन चे इंजिन पण सजवलेले असते आणि प्रत्येक स्टेशन वर त्या चालकाचा छोटा सत्कार केला जातो. मला जर नीट आठवत असेल तर मुंबईहून पुण्याला जाणार्या शताब्दीसारख्या गाड्या नेहमीच्याच रुळावर(प्लॅटफॉर्म च्या शेजारी) थांबायच्या, मधल्या नाही. कर्जत ला रूळ असे वापरले जातात(जायचे) रूळ १ : मुंबई - पूणे platform रूळ २ : bankers/ मागे लागणारी इंजिने येथे उभी असतात, लोणावळ्याहून येतात आणि येथे विश्रांती घेतात.. या इंजिन मधून यायला खूप मजा येते (आजकाल हीच इंजिने पुढे पण असतात) रूळ ३ : पुण्याहून मुंबईकडे जाणार्या आणि कर्जत ला न थांबणार्या गाड्यांसाठी (सकाळच्या डेक्कन, प्रगती इ.) रूळ ४ : पूणे - मुंबई platform रूळ ५ : लोकल (कर्जत ते मुंबई) चा platform . यालाच LSU (किंवा तत्सम) नाव आहे रूळ ६ : खोपोली ला जाणार्या गाडीचा platform आणि हो, शताब्दी सारख्या गाड्यांना तुम्ही कर्जत ला चढू शकता, तुमचा पुणे मुंबई पास असेल तर अजूनही इंद्रायणी च्या आरक्षित जागा सोडल्या तर हीच परिस्थिती आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, November 06, 2006 - 4:21 pm: |
| 
|
डेक्कनला ५० वर्षं झाल्यावर टिव्हीवर एक खास कार्यक्रम झाला होता. त्यातील प्रवाश्यानी सांगितलेल्या आठवणी मजेदार आहेत. त्यापैकी एकाला घाटात बिया फेकायचा नाद होता. त्या बियातुन घाटात काहि गुलमोहोराची झाडे उगवलेली दाखवली होती. एक कल्याण लोकल ५ वाजता व्हीटीहुन सुटते. पण मागुन येणार्या डेक्कनला वाट देण्यासाठी ती गाडी मुलुंडला एक नंबरवर घेतात. हिही आठवण जुनीच आहे. या गाडीला मी प्रत्यक्ष लता मंगेशकरला बघितलेले आहे. पुण्याला हि गाडी नेहमी एक नंबरलाच लावतात. म्हणजे मग व्ही आय पी लोकाना जिने चढावे लागत नाहीत. बाकि सगळ्या गाड्याना कर्जतला जादा ईंजिन्स लावावी लागत असली तरी हिला " जिवनयान का सिरा " असल्याने, त्याची गरज नसे.
|
Milindaa
| |
| Monday, November 06, 2006 - 6:43 pm: |
| 
|
अगदी डेक्कन क़्वीन ला देखील ही इंजिने लावतच असत. फरक एवढाच असे की ही गाडी यायच्या आधीपासून इंजिने जय्यत तयारीत असत, गाडी फलाटावर लागेपर्यंत इंजिने मागे आलेली असत.. नंतर ही सोय (इंजिने तयार ठेवण्याची) सर्वच गाड्यांसाठी केली गेली
|